दिर्घ कथा * मीना गोगावले

(पहिला भाग)

‘‘कहीं दूर जब दिन ढल जाए, सांझ की दुलहन बदन चुराए, चुपके से आए, मेरे खयालों के आंगन में...’’ गाणं गुणगुणतच राजन बाथरूममधून बाहेर आला अन् म्हणाला, ‘‘वहिनी, माझा ब्रेकफास्ट...मला लवकर जायचंय आज.’’

त्याच्याकडे बघत हसून राधिकेनं म्हटलं, ‘‘काय भाऊजी? विशेष खुशीत दिसताय?

हल्ली रोजच ‘सांझ की दुलहन’ आठवतेय तुम्हाला?’’

‘‘काही नाही गं, रेडियोवर ऐकलं अन् सहज गुणगुणलो.’’

‘‘एखादं गाणं गुणगुणावसं वाटतं त्याचं काय कारण असतं माहीत आहे?’’

‘‘मला नाही माहीत,’’ काहीशा बेपवाईनं राजननं उत्तर दिलं.

‘‘याचा अर्थ असा की गाण्याचे शब्द तुमच्या हृदयात खोलवर झिरपले आहेत. एखादं गाणं जेव्हा नकळत ओठांवर येतं, तेव्हा मनात ती प्रतिमा आधीच तयार झालेली असते.’’

‘‘काही तरीच काय वहिनी...तू ही ना...’’

‘‘ऑफिसात कुणी बघून ठेवली आहे का? असेल तर मला सांगा, मी सांगते तुमच्या दादांना. ठरवून टाकूयात लग्न.’’

‘‘नाहीए गं कुणी, असती तर सांगितलंच असतं ना?’’

‘‘खरं?’’

‘‘अगदी खरं!’’ हसून राजननं म्हटलं अन् तिच्याकडे बघत म्हणाला, ‘‘एक सांगू?’’

‘‘सांग ना.’’

‘‘वहिनी, मला ना, सांझ की दुलहनच पाहिजे.’’

‘‘आता ती कशी असते बाई? आम्ही तर अशी कुणी नवरी बघितलीच नाहीए?’’

‘‘खूप खूप सुंदर! उतरून येणाऱ्या सायंकाळसारखी शांत, सर्व प्रकाश आपल्यात समावून घेतलेली, डोंगरामागे दडणाऱ्या सूर्याच्या सावळ्या प्रकाशासारखी, पानांमधून डोकावणाऱ्या कवडशांसारखी, रात्रीच्या चमचमणाऱ्या आकाशासारखी, डोळ्यातल्या स्वप्नासारखी...अतिशय सुंदर...!!’’

‘‘म्हणजे थोडक्यात तुम्हाला कवितेशी लग्न करायचंय.’’

‘‘कविता नाही वहिनी. ती प्रत्यक्षात असणार आहे. जशी सोनेरी गुळाबी संध्याकाळ स्वप्नातली असूनही प्रत्यक्षात असतेच ना? मला तिच हवीय, हुंडा नाही, मानपान नाही, काही नको.’’

‘‘म्हणजे तुम्ही शोधताय?’’

‘‘नाही, अजून तसं काहीच नाही.’’

‘‘मग?’’

‘‘आता तर फक्त मिटल्या डोळ्यातून डोकावते.’’

‘‘असं  मग काय म्हणते? सांगा की...’’

‘‘काही नाही. फक्त येते अन् जाते, उद्या येते एवढं वचन देते.’’

‘‘भाऊजी, स्वप्नं बघायला लागलात...चांगला संकेत आहे. बाबांना सांगते,’’

नाश्त्याची बशी त्याच्या हातात देत राधिका हसून बोलली.

राधिकेचा दीर राजन खूपच संवेदनशील, अतिशय सज्जन, मनाचा निर्मळ अन् खूप प्रेमळ. सगळ्यांशी मिळून मिसळून वागणारा. सगळ्या सोसायटीत राजनदादा म्हणून प्रसिद्ध. कॉलनीतले सगळेच त्याच्या ओळखीचे. वाटेत चालताना, भेटलेल्या कोणी, आजही अडचण सांगितली की राजननं त्याला मदत केलीच म्हणून समजा. अन् वर सहजपणे म्हणेल, ‘‘त्याला गरज होती, मी मदत करू शकत होतो...केली!’’

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...