- मी ३१ वर्षांची विवाहित स्त्री आणि ४ वर्षांच्या मुलीची आई आहे. मी एका मुलावर खूप प्रेम करते. तोही माझ्यावर जिवापाड प्रेम करतो. मी विवाहित आणि एका मुलाची आई असूनही आम्हा दोघांचे प्रेमसंबंध खूप चांगले आहेत.
आम्ही निर्धास्त होऊन शारीरिकसंबंधही ठेवले आहेत. पण आता अचानक मला असं वाटू लागलं आहे की अशा प्रकारचं वाईट कृत्य मी करायला नकोय. म्हणून मी त्या मुलापासून दुरावा निर्माण केला आहे. पण तरी तो मला वारंवार फोन करत आहे.
तो मला भेटायला बोलवत आहे. मी त्याला एकदा भेटू का? मी काय करू सांगा?
तुम्ही एक विवाहित स्त्री आहात. अशा प्रकारे कोणा दुसऱ्या मुलाशी अनैतिक संबंध ठेवून तुम्ही केवळ आपलं वैवाहिक जीवन धोक्यात घालत नव्हतात, तर त्या मुलाचीही दिशाभूल करत होता. हे तर बरं झालं की वेळीच तुम्हाला तुमची चूक कळली आणि तुम्ही तुमचं पाऊल मागे घेतलं. तुमच्यावर केवळ तुमच्या कुटुंबाचीच नव्हे तर तुमच्या लहान मुलीच्या पालनाचीही जबाबदारी आहे. म्हणून आपल्या निर्णयावर ठाम राहा.
तुमच्या प्रियकराला स्पष्ट सांगा की तुम्हाला त्याला भेटायचं नाहीए. म्हणून त्याने संपर्क साधण्याचा प्रयत्न करू नये.
- मी ३० वर्षांची विवाहित स्त्री असून एका किशोरवयीन मुलाची आई आहे. अलीकडे मी माझ्या एका कौटुंबिक समस्येमुळे खूप चिंतित आहे. मी शासकीय शाळेत शिक्षिका आहे. मात्र माझ्या पतींची सध्या फार वाईट अवस्था सुरू आहे. ते ज्या खाजगी कंपनीमध्ये आधी काम करायचे तिथून त्यांना अचानक असं सांगून काढून टाकलं गेलं की सध्या कंपनीला आर्थिक मंदीचा फटका बसला आहे.
आता समस्या ही आहे की त्यांना आपली पोझिशन आणि पात्रतेनुसार काम मिळत नाहीए. त्यांना आधीच्या कंपनीमध्ये जितका पगार मिळत होता, तितक्याच पगारावर काम करायचं आहे. असं घरातच रिकामं बसून त्यांना दोन महिने झालेत.
मी त्यांना सतत सांगते की पगार कमी मिळाला तरी हरकत नाही, पण त्यांनी नोकरीत रूजू व्हावं. पण ते अजिबात ऐकतच नाहीएत. म्हणतात, जग पुढे चालले आहे आणि मी का म्हणून मागे जाऊ? तुम्हीच सांगा, मी त्यांना कसं समजावू?