* प्रतिनिधी
१५ जुलै २०२५, मुंबई* – झी एंटरटेनमेंट एंटरप्राईजेस लिमिटेड (झी) हे अग्रगण्य कंटेंट आणि तंत्रज्ञान पॉवरहाऊस. *‘झी रायटर्स रूम’* ची अभिमानाने घोषणा करत आहेत. हा एक लॅन्डमार्क उपक्रम असून यातून देशभरातील युवा आणि भावी पटकथालेखकांना शोधून त्यांचे संवर्धन करण्याचे त्यांचे उद्दिष्ट्य आहे. 'झी रायटर्स रूम' हा केवळ एक टॅलेंट हंट नाही, तर 'युअर्स ट्रुली, झी' या कंपनीच्या ब्रँड तत्त्वज्ञानाशी सुसंगत असलेली एक सर्जनशील चळवळ आहे. विविध प्लॅटफॉर्म्सवरील झीच्या कंटेंटचा दर्जा उंचावण्याचा हा उपक्रम आहे. नव्या दृष्टिकोनांची मागणी असलेल्या या काळात, या उपक्रमाचा उद्देश हा अस्सल कथा सांगण्याची क्षमता असलेल्या नवोदितांना व्यावसायिक पटकथालेखनाच्या जगाशी जोडणे हा आहे. या माध्यमातून निवडले गेलेले लेखक झीच्या टीव्ही, डिजिटल आणि चित्रपट प्लॅटफॉर्म्ससाठी कथा लिहिण्याची संधी मिळवू शकतील.
‘झी’च्या सेंट्रल कंटेंट आणि प्रादेशिक टीम्सच्या पुढाकाराने राबवण्यात येणारा हा उपक्रम, भारताच्या सातत्याने विकसित होत असलेल्या मनोरंजन विश्वाच्या गरजा आणि देशभरातील न टिपल्या गेलेल्या प्रतिभा यांच्यातील दुवा साधण्याचे काम करणार आहे. 'झी रायटर्स रूम' या उपक्रमाची घोषणा *सात भारतीय भाषांमध्ये* करण्यात आलेल्या मनाला भिडणाऱ्या ब्रँड फिल्मद्वारे करण्यात आली. या फिल्मच्या उद्देश एकच आहे *"उद्याचे लेखक घडवणे."* ही एकसंध अशी दूरदृष्टी या फिल्मच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडण्यात आली आहे.
*८० शहरांमध्ये* आणि *३२ कार्यक्रम केंद्रांमध्ये* राबवला जाणारा हा उपक्रम *ऑन-एअर, डिजिटल आणि ऑन-ग्राऊंड प्लॅटफॉर्म्सवरून* चालवलेल्या जोरदार प्रचार मोहिमेमुळे आणखी प्रभावी ठरत आहे. या उपक्रमाचा उद्देश *मराठी, हिंदी, बंगाली, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम* या भाषांमधील प्रतिभावान कथाकारांना शोधून त्यांना एक अद्वितीय संधी देणे हाच आहे — ही एक अशी सहयोगी रायटर्स रूम आहे जिथे कल्पकता, शिस्त आणि रचनात्मक कलेला वाव मिळेल.
या उपक्रमाबद्दल बोलताना *झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेडचे चीफ क्रिएटिव्ह ऑफिसर राघवेंद्र हुंसूर* म्हणाले, "भारतातील सर्वात मोठ्या स्टोरीटेलर्सपैकी एक म्हणून, पुढच्या पिढीतील लेखन प्रतिभेला घडवणे ही केवळ आमच्यासाठी संधी नाही, तर आमची जबाबदारी आहे. झीमध्ये आम्ही मानतो की आमची खरी ताकद केवळ आम्ही सांगत असलेल्या कथांमध्ये नाही, तर त्या कथा सांगणाऱ्या लेखकांमध्ये आहे – जे आम्ही शोधतो आणि घडवतो. ‘झी रायटर्स रूम’च्या माध्यमातून आम्ही एक असे व्यासपीठ तयार करत आहोत जिथे अस्सल आवाज, न ऐकले गेलेल्या कल्पना आणि प्रामाणिक भावनांना स्वतःचा आकार मिळू शकेल. हा कार्यक्रम स्पर्धात्मक नाही – ही आमची बांधिलकी आहे, भारताच्या प्रत्येक कोपऱ्यातून येणाऱ्या लेखकांना योग्य साधने, मार्गदर्शन आणि आत्मविश्वास देण्याची, जेणेकरून ते कालातीत अशा प्रभावी कथा सर्व स्क्रीनवर, सर्व प्रांतांमध्ये, सर्व शैलींमध्ये तयार करू शकतील - आमचे काम म्हणजे नव्या सर्जनशील प्रतिभेला सक्षम बनवणे, त्यांना लेखनकौशल्य, धैर्य आणि संधी देणे. कारण स्टोरीटेलिंगचे भवितव्य हे केवळ आपण काय तयार करतो यावर नाही, तर आपण कोणासोबत तयार करतो यावरही अवलंबून आहे."