* ज्योती गुप्ता
बऱ्याच लोकांचा असा विश्वास आहे की महिलांना वाहनांमध्ये विशेष रस नसतो. त्या वाहन चालविण्यास किंवा खरेदी करण्यात उत्साह दाखवत नाहीत.
जर एखादी महिला वाहन चालवत असेल तर लोक तिच्यावर भाष्य करण्यास चुकत नाहीत. वास्तविक, लोकांच्या मनात ही गोष्ट घर करून आहे की स्त्रिया चांगल्या चालक होऊ शकत नाहीत. त्यांना वाहनांची समज नसते. पण दुसरीकडे, ऑटोएक्सपोच्या मंडपात उसळलेली महिलांची गर्दी या गोष्टीस नाकारत होती. कदाचित लोक हे विसरतात की महिला केवळ गाडयाच नव्हे तर विमानही चालवू शकतात. महिला कॅब ड्रायव्हर्स या गोष्टीचे सर्वात मोठे उदाहरण आहे.
कार केवळ श्रमिक महिलांच्याच नव्हेत तर गृहिणींच्या जीवनाचाही एक भाग आहेत. ऑफिसला जायचे असो की मुलांना शाळेत सोडणे, स्त्रिया कोणावर अवलंबून न राहता आपली कामे स्वत:च करणे जाणतात.
अलीकडे काही वर्षांपासून महिला चालकांची संख्याही वाढली आहे आणि ही गोष्ट कार उत्पादक कंपन्यांनाही जाणतात. म्हणूनच कंपन्यांनी महिलांना लक्षात घेऊन महिला अनुकूल वाहने तयार केली आहेत.
चला, महिलांसाठी तयार करण्यात आलेल्या कारविषयी आणि ऑटो एक्सपोमध्येही ज्यांच्याबद्दल खूप चर्चा करण्यात आली त्यांबद्दल जाणून घेऊया :
स्वयंचलित गिअर बॉक्सवर लक्ष
मारुती सेलेरिओ, ह्युंदाईची क्रेटा, व्हर्ना आणि टोयोटाची इनोव्हामध्ये स्वयंचलित गिअर बॉक्स सिस्टम दिलेले आहेत, ज्यामुळे वाहन चालविणे अधिक सुलभ होते. ही गिअर बॉक्स सिस्टम महिलांमध्ये खूप लोकप्रिय होत आहे. विशेषत: नोकरदार महिलांसाठी दैनंदिन ऑफिसची राईड आता या यंत्रणेने बरीच सोपी केली आहे. त्याच वेळी, मेट्रो शहरांमध्ये कार उत्साही लोक आता स्वयंचलित गिअर बॉक्सची कार विशेष पसंत करत आहेत.
ब्ल्युटूथ स्टिरिओ सिस्टम
आपल्याला राईडसह संगीताचा आनंद मिळत नसेल, हे कसे शक्य आहे. ब्ल्युटूथ स्टिरिओ सिस्टम स्त्रियांना खूप आवडते. प्रारंभिक श्रेणीच्या मारुती अल्टो आणि इग्निसमध्ये तुम्हाला ब्ल्युटूथसह स्टिरिओ सिस्टमची सुविधा मिळेल.
मागील पार्किंग कॅमेरा आणि स्वयंचलित वाइपर
जेव्हा पाऊस पडतो आणि पावसाच्या सरी विंड स्क्रीनवर पडतात तेव्हा वाइपर स्वत:हून मागे-पुढे होऊ लागतात. तसेच मागील पार्किंग कॅमेऱ्याची आज जवळजवळ प्रत्येक महिला ड्रायव्हरला आवश्यकता आहे. ड्राईव्हिंग जितकी सोपी असेल तितकाच ड्राईव्हचा आनंद येतो. पावसाळयात विंड स्क्रीन साफ करण्यासाठी स्वत: वाइपरला वारंवार चालू आणि बंद करणे हे कुठल्या झंझटपेक्षा कमी नाही.