- सुमन बाजपेयी

‘‘बिचारी ३५ वर्षांची झाली. पण अजून सिंगल आहे.’’

‘‘दिसायला तर सुंदर आहे. मोठी अधिकारी आहे. काय माहीत अजून लग्न का नाही झालं?’’

सोमा आपल्या सोसायटीत शिरताच हे शब्द तिच्या कानावर पडले. खरंतर या गप्पा तिच्यासाठी नवीन नव्हत्या. तिला आता याची सवय झाली होती. पण तरीही कधीकधी तिला या गोष्टींचा त्रास व्हायचा. लोक तिच्या आयुष्यात हस्तक्षेप का करतात? तिला तिचं आयुष्य शांततेने जगू का देत नाहीत? तिच्या प्रत्येक हालाचालीवर लक्ष ठेवलं जातं. जसं काही सिंगल असणं हा गुन्हाच आहे. तिने स्वत:हून असं

आयुष्य निवडलं असेल तर समाजाला याचा त्रास का होतो? तिचं तर सगळं छान चाललंय.

आपल्या मोठ्या बहिणीचं फसलेलं लग्न पाहूनच सोमाने एकटं राहण्याचा निर्णय घेतला. किती बंधनं आहेत तिच्यावर. कोणतंही काम ती आपल्या पतीच्या परवानगीशिवाय करू शकत नाही. सोमाने रीनाला निरखून पाहिलं. पस्तीशीतही ती साठीतली दिसत होती.

सोमासारख्या सिंगल विमेन आजकाल कमी नाहीत. कारण त्या आपल्या मर्जीने लग्न न करण्याचा निर्णय घेत आहेत. त्यांना त्यांच्या पद्धतीने आयुष्य जगायचं आहे. मग एखादवेळेस लग्न नाही जरी झालं तरी एकटयाने आनंदात जगता येतं. पण जगण्याची पद्धत माहीत असायला हवी.

सोमा म्हणते, ‘‘लग्न झालंच पाहिजे असं काही नाही. काहीवेळा असं होतं की इच्छा असूनही योग्य जोडीदार न मिळाल्याने तुम्ही लग्न करू शकत नाही. कोणी आवडलंच तरी त्या व्यक्तिसोबत संपूर्ण आयुष्य काढता येण्याची खात्री नसते. माझ्यासोबतही

असंच काहीसं झालं. हे खरं आहे की प्रेम हा एक सुंदर अनुभव आहे. पण तुम्हाला कोणी जोडीदार मिळाला नाही तर त्याचा अर्थ असा नसतो की तुम्ही सुखी नाही. फक्त समाजाला तसं वाटत असतं. तुम्ही सिंगल असाल तर तुमचं आयुष्य अपूर्ण आहे असं मानणं चुकीचं आहे. लग्न म्हणजेच सर्वस्व नाही. आयुष्यात अनेक शक्यता असतात. फक्त त्या शोधणं आणि त्यांचा योग्य वापर करणं जमलं पाहिजे.’’

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...