कथा * शन्नो श्रीवास्तव

या नव्या कॉलनीत येऊनही मला खरं तर बरेच दिवस झाले होते. पण वेळ मिळत नसल्यानं माझं कुणाकडे जाणं, येणं होत नसे. मुळात ओळखीच झाल्या नव्हत्या. मी शाळेत शिक्षिका होते. सकाळी आठला मला घर सोडावं लागायचं. परतून येईतो तीन वाजून जायचे. आल्यावर थोडी विश्रांती, त्यानंतर घरकाम, कधी बाजारहाट वगैरे करत दिवस संपायचा. कुणाकडे कधी जाणार?

माझ्या घरापासून जवळच अवंतिकाचं घर होतं. तिची मुलगी योगिता माझ्याच शाळेत, माझीच विद्यार्थिनी होती. मुलीला सोडायला ती बसस्टॉपवर यायची. तिच्याशी थोडं बोलणं व्हायचं. हळूहळू आमची ओळख वाढली. मैत्री म्हणता येईल अशा वळणावर आम्ही आलो. सायंकाळी अवंतिका कधीतरी माझ्या घरी येऊ लागली. इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या.

तिचं बोलणं छान होतं. राहणी टापटीप होती. तिचे कपडे, दागिने, राहाणीमान यावरून ती श्रीमंत असावी असा माझा कयास होता. नव्या जागी एक मैत्रीण भेटल्यामुळे मलाही बरं वाटत होतं.

योगिता अभ्यासात तशी बरी होती पण तिचा होमवर्क कधीच पूर्ण झालेला नसे. अगदी सुरुवातीला मी तिला एकदा रागावले की होमवर्क पूर्ण का केला नाही, तेव्हा ती रडवेली होऊन म्हणाली, ‘‘बाबा मम्मीला रागावले, ओरडले म्हणून मम्मी रडत होती. माझा अभ्यास घेतलाच नाही.’’

नंतरही तिचा होमवर्क पूर्ण झालेला नसायचा अन् कारण विचारल्यावर ती नेहमीच आईबाबांच्या भांडणाबद्दल सांगायची. अर्थात्च एक टीचर म्हणून कुणाच्याही घरगुती बाबतीत मी नाक खुपसणं बरोबर नव्हतं. पण पुढे जेव्हा आमची मैत्री झाली अन् योगिताच्या अभ्यासाचा प्रश्न असल्यामुळे मी एकदा अंवतिका घरी आलेली असताना तिला याबद्दल विचारलं. तिनं डोळ्यांत पाणी आणून मला सांगितलं, ‘‘घरातल्या अशा गोष्टी बाहेर कुणाजवळ बोलू नयेत हे मला समजतं. पण आता तुम्हाला आमच्या भांडणाबद्दल समजलंच आहे तर मी ही तुमच्याशी बोलून माझ्या मनावरचा ताण कमी करून घेते. खरं तर माझ्या नवऱ्याचा स्वभावच वाईट आहे. ते सतत माझे दोष हुडकून माझ्यावर खेकसत असतात. कितीही प्रयत्न केला तरी हे खूश होत नाहीत. त्यांच्या मते मी मूर्ख अन् गावंढळ आहे. तुम्हीच सांगा, मी वाटते का मूर्ख अन् गावंढळ? मी थकलेय या रोजच्या भांडणांनी...पण सहन करण्याशिवाय दुसरा काही पर्यायच नाहीए माझ्याजवळ.’’

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...