* प्रतिनिधी
मी २४ वर्षांची तरुणी आहे. ३-४ महिन्यानंतर माझं लग्न होणार आहे. मी अजूनपर्यंत कोणासोबतही सेक्स संबंध केले नाहीत. परंतु नियमित मॅस्टरबेशन करते. मला वाटतं की यामुळे प्रायव्हेट पार्टची त्वचा लूज पडली आहे. त्यामुळे मी खूप तणावात आहे. मी काय करू?
ज्या प्रकारे सेक्स केल्यामुळे नाजूक भागाची त्वचा लूज पडत नाही, त्याचप्रमाणे मॅस्टरबेशननेदेखील त्वचेवर कोणताही फरक पडत नाही आणि शिथिलतादेखील येत नाही. हा तुमचा एक भ्रम आहे.
खरं म्हणजे कोणत्याही अवयवाच्या कमी उपयोगाने शिथिलता येते. नियमित उपयोगाने नाही. तुम्ही तुमच्या लग्नाची तयारी करा आणि मनातील भीती पूर्णपणे काढून टाका. तुमच्या वैवाहिक आयुष्यावर कोणताही वाईट परिणाम होणार नाही.
मी २५ वर्षांची विवाहित स्त्री आहे. सासर आणि माहेर जवळजवळच आहे. त्यामुळे माझी आई आणि इतर नातेवाईक अनेकदा सासरी येतजात असतात. माझ्या पतींचा काहीच विरोध नाही. परंतु माझ्या सासूबाईंना हे आवडत नाही. त्या म्हणतात की तू तुझ्या आईला सांग की सारखं भेटायला येऊ नका. खरंतर सासरी माझ्या माहेरच्या लोकांचा पूर्ण मान राखला जातो. परंतु सासूबाईंचं म्हणणं आहे की नातेवाईकांमध्ये दुरूनच संबंध ठेवल्यामुळे नवेपणा राहतो. यामुळे घरात वाददेखील होतात. परंतु मी माझ्या आईला हे कसं सांगू? एकुलती एक मुलगी असल्यामुळे तिचं मन दुखवायचं नाही आहे. कृपया योग्य सल्ला द्या?
तुमच्या सासूबाईंचं म्हणणे योग्य आहे. नातं प्रेमाने निभवावं त्यामध्ये अंतर असावं. त्यामुळे नातेसंबंध दीर्घकाळ राहतात आणि संबंधांमध्येदेखील गोडवा राहतो.
अनेकदा काही प्रकरणांमध्ये मुलीचं सासर जवळ असतं, तेव्हा तिच्या माहेरच्या नातेवाईकांचंसारखं सासरी येणं जाणं असतं आणि ते अनेकदा कौटुंबिक प्रकरणांमध्येदेखील नाक खुपसतात. यामुळे मुलीचं घर विस्कटलं जातं.
भलेही प्रत्येक सुखदु:खात एकमेकांची साथ द्या, परंतु नात्यांमध्ये थोडं अंतर ठेवा. त्यामुळे सर्वांच्या मनात प्रेम व नात्यांचा गोडवा राहील.
तुम्ही तुमच्या आईशी याबाबत मोकळेपणाने बोलून घ्या. त्या तुमच्या आई आहेत आणि यामुळे तुमच्या घरात क्लेश होईल, हे त्यांना आवडणार नाही. होय, एक मुलगी असण्याची जबाबदारी तुम्हीदेखील निभवा आणि यासाठी एक निश्ंिचत वेळ वा दिवशी तुम्ही स्वत:हून माहेरी जाऊन तिची काळजी घ्या. तुम्ही त्यांच्याशी फोनवरुनदेखील नियमित संपर्कात रहा. माहेरच्यांच्या सुखदुखात सहभागी व्हा. नक्कीच यामुळे घरातील क्लेश कमी होईल आणि नात्यांमध्येदेखील गोडवा बनून राहील.