* निती गुप्ता

विणकामाच्या टिप्स

* लोकर नेहमी चांगल्या क्लॉलिटीची विकत घ्या.

* लोकर गरजेपेक्षा १-२ गोळे जास्तच विकत घ्या, म्हणजे लोकर कमी पडणार नाही. तसंदेखील उरलेल्या लोकरी लवकर परत देता येतात.

* विणकामापूर्वी त्याची तपासणी करा. यासाठी १० फं. वर १० सुया विणून विणलेल्या भागाची लांबीरुंदी मोजून घ्या.

* लक्षात ठेवा की गार्टर स्टिच व स्टाकिंग स्टीचच्या विणकामाचं स्ट्रेच वेगवेगळं असतं. गार्टर स्टीच विणकाम स्टाकिंग स्टीचच्या विणकामाच्या तुलनेत रुंद पसरतं व लांबी खूपच कमी वाढते.

* काही स्त्रिया सरळ सूईच्या तुलनेत उलटया सुयांनी सैलसर विणतात. जर ही समस्या तुमच्यासोबतदेखील असेल तर तुम्ही उलटया सुईने कमी नंबरच्या सुया वापरा.

* विणकाम करतेवेळी प्रत्येक सुईचं पहिलं फं. विणता उतरा. यामुळे कोपऱ्यांवरती सफाई येईल आणि विणकाम सहजसोपं होईल.

* लोकरीचा नवीन गोळा सुईमध्ये सुरुवातीला जोडा मधेच नाही, असं केल्यामुळे स्वेटर अधिक क्लियर विणेल.

* लोकर जोडण्यासाठी त्यांची टोकं उसवून ८ वा १० बोटं लांबीपर्यंत अर्ध्याअर्ध्या लोकरीच्या रेषांना काढून दोन्ही लोकरीच्या टोकांना आपापसात मिळून विखरू

* नंतर यामध्ये विखुरलेल्या लोकरीने काही फं विणून पुढे विणत जा. ४ लोकरीच्या तुकडयांना आपापसात जोडल्यामुळे कधीही गाठ लागता कामा नये. गाठ लागल्यामुळे स्वेटर चांगलं दिसत नाही.

* जर तुम्ही एकापेक्षा अधिक रंगाच्या लोकरीने काम करत असाल तर त्यांना पॉलिथिनच्या वेगवेगळया पिशव्यांमध्ये ठेवा वा मग त्यांच्यासाठी छिद्र असणाऱ्या प्लास्टिक बॅग वापरा. एक छिद्र असणाऱ्या प्लास्टिक बॅगला कामी आणा. एक छिद्रामध्ये एक रंगाचं लोकर काढा. यामुळे गुंतागुंत होणार नाही.

* जर तुम्ही एकाच रंगाची लोकर २ वेळा वेगवेगळया डाय लॉटने विकत घेतली असेल तर तुम्ही एक सुई एक लॉटच्या लोकरी व दुसरी सुई दुसऱ्या लॉटच्या लोकरीने विणा.

* जर विणतेवेळी कोणतंही फं पडलं तर त्याला उचलण्यासाठी क्रोशियाचा हुक कामी आणा.

* पांढऱ्या लोकरीने विणकाम करतेवेळी हातांवरती टाल्कम पावडर लावा. यामुळे पांढरी ऊन खराब होणार नाही.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...