* पद्मा अग्रवाल
आज जेव्हा महिला पुरुषांच्या बरोबरीने आणि कित्येकदा त्यांच्यापेक्षा जास्त पगार घेत आहेत तेव्हा हा त्यांचा अधिकार आहे की त्या या आपल्या कमवलेल्या पैशांना आपल्या इच्छेनुसार खर्च करतील.
परंतु पुरुष नेहमी स्त्रीवर सत्ता गाजवत आला आहे आणि आजदेखील पत्नीवर स्वत:चा अधिकार समजतो.
प्रोफेशनल कॉलेजमध्ये लेक्चरर इला चौधरी यांच्या फोनवर मेसेज आला की त्यांच्या पतीने त्यांच्या जॉइंट अकाउंटमधून ४०,००० काढले आहेत. त्यांचा मूड खराब झाला. त्या चिडून उठल्या.
घरी येऊन स्वत:लाच खूप संयमित करीत काहीशा तिखट आवाजात त्या बोलल्या, ‘‘कॉलेजच्या फंक्शनसाठी मी मॉलमधील एक ड्रेस आणि मॅचिंग सँडल पसंत केले होते. माझ्या अकाउंटमध्ये आता आता केवळ दहा हजारच उरले आहेत आणि अजून पूर्ण महिना जायचा आहे. तो ड्रेस विकला गेल्याशिवाय राहील का?’’
मग काय, पती आदेश नाराज होऊन ओरडू लागले, ‘‘न जाणो आपल्या पैशांची किती घमेंड आली आहे. ड्रेसेस आणि सँडल्सचा भडिमार आहे, परंतु नाही. पॉलिसी एक्सपायर झाली असती, यामुळे मी पैसे काढले.’’
ईला चौधरी म्हणू लागल्या, ‘‘माझी सॅलरी ६०,००० आहे. मला कॉलेजमध्ये चांगल्या पद्धतीने ड्रेसअप होऊन जावे लागते. परंतु जसे मी काही नवे खरेदी करू इच्छिते, तुम्ही राग दाखवून मला माझ्या मनाचे करू देत नाही.’’
पतिने मूर्खात काढले
एका मोठया स्टोअरमध्ये मॅनेजरच्या पदावर काम करणाऱ्या मृदुला अवस्थी सांगतात, ‘‘आमच्या स्वत:च्या स्टोअरच्या मॅनेजरने पैशात पुष्कळ अफरातफरी केली. त्यामुळे त्याला काढले. पती हैराण होते. मी घरात रिकामी असण्याने दिवसभर वैतागायचे. त्यामुळे मी म्हटले की मी एमबीए आहे. जर तुम्ही म्हणाल तर स्टोअर सांभाळेन, परंतु माझी अट आहे की मी पूर्ण सॅलरी म्हणजेच तितकीच जितकी मॅनेजर घ्यायचा, घेईन.’’
पती अमर खुश होऊन म्हणाले, ‘‘हो. तू पूर्ण सॅलरी घे. तसंही सगळं तुझंच तर आहे.’’
पहिल्या महिन्यात तर कित्येक वेळा मागितल्यानंतर दिली. परंतु पुढच्या महिन्यापासून काही नाही. ‘सगळे काही तुझे वाला’ डायलॉग मूर्ख बनवण्यासाठी पुष्कळ आहे.