* नम्रता पवार
दिल्ली प्रेस प्रकाशन आयोजित गृहशोभिका ‘एम्पॉवर हर’ इव्हेंट मुंबईतील माटुंगा येथे दिनांक २५ जानेवारी रोजी फ्लेमिंगो बँक्वेट हॉलमध्ये मोठया उत्साहात पार पडला. दादर आणि ठाणे या दोन्ही इव्हेंटप्रमाणेच या तिसऱ्या इव्हेंटसाठी अनेक महिला उस्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या.
गृहशोभिका ‘एम्पॉवर’ या कार्यक्रमाची सुरुवात निवेदिका रूपाली सकपाळ यांच्या मिश्किल निवेदनाने झाली.
इव्हेंटसाठी सर्व उपस्थित महिलांचे स्वागत करताना रुपाली यांनी या इव्हेंटची रूपरेषा आणि कार्यक्रमाचे प्रायोजक डाबर खजूरप्राश, एल. जी. हिंग (लालजी गोधू अँड कंपनी), ब्युटी पार्टनर ग्रीन लीफ अँटी हेअर फॉल हेअर सिरम बाय ब्रिहंस नॅचरल प्रॉडक्ट, स्किन केअर पार्टनरला शिल्ड या कार्यक्रमाच्या प्रायोजकांचा एव्ही दाखवला.
त्यानंतर ज्यांच्यामुळे आपण हा कार्यक्रम करू शकलो ते दिल्ली प्रेस प्रकाशन यांच्या संपूर्ण प्रवासाचा एव्ही दाखवण्यात आला.
‘एम्पॉवर हर’ हा खास महिलांसाठीचा इव्हेंट संपूर्ण भारत भरात म्हणजेच अहमदाबाद, लखनौ, इंदोर, बंगलोर, चंदिगड, लुधियाना, मुंबईत होत असल्याचे सांगितलं.
कार्यक्रमात अधिक ट्विस्ट आणण्यासाठी प्रश्नमंजुषा खेळ खेळण्यात आला. विजेत्या ५ महिलांना डाबर खजूर च्यवनप्राशतर्फे भेटवस्तू देण्यात आल्या.
डाबर खजूरप्राश
डाबर प्रस्तुत ‘वुमन हेल्प अँड वेलनेस सेशन’ यासाठी सृजन आयुर्वेदा अँड वेलनेस सेंटर, पुण्याच्या डॉक्टर प्राजक्ता गावडे, यांनी आयर्न डेफिशन्सी इन वूमन यावर उपस्थित महिलांना मार्गदर्शन केलं.
डॉक्टर प्राजक्ता यांनी सांगितलं की डाबर खजूरप्राश हे एक अनोख्या प्रकारचं डाबर च्यवनप्राश आहे आणि ते खास स्त्रियांसाठी बनविण्यात आलंय. आज प्रत्येक भारतीय स्त्रीमध्ये लोह तसेच हिमोग्लोबिनची कमतरता आहे. डाबर खजूरप्राशमध्ये खजूर आणि आवळासोबतच ४० पेक्षा अधिक उपयुक्त इनग्रीडियन्स आहेत. जे आर्यन, हिमोग्लोबिनची पातळी, स्टॅमिना, स्ट्रेग्थ वाढविण्यास मदत करतात.
डॉक्टर प्राजक्ता यांनी महिलांना आरोग्याची कशी काळजी घ्यायची याच्या टिप्स दिल्या. इव्हेंटसाठी उपस्थित महिलांनी त्यांना अनेक प्रश्न विचारले आणि डॉक्टर प्राजक्ता यांनी महिलांच्या शंकांच निरसन केलं.
दिल्ली प्रेस प्रकाशनचे नॅशनल सेल्स हेड दीपक सरकार यांनी डॉक्टर प्राजक्ता यांना भेटवस्तू देऊन सन्मानित केलं.