प्रतिनिधी
भारतातील सर्वांत प्रतिष्ठित आणि आवडत्या मीडिया ब्रँड्सपैकी एक असलेल्या *झी ने २०.८ करोड घरांमधील ८५.४ करोड प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आपली नवीन ब्रँड ओळख आणि शक्तिशाली ब्रँड वचन “युअर्स ट्रुली झी” सह एका धाडसी नव्या युगात प्रवेश केला आहे. या गतीला पुढे चालना देण्यासाठी आणि या वैविध्यपूर्ण उद्योगामध्ये आपली भूमिका अधिक ठामपणे मांडण्यासाठी झीने एक महत्त्वपूर्ण उद्योगाभिमुख उपक्रम *‘झी व्हॉट्स नेक्स्ट’* सुरू केला आहे. कंटेंट आणि तंत्रज्ञान यांचा मिलाफ असलेला पॉवरहाऊस ब्रँड म्हणून होत असलेल्या नेटवर्कच्या रूपांतराचा वेध घेणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
*‘झी व्हॉट्स नेक्स्ट’ हा झी चा एक इंडस्ट्री-फर्स्ट उपक्रम असून इथे झीने आपल्या भागीदारांना धाडसी नव्या युगात प्रवेश देत, नवकल्पनांचा, बदलत्या दृष्टीकोनाचा आणि नव्याने साकारलेल्या मनोरंजनाचा प्रथम अनुभव दिला.* हा उपक्रम झी जगासाठी निर्माण करत असलेल्या त्या सर्व गोष्टींवर प्रकाशाचा झोत आणत आहे, जिथे कंटेंट कल्पकता आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर आणि आपल्या सांस्कृतिक मुळांवर ठाम उभे राहूनही सहजपणे विभिन्न प्लॅटफॉर्म्स, डिव्हायसेस आणि हृदयांमध्ये मुक्तपणे संचार करू शकते. मार्केटर्ससाठी हे एक असे दालन होते ज्यातून कथाकथन हे केवळ ३० सेकंदांच्या जाहिरातीपासून पात्र-आधारित चळवळीत कसे रूपांतरित होऊ शकते आणि त्याच वेळी झी हे केवळ बदलाला प्रतिसाद देत नसून स्वतः तो बदल घडवत आहेत आणि आपल्या भागीदारांना भारतीय मनोरंजनाचे हे भविष्य घडवायला आमंत्रित करत आहे.
प्रेक्षक कंटेंट पाहण्याच्या पद्धतीत बदल करत आहेत अशा सातत्याने बदलणाऱ्या वातावरणात झी ने हे पुन्हा एकदा अधोरेखित केले की टीव्ही आजही देशातील सर्वात प्रभावी कथाकथन माध्यम असून दररोज कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचतो. आजचे प्रेक्षक हे प्लॅटफॉर्म-फ्लुइड झाले असून झी ने आपल्या प्रेक्षकांच्या गरजांसोबत रिअल-टाईममध्ये स्वतःला जुळवून घेतले आहे. विभिन्न प्लॅटफॉर्म्सवर सहजपणे जाऊ शकणाऱ्या आपल्या व्यक्तिरेखा, फॉर्मेट्स आणि कथानके यांसह ते असे कंटेंट निर्माण करत आहेत जे टेलिव्हिजनवरून ओटीटी ते आणि सोशल मीडियावर आरामात प्रवास करू शकते. या बदलत्या ट्रेंड्सच्या अनुरूप राहून आणि अग्रगण्य कंटेंट आणि तंत्रज्ञान पॉवरहाऊस असण्याच्या झी च्या वचनाशी सुसंगत राहून नेटवर्कने धोरणात्मक धोरणात्मकदृष्ट्या दोन नवीन हायब्रीड वाहिन्या झी पॉवर आणि झी बांगलासोनार यांचे ‘झी व्हॉट्स नेक्स्ट’ या उपक्रमात अनावरण केले.