* प्रतिनिधी

नववधू होण्याचे स्वप्न पूर्ण होणार असते तेव्हा मनात एक वेगळाच उत्साह असतो, कारण जीवन नव्या रंगात रंगणार असते. अशावेळी तिचे सौंदर्य खुलवण्यासाठी मेकअप आणि कपडे महत्त्वाचे असतातच पण, कपडयांची शोभा तेव्हाच वाढते जेव्हा दागिन्यांची निवड उत्तम आणि विशेष असते. अशावेळी तुमच्या या खास दिवसाला आणखीनच खास बनवेल सेन्को गोल्ड अॅण्ड डायमंड.

विश्वासार्हतेच्या ८० वर्षांच्या परंपरेसह सेन्कोचे देशभरात १०० हून अधिक स्टोअर्स आहेत, जे प्रत्येक समारंभासाठी वैशिष्टयपूर्ण दागिने उपलब्ध करुन देतात. याच्या पारंपारिक डिझाइन्स आधुनिक वैशिष्टयांसह तयार करण्यात आल्या असून वजनाने खूपच हलके असलेले हे दागिने तुम्हाला पारंपारिक तसेच आधुनिक लुकही देतील. शिवाय ते घातल्यानंतर तुम्हाला दागिन्यांमुळे  वजन झाल्यासाखे जराही वाटणार नाही.

पंजाबी वधूचा हटके अंदाज

पंजाबी नववधू त्यांच्या वेषभूषासाठी खूप लोकप्रिय आहेत. एवढेच नव्हे तर त्यांचे दागिनेही त्यांना आकर्षणाचे केंद्रबिंदू बनविण्याचे काम करतात. विशेष डिझाइनचे मंगळसूत्र त्यांच्या गळयाचे सौंदर्य तर वाढवतेच सोबतच ते दोन जीवांमधील विश्वासाचे प्रतिक असते. कपाळाचे सौंदर्य वाढविण्यासाठी बिंदी महत्वाची असते, ज्यातील कुंदन, रंगीबेरंगी खडे आणि मोत्यांच्या लटकंतीमुळे ती वैशिटयपूर्ण ठरते. नववधू जोपर्यंत रंगीबेरंगी खडे, कुंदन असलेला चोकर नेकलेस, हातफुलासह  मीनाकारी केलेले झुमके घालत नाही तोपर्यंत काहीतरी राहून गेल्यासारखे तिला वाटते. अंगठी आणि लग्नाचा चुडा तिचा शृंगार परिपूर्ण करतो.

हिंदू नववधूच्या सौंदर्यात भर घालणारे दागिने

लग्नाच्या दिवशी प्रत्येक मुलीला सुंदर दिसायचे असते, जेणेकरुन तिचे सौंदर्य पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या तोंडून किती सुंदर, असे कौतुकाचे शब्द निघतील आणि तिला आपण आज खूपच खास असल्याचा आनंद मिळेल. यासाठी, प्रत्येक हिंदू नववधू लाल लेहंगाच निवडते कारण, त्यात तिला स्वत:ला जास्त ग्रेसफूल असल्यासारखे वाटते. परंतु जोपर्यंत तिच्या भांगात कुंदनने सजलेली बिंदी, मोती, रत्नजडित हार आणि शतकानुशतके परंपरागत चालत आलेला सोन्याचा राणीहार नसेल तोपर्यंत लाल लेहंग्यातील तिचा पेहराव उठून दिसत नाही.

शुभ मानली जाणारी सुंदर नथ, हातातील लग्नाचा चुडा आणि त्यासोबतच घातलेल्या सोन्याच्या डिझायनर बांगडया मुलीला खऱ्याअर्थी नववधूचा परिपूर्ण लुक मिळवून देतात.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...