* श्रीमती प्रतिभा अग्निहोत्री

उज्जैनमध्ये क्षिप्रा नदीच्या जवळ असलेल्या ५२ कुंडांत वर्षातून दोनदा सोमवती अमावस्या आणि शनिचरी अमावस्या यादिवशी खूप गर्दी असते. इथे अशी अंधश्रद्धा आहे की इथे स्नान केल्याने भूतप्रेत, हडळ, पिशाच या बाधांचा नाश होतो.

१७ मार्च, २०१८ रोजी शनिचरी अमावस्येची मी प्रत्यक्षदर्शी होते. मी इथे फार विचित्र घटना घडताना पाहिल्या. सादर आहे त्यावरचा हा रिपोर्ट.

दृश्य १

एका २५ वर्षीय नवयुवतीला तिचे कुटुंबीय जबरदस्तीने पाण्यात बुडी घ्यायला भाग पाडत होते. त्यांच्यासोबत असलेला तांत्रिक त्यांना मार्गदर्शन करत होता पण ती युवती जोरजोरात ओरडत होती, ‘‘मला सोडा, मी या पाण्यात स्नान करणार नाही. किती घाणेरडा वास येतोय पहा या पाण्यातून. मला काहीही झालेले नाही. मी आजारी आहे... काही भूतप्रेत वगैरे नाही... प्लीज मला सोडा.’’

त्या नवयुवतीचे बोल ऐकून त्यांच्यासोबत आलेला पंडित म्हणाला, ‘‘फारच जबरदस्त आणि वयस्कर हडळीचा हिच्यावर प्रभाव आहे, जराही कमजोर पडू नका. स्नान करायला लावा. त्यानंतर मी सर्वकाही ठीक करीन.’’

पंडिताच्या सांगण्यावरून घरातील मंडळी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून तिला बुडी मारायला भाग पाडण्यात व्यस्त झाले आणि तांत्रिक आपल्या तंत्रमंत्राच्या पूजेत व्यस्त झाला. घरातील मंडळी दानदक्षिणा तयार करू लागले.

दृश्य २

एका ३० वर्षीय महिलेला तिच्या घरातले लोक महागडया गाडीतून घेऊन येतात. हसतमुख, सर्वसामान्य दिसणाऱ्या त्या महिलेकडे पाहून कोणाला वाटणारही नाही की तिला काही त्रास असेल. परंतु जशी तिने कुंडात बुडी घेतली आणि पाण्यातून बाहेर आली, तेव्हा तिचे संपूर्ण केस मोकळे होते आणि मग ती जोरजोरात ओरडायला लागली.

तिच्याबरोबर आलेला तांत्रिक मोठमोठया मोत्यांच्या माळा परिधान केलेल्या त्या महिलेच्या तोंडावर काळा कपडा टाकून मंत्र म्हणत त्या महिलेचे केस पकडून मोठया आवाजात तिला विचारतो,

‘‘बोल, कोण आहेस तू? का त्रास देत आहेस?’’

‘‘मी याची शेजारीण आहे, जिचा मृत्यू २ वर्षांपूर्वी झाला होता,’’ महिलेच्या आतील भूत उत्तर देते.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...