कथा * नीरजा श्रीखंडे

‘‘प्रेरणा वहिनी, कुठं आहेस तू?’’ अंबुजनं डोक्यावरचं हेल्मेट काढून बाजूला ठेवलं अन् हातातला पुडा डायनिंग टेबलवर ठेवला. भिजून आला होता तो, शर्ट जरा झटकला अन् म्हणाला, ‘‘आत्तासाठी मी जेवण बाहेरून आणलंय, तू आता काहीही करत बसू नकोस.’’ तो आपल्या खोलीतून फ्रेश होऊन बाहेर आला तोवर प्रेरणाही तिच्या खोलीतून हॉलमध्ये आली होती.

ती एवढ्यातच कानपूरहून एक इंटरव्ह्यू देऊन परतली होती. रात्रीचे आठ वाजले होते. प्रेरणाचा नवरा पंकज त्याच्या नोकरीच्या टूरवर गेलेला होता. म्हणूनच प्रेरणानं अंबुजच्या मदतीनं हा इंटरव्ह्यूचा घाट घातला होता आणि तो पारही पाडला होता. पंकज असता तर त्यानं तिला जाऊच दिलं नसतं. तो चिडला असता, रागावला असता. अंबुजनंच पेपरला जाहिरात बघितली होती. त्यानं तिला त्यासाठी ऑनलाइन फॉर्म भरून दिला होता. तिला कानूपरचं तिकिट काढून देऊन गाडीतही बसवून आला होता. इथून तो सतत फोनवर तिची चौकशी करत होता. प्रेरणा कानपूरहून नोकरी पक्की करूनच आली होती. ही बातमी ऐकून अंबुजही आनंदला होता. पंकजला मात्र तिनं ही बातमी अजून दिली नव्हती, कारण त्याचा फोन लागत नव्हता.

‘‘अरे, तू भिजून आला आहेस? मी घरी पटकन् काही तरी केलं असतं रे...मला ठाऊक आहे गेले तीन चार दिवस तू फक्त ब्रेड, सूप, दूध एवढ्यावरच आहेस. बाहेरचं जेवण तुला आवडतही नाही,’’ प्रेरणानं म्हटलं.

अंबुज फक्त हसला. प्रेरणानं म्हटलं, ‘‘मी आधी चहा करते. आल्याचा चहा तुलाही चालेल ना,’’ तिच्या हातचा चहा त्याला आवडतो हे ती जाणून होती.

‘‘हो वहिनी, तू गेल्यापासून चहा प्यायलोच नाहीए. मला काही तुझ्यासारखा चहा जमत नाही आणि माझ्या हातचा चहा मला आवडतच नाही,’’ भाबडेपणानं अंबुज म्हणाला.

‘‘माझ्या धाकट्या जावेनं आता लवकरात लवकर घरात यायला हवंय. ती आली की तुझ्या आवडीच्या चहापासून सगळं तिला शिकवेन मी. मग तुझे हाल नाही होणार,’’ प्रेरणानं चहाचा कप त्याच्या हातात देत म्हटलं.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...