* गरिमा पंकज

नुकतेच मेट्रो आणि अन्य शहरांमध्ये राहणाऱ्या १,२०० महिलांचे मॉम्सप्रेसो नावाच्या कंपनीद्वारे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात असे समोर आले की, ७० टक्के माता त्यांच्या जीवनात आनंदी नाहीत. ५९ टक्के माता वैवाहिक जीवनात सुखी नाहीत तर ७३ टक्के मातांना असे वाटते की, मुलांच्या नजरेत त्या स्वत:ला चांगली आई म्हणून सिद्ध करू शकत नाहीत.

जरा विचार करा, मातृत्वाचा प्रवास कितीतरी अवघड असतो. ९ महिन्यांपर्यंत अधूनमधून पोटात प्रचंड वेदना, छातीत जळजळ, उलटया, पाठदुखी, कफ, व्हेरिकोस व्हेन्ससारखे आजार आणि त्यानंतर प्रदीर्घ काळ सहन कराव्या लागणाऱ्या प्रसूती कळा. एवढया सगळया त्रासानंतर एका महिलेला मातृत्वाचा आनंद मिळतो. ती बाळाला जीवन आणि पतीला पिता बनण्याचे सुख देते.

आई झाल्यावरही ती मुलासोबत रात्रभर जागते. काहीही न खातापिता सतत काम करत असते. बाळाला दूध पाजते, त्याचे लंगोट बदलते, त्याला आंघोळ घालते, पण २४ तास काम करणाऱ्या आईच्या सुखाचा विचार घरातील किती लोक करतात?

का निराश आहेत माता?

खरंतर २०-२५ वर्षांपूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती. कुटुंबात मुलांकडे लक्ष द्यायला कोणीतरी असायचेच. आजच्या तांत्रिक विकासाच्या आणि वाढत्या स्पर्धेच्या या युगात कुटुंब छोटी झाली आहेत. याचा अर्थ आईपुढील आव्हाने आणि जबाबदाऱ्या वाढल्या आहेत.

घरात वडील भलेही जास्त शिकलेले असले, आई कामाला जात असेल तरीही मुलाला शिकवण्याची, त्याचा गृहपाठ करून घेण्याची जबाबदारी आईचीच असते. मुलाच्या काळजीमुळे आई सतत तणावाखाली वावरत असते. जसे की, मुलाकडून होत असलेला गॅजेट्स आणि इंटरनेटचा जास्त वापर, त्याचे खाण्या-पिण्याचे नखरे, त्याला शिस्त लावणे, त्याच्या परीक्षा यामुळे आई सतत चिंतेत असते.

पेप्सिकोच्या सीईओ इंदिरा नुयी यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘‘माझ्या लग्नाला ३४ वर्षांहून जास्त काळ लोटला आहे. मला २ मुली आहेत. दर दिवशी सकाळी तुम्हाला हा निर्णय घ्यावा लागतो की, तुम्हाला आज पत्नीची जबाबदारी पार पाडायला महत्त्व द्यायचे आहे की आईची जबाबदारी पार पाडायला प्राधान्य द्यायचे आहे. प्रत्यक्षात अनेकदा तुम्हाला या दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. कितीतरी निर्णय संयमाने घ्यावे लागतात. तरीही आज जर तुम्ही माझ्या मुलींना माझ्याबद्दल विचारले तर मला वाटत नाही की, त्या मी एक उत्तम आई आहे असे सांगतील.’’

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...