कथा * ऋचा गुप्ते

शेजारच्या खोलीतून मघापासून बोलण्याचे आवाज ऐकायला येत होते. संभाषण साधच असावं पण दोघंही इतकी हसत होती की सांगता सोय नाही. काय करताहेत दोघं? रमणच्या छातीत शूळ उठला होता. रमणच्या मनात आलं की उठून त्या कोपऱ्यातल्या खोलीत जाऊन दार लावून मोठ्या आवाजात संगीत सुरू करावं. नकोच ते हसण्या बोलण्याचे आवाज. तरीही मनात एक किडा वळवळत होता. तो त्याला स्वस्थ बसू देत नव्हता.

काजल गात होती :

‘‘काल पाहिले मी स्वप्न गडे

नयनी मोहरली गं आशा

बाळ चिमुकले खुदकन् हसले

काल पाहिले मी स्वप्न गडे.’’ काजल गात होती अन् रोहन शिटीवर तिला साथ देत होता. सोफ्यावर पडल्या पडल्या रमणनं मनातच त्याला शिवी दिली ‘निर्लज्ज कुठला.’ कुणास ठाऊक आता काय सांगतोय काजलला...इतकी का हसतेय ती...आता मात्र रमणचा संयम संपला. संतापून उठला अन् पाय आपटत काजलच्या खोलीत पोहोचला.

‘‘काय चाललंय मघापासून खिदळणं? इतकं काय घडलंय? अरे, मला स्वत:च्या घरातही काही वेळ शांतता लाभू नये का?’’

रोहननं ‘‘सॉरी-सॉरी’’ म्हणत तिथून काढता पाय घेतला. काजल मात्र अजूनही गुणगुणत होती.

‘‘इवली जिवणी, इवले डोळे,

भुरूभुरू उडती केसही कुरळे,

रूणुझुणु रूणुझुणु वाजती वाळे,

रंग सावळा, तो कृष्ण रडे,

काल पाहिले मी स्वप्न गडे...’’

रोहन तिथं नसल्याने आता रमणला तिचं गुणगुणणं आवडू लागलं. त्याने डोळे भरून काजलकडे बघितलं. सातवा महिना लागला होता. किती सुंदर दिसत होती ती. सर्वांगावर तेज आलं होतं. पूर्वीची एकेरी अंगलट आता गोलाईत बदलली होती. मातृत्त्वाच्या तेजानं झळाळत होती काजल.

गरोदरपणी स्त्री सर्वात छान दिसते. मातृत्त्वामुळे आयुष्याला येणाऱ्या परिपूर्णतेचं समाधान तिला वेगळंच सौंदर्य देतं. रमण अगदी भान हरवून काजलकडे बघत होता, तेवढ्यात रोहननं खोलीत प्रवेश केला. त्याच्याकडे बघताच रमणचं मन कडू झालं. तो झटक्यात वळला. रोहननं वहिनीसाठी काही फळं कापून आणली होती. त्यानं ती प्लेट रमणच्या पुढे केली. त्याच्याकडे दुर्लक्ष करून रमण खोलीतून बाहेर पडला.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...