कथा * मीना वाखले

वैदेही कमालीची बेचैन झाली होती. अचानक सौरभचा ई मेल वाचून, तोही दहा वर्षांनी प्रथमच आलेला ई मेल बघून ती अंतर्बाह्य ढवळून निघाली होती. तिला न जुमानता तिचं मन सौरभचाच विचार करत होतं... का? का तो तिला अचानक सोडून गेला होता? न कळवता, न सांगता पार नाहीसाच झाला होता. मारे म्हणायचा, ‘‘मी तुझ्यासाठी आकाशातले तारे तोडून आणू शकत नाही, पण जीव देईन तुझ्यासाठी...पण नाही, जीव तरी कसा देऊ? माझा जीव तर तुझ्यात वसलाय ना?’’ हसून वैदेही म्हणायची, ‘‘खोटारडा कुठला...अन् भित्रासुद्धा’’ आज इतक्या वर्षांनी हे सगळं आठवल्यावरही वैदेहीच्या चेहऱ्यावर हास्य उमललं होतं. पण दुसऱ्याच क्षणी त्याने केलेल्या विश्वासघाताची आठवण येऊन तिचा चेहरा रागाने लाललाल झाला. पुन्हा प्रश्नांचा तोच गुंता... तो मुळात तिला सोडून गेलाच का? अन् गेलाच होता तर आज ई मेल कशाला केला?

वैदेहीने मेल पुन्हा वाचला. फक्त दोन ओळी लिहिल्या होत्या सौरवने, ‘‘आय एम कमिंग टू सिंगापूर टुमारो, प्लीज कम अॅण्ड सी मी. विल अपडेट यू द टाइम प्लीज गिव्ह मी योअर नंबर. विल कॉल यू.’’

वैदेहीला कळेना, त्याला नंबर द्यावा की न द्यावा? इतक्या वर्षांनंतर त्याला भेटणं योग्य ठरेल की अयोग्य? आज मारे ईमेल करतोए पण दहा वर्षांत भेटायची एकदाही इच्छा झाली नाही? मी जिवंत आहे की मेलेय याची चौकशी करावीशी वाटली नाही? आता परत यायचं काय कारण असेल? प्रश्न अन् प्रश्न...पण उत्तर एकाचंही नाही.

पण शेवटी तिने त्याला आपला नंबर पाठवून दिला? खुर्चीवर बसल्या बसल्या तिला त्या दोघांची पहिली भेट आठवली.

दहा वर्षांपूर्वी ‘फोम द शॉपिंग मॉल’च्या समोर ऑर्चर्ड रोडवर वैदेहीला कुणा कारवाल्याने ठोकरलं होतं. तो बेधडक निघून गेला. रस्त्यावर पडलेली वैदेही ‘हेल्प..हेल्प..’ म्हणून ओरडत होती. पण त्या गर्दीतला एकही सिंगापुरी तिच्या मदतीला येत नव्हता. कुणी तरी पोलिसांच्या हेल्पलाइनला फोन केला.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...