* गरिमा पंकज
अनुभवला नुकतेच मॅनेजर बनवले गेले होते. आता त्याच्या जीवनात एकच गोष्ट महत्वाची होती आणि ती म्हणजे काम. याशिवाय तो आपला वेळ कुठेही खर्च करत नाही. अगदी नाती निभावणं सोडाच पण मित्रांसोबत थट्टामस्करीही करत नाही. सकाळी ऑफिसला निघून जायचा आणि पूर्ण दिवस फायलींमध्ये हरवून जायचा.
रात्री उशिरा घरी परतायचा तोपर्यंत त्याची मुले झोपलेली असायची. पत्नीशीसुद्धा फक्त कामाविषयीच बोलायचा. इतर वेळेस मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये व्यस्त असायचा. कालांतराने त्याचं आयष्य नैराश्याने भरून गेलं. ऑफिसचे कलीग्सही त्याच्याशी किनारा करू लागले. पत्नीबरोबर भांडणं होऊ लागले.
सतत चिडचिड करू लागला. एवढा चिढखोर झाला की मुलांचे मस्ती करतानाचे ओरडणेसुद्धा सहन करू शकत नसे आणि म्हणून त्यांच्यावर हात उचली. नेहमी आजारी पण राहू लागला. एके दिवशी अनुभवच्या डॉक्टर मित्राने त्याला चांगल्या संबंधाची गरज आणि मानसिक आनंदाचा आरोग्यावर पडणारा प्रभाव याविषयी विस्तीर्ण माहिती दिली. त्याला जीवन जगण्याचा योग्य मार्ग शिकवला. तेव्हा अनुभवलाही कळून चुकले की नातेसंबंधात कटकट करून तो कधीही पुढे जाऊ शकत नाही. वेळोवेळी झाडांप्रमाणे नात्यांचेही प्रेम आणि विश्वासाच्या पाण्याने पोषण करणे गरजेचे आहे.
या गोष्टी लक्षात घेतल्या तर नातेसंबंध आणि जीवनात प्रेम टिकून राहील.
जीवनाला खूप गंभीरपणे घेऊ नका
काही लोक जीवनाला एवढे गंभीरपणे घेतात की ते जीवनातील लहानमोठे चढउतारही स्वीकारू शकत नाही आणि डिप्रेशनमध्ये जातात, याउलट व्यक्तिचे व्यक्तित्व असे असायला हवे की मोठयांहून मोठे वादळसुद्धा मनाला विचलित करू शकणार नाही. लोकांशी वाद घालण्यापेक्षा गोष्टींना हसून टाळायला शिकले पाहिजे. यामुळे नात्यांमध्ये कधी वितुष्ट येत नाही आणि आपल्यातील प्रसन्नतासुद्धा कायम टिकून राहते.
थँकफुलनेस आवश्यक
एका अभ्यासानुसार आपण ज्या गोष्टींसाठी दुसऱ्यांचे आभारी आहात त्या गोष्टी एका डायरीत किंवा मोबाईलमध्ये लिहून ठेवल्याने मनात एक वेगळा आनंद निर्माण होतो. असे करणे परस्पर नातेसंबंधांसह आरोग्यासाठीही खूप फायद्याचे असते. बऱ्याच वेळा आपण कोणा व्यक्तीच्या त्या गोष्टींवर लक्ष्य केंद्रित करु लागतो, जेव्हा त्याने आपल्याशी वाईट वर्तणूक केली. यामुळे आपली वागणूकही त्याच्याशी कठोर होऊन जाते. यामुळे नात्यांमध्ये कटुता येण्याची दाट शक्यता असते. अशावेळेस लिहिलेल्या त्या जुन्या गोष्टीं वाचाव्याते जेव्हा त्याने आपली मदत केली होती, काही चांगले केले होते.