* प्रतिनिधी

गृहशोभिका मासिकाने आपल्या वाचकांसाठी अलीकडेच ‘कुकिंग क्वीन’ इव्हेंट्सचं आयोजन मुंबई लगतच्या तलावांचं शहर म्हणून ओळख असणाऱ्या ठाणे पूर्वेच्या आनंद बँक्वेट हॉलमध्ये यशस्वीरित्या संपन्न झाला. या इव्हेंटला यशस्वी बनविण्यात स्पाइस पार्टनर एलजी हिंग, हेल्दी टिफिन पार्टनर एक्सो, टुरिझम पार्टनर उत्तराखंड राज्य, सोबतच असोसिएट पार्टनर पारस घी यांनी सहकार्य केलं.

या इव्हेंटमध्ये २०० पेक्षा अधिक महिला सहभागी झाल्या होत्या. इव्हेंटमध्ये आरोग्यदायी खाण्याचे फायदे, स्त्रियांमध्ये पोषणाची कमतरता पूर्ण करण्यासंबंधी माहिती देण्यासोबतच अनेक मनोरंजक स्पर्धां देखील आयोजित करण्यात आल्या. कुकिंग स्पर्धेमध्ये महिला पूर्ण उत्साहाने सहभागी झाल्या होत्या.

शेफ सेशन

‘ऑल अबाउट कुकिंग’चे सुप्रसिद्ध शेफ निलेश लिमये यांनी महिला प्रतिस्पर्ध्यांचा उत्साह वाढविण्याबरोबरच त्यांना फास्टिंग म्हणजेच उपवासाच्या रेसिपी संबंधित नवीन माहिती देखील दिली. कुकिंगच्या जगतात १५ पेक्षा अधिक वर्षांपासूनचा अनुभव असणारे शेफ निलेश रेस्टॉरंट आणि केटरिंग बिझनेस कन्सल्टंट म्हणून देखील ओळखले जातात. शेफ निलेश प्रामुख्याने मेन्यू व रेसिपी डेव्हलपमेंट, किचन सेटअप, स्टाफ ट्रेनिंग आणि फूड स्टायलिंगसाठी प्रसिद्ध आहेत.

शेफ निलेश यांनी कुकिंग डेमो देण्यासोबतच महिलांनां जेवण बनवणं आणि सर्व्ह करणं या संबंधित अनेक गोष्टी सांगितल्या. त्यांनी कुकिंगशी संबंधित अनेक प्रश्नांची उत्तरं देखील विस्तारपूर्वक दिली. त्यांनी फास्टिंग रेसिपीजना हेल्दी आणि इंटरेस्टिंग बनविण्याच्या टीप्सदेखील महिलांना दिल्यात. शेफ सेशन सर्वांनी खूपच एन्जॉय केलं.

कुकिंग क्वीन सुपर जोडी

या स्पर्धेसाठी ड्रॉच्या माध्यमातून ५ कुकिंग क्वीन जोड्यांना निवडण्यात आलं. या सर्वांना स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी गरजेचं सर्व साहित्य अगोदर पासूनच उपलब्ध करण्यात आलं होतं. प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ  पुरस्कार मिळवणाऱ्या विजेत्यांची निवड रेसिपीची चव, कुकिंग स्टेशनची स्वच्छता, साहित्य कशा प्रकारे मांडलय, डिशचं प्रेझ्नटेशन इत्यादीच्या आधारावर शेफ निलेश यांनी केली.

स्पर्धेमध्ये प्रथम पुरस्कार मीनल पिंपळे आणि शिल्पा गजेंद्र या जोडीने बेसन चीला विथ पनीर सलाड बनवून जिंकला. द्वितीय पुरस्कार ज्योती लोखंडे आणि मनीषा गोसावी या जोडीने पनीर वेजी बनवून जिंकला. तर तृतीय पुरस्कार काजल करंबळकर आणि गौरी बोलके या जोडीने पनीर सलाड मंचुरियन बनवून जिंकला. तृप्ती जाधव आणि अल्पना मोरे या जोडीने व्हेज पनीर पॅटीस तर नलिनी मनवाडकर आणि माया करंबळकर यांनी थालीपीठ विथ पनीर बनवलं. या दोन्ही जोड्यांना उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आला.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...