* शैलेंद्र सिंह
फॅशन, मॉडेलिंग आणि अभिनयासाठी पूर्वी स्त्रियांचे वय २० ते ३० पर्यंतच योग्य मानले जात होते. पण आता ३५ व्या वर्षांनंतरही स्त्रिया स्वत:ला एखाद्या मॉडेल किंवा अभिनेत्रीपेक्षा कमी समजत नाहीत. संधी मिळाल्यावर चंदेरी पडद्यापासून ते रॅम्प शो, कॅटवॉक आणि मॉडेलिंगमध्येही त्या सेकंड इनिंगची मजा घेत आहेत.
हा बद्दल फक्त बॉलिवूडपर्यंतच मर्यादित राहिला नसून लहान मोठ्या शहरातील घरगुती स्त्रियासुद्धा यामध्ये मागे राहिलेल्या नाहीत. यामुळेच देशात सौंदर्य, फॅशनेबल कपडे आणि वेलनेसचा व्यवसाय सर्वात अग्रेसर आहे.
हेमामालिनी, माधुरी दिक्षित, मलायका अरोरा, काजोल, जुही चावलाच नाही तर लहान मोठ्या शहरात राहणाऱ्या स्त्रियासुद्धा आता वयाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आधीपेक्षाही चांगले काम करत आहेत. फिटनेस आणि सौंदर्य पाहता त्या आधीपेक्षाही अधिक सुंदर आणि ग्लॅमरस दिसू लागल्या आहेत. हेच कारण आहे की हल्ली लहान मोठ्या सर्वच शहरात ‘मिसेस’ म्हणून वेगलेगळ्या स्पर्धांचे आयोजन होऊ लागले आहे. लग्नानंतर स्त्रिया इतर काही सामाजिक कार्यांमध्ये सक्रिय असत. आता फॅशन, ब्युटी, रॅम्प शो आणि मॉडेलिंगमध्येही त्या त्यांचे सौंदर्य आणि फिटनेसची कमाल दाखवत आहेत.
याबद्दल मिळालेल्या माहितीवरून समजते की लग्नानंतर करिअर, कुटुंब, मुलांचे ताणतणाव यामुळे स्वातंत्र्यावर गदा यायची. ३५ व्या वर्षी किंवा त्यानंतर साधारणत: सर्व बाबी सुरळीत झालेल्या असतात आणि मानसिकदृष्ट्या थोडी मोकळीक मिळालेली असते आणि याच कारणामुळे हल्लीच्या काळात महिला वयाच्या दुसऱ्या टप्प्यात जास्त सक्रिय दिसू लागल्या आहेत.
आणि हे फक्त रॅम्प आणि ब्युटी शो पुरतं मर्यादित नाही. आज हॉटेलांमध्ये होणाऱ्या पार्ट्यां पाहिल्या तर कळून येते की सर्वात जास्त पार्ट्यांचे आयोजन स्त्रियांकडूनच केलेले असते. त्याच अयोजक असतात आणि त्याच सहभागीसुद्धा होतात. आधी किट्टी पार्टी फक्त तंबोला खेळण्यापुरतीच मर्यादित होती. पण आता किट्टी पार्टी ग्लॅमरस होऊ लागली आहे. यामध्ये थीम पार्टीचे आयोजन केले जाते. पार्टीची थीमसुद्धा काही अशाप्रकारे ठरवली जाते की त्यामध्ये महिला त्यांचा फिटनेस आणि सौंदर्यही दाखवू शकतील. थीम पार्टीमध्ये पूलपार्टीसुद्धा असते. तिथं महिला स्विमवेअर परिधान करून येतात. कधी तर स्कर्ट घालून येण्याची वेगळी थीम बनते. थीम पार्टीमध्ये जेव्हा विजेत्यांची निवड होते, तेव्हा कुणाचा स्कर्ट किती शॉर्ट होता, कोणी कशाप्रकारचे स्विमवेअर घातले होते हेही पाहिले जाते.