कथा * गिरीजा पालकर

‘‘तू एक दिवसासाठी माझा ब्रॉयफ्रेंड होशील का?’’ त्या मुलीचे हे शब्द सतत माझ्या कानात घुमत होते. मी खरं तर गोंधळून, बावचळून तिच्याकडे बघत होतो. दाट काळे केस अन् हसऱ्या चेहऱ्यावरचे दोन चमकदार डोळे बघून माझं हृदय धडधडायला लागलं. कुणा अनोळखी मुलीकडून अशा तऱ्हेची मागणी आल्यावर दुसरं काय होणार?

मी चांगल्या कुटुंबातला चांगला हुशार मुलगा आहे. लग्नाच्या बाबतीतही माझी मतं ठाम होती. आधी एकदा मी प्रेमात पडलो होतो, पण आमचं प्रेमप्रकरण अगदीच अल्पजीवी ठरलं होतं. त्या मुलीनं माझा विश्वासघात केला. मला ती सोडून गेलीच...खरं तर ही जगच सोडून गेली.

खूप प्रयत्न करूनही मी तिला विसरू शकलो नाही. मग ठरवलं की आता ठरवूनच लग्न करूयात. घरचे लोक ठरवतील, त्या मुलीशी लग्न करून मोकळं व्हायचं.

पुढल्या महिन्यांत माझा साखरपुडा आहे. मुलीला बघितलंही नाहीए. घरच्यांना ती खूपच खूप आवडली आहे. सध्या मी सुट्ट्यांमध्ये मामाकडे आलोय. मी परत घरी गेलो की साखरपुड्याची तयारी सुरू होणार.

‘‘सांग ना, तू माझा एक दिवसाचा...’’ तिनं आपला प्रश्न पुन्हा विचारला.

‘‘मी तर तुला...तुम्हाला...ओळखतही नाही...’’ मी अजूनही बाबरलेलाच होतो.

‘‘ओळखत नाही म्हणूनच तर एक दिवसाचा बॉयफ्रेंड म्हणतेय...नेहमीसाठी नाही विचारलं,’’ तिनं तिचे मोठे मोठे डोळे फडफडवत म्हटलं, ‘‘खरं तर दोनचार महिन्यांतच माझं लग्न होणार आहे. माझ्या घरातली माणसं फार जुनाट विचार सरणीची अन् कट्टर आहेत. ब्रॉयफ्रेंड तर दूर, मी कुणा मुलाशी कधी बोलतही नाही. मी ही आता हे सगळं भाग्य म्हणून स्वीकारलंय. घरचे ज्या मुलाशी लग्न ठरवतील, त्याच्याशी मी मुकाट्यानं लग्न करणार आहे. पण माझ्या मैत्रिणी म्हणतात, लग्नाची मजा तर लव्हमॅरेजमध्ये आहे. निदान एक दिवस तरी बॉयफ्रेंडबरोबर हिंडून फिरून बघायचं आहे. माझ्या सर्व मैत्रिणींना बॉयफ्रेंड आहेत...फक्त मलाच नाहीए.’’

‘‘एक गोष्ट खरी की मी खूपच संवेदनशील, भावनाप्रधान मुलगी आहे. कुणावर प्रेम करेन तर अगदी मनापासून करेन. त्यामुळेच अशा गोष्टींबद्दल मनात थोडी धाकधूक आहे. मला कळतंय की मी आजकालच्या मुलींसारखी स्मार्ट नाही हे तुम्हाला जाणवतंय. पण बिलीव्ह मी. मी आहे ही अशी आहे. मला फक्त कुणी सज्जन मुलगा एका दिवसासाठी बॉयफ्रेंड व्हायला हवाय...प्लीज...तू मला मदत कर ना?’’

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...