* डॉक्टर संदीप गोविल, मानसोपचारतज्ज्ञ, सरोज सुपर स्पेशालिटी रुग्णालय, नवी दिल्ली

वेगाने बदलणाऱ्या जीवनशैलीचा परिणाम फक्त तुमच्या जीवनावरच होतो का? वेळ कमी पडत असल्याचा त्रास फक्त तुम्हालाच होतो का? कामावरचे प्रचंड काम आणि सर्व गोष्टी आल्याच पाहिजे, अशा दबावामुळे फक्त तुम्हीच त्रासून गेला आहात का? खरंतर या सर्व गोष्टींचा तुमच्यासोबत तुमच्या मुलांनाही त्रास होतो. यामुळे ती बऱ्याचदा चिडलेली, आळसावलेली दिसतात आणि त्यामुळेच तुमचे ऐकत नाहीत. त्यांना छोटया छोटया गोष्टी समजावून सांगणेही अवघड होते. त्यामुळे पालक या नात्याने तुम्हाला मुलांची काळजी वाटू लागते.

६ ते १२ वर्षांचे वय मुलांमध्ये बरेच बदल घडवून आणणारे असते. या काळात शारीरिक बदलांसोबतच मुलांच्या स्वभावातही बरेच बदल घडत असतात. हे वय असे असते जिथे मुलांना काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणे गरजेचे असते.

अशा वेळी विशेषज्ज्ञांचा सल्ला अत्यंत महत्त्वाचा ठरतो. विशेष करून आपल्या लहान आणि वाढत्या वयातील मुलांना कसे समजवावे, त्यांच्याशी कसे वागावे, हे नोकरदार पालकांसमोरील मोठे आव्हान असते.

अभ्यासाला द्या मनोरंजनाची फोडणी

* मुलांसोबत त्यांच्या खेळात सहभागी व्हा.

* मुलांना चित्र काढायची आवड असते. या कलेत तुम्ही त्यांचे चांगले मित्र बनू शकता.

* कोणते २ रंग एकत्र केल्यास कुठला नवीन रंग तयार होतो, हे त्यांना सांगा.

* मुलांसोबत वेळ घालवा. त्यांच्यासोबत टीव्ही बघा. त्यांची आवड, त्यांना न आवडणाऱ्या गोष्टी विचारा.

* मुलांना जे सांगाल त्याचे स्वत: अनुकरण करा. जसे की, उन्हातून घरी आल्यानंतर लगेच थंड पाणी पिल्यास घसा खराब होऊ शकतो. त्यामुळे हे मुलांना सांगा आणि तुम्हीही आचरणात आणा.

* तुम्ही वडील असाल तर सुट्टीच्या दिवशी मुलांच्या शाळेचे दप्तर व्यवस्थित आहे का, हे तपासा. सतत ओरडणारे वडील बनण्याऐवजी मुलांचे मित्र बना.

* तुमच्या आवडी मुलांवर लादू नका. उलट त्यांच्या आवडी विचारा आणि तुमची आवड त्यांना सांगा.

* अनोळखी व्यक्तीशी बोलू नये, हे त्यांना समजावून सांगा. शक्य असल्यास ही गोष्ट मुलांना त्यांच्या मित्रांसमोर समजावून सांगा.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...