* सोमा घोष
२२ वर्षीय सीमा नोकरीत रुजू होऊन काही दिवसच झाले होते, कार्यालयामधील एका वरिष्ठ कर्मचाऱ्याने तिला तिच्या कामाच्या प्रक्रियेत खूप मदत केली, त्यानंतर तो तिला वेळोवेळी जेवणासाठी किंवा चहासाठी बोलावू लागला. सुरुवातीला, सीमाला त्याच्या वागण्यात काही चुकीचे वाटले नाही, पण हळूहळू जेव्हा तिला त्याच्या बोलण्याच्या पद्धतीत वेगळेपणा जाणवू लागला, तेव्हा ती काम किंवा इतर काही सबबी सांगून त्याच्यासोबत जाण्यास नकार देऊ लागली. यामुळे त्याला जाणवले की, त्याचा डाव यशस्वी होणार नाही, त्यानंतर त्याने त्याचा विचार बदलला. सीमाला नोकरी सोडायची नव्हती आणि स्वत:ला त्या व्यक्तीपासून वाचवायचेदेखील होते. खरी वस्तुस्थिती तिला तिच्या सिक्स्थ सेन्समुळे कळली. तिची वेळ चांगली असल्याने पुढे त्या व्यक्तीने स्वत:हूनच कंपनी सोडली.
येथे समजून घेण्यासारखी गोष्ट अशी की, सेक्सुअल हरॅसमेंट म्हणजे लैंगिक छळाला बळी न पडण्याचे कारण सीमाची हुशारी होती, ज्यामुळे तिने कोणाचीही नाराजी ना पत्करता कार्यालयात स्वत:चे स्थान अतिशय काळजीपूर्वक निर्माण केले. सेक्सुअल हरॅसमेंट म्हणजे लैंगिक छळ, याचा अर्थ एखाद्या व्यक्तीशी लैंगिक स्वरूपाचे अवांछित वर्तन; हा एक प्रकारचा लैंगिक हिंसाचार आहे. लैंगिक छळ कायद्याविरुद्ध आहे, परंतु शाब्दिक गैरवर्तन किंवा स्पर्श करणे कायद्याने दंडनीय नाही, जरी यामुळे एखाद्या व्यक्तीला अपमानित, धमकी किंवा त्रासदायक वाटू शकते. लैंगिक छळाचे दोन प्रकार आहेत :
* तोंडी, ज्यामध्ये स्त्रीच्या शरीरावर, कपड्यांवर, शरीरयष्टीवर किंवा दिसण्यावर वारंवार टिप्पणी करणे समाविष्ट आहे.
* शारीरिक, ज्यामध्ये स्त्रीच्या शरीराला स्पर्श करणे, तिचे केस कुरवाळकणे, मिठी मारणे इत्यादी, ज्यामुळे तिला अस्वस्थ वाटेल.
खरं तर, लैंगिक छळ कोणत्याही व्यक्तीसोबत आणि कधीही होऊ शकतो. मग भलेही त्याचे लिंग कोणतेही असो. लैंगिक छळ कामाच्या ठिकाणी, पार्ट्यांमध्ये किंवा शाळेत होऊ शकतो. ही एकदा घडणारी घटना किंवा वारंवार होणारे वर्तन असू शकते. कायद्यात यासंदर्भात सामान्यत: छेडछाड किंवा आक्षेपार्ह टिप्पण्या समाविष्ट नाहीत, याचा संबंध परस्पर आकर्षण किंवा सहमतीने केलेल्या वर्तनाशी जोडला जाऊ शकत नाही. त्यामुळे, सुरुवातीला हे ठरवणे कठीण आहे की, जे घडले तो लैंगिक छळ आहे की संमतीने घडले आहे, कारण असे आढळून आले आहे की, महिलांना सिक्स्थ सेन्स असतो आणि हे विज्ञानानेदेखील मान्य केले आहे.
आकडेवारी काय सांगते?
वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यूनुसार, ३५ टक्के महिलांना त्यांच्या आयुष्यात लैंगिक छळाला सामोरे जावे लागते. महिला केवळ कामाच्या ठिकाणीच नव्हे तर घरातही लैंगिक छळाच्या बळी ठरतात. ज्या लोकांना याचा सामना करावा लागतो त्यांना अनेकदा त्रास, भीती, अपमान किंवा असुरक्षित वाटते. काहींसाठी, याचा त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर आणि त्यांच्या जीवनमानावर गंभीर परिणाम होतो.
१९७३ च्या सकाळी मुंबईतील परळ येथील किंग एडवर्ड मेमोरियल (केईएम) रुग्णालयाच्या तळघरात रक्ताच्या थारोळ्यात सापडलेल्या २५ वर्षीय नर्स अरुणा शानबाग यांची अवस्था, हे याचे उदाहरण आहे. तिच्या मेंदूला आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कण्याला दुखापत झाली. ती तळघरात एकटीच होती, तिचा गणवेश बदलत होती, तेव्हा तिचा सहकारी सोहनलाल वाल्मिकीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. वैद्यकीय तपासणीत असे दिसून आले की, हल्ल्यादरम्यान तिच्या गळ्यात कुत्र्याची साखळी बांधली होती आणि ती वळवण्यात आली होती, ज्यामुळे तिच्या मेंदूला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाला आणि ती कोमात गेली. ४२ वर्षे ती कोमात राहिल्यानंतर तिचा मृत्यू झाला.
नोंदवल्या न गेलेल्या घटना
हे देखील खरं आहे की, लैंगिक छळाच्या अनेक घटना नोंदवल्या जात नाहीत. एका सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, कामाच्या ठिकाणी होणाऱ्या छळाच्या सुमारे ७५ टक्के घटना नोंदवल्या जात नाहीत, कारण यामध्ये महिला नोकरी गमावण्याच्या आणि बदनामीच्या भीतीने गप्प राहातात, विशेषत: जर छळ करणारी व्यक्ती उच्च पदावर असेल तर कंपन्यादेखील कारवाई करत नाहीत.
कार्यालयातील वातावरण चांगले असणे गरजेचे
‘द कॉन्व्हर्सेशन’मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, सिक्स्थ सेन्स म्हणजे सहावे इंद्रिय शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे आणि पुरुषांपेक्षा महिलांमध्ये ते जास्त प्रमाणात आढळते. ब्रिटनच्या ‘युनिव्हर्सिटी ऑफ लंडन’च्या शास्त्रज्ञांनी नुकत्याच केलेल्या संशोधनात असे म्हटले आहे की, महिलांचा ‘सिक्स्थ सेन्स’ पुरुषांपेक्षा खूपच वेगळा असतो. संशोधन डेटाच्या विश्लेषणातून असे आढळून आले की, महिलांना त्यांच्या हृदयाचे ठोके आणि काही प्रमाणात फुफ्फुसांचे संकेत पुरुषांच्या तुलनेत जास्त अचूकपणे कळतात. याचे कारण असे की, पुरुषांपेक्षा महिलांना चिंता आणि नैराश्याचा धोका जास्त असतो, एखाद्या दुर्घटनेचा आभास त्यांना लवकर होतो.
महिलांना मार्शल आर्ट्स शिकवणारा अभिनेता विद्युत जामवालने एका मुलाखतीत सांगितले की, महिलांना सिक्स्थ सेन्स असतो, ज्याचा वापर त्या स्वसंरक्षणासाठी करू शकतात.
लैंगिक छळापासून वाचण्याचे उपाय
लैंगिक छळापासून वाचण्यासाठीचे काही उपाय:
* स्वत:ला कधीही दोष देऊ नका. तुम्ही जरी लैंगिक छळाचा बळी ठरला असाल तरी त्यासाठी तुम्ही जबाबदार नाही.
* जर तुमच्यासोबत गैरवर्तन केले जात असेल तर सांगायला उशीर करू नका. उशीर केल्याने छळ सुरूच राहाण्याची शक्यता वाढते.
* तुमच्यासोबत काय घडले, याबद्दल मोकळेपणाने बोला. छळ करणाऱ्याला लेखी संदेश पाठवा. त्यानंतरही जर छळ सुरूच राहिला तर रेकॉर्ड करा किंवा डायरीचा आधार घ्या. त्याचे बोलणे लिहून काढा किंवा रेकॉर्ड करा.
* तुम्हाला मदत करणाऱ्या सहकाऱ्यांशी बोला.
* जर तुम्ही लैंगिक छळाचे बळी ठरला असाल आणि तुम्हाला कोणतीही मदत मिळत नसेल तर पोलिसांकडे तक्रार करा.
* मुलींनी प्रत्येक वयात स्वत:ची ताकद ओळखली पाहिजे, कोणत्याही प्रकारचा छळ किंवा चुकीची परिस्थिती कशी टाळायची हे त्यांना माहीत असले पाहिजे.
* कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ रोखण्यासाठी, कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ कायदा, २०१३ (एसएच कायदा, २०१३) लागू करण्यात आला आहे. कायद्याची मदत घ्या.





