* पूनम अहमद
रेखाने लग्नाच्या पहिल्याच वर्षी हे नमूद केले होते की तिचा पती अनिलला इतर महिलांसोबत फ्लर्टिंग करण्याची सवय आहे. आधी तिला वाटलं की लग्नाआधी सगळी मुलं फ्लर्ट करतातच. अनिलची सवय हळूहळू दूर होईल, पण तसे झाले नाही.
रेखाला आश्चर्य वाटत होते की तिच्या उपस्थितीतही अनिल इतर महिलांसोबत फ्लर्ट करण्याची संधी सोडत नाही. आता त्यांना २ मुलेही होती.
रेखाला वाटायचे, जेव्हा ही अवस्था माझ्यासमोरच आहे, तर मग ऑफिस किंवा बाहेर काय-काय करत असतील. अनिलची कृती पाहून ती विचित्रशा नैराश्यात राहू लागली.
एक दिवस तर खूपच झाले. तिच्याच सोसायटीत राहणारी खास मैत्रीण रीना ही संध्याकाळी त्यांच्या घरी आली. अनिल घरीच होता. जोपर्यंत रेखा रीनासाठी चहा आणते तोपर्यंत अनिल उघडपणे रीनाशी फ्लर्ट करत होता. रेखाला खूप राग आला.
रीना निघून गेल्यावर तिने अनिलला रागाने विचारले, ‘‘रीनाशी इतके फालतू बोलायची काय गरज होती?’’
अनिल म्हणाला, ‘‘मी फक्त तिच्याशी बोलत होतो. ती आमची पाहुणी होती.’’
जेव्हा सहनशक्तीच्या बाहेर होईल
पुन्हा हा प्रकार घडला, अनिलने तिचे बोलणे नाही मानले. अनिल घरी असतांना जेव्हा केव्हा रीना घरी यायची तेव्हा तो तिथेच टिकून असायचा.
एके दिवशी तर हद्दच झाली, जेव्हा त्याने रीनाचा हात मस्करीत पकडला. जेव्हा ती घरी जाण्यासाठी उठली तेव्हा अनिल तिचा हात धरून म्हणाला, ‘‘अहो, अजून थोडा वेळ बसा. इथे सोसायटीतच तर जायचं आहे.’’
रीना तर खजील होत निघून गेली पण रेखाला तिच्या पतीच्या या कृत्याची खूप लाज वाटली. रीना निघून गेल्यावर तिचं अनिलशी खूप भांडण झालं. पण अनिलवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही.
रेखा आणि रीना खूप चांगल्या मैत्रिणी होत्या. रेखाने आपल्या पतीच्या या कृत्याबद्दल एकांतात तिची माफी मागितली आणि तिला असेही सांगावे लागले, ‘‘रीना, अनिल घरी असतांना तू येत जाऊ नकोस. मला फोन कर, मीच येत जाईन.’’