* गरिमा पंकज
लिव इन हे आजच्या बदलत्या जीवनशैलीनुसार तरुणांनी निर्मित केलेली थोडी कमी आजमावलेली कॉन्सेप्ट आहे. मुलामुलीची विवाहित जोडप्याप्रमाणे सोबत राहाण्याची व्यवस्था म्हणजे लिव इनमध्ये वैवाहिक जीवनातील आकांक्षा पूर्ण होतात, एकमेकांचा सहवासही लाभतो परंतु दीर्घकालीन जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी ते बांधील नसतात. कधीही विलग होण्याचं स्वातंत्र्य असतं. ही कॉन्सेप्ट विवाह करण्याची मानसिकता नसणाऱ्यांना वरकरणी आकर्षक भासते, परंतु आतून तितकीच पोकळ आणि अस्थिर तर आहेच शिवाय त्यातही अनेक जबाबदाऱ्या आहेत. कदाचित हेच कारण आहे की बहुतेक जण खासकरून मुली आजही याचा स्वीकार करत नाहीत.
अपूर्णतेची जाणीव
एक प्रकारे हे नातं धार्मिक मान्यतांच्या बंधनापासून सामाजिक रुढीपरंपरा आणि शोबाजीच्या रंगापासून दूर आहे आणि कायद्यानेसुद्धा याला काही मर्यादेपर्यंत मान्यता दिली आहे. परंतु तरीदेखील या नात्याच्या अपूर्णतेला दुर्लक्षित करता येणार नाही खासकरून मुली अशाप्रकारच्या नात्यांमध्ये अनेकदा गहिऱ्या मानसिक त्रासातून जातात.
वास्तविक, लिव इनमध्ये नातं जेव्हा गहिरं होतं आणि दोघे एकमेकांच्या जवळ येतात, शारीरिकसंबंध साधतात, तेव्हा ती भावना मुलीच्या मनात कायम सोबत राहाण्याच्या इच्छेला जन्म देते. ५० मिनिटांची जवळीक ५० वर्षांच्या सहवासाच्या इच्छेमध्ये बदलू लागते. परंतु जरुरी नाही की मुलगासुद्धा याच पद्धतीने विचार करेल आणि जबाबदाऱ्या पूर्ण करायला तयार होईल.
बहुतेक प्रकरणांमध्ये या गोष्टीवरून नातेसंबंध तुटतात आणि अखेरीस शारीरिक प्रेमावर आधारीत हे नातं आयुष्यभराचं दुखणं बनून राहातं. अनेकदा या दुखण्यातून निर्माण झालेली वेदना इतकी त्रासदायक असते की मुलगी स्वत:ला संपवून टाकण्यासारखं चुकीचं पाऊल उचलायलाही मागेपुढे पाहात नाही.
अशा नातेसंबंधांमध्ये प्रेम कमी वाद अधिक
अशा नातेसंबंधांमध्ये मुलामुलींचा एकमेकांवर पूर्ण हक्क नसतो. ते संयुक्त निर्णयसुद्धा घेऊ शकत नाहीत. जसं की, विवाहित दाम्पत्य मात्र घेतात. उदाहरणादाखल संपत्ती एक तर मुलाची असते वा मुलीची. दोघांचा अधिकार नसतो. दुसऱ्याला हे विचारण्याचा अधिकार नाही की पैसे कशाप्रकारे खर्च होत आहेत. दोघे आपले पैसे आपल्या मर्जीने खर्च करतात.