स्त्रियांमध्ये हृदयरोगाचा धोका

* डॉ. नीती चड्ढा

हदयरोगाचा धोका स्त्री आणि पुरुषांमध्ये एकसारखाच असतो. मात्र स्त्री आणि पुरुषांमध्ये कार्डिओलॉजी वेगळ्या प्रकारे काम करतं. पुरुष आणि स्त्रियांमध्ये कार्डिओवॅस्क्युलर आजारांच्या बरोबरीच्या धोकादायक कारकांव्यतिरिक्त (मधुमेह, उच्च रक्तदाब, रक्तामध्ये कोलेस्ट्रॉलचा वाढलेला स्तर आणि धूम्रपान) आणखीनही असे कारक आहेत, जे स्त्रियांमध्ये कार्डिओवॅस्क्युलर आजाराचा धोका वाढवतात.

अशात स्त्रियांना हे जाणून घेणंही तितकंच गरजेचं आहे की कोणकोणत्या कारणामुळे हृदयरोग होण्याचा धोका संभवतो.

रजोनिवृत्ती आणि एस्ट्रोजनची कमी

स्त्रियांच्या शरीरात बनणारं हार्मोन एस्ट्रोजन हृदयरोगापासून नैसर्गिक संरक्षण प्रदान करतं. वाढत्या वयाबरोबर नैसर्गिक एस्ट्रोजनच्या अभावामुळे त्यांच्यामध्ये रजोनिवृत्तीनंतर हृदयरोगाचा धोका वाढू शकतो. जर गर्भाशय किंवा अंडाशय काढण्याची सर्जरी रजोनिवृत्तीचं कारण असेल तर धोका आणखीन वाढतो.

गर्भनिरोधक गोळ्या

काही औषधी गोळ्या हृदयरोगाचा धोका निर्माण करू शकतात. विशेष करून त्या स्त्रियांमध्ये ज्या धूम्रपान करतात किंवा ज्यांना उच्च रक्तदाब असतो.

तणाव, लठ्ठपणा आणि थकवा ही काही धोक्याची कारणं आहेत जी तुलनात्मकरीत्या स्त्रियांना जास्त प्रभावित करतात.

डायबिटीज झालेल्या स्त्रियांचा कार्डिओवॅस्क्युलर आजारामुळे मृत्युचा धोका, डायबिटीज झालेल्या पुरुषांच्या तुलनेत जास्त असतो. गरोदरपणादरम्यान झालेला डायबिटीजदेखील स्त्रियांमध्ये धोका वाढवतो.

हृदयाचे अनेक प्रकारचे रोग स्त्रियांमध्ये पुरुषांच्या तुलनेत जास्त दिसून येतात. जसं की स्ट्रोक, हायपरटेंशन. एण्डोथेलियल डिसफंक्शन आणि कंजेस्टिव्ह हार्ट फेल्योर.

आज हेल्थकेअर समाजात सर्वात चर्चेचा विषय आहे. त्यामुळे स्त्रियांना या गोष्टीसाठी प्रेरित करायला हवंय की त्यांनी आपल्या लक्षणांवर लक्ष द्यावं आणि वेळीच रोगाच्या निदानासाठी उपचाराची निवड करावी.

कोरोना काळातील फूड हायजीन टीप्स

* पारुल भटनागर

बऱ्याचदा असे पहायला मिळते की, आपल्या चुकीच्या सवयीमुळेच आपण आजारी पडतो. खाण्यापिण्यासंदर्भातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष, दूषित जेवण जेवणे इत्यादी कारणांमुळे बॅक्टेरिया किंवा विषाणू आपल्या शरीरात प्रवेश करुन आपल्याला आजारी पाडतात. संशोधनानुसार असे सिद्ध झाले आहे की, दूषित खाण्यातून बॅक्टेरियांचा शरीरात शिरकाव झाल्यानंतर काहीच तासांनी त्यांची संख्या वेगाने वाढते ज्यामुळे पोटदुखी, उलटी किंवा ताप येतो. ही समस्या गंभीर झाल्यास आपल्या इम्युनिटीवर म्हणजे रोगप्रतिकारकशक्तीवर परिणाम होतो. आता जेव्हा संपूर्ण जग कोविड -१९च्या समस्येशी लढा देत आहे तेव्हा या समस्येकडे दुर्लक्ष करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अशावेळी तुम्ही घरी जेवण बनवा किंवा बाहेरुन खाण्यापिण्याच्या वस्तू आणा, प्रत्येक वेळी विशेष करुन स्वच्छतेकडे लक्ष द्यायलाच हवे, अन्यथा जरासाही बेजबाबदारपणा तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतो.

‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’नुसार, जगभरात दरवर्षी दूषित अन्न खाल्ल्यामुळे १० पैकी १ व्यक्ती आजारी पडते आणि दरवर्षी ४ लाख २० हजार लोकांचा मृत्यू होतो.

अशावेळी हे माहिती करुन घेणे खूपच गरजेचे आहे की, फूड हायजीन म्हणजे अन्नपदार्थांच्या सुरक्षेकडे लक्ष देऊन आपण स्वत:च्या आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्याकडे कसे लक्ष देऊ शकतो :

फळे आणि भाजीपाला स्टेरिलाईज कसा करावा?

फळे आणि भाज्या वापरापूर्वी चांगल्या प्रकारे धुतल्या न गेल्यास तुम्ही आजारी पडू शकता. आता तर कोरोना काळात त्यांना घरात आणताच लगेच धुवून त्यानंतर स्टोअर करणे गरजेचे आहे, जेणेकरुन संक्रमित व्यक्तीकडून फळे, भाजीपाल्याच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारच्या विषाणूच्या संपर्कात येण्यापासून तुम्ही वाचू शकाल. सोबतच फळे, भाजीपाल्यात ज्या कीटकनाशकांचा वापर केला जातो त्याचा प्रभावही या गोष्टी धुतल्यामुळे दूर करता येईल.

कसे कराल स्वच्छ?

* प्रत्येक भाजी स्वच्छ पाण्याखाली धरुन चांगल्या प्रकारे चोळून साफ करा. यामुळे त्यावरील किटाणू निघून जातील. फूड अॅण्ड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशननुसार, फळे, भाजीपाला धुण्यासाठी एखाद्या चांगला डिटर्जंट किंवा साबण वापरण्याची गरज नाही, कारण त्यात केमिकल्स असतात. त्यामुळे तुमच्या हार्मोन्सचे संतुलन बिघडून आरोग्यावर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. याउलट केवळ स्वच्छ पाण्याने फळे आणि भाज्या धुतल्यास बॅक्टेरिया मरतात. पण हो, या गोष्टीकडे लक्ष द्या की भाजीपाला धुण्याआधी आणि नंतर स्वत:चे हात स्वच्छ धुवा.

* फळे आणि भाज्या स्वच्छ धुण्यासाठी व्हिनेगर, बेकिंग पावडर खूप चांगला पर्याय आहे. तुम्ही कोमट पाण्यात हे दोन्हीही समान प्रमाणात घेऊन त्यात फळे, भाज्या २० मिनिटे ठेवून द्या. त्यानंतर स्वच्छ पाण्यात धुवून सुकवा व स्टोअर करा.

* हळद, व्हिनेगर आणि मीठ घातलेल्या कोमट पाण्यानेही तुम्ही फळे, भाज्या धुवू शकता. त्यासाठी तुम्हाला त्या कमीत कमी २० मिनिटे या पाण्यात ठेवाव्या लागतील. त्यानंतर स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुवून सुकल्यानंतर स्टोअर करा. लक्षात ठेवा, चांगल्या परिणामासाठी तिन्ही समप्रमाणात घेऊन त्यात लिंबाच्या रसाचेही काही थेंब टाका.

किराणा सामान स्वच्छ करणे गरजेचे

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, ग्रोसरी म्हणजे किराणा सामानामुळे विषाणूचा संसर्ग पसरण्याचा धोका खूपच कमी असतो. तरीही या महामारीच्या काळात जेवढी खबरदारी घेता येईल तेवढी कमीच आहे. अशावेळी आपण स्वत:ला बाहेर जाण्यापासून तर रोखू शकतो पण, खाण्यापिण्यासाठी किराणा सामान घ्यावेच लागते. त्यामुळे एकतर तुम्ही ते स्वत: घेऊन या किंवा ऑनलाइन मागवा. सामान आल्याबरोबर तसेच्या तसे स्टोअर करण्याची सवय बदला. उलट ग्रोसरी आणल्यानंतर ती थोडावेळ एकाच ठिकाणी ठेवा. वाइप्स अल्कहोलयुक्त सॅनिटायजरने साफ करा. यामुळे त्यावरील बॅक्टेरिया नष्ट होण्यासोबतच विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यताही जवळजवळ संपुष्टात येईल.

पॅकिंग केलेले सामान मागवण्याचाच प्रयत्न करा, कारण मोकळे सामान जास्त लोकांच्या संपर्कात आल्यामुळे संसर्ग पसरण्याची शक्यता असते. याउलट पॅकिंग सामानाबाबत अशा प्रकारची शक्यता फारच कमी असते.

जेव्हा बाहेर जेवणाची ऑर्डर द्याल

अनेकदा घरचे जेवण जेवल्याने कंटाळा येतो आणि मग बाहेरचे खाणे मागवले जाते. अशावेळी ते लगेच खाऊ नका. असे सांगितले जाते की, प्लॅस्टिकवर कोरोना विषाणू ७२ तासांपर्यंत जिवंत राहू शकतो, पण आतापर्यंत असे काहीच सिद्ध झालेले नाही की जेवण, खाण्यातून कोरोना विषाणूचा संसर्ग पसरतो. तरीही खबरदारी घेणे गरजेचे आहे.

म्हणूनच जेव्हा तुम्ही बाहेरून जेवण ऑर्डर कराल तेव्हा कॉण्टॅक्टलेस म्हणजे संपर्कविरहित डिलिव्हरी आणि ऑनलाइन पेमेंटचाच पर्याय निवडा. ऑर्डर आल्यानंतर ते जेवण आपल्या भांडयांमध्ये काढून गरम करायला विसरू नका. जेवणाची ऑर्डर घेताना आणि ती पाकिटे उघडल्यानंतर हात स्वछ धुवा. स्वयंपकाघरात जेथे जेवण ठेवाल ती जागाही चांगल्या प्रकारे डिसइन्फेक्टेडने स्वच्छ करा. अशा प्रकारे खाण्याच्या हायजीनकडे लक्ष देऊन स्वत:ला सुरक्षित ठेवता येईल.

दुधाची पिशवी कशी स्वच्छ कराल?

दूध हे अत्यावश्यक फूड आयटमपैकी एक समजले जाते. त्याच्याशिवाय बहुतांश घरातील दिवसाची सुरुवात होत नाही. पण आता प्रश्न असा आहे की, कोरोना काळात इतक्या अत्यावश्यक दुधाचा काळजीपूर्वक वापर कसा करावा, जेणेकरुन सुरक्षेसोबतच शरीराला पोषक तत्त्वेही मिळू शकतील.

‘फूड सेफ्ट अॅण्ड स्टॅण्डर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया’ने दूधाची सुरक्षा आणि हायजीनसंदर्भात काही टीप्स शेअर केल्या आहेत. त्यानुसार, जेव्हा तुम्ही दुधाची पिशवी घ्याल तेव्हा सर्वात आधी ती पाण्याने स्वच्छ धुवा. त्यानंतर ती सुकू द्या किंवा टिश्यू पेपरच्या मदतीने कोरडी करा, जेणेकरुन त्याचे पाणी भांडयात पडणार नाही.

कीटकांना घरात आश्रय देऊ नका

घरात कीटक राहू नयेत यासाठी पेस्ट कंट्रोल करणे खूपच गरजेचे आहे, कारण फूड हायजीनसाठी हे आवश्यक समजले जाते. कीटक जास्त करुन फ्रिजच्या कोपऱ्यात, स्वयंपकाघर, तेथील कपाट इत्यादी ठिकाणी लपून राहतात. कधी ते स्वयंपाकघरात फिरताना दिसतात तर कधी भांडयात जाऊन बसतात. त्यामुळे तुम्हाला फूड पॉयजनही होऊ शकते. तुमची इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारकशक्ती कमजोर होते. प्रत्यक्षात कोरोना विषाणूशी लढण्यासाठी इम्युनिटी वाढवणे खूपच गरजेचे आहे. म्हणूनच वरचेवर अशा सर्व जागा स्वच्छ करा.

स्वच्छ पाण्याचाच वापर करा

फूड हायजीनसाठी जेवण बनवण्यापूर्वी स्वच्छ पाण्याचा वापर करणे खूपच गरजेचे आहे, कारण दूषित पाण्यामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होतो. यामुळे उलटी, डायरिया आणि पोटासंबंधी समस्या निर्माण होतात. म्हणूनच जेव्हा जेवण बनवाल त्याआधी भाजीपाला, डाळी स्वच्छ पाण्यात धुवायला विसरू नका.

स्वयंपाकगृह ठेवा स्वच्छ

खाण्याच्या हायजीनकडे लक्ष देण्यासोबतच स्वयंपाकघराच्या स्वच्छतेकडेही लक्ष ठेवणे गरजेचे आहे,  कारण कुटुंबाचे आरोग्य त्यावरच अवलंबून असते. त्यामुळेच हे गरजेचे आहे की, दररोज त्या सर्व गोष्टी स्वच्छ करा जिथे बॅक्टेरिया तयार होण्याची शक्यता सर्वात जास्त असते. जसे की, प्लेट, ग्लास, वाटी इत्यादी वापरल्यानंतर हे सर्व लगेच धुवून ठेवा. वापरात नसले तरी वरचेवर धुवा. सोबतच प्रत्येक वेळी वापरल्यानंतर विळी, चाकू डिसइन्फेक्टेटने व्यवस्थित धुवा. स्पंज आणि स्वयंपाक घरातील कपडयांना रोज रात्री गरम पाण्यात डिसइन्फेक्टेट घालून १५ मिनिटे भिजवून ठेवा. यामुळे ते स्वच्छ होण्यासोबतच त्यातील किटाणूही नष्ट होतात. अशाच प्रकारे संपूर्ण स्वयंपाकघरही चांगल्या कपडयाने नेहमी स्वच्छ करा, कारण स्वयंपाकाची प्रत्येक गोष्ट स्वयंपाकघरातच असते आणि त्याला सतत हात लागल्यामुळे त्यावरील किटाणू खाद्यपदार्थात जाऊन आपल्याला आजारी पाडू शकतात. सिंक गरम पाणी आणि साबणाने रोज स्वच्छ करा. आठवडयातून एकदा स्वयंपाकघरातील प्रत्येक कोपरा, भांडी ठेवायचे कपाट, स्टोव्ह इत्यादी वस्तू चांगल्या प्रकारे डिसइन्फेक्टेड किंवा गरम पाण्यात साबणासह लिंबाच्या रसाचे काही थेंब टाकून व्यवस्थित स्वच्छ करा. यामुळे स्वयंपाकघर स्वच्छ आणि सुंदर दिसू लागेल आणि न दिसणारे बॅक्टेरिया मरुन जातील.

सर्व्हाइकल कॅन्सरपासून कसे वाचाल

* डॉ. अंजलि मिश्रा

भारतीय महिला मासिक पाळीशी संबंधित गोष्टींवर आजही खुलेपणाने बोलणं टाळतात. बहुधा याचमुळे भारतीय महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरनंतर सर्व्हाइकल कॅन्सर दुसरा सर्वसाधारण कॅन्सर बनून समोर येतोय.

कसा होतो

* सर्विक्स गर्भाशयाचा भाग आहे, ज्यात सर्व्हाइकल कॅन्सर ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (एचपीव्ही)च्या संक्रमणाने होतो.

* हे संक्रमण साधारणपणे शारीरिक संबंधांनंतर होते व या आजारात अनियमित रुपाने सेल्स वाढू लागतात.

* यामुळे योनीमध्ये रक्त येणे बंद होणे व संबंधांनंतर रक्तस्त्राव यासारख्या समस्या निर्माण होतात.

लक्षणे

साधारणपणे सुरुवातीला याची लक्षणे ठळकपणे समोर येत नाहीत, परंतु जर थोडीशी सावधगिरी बाळगली तर याची लक्षणे ओळखता येऊ शकतात :

* नियमित मासिक पाळीच्या दरम्यान रक्तस्त्राव होणे, संभोगानंतर रक्तस्त्राव होणे.

* पाण्यासारख्या दुर्गंधीयुक्त पदार्थाचे जास्त प्रमाणात स्त्रवणे.

* जेव्हा कॅन्सरच्या पेशी पसरू लागतात, तेव्हा ओटीपोटात वेदना होऊ लागतात.

* असामान्य अतिरक्तस्त्राव होणे वजन कमी होणे, थकवा जाणवणे व अॅनिमियाची समस्या ही देखील लक्षणे असू शकतात.

कॅट्रोल करण्याचे व्हॅक्सिन व टेस्ट

* तसे तर सुरुवातीला सर्व्हाइकल कॅन्सरची लक्षणे दिसून येत नाहीत, परंतु याला थांबवण्यासाठी व्हॅक्सिन उपलब्ध आहे, ज्यामुळे जवळपास ७० टक्केपर्यंत बचाव होऊ शकतो.

* नियमितपणे तपासणी केली गेली, तर सर्व्हाइकल कॅन्सरची लक्षणे ओळखता येऊ शकतात.

* आजाराचे निदान करण्यासाठी साधारणपणे पॅप स्मीअर टेस्ट केली जाते, या टेस्टमध्ये प्री कॅन्सर सेल्सची तपासणी केली जाते.

* एलबीसी टेक्निकच्या अॅडव्हान्स वापरामुळे सर्व्हाइकल कॅन्सरची तपासणी करण्यात सुधारणा झाली आहे.

उपचार

* जर सर्व्हाइकल कॅन्सरचे निदान सुरुवातीच्या स्टेजला केले, तर वाचण्याची शक्यता ८५ टक्क्यांपर्यंत असते.

* तसे तर सर्व्हाइकल कॅन्सरचा उपचार या गोष्टीवर अवलंबून आहे की कॅन्सर कोणत्या स्टेजला आहे. सर्वसाधारणपणे सर्जरीद्वारे गर्भाशय काढले जाते व जर आजार अगदीच अॅडव्हान्स्ड स्टेजला असेल, तर केमोथेरपी व रेडिओथेरपीदेखील दिली जाते.

सावधानता आहे गरजेची

* डॉक्टरकडून सल्ला घेऊन अँटी सर्व्हाइकल कॅन्सरच्या लसी घ्याव्यात.

* महिलांनी विशेषत: व्यक्तिगत स्वच्छतेकडेदेखील लक्ष दिले पाहिजे, कारण जननेंद्रियांची स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे.

* मासिक पाळीत चांगल्या प्रतीच्या सॅनिटरी नॅपकिनचा वापर केला पाहिजे.

* वेळीच डॉक्टरांशी संपर्क करणे कॅन्सरच्या उपचारांवरील सगळयात महत्त्वाचे पाऊल आहे. त्यामुळे शरीरातील बदलांना दुर्लक्षित करू नये.

महत्त्वपूर्ण तथ्य

स्पष्ट शब्दांमध्ये सांगायचे, तर जगातील विकसित देशांमध्ये १०० पैकी एका स्त्रीला आयुष्यात सर्व्हाइकल कॅन्सर होतो, तर भारतात ५३ स्त्रियांपैकी एकीला हा आजार होतो. म्हणजे भारतीय आकडेवारीनुसार जवळपास अर्ध्याचा फरक आहे.

अन्य कारणे

* लहान वयात संभोग करणे.

* एकापेक्षा जास्त पार्टनरसोबत

* शारीरिक संबंध ठेवणे.

* अॅक्टिव वा पॅसिव्ह स्मोकिंग.

* सातत्याने गर्भनिरोधक औषधांचा

वापर.

* रोग प्रतिकार शक्ती कमी होणे.

रोगप्रतिकारक शक्ति वाढवणारे खाद्यपदार्थ

*  प्रतिनिधी

तुम्ही अनेकदा डॉक्टरांकडून हे ऐकले असेल की तुमची इम्यूनिटी म्हणजे रोगप्रतिकारक शक्ति कमकुवत आहे. म्हणूनच तुम्ही बऱ्याचदा खोकला, सर्दी किंवा इतर आजारांना लवकर बळी पडता. आजारी पडण्याचा प्रतिकारशक्तिशी काय संबंध आहे हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल? आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की तुमची रोगप्रतिकारक शक्ति शरीराचे विविध रोगांपासून संरक्षण करते. तुमची रोगप्रतिकार शक्ति जितकी अधिक कणखर होईल तितके तुम्ही आजारी पडण्याची शक्यता कमी आहे.

हवामान कोणतेही असो, आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ति योग्य ठेवणे महत्वाचे आहे.

आपण खाल्लेल्या प्रत्येक गोष्टीचा आपल्या रोगप्रतिकारक शक्तिवर परिणाम होतो. पुढील खाद्यपदार्थ आपली रोगप्रतिकार शक्ति बळकट करतात :

बदाम : दररोज ८-१० भिजवलेले बदाम खाल्ल्याने केवळ शरीराची प्रतिकारशक्तिच वाढते असे नाही तर मेंदूला ताणतणावाशी सामोरे जाण्याची शक्तिदेखील मिळते. व्हिटॅमिन ई शरीरात नैसर्गिकरित्या आढळणाऱ्या नैसर्गिक किलर पेशींना वाढविण्यास मदत करते, ज्या विषाणू आणि कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यास मदत करतात. बदामात आढळणारे व्हिटॅमिन ई त्वचा निरोगी बनवते तसेच सुरकुत्या पडण्याची प्रक्रिया कमी करते.

लसूण : ही मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट बनवून आपल्या रोगप्रतिकार क्षमतेला आजारांशी लढण्याचे सामर्थ्य देते. यामध्ये एलिसिन नावाचा घटक आढळतो, जो शरीराला संसर्ग आणि बॅक्टेरियांशी लढण्याची शक्ति देतो.

आंबट फळे : संत्री, लिंबू, अननस आणि ईडलिंबूसारख्या आंबट फळांमध्ये व्हिटॅमिन सी पर्याप्त प्रमाणात आढळते, ज्यामुळे सर्व प्रकारच्या संक्रमणाशी लढणाऱ्या पांढऱ्या रक्त पेशी तयार होण्यास मदत होते. या फळांच्या सेवनाने तयार झालेल्या अँटीबॉडीज पेशींच्या पृष्ठभागावर एक कोटिंग बनवतात, ज्यामुळे विषाणू शरीरात प्रवेश करू शकत नाही. यामध्ये असलेल्या व्हिटॅमिन सीमुळे एलडीएल म्हणजेच शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल वाढते, जे कार्डियो व्हॅस्क्युलर रोगांपासून संरक्षण करते आणि रक्तदाब नियंत्रित ठेवते. म्हणून आपल्या दैनंदिन आहारामध्ये काही आंबट फळांचा समावेश अवश्य करा.

पालक : पोषक तत्वांनी समृद्ध असलेल्या या पालेभाजीला सुपर फूड म्हणून ओळखले जाते. यामध्ये फोलेट नावाचा घटक आढळतो, जो शरीरात नवीन पेशी तयार करण्याबरोबरच त्या पेशींमध्ये असलेल्या डीएनएची दुरुस्ती करण्याचेही काम करतो. यामध्ये असलेले फायबर लोह, अँटिऑक्सिडेंट घटक आणि व्हिटॅमिन सी शरीराला सर्व प्रकारे निरोगी ठेवतात. उकडलेल्या पालक भाजीच्या सेवनाने पचनयंत्रणा योग्यरित्या कार्य करते.

मशरूम : यामुळे शरीराची रोग प्रतिकारकशक्ति वाढते. हे पांढऱ्या रक्त पेशी सक्रिय करण्यात मदत करते. यात सेलेनियम नावाचे मिनरल, अँटीऑक्सिडेंट घटक, व्हिटॅमिन बी आणि नाइसिन नावाची खनिजे आढळतात. यांमुळे मशरूममध्ये अँटीव्हायरल, अँटीबॅक्टेरिअल आणि अँटीट्यूमर घटक आढळतात. शिटाके, मिटाके और रेशी नावाच्या मशरूमच्या प्रजातीमध्ये शरीराची रोग प्रतिकारशक्ती बळकट करणारे घटक पुरेशा प्रमाणात आढळतात.

ब्रोकोली : यामध्ये व्हिटॅमिन ए आणि सी व्यतिरिक्त ग्लूटाथिओन नावाचा एक अँटीऑक्सिडेंट घटकदेखील आढळून येतो. ही एक अशी भाजी आहे जी रोगप्रतिकार शक्ति बळकट करते, ज्याचा वापर तुम्ही दररोजच्या आहारात सहजपणे करू शकता. थोडयाशा पनीरमध्ये वाफवलेल्या ब्रोकोलीचे मिश्रण करून एक चविष्ट कोशिंबीर तयार केली जाऊ शकते, ज्याच्या सेवनामुळे शरीराला पुरेशा प्रमाणात प्रोटीन आणि कॅल्शियम देखील मिळते.

लाल शिमला मिरची : ही भोजनाचा स्वाद तर वाढवतेच, तसेच आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. यात व्हिटनि सी पुरेशा प्रमाणात असते, जे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडेंट असते. लाल शिमला मिरचीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन बी ६ असते.

कोरोनापासून असे सुरक्षित ठेवा कुटुंब

* गरिमा पंकज

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जगभरात पसरत चालला आहे. कोरोनाबाधित आणि मृतांच्या दिवसागणिक वाढत जाणाऱ्या आकडयांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ऑफीस बंद होत आहेत. शाळा, महाविद्यालयेही बंद झाली आहेत. संपूर्ण कुटुंब घरात कैद झाले आहे. अशावेळी महिलांची जबाबदारी वाढली आहे. त्यांना कुटुंबाच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष द्यावे लागत आहे.

मुलांची काळजी कशी घ्यावी?

मुलांना विश्वास द्या : मुले अनेकदा वस्तूंना हात लावतात. खाण्याचे पदार्थ इतरांशी शेअर करतात. म्हणजे ते संसर्ग पसरवण्याचे मोठे माध्यम आहेत. अशावेळी कोरोना म्हणजे काय आणि त्यापासून दूर राहणे किती गरजेचे आहे, हे तुम्हाला मुलांना सांगावे लागेल. मुलांसोबत या विषयावर मनमोकळेपणाने बोला. त्यांना आवश्यक ती काळजी घ्यायला सांगा.

कोरोना संसर्गासारख्या महामारीबाबत मुलांशी कशाप्रकारे बोलावे, हे त्या मुलांच्या वयानुसार ठरवावे. लहान मुले म्हणजे सर्वसाधारणपणे ६-७ वर्षांच्या मुलांना या विषयावर बोलायला आवडत नाही. याबाबत सांगितलेले ती लक्षपूर्वक ऐकत नाहीत. त्यामुळे त्यांना प्रेमाने जवळ बसवून या आजाराबाबत प्राथमिक माहिती  द्या. कोरेना संसर्गाबाबत सावध करा. मोठया मुलांनाही हात धुणे आणि मास्क लावण्याचे महत्त्व समजावून सांगा. त्यांना सांगा की, काही जणांना कोरोना झाला असेल, पण खबररदारी बाळगल्यास काहीच होणार नाही. असे काय करायला हवे ज्यामुळे कोरोना संसर्ग होणार नाही, याचीही माहिती मुलांना द्या. सोबत कोरोना संसर्गापासून वाचणे आपल्याच हाती आहे, याची जाणीव त्यांना करुन द्या.

तुमच्याकडून मुले शिकतात : लहान मुलांवर आईवडिलांचा मोठा प्रभाव असतो. त्यांच्याकडूनच ती शिकतात. त्यांच्यासारखेच वागायचा प्रयत्न करतात. तुम्ही बाहेर पडताना मास्क घातलात, वेळोवेळी हात धुतले आणि सॅनिटायजरचा वापर केल्यास मुलेही तुमचेच अनुकरण करतील. युवा अवस्थेतील मुलांचे विश्व वेगळे असते. ते जगभरातील माहिती जाणून घेण्यासाठी आईवडिलांवर फारशी अवलंबून नसतात. त्यांना याबाबतची माहिती जास्त करुन मित्रांकडून मिळते. त्यामुळेच सर्वकाही ठीक आहे, असे एखाद्या १४ वर्षांच्या मुलाला सांगितले तर त्याचा त्यावर विश्वास बसणार नाही. कारण तुम्ही जेव्हा असे सांगाल त्यावेळी तुम्हाला काहीच माहिती नाही, असे उत्तर तो तुम्हाला देईल. तुम्ही मुलाशी इतके मनमोकळेपणे वागायला हवे की, मनातील प्रत्येक गोष्ट तो तुमच्याशी शेअर करेल.

सर्वाधिक धोका कोणाला? : पुरुषांच्या तुलनेत महिला आणि मुलांना कोरोनाचा धोका कमी असल्याचे पहायला मिळते. मृतांमध्ये महिला आणि मुलांचा आकडा कमी आहे. पण म्हणून खबरदारी घेणे गरजेचे नाही, असा याचा अर्थ होत नाही.

वयाचा विचार केल्यास कोरोना संसर्गामुळे ०.२ टक्के लहान मुले आणि युवकांचा, तर ८० वर्षांहून अधिक वय असलेल्या १५ टक्के लोकांना जीवास मुकावे लागले आहे. वाढत्या वयासोबत आजारी पडण्याचे प्रमाणही वाढते कारण, त्यांच्यातील रोगप्रतिकारकशक्ती कमी होते. वय झालेल्या, आधीपासूनच रोगप्रतिकारकशक्ती कमी असलेल्या तसेच दम्यासारखे गंभीर आजार असलेल्यांमध्ये कोरोनाचा जास्त संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. म्हणूनच वृद्ध आणि आजारी व्यक्तींची जास्त काळजी घ्या. त्यांना घराबाहेर पाठवू नका.

कोरना संसर्गापासून कसे करावे रक्षण

भेटीगाठी घेणे टाळा : आजारी लोकांना भेटणे टाळा. स्वत: आजारी असाल तर डॉक्टरांकडे जाण्याव्यतिरिक्त इतर कुठेही जाणे टाळा. सर्दी, खोकला झाल्यास रुमालाचा वापर करा. कुटुंबाच्या संपर्कात येणे टाळा. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा. दरवाजाचे हँडल, स्वीचबोर्ड आदींना सतत हात लावणे टाळा.

घरातील स्वच्छतेकडे लक्ष द्या : घरात ज्या वस्तू दररोज वापरल्या जातात त्या रोज स्वच्छ करा. खुर्ची, जेवणाचे टेबल, विजेची बटणे, दरवाजा इत्यादींचा वापर घरातील सर्वच करतात. म्हणूनच दिवसातून दोनदा त्यांची साफसफाई करा.

हात २० सेकंदांपर्यंत धुवा : पाणी, साबण किंवा हँड वॉशने २० सेकंदांपर्यंत चोळून हात धुवा. जेवणापूर्वी आणि जेवणानंतर, टॉयलेटला जाऊन आल्यानंतर साबणाने हात धुवा. ज्यात ६० टक्के अल्कहोल असेल अशाच सॅनिटायजरचा वापर करा.

मास्कचा वापर : तोंड मास्कने झाकून घ्या. खोकताना किंवा शिंकताना टिश्यू पेपर वापरा व नंतर तो कचऱ्यात फेकून द्या. बाहेर जातानाही मास्कचा वापर करा. जर तुमच्या जवळपास एखादा विषाणू आलाच तरी तोंड आणि नाक झाकलेले असल्यामुळे तो तुम्हाला संक्रमित करू शकणार नाही आणि तुम्ही सुरक्षित रहाल.

डाएट कसा असावा? : कुठलातरी एखादा खाद्यपदार्थ तुम्हाला कोरोनापासून वाचवू शकत नाही. पण पौष्टिक आणि समतोल आहार तुमची रोगप्रतिकारकशक्ती वाढवू शकतो. यामुळे कोरोनाशी लढण्यासाठी तुमचे शरीर मजबूत होईल. आहारात वैविध्य हवे. विविध प्रकारची फळे, कडधान्ये, हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करा.

फळे आणि पालेभाज्या : रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. संत्री, मोसंबी, आवळा, लाल किंवा पिवळी शिमला मिरची, किवी, पपई, गाजर, लिंबू इत्यादींपासून तुम्हाला अगदी सहजपणे व्हिटॅमिन सी मिळू शकते.

अंडी आणि डाळी : शरीरात झिंक म्हणजे जस्ताची कमतरता असल्यास तुम्ही सहजपणे आजाराचे शिकार होऊ शकता. गहू, बीन्स, मटार, डाळी इत्यादी झिंकचे महत्त्वपूर्ण स्रोत आहेत.

आल्याचा चहा : तुम्हाला सर्दी, खोकला असेल तर आहारात आल्याचा नक्की वापर करा. आल्याची चहा पिणे हे सर्वात उत्तम. आल्यात लोह, जस्त, कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम भरपूर प्रमाणात असते.

खोबरेल तेल : घरात जेवण बनवताना सरसोचे तेल किंवा रिफाईंडऐवजी खोबरेल तेलाचा वापर करणे जास्त उपयुक्त ठरेल. यात लॉरिक अॅसिड, आर कॅप्रिलिक अॅसिड असते, जे तुमच्यातील रोगप्रतिकारकशक्ती वाढवून तुमचे विषाणूंपासून संरक्षण करते.

व्हिटॅमिन ए : तुमचे आरोग्य आणि रोगप्रतिकारकशक्ती मजबूत करण्यासाठी व्हिटॅमिन ए खूपच महत्त्वपूर्ण आहे. मासे, अंड्यातील पिवळा बलक, चीज, डाळी आणि मेथी, पालकासारख्या हिरव्या पानांच्या भाज्यांमधून तुम्हाला पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन ए मिळू शकेल.

लसूण : यात एलिसीन असते, ज्याच्या सेवनामुळे शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढते. दररोज लसणाच्या दोन पाकळया गरम पाण्यासोबत खा किंवा तुम्ही याचे सूप बनवूनही पिऊ शकता. लसूण खाल्लयाने सर्व प्रकारचे व्हायरल इन्फेक्शन आणि संसर्गापासून स्वत:चे रक्षण करता येते.

व्हिटॅमिन डी : सूर्यकिरणांपासून नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन डी मिळते. सुरमई, मासे, अंडी, चीज, मशरममधूनही व्हिटॅमिन डी मिळते.

पाणी : पुरेशा प्रमाणात पाणी प्या. कोमट पाणी प्या. स्वत:ला हायड्रंट ठेवा.

आराम आणि व्यायाम : पुरेशी झोप घ्या. सोबतच सकाळच्या वेळेस फेरफटका मारा. व्यायाम अवश्य  करा. व्यायामामुळे शरीर आतून मजबूत होते आणि इन्फेक्शनचा धोका कमी होतो.

हॅप्पी प्रेगनन्सी

– डॉ. साधना सिंघल

स्त्रीरोगतज्ज्ञ, श्री बालाजी अॅक्शन मेडिकल इन्स्टिट्यूट, नवी दिल्ली

आई बनणे स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण आहे. परंतु अनेकदा काही कारणांमुळे काही स्त्रिया आई बनू शकत नाहीत. अशा परिस्थितीत निराश होणे स्वाभाविक आहे. परंतु बऱ्याचदा काही गोष्टींची काळजी घेऊन आणि वैद्यकीय सल्ला घेऊन उणिवा दूर केल्यास आई बनण्याचे सुख मिळविता येऊ शकते.

जाणून घेऊया प्रेगनन्सीसाठी कोणकोणत्या खास गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सोबतच प्रेगनन्सीची प्रक्रिया आणि त्याच्याशी संबंधित गुंतागुंत याबाबत :

महत्त्वपूर्ण खबरदारी

  • ३२ वर्षांनंतर, स्त्रियांमधील गर्भधारणेची क्षमता कमी होऊ लागते. म्हणूनच जर एखाद्या स्त्रीचे वय ३२ वर्ष झाले असेल तर तिने तिच्या गर्भधारणेस उशीर करू नये. जर ती नैसर्गिकरित्या गर्भवती होऊ शकत नसेल तर तिने त्वरित विशेषज्ञांना दाखवले पाहिजे.
  • धूम्रपान केल्यानेही आई बनण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. इतकेच नाही, यामुळे गर्भपात होण्याचा धोकादेखील असतो, म्हणून स्त्रियांनी धूम्रपान करू नये.
  • खूप जास्त वजन असणेही आई बनण्यासाठी अडथळा ठरू शकते. जर तुम्ही लठ्ठ असाल आणि तुम्हाला गरोदरपणात त्रास होत असेल तर तुम्ही आपले वजन कमी करा.
  • ज्या महिला शाकाहारी असतात, त्यांनी आपल्या आहारात फॉलिक अॅसिड, झिंक आणि व्हिटॅमिन १२ घेण्याची गरज असते. शरीरात या पोषक तत्त्वांचा अभावही गर्भधारणेत अडथळा आणतो.
  • जर तुम्ही एका आठवडयामध्ये ७ तासांपेक्षा जास्त व्यायाम करत असाल तर तो कमी करणे गरजेचे आहे. गरजेपेक्षा जास्त व्यायामामुळे ओव्हुलेशनची समस्या निर्माण होते, ज्यामुळे गर्भधारणेत त्रास होतो.
  • शारीरिक निष्क्रियताही कधीकधी गर्भधारणेत अडथळा आणते. जर तुम्ही खूप आळशी, शारिरीकदृष्टया अॅक्टिव्ह नसाल तर तुम्हाला अॅक्टिव्ह व्हावे लागेल.
  • एसटीआय अर्थात लैंगिक संक्रमणामुळेही गर्भधारणेच्या क्षमतेवर परिणाम होतो. तुम्हाला अशी काही समस्या असल्यास त्वरित उपचार करा.
  • पेस्टिसाइड्स, हर्बिसाइड्स, धातू यासह काही रासायनिक घटक असे असतात की ज्यांच्या संपर्कात आल्यामुळे गर्भधारणेच्या क्षमतेवर परिणाम होतो. म्हणूनच शक्य तितके यांच्या थेट संपर्कात येणे टाळा.
  • मानसिक तणावही गर्भधारणेच्या क्षमतेवर परिणाम करते. म्हणून जर तुम्ही जास्त ताण घेत असाल तर ते टाळा.

 

गर्भधारणा कशी होते

एक स्त्री जिला दरमहा मासिक पाळी येते, तिच गर्भधारणा करू शकते. खरेतर २ मासिक पाळीदरम्यान ओव्हुलेशन कालावधी असतो. हा तो काळ असतो, जेव्हा अंडाशयातून अंडी रिलीज होतात, म्हणजे सोडली जातात. सामान्य स्थितीत एका स्त्रीमध्ये पुढील मासिक पाळीच्या २ आठवडयांपूर्वी ओव्हुलेशन प्रक्रिया सुरू होते. ओव्हुलेशनदरम्यान सोडलेली अंडी २४ तास जिवंत राहतात आणि त्यानंतर मरतात. ओव्हुलेशनदरम्यान पती-पत्नीमध्ये शारीरिक संबंध येतो, तेव्हा अंडी आणि शुक्राणू एकमेकांच्या संपर्कात येतात. त्याच वेळी, शुक्राणूने अंडयाला फर्टिलाइज्ड म्हणजे फलित केल्याने स्त्री गर्भधारण करते.

गर्भधारणेसाठी सर्वोत्तम वेळ

ओव्हुलेशनवेळी शारीरिक संबंध ठेवणे ही गर्भधारणेसाठी सर्वात चांगली वेळ असते. सामान्य स्त्रीमध्ये ओव्हुलेशनचा कालावधी ६ दिवस असतो. ओव्हुलेशननंतर जिथे अंडी फक्त १ दिवस टिकतात, शुक्राणू १ आठवडयापर्यंत टिकतात. अशाप्रकारे ओव्हुलेशन नंतरचे ५ दिवस गर्भधारणेसाठी उत्तम मानले जातात. विशेषज्ञांच्या मते, जर ओव्हुलेशनच्या १-२ दिवस आधी शारीरिक संबंध ठेवले तर गर्भधारणेची क्षमता मोठया प्रमाणात वाढते, कारण यामुळे शुक्राणूंना अंडयांशी संपर्क साधण्यास अधिक वेळ मिळतो.

गर्भधारणेदरम्यान येणाऱ्या समस्या

गर्भधारणेनंतर स्त्रीला खूप काळजी घ्यावी लागते. तसे न केल्यास तिला अनेक समस्या येतात.

उच्च रक्तदाब : गर्भधारणेदरम्यान बऱ्याच महिलांमध्ये उच्च रक्तदाब म्हणजे हाय बीपीची तक्रार असते.

अॅनिमिया : गर्भवती महिलेने पुरेशा लोहाचे सेवन न केल्यास तिच्या शरीरातील हिमोग्लोबिन कमी होते. याकडे दुर्लक्ष केल्यास आई आणि मूल, दोघांचाही जीव जाऊ शकतो.

संसर्ग : गर्भवती महिलेस इन्फ्लूएन्  हॅपिटायटीस ई, हर्पिस सिम्पलेक्स, मलेरिया इत्यादी आजार होण्याचा धोका अधिक असतो. या आजारांवर वेळेवर उपचार करणे फारच गरजेचे असते, अन्यथा आई आणि मूल दोघांचा मृत्यू होऊ शकतो.

मूत्रमार्गातील असंयम : गर्भधारणेदरम्यान बऱ्याचदा मूत्रमार्गातील असंयम म्हणजे मूत्रमार्गाचे विकार होतात. ही समस्या उद्भवते तेव्हा डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

तणाव : गर्भावस्थेदरम्यान आणि नंतर बऱ्याच स्त्रिया प्रचंड मानसिक तणावाखाली येतात. या तणावाचा परिणाम आई आणि मूल दोघांवर होतो. म्हणून शक्य तितक्या लवकर तणावातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

मुलीला अवश्य सांगा मासिक पाळीसंबंधी या टीप्स

* प्रतिनिधी

बहुतांश आया मासिक पाळीबाबत मुलीशी मोकळेपणाने बोलत नाहीत. हेच कारण आहे की या दरम्यान मुली हायजिनच्या महत्वाकडे दुर्लक्ष करतात आणि अनेक समस्यांच्या भक्ष्य बनतात.

मासिक पाळीबाबत जागरूकता नसणे याचे मोठे कारण आहे. सादर आहेत काही टीप्स ज्या प्रत्येक आईने आपल्या किशोरवयीन मुलीला द्यायला हव्या. जेणेकरून ती मासिकपाळीदरम्यान येणाऱ्या सगळया समस्यांना तोंड देऊ शकेल.

कपडयाला नाही म्हणा : आजही आपल्या देशात जागरूकता कमी असल्याने मासिक पाळी दरम्यान तरुणी कपडा वापरतात. असे केल्याने त्यांना गंभीर आजार होऊ शकतात. कपडयाचा वापर केल्याने होणाऱ्या आजारांबाबत आपल्या मुलीला जागरूक बनवणे हे प्रत्येक आईचे कर्तव्य आहे. मुलीला सॅनिटरी नॅपकीनचे फायदे सांगा आणि तिला याची माहिती द्या की हे वापरल्यास ती आजारांपासून दूर तर राहीलच, शिवाय या दिवसातही मोकळेपणाने वावरू शकेल.

केव्हा बदलावे पॅड : प्रत्येक आईने आपल्या मुलीला हे नक्कीच सांगावे की साधारणत: दर ६ तासांनी सॅनिटरी नॅपकीन बदलवायला हवे. याशिवाय आपल्या गरजेनुसारसुद्धा सॅनिटरी नॅपकीन बदलायला हवा. जास्त स्त्राव असल्यास तुम्हाला सतत पॅड बदलावे लागते, पण जर स्त्राव कमी असेल तर सतत पॅड बदलायची गरज नसते. तरीही ४-६ तासांनी सॅनिटरी नॅपकीन बदलत राहावे जेणेकरून इन्फेक्शनपासुन सुरक्षित राहू शकू.

गुप्तांगांची नियमित स्वच्छता : मासिक पाळी दरम्यान गुप्तांगांच्या आजूबाजूच्या त्वचेत रक्त गोळा होते, जे संक्रमणाचे कारण बनू शकते. म्हणून गुप्तांगांची नियमित स्वच्छता करण्याचा सल्ला द्या. यामुळे व्हजायनातुन दुर्गंधी येणार नाही.

हे वापरू नका : व्हजायना आपोआप स्वच्छ ठेवण्याची एक नैसर्गीक प्रक्रिया असते, जी चांगल्या आणि वाईट बॅक्टेरियाचे संतुलन कायम ठेवते. साबण योनी मार्गात असलेल्या चांगल्या बॅक्टेरियाना नाहीसे करू शकते. म्हणून याचा वापर करू नका, असा सल्ला द्या.

धुण्याची योग्य पद्धत : मुलीला सांगा की गुप्तांगांना स्वच्छ ठेवण्यासाठी योनीकडून पार्श्वभागाच्या दिशेने स्वच्छ करा म्हणजे समोरून मागच्या दिशेने. उलटया दिशेला कधीही करू नका. उलटया दिशेने धुतल्यास पार्श्वभागात असलेले बॅक्टेरिया योनीत जाऊ शकतात आणि संक्रमणाचे कारण बनू शकतात.

सॅनिटरी पॅडची विल्हेवाट : वापरलेले पॅड योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने फेकायाला सांगावे, कारण हे संक्रमणाचे कारण बनू शकतात. पॅडस फ्लश करू नका, कारण यामुळा टॉयलेट ब्लॉक होऊ शकते. नॅपकीन फेकल्यावर हात नीट धुणे आवश्यक आहे.

रॅशेशपासून कसे दूर राहाल : मासिक पाळीत जास्त स्त्राव झाल्यास पॅडसचे रॅशेश येण्याची संभावना खूप वाढते. असे साधारणत: तेव्हा होते जेव्हा पॅड खूप काळ ओला राहतो आणि त्वचेववर घासल्या जातो. म्हणून मुलीला वेळोवेळी पॅड बदलायला सांगा. जर रॅश आलाच तर आंघोळीनंतर आणि झोपताना अँटीसेप्टीक ओइन्टमेन्ट लावा. जर ओइन्टमेन्ट लावूनही रॅश बरा झाला नाही तर तिला डॉक्टरकडे घेऊन जा.

एकाच प्रकारचा सॅनिटरी नॅपकीन वापरा : ज्या किशोर वयीन मुलींमध्ये स्त्राव जास्त होतो, त्या एकाच वेळी २ पॅड्स अथवा एका पॅडसोबत टोपोन वापरू शकतात किंवा कधीकधी सॅनिटरी नॅपकिनसोबत कपडासुद्धा वापरू वापरतात म्हणजे असे केल्याने त्यांना दीर्घ काळ पॅड बदलावे लागत नाही. अशा वेळी मुलीला सांगा की एका वेळी एकाच प्रोडक्ट वापर. जेव्हा एकाच वेळी दोन प्रकारचे प्रॉडक्ट वापरल्या जातात तेव्हा जाहीर आहे की हे बदलता येत नाहीत, ज्यामुळे इन्फेक्शनची संभावना आणखीनच वाढते.

होली स्पेशल : खेळा आरोग्यदायी अन् सुरक्षित होळी

– प्रतिनिधी

परंपरेनुसार होळी ही गुलालाने खेळली जात असे जो ताज्या फुलांनी बनवला जात होता. पण आजकाल रंग केमिकलचा वापर करून फॅक्टरीमध्ये बनवले जाऊ लागले आहेत. यांमध्ये सामान्यपणे वापरले जाणारे केमिकल्स आहेत, लेड ऑक्साइड, कॉपर सल्फेट, अॅल्युमिनिअम ब्रोमाइड, प्रुशियन ब्लू, मर्क्युरी सल्फाइट. यापासून काळा, हिरवा, सिल्वर, निळा आणि लाल रंग बनतो. हे रंग दिसायला जेवढे आकर्षक दिसतात, तेवढेच हानिकारक तत्त्व यात वापरलेले असतात.

लेड ऑक्साइड रीनल फेलियरचे कारण बनू शकते. कॉपर सल्फेटमुळे डोळ्यांना अॅलर्जी, पफ्फिनेस आणि काही काळासाठी आंधळेपणाचे कारणही बनू शकते. अॅल्युमिनिअम ब्रोमाइड आणि मर्क्युरी सल्फाइट धोकादायक तत्त्व असतात आणि प्रुशियन ब्लू कॉन्टॅक्ट डर्मेंटाइटिसचे कारण बनू शकते. असे काही उपाय आहेत, ज्यांचा वापर करून आपण या हानिकारक तत्त्वांच्या परिणामांपासून स्वत:चे संरक्षण करू शकता.

त्वचेतील ओलावा टिकवा

पारस हॉस्पिटल, गुरुग्रामच्या त्वचा विभागाचे प्रमुख डॉ. एच. के. कार सांगतात, ‘‘होळी खेळताना पूर्ण बाह्यांचे कपडे घाला म्हणजे आपली त्वचा धोकादायक तत्त्वांच्या दुष्परिणामांपासून सुरक्षित राहील. स्वत:ला पूर्णपणे हायड्रेटेड ठेवा. कारण डिहायड्रेशनमुळे त्वचा रूक्ष होते आणि अशा वेळी आर्टिफिशियल रंगांमध्ये वापरात येणारे केमिकल्स केवळ आपल्या त्वचेलाच नुकसान पोहोचवत नाहीत, तर याचा प्रभाव बराच काळ टिकून राहील. आपले कान आणि ओठांचा ओलावा टिकून राहण्यासाठी व्हॅसलिन लावा. आपल्या नखांवरही व्हॅसलिन लावा.’’

डॉ. एच. के. कार पुढे सांगतात, ‘‘आपल्या केसांना तेल लावायला विसरू नका. असे न केल्यास केसांना होळीच्या रंगांत मिसळलेल्या केमिकल्समुळे हानि पोहोचू शकते. कोणी आपल्या चेहऱ्याला रंग लावत असेल किंवा चोळत असेल, तेव्हा आपण आपले ओठ आणि डोळे चांगल्याप्रकारे बंद करा. श्वासाव्दारे या रंगांचा गंध शरीरात गेल्याने इंफ्लेमेशन होऊ शकते. त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो.

‘‘होळी खेळताना आपल्या कॉन्टॅक्ट लेन्स काढून टाका आणि डोळ्यांच्या आजूबाजूची त्वचा सुरक्षित करण्यासाठी सनग्लासेस लावा.

‘‘जास्त प्रमाणात भांग घेतल्याने आपलं ब्लडप्रेशर वाढण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्याचे सेवन चुकूनही करू नका.

‘‘आपला चेहरा कधी चोळून स्वच्छ करू नका. कारण असे केल्याने त्वचेवर रॅशेज आणि जळजळ होऊ शकते. स्किन रॅशेजपासून संरक्षणासाठी त्वचेवर बेसन व दूधमिश्रीत पेस्ट लावू शकता.’’

ज्या लोकांची त्वचा संवेदनशील असते, त्यांनी वर सांगितलेले उपाय करून खास काळजी घेतली पाहिजे. आजकाल बाजारात ऑर्गेनिक रंगही उपलब्ध आहेत. केमिकल्स असलेल्या रंगांऐवजी हे खरेदी करा. एकमेकांवर पाण्याने भरलेले फुगे मारू नका. त्यामुळे डोळे, चेहरा व शरीराला नुकसान होऊ शकते.

अति थंड असलेले पदार्थ होळीच्या सणावेळी खाण्या-पिण्यापासून लांब रहा.

इन्फेक्शनचा धोका असते.

दिल्लीच्या लोकनायक जयप्रकाश हॉस्पिटलमध्ये त्वचा विभागाचे प्रमुख आणि प्रोफेसर डॉ. विजय कुमार गर्ग सांगतात, ‘‘केमिकलच्या रंगांमुळे अॅलर्जीची समस्या, श्वास घेण्यास त्रास व इन्फेक्शन होऊ शकते. रंग घट्ट करण्यासाठी त्यात काचेचा चुराही मिसळला जातो. त्यामुळे त्वचा व डोळ्यांचे नुकसान होऊ शकत. आपण हर्बल रंगांनी होळी खेळणे उत्तम राहील. आपल्याजवळ रुमाल किंवा स्वच्छ कापड जरूर ठेवा, जेणेकरून डोळ्यांत रंग किंवा गुलाल गेल्यानंतर लगेच स्वच्छ करता येईल. रंग खेळताना मुलांची विशेष काळजी घ्या.’’

कोलंबिया एशिया हॉस्पिटल गाजियाबादचे त्वचा विशेषज्ज्ञ डॉ. भावक मित्तल सांगतात, ‘‘शक्य तेवढ्या सुरक्षित, नॉन टॉक्सिक आणि नैसर्गिक रंगांचा वापर करा. हे धोकादायक केमिकलमुक्त व सुरक्षित असतात, शिवाय हे त्वचेवरून स्वच्छ करणेही सोपे असते. एक अन्य मार्ग हा आहे की आपण आपल्यासाठी घरीच रंग बनवावे. उदा. जुन्या काळात फळांची पावडर व भाज्यांमध्ये हळद आणि बेसनसारख्या गोष्टी मिसळून रंग बनवले जात होते. पण लक्षात ठेवा, जर ही तत्त्व चांगल्याप्रकारे बारीक पावडर केलेली नसतील, तर त्वचेवर रॅशेज, लालसरपणा आणि इरिटेशनचे कारण बनू शकते.’’

रंगाचा बेरंग होऊ नये म्हणून

– डॉ. डी.जे.एस. तुला, हेड ऑफ कॉस्मेटिक डिपार्टमेंट, प्राइम्स सुपर

होळी हा रंगांचा सण सर्वच वयोगटातील व्यक्तींना साजरा करावासा वाटतो. यामध्ये धर्म महत्त्वाचा नसतो. कारण प्रत्येकाला या सणामध्ये आनंदाने सहभागी व्हावंसं वाटतं.

रंगांचा हा सण आनंद देतो आणि मनोरंजन तर करतोच. पण हा सण काही कारणांमुळे शरीरासाठीही महत्त्वाचा आहे. होळी अशावेळी येते, जेव्हा वातावरण बदलत असतं आणि त्यामुळे मन आळसावत असतं. शरीरात शिथिलता जाणवते, ही शिथिलता दूर करण्यासाठी मोठ्या आवाजात संगीत ऐकणं, मोठ्या आवाजात गाणं आणि बोलणं हा उपाय आहे.

होळीला जुना इतिहास आहे. पूर्वी खऱ्या फुलांपासून बनवलेले रंग वापरले जात. पण गेल्या काही वर्षांत रासायनिक आणि नकली रंग या सणाचा एक भाग बनले आहेत. आजकाल होळीच्या रंगांमध्ये लँड ऑक्सिजन, इंजिन ऑईल, तांबा सल्फेट इत्यादींची भेसळ असते. यामुळे विविध प्रकारची एलर्जी आणि जळजळ होऊ शकते.

रंगांमुळे केसही खराब होतात. केसांमध्ये कोंडा होऊन ते गळू लागतात.

होळीच्या रंगांमुळे होणारे काही गंभीर त्वचाविकार खालीलप्रमाणे आहेत.

क्झिमा : हा कृत्रिम रंगांच्या प्रभावामुळे होणारा सर्वाधिक किचकट विकार आहे. या एलर्जीमुळे त्वचेला सूज येते, ज्यामुळे चिडचिड होऊ लागते.

त्वचेची सूज : या एलर्जीमध्ये गंभीर वेदना, त्वचेला खाज येणे याशिवाय जखमेवर खपली तयार होते.

राइनायटिंग्ज : यामुळे नाकपुड्यांमध्ये सूज येते. नाकातील रक्त असुंतलित झाल्याने खाज आणि शिंका येतात.

दमा : कृत्रिम रंगांमुळे अस्थमा होऊ शकतो. यामुळे श्वसनात अडथळे येतात.

निमोनिया : श्वासाबरोबर रासायनिक रंग शरीरात गेल्याने आणखी एक विकार होऊ शकतो, ज्याचं नाव आहे निमोनिया. यामध्ये छातीत वेदना, थकवा, ताप आणि श्वास घेण्यास त्रास होतो.

या सूचनांचा अवलंब करून होळीचा पुरेपूर आनंद लुटा.

* त्वचेवरील रंग लवकर निघावेत म्हणून एक दिवस आधी राईचं तेल लावा. खासकरून चेहरा, हात आणि पायांवर. होळीच्या रंगांच्या हानिपासून वाचवण्यासाठी केसांनांही रंग लावा. त्यामुळे केसांवर रंगांचा थर पातळ लागतो आणि केस सुरक्षित राहतात.

* शरीरावर सनस्क्रीन लोशन लावल्याने त्वचेवर रंगांचा वाईट प्रभाव पडत नाही.

* त्वचेवरील रंगांचा प्रभाव कमी करण्यासाठी होळी खेळण्याच्या अर्धा तास आधी थंड क्रिम, व्हॅसलिन, ऑलिव्ह किंवा नारळाचं तेल शरीरावर व्यवस्थित लावा.

* चेहऱ्यावरचा गुलाल काढण्यासाठी रगडण्याऐवजी क्लिजर वापरा, यानंतर त्वचेला मऊपणा आणणारं माइश्चराइजर वापरा. खास करून संवदेनशील त्वचेसाठी असलेलं माइश्चराइजर वापरावं.

* चोळू लावले गेलेले रंग काढण्यासाठी चेहरा साबणाऐवजी फेशवाशने धुवा. रंग काढण्यासाठी त्वचा हलक्या हातांनी चोळा. रगडू नका. त्यामुळे त्वचा खराब होऊ शकते.

* पापण्या आणि डोळ्यांच्या आजूबाजूला सनस्क्रीन लोशन लावल्याने डोळ्यांवर रंगांचा कमी प्रभाव पडतो आणि डोळ्यांचं संरक्षण होतं.

* रंग धुतल्यानंतर डोळ्यांमध्ये गुलाबजल घातल्याने डोळ्यांना आराम मिळतो.

* डोळ्यांमध्ये सुका रंग पडल्याने डोळे स्वच्छ पाण्याने धुवा. डोळे रगडू नका. त्यामुळे जळजळ होईल.

निरोगी त्वचेसाठी उपाय

* अंघोळीआधी एक तास मुलतानी माती पाण्यात भिजवा. होळी खेळून झाल्यावर रंगलेल्या अंगावर याचा लेप लावा. सुकल्यानंतर गरम पाण्याने धुवा.

* खूप प्रयत्न करूनही एखादा रंग निघत नसेल तर मातीच्या तेलात कपडा भिजवून तो शरीरावर हलक्या हाताने रंगडा, रंग निघेल.

* बेसनात गोडं तेल, मलई आणि गुलाबपाणी मिसळून हा लेप आपल्या चेहरा, हात आणि पायांवर व्यवस्थित लावा. लेप व्यवस्थित सुकल्यानंतर हळूहळू चोळून तो काढा.

* अर्धी वाटी दह्यामध्ये २ चमचे लिंबाचा रस मिसळा. तो रंगांच्या डागांवर लावून हळूहळू चोळत कोमट पाण्याने धुवा. अंघोळीनंतर क्रिम लावायला विसरू नका.

* सोयाबीनच्या पिठात किंवा बेसनमध्ये दूध, मीठ, ग्लिसरीन आणि सुगंधी तेल काही थेंब टाकून मिश्रण तयार करा. हे मिश्रण शरीरावर लावा. हा लेप लावून तुम्हाला तजेलदार वाटेल.

* शरीरासोबत नखांचीही काळजी घ्या. रंगांचा त्रास होऊ नये म्हणून नखं आधीच कापा आणि त्यावर नेलपेंट लावा.

* दातांच्या सुरक्षेसाठी दंतटोपी लावा.

* त्वचेला रंगांपासून वाचवण्यासाठी संपूर्ण अंग झाकलं जाईल असे कपडे घाला. पांढरे किंवा फिकट रंगांचं कपडे घालणं टाळा. असे कपडे होळीचे रंग जास्त शोषून घेतात.

* त्वचा जळजळत असेल तर लगेच पाण्याने धुवा. एखादं चांगलं लोशन लावा.

होली स्पेशल : होळी सेफ्टी टीप्स

* प्रतिनिधी

होळीचा उत्सव म्हणजे खूप सारी पंचपक्वान्नं, गोडधोड, भांगसोबतच मित्र, कुटुंबासह गुलाल, रंगांच्या उधळणीत रंगून जाणे. लोक आता गुलालापेक्षा जास्त गडद केमिकलयुक्त रंगांनी होळी खेळणे पसंत करू लागले आहेत. ते अशी होळी खेळण्यात इतके रंगून जातात की स्वत:चेच नुकसान करून घेतात. तज्ज्ञांच्या मते, केमिकलयुक्त कलर आणि डायच्या वापरामुळे स्किन इन्फेक्शन, डोळे आणि केसांचे नुकसान होते.

डर्मोटोलॉजिस्ट आणि कॉस्मेटोलॉजिस्ट डॉ. शैफाली ट्रासी नीरूरकर सांगतात, ‘‘होळीदरम्यान सिंथेटिक रंगांच्या वापरामुळे त्वचेची जळजळ आणि ती लालसर होण्याची समस्या निर्माण होते. बऱ्याचदा इरिटेशन इतके जास्त वाढते की ते पिग्मेंटेशनचे कारण ठरू शकते.’’

त्या सांगतात, बहुतांश रंग अल्कलाइन हा बऱ्याच रंगांचा बेस असतो. तो डोळयात गेल्यास दृष्टीवर परिणाम होतो. जे रंग पेस्ट फॉर्ममध्ये असतात, त्यात इंजिन ऑइल असल्यामुळे ते खूपच विषारी असतात. बरेच लोक स्वस्त रंगांच्या नादात हर्बल रंगांकडे दुर्लक्ष करून हेच रंग खरेदी करतात, जे त्यांचे नुकसान करू शकतात. म्हणूनच अशावेळी होळीचा उत्सव संपूर्ण सुरक्षेसह साजरा करणे गरजेचे आहे.

डॉ. नीरूरकर यांच्याकडून माहिती करून घेऊया होळीच्या सेफ्टी टिप्स

* होळी खेळण्यापूर्वी तुम्ही आपला चेहरा आणि हातांना राईचे तेल किंवा मॉइश्चरायझर लावा. कारण यामुळे थेट चेहऱ्याला रंग लागत नाही आणि यामुळे रंगही सहज काढता येतो. सोबतच तुम्ही कमीत कमी ३० एसपीएफचे सनस्क्रीन संपूर्ण शरीराला लावा, जेणेकरून त्वचेवर रंगांचा जास्त परिणाम होणार नाही.

यासाठी नायकाचा सल्ला आहे की तुम्ही तिजोरी कोल्ड प्रोसेस्ड आलमंड अँड मस्टर्ड ऑइल, नायका कंट्री रोज बॉडी लोशन आणि न्युट्रोजिना अल्ट्रा शीर ड्राय टच सनब्लॉक एसपीएफ ५०+ चा वापर करा.

* तुम्ही केसांना चांगल्याप्रकारे तेलाने मसाज करा. ते रंगांना केसांच्या त्वचेच्या आत जाण्यापासून रोखते. त्या सांगतात, ‘‘होळीची मजा लुटल्यानंतर फक्त शाम्पूच पुरेसा नसतो तर केसांना चांगल्याप्रकारे तेल लावणेही गरजेचे असते.’’

यासाठी नायकाचा सल्ला आहे की तुम्ही कामा आयुर्वेदा एक्स्ट्रा वर्जिन ऑर्गेनिक कोकोनट ऑइल वापरा.

*द्य होळी खेळताना रंग तोंडात जाण्याची भीती सर्वात जास्त असते. यासाठी त्या सांगतात, ‘‘तुमचे दात खराब होण्यापासून वाचविण्यासाठी डेंटल कॅप वापरा किंवा जेव्हा कोणी रंग लावेल त्यावेळी तोंड व्यवस्थित बंद करून घ्या.’’

* डॉ. शैफाली सांगतात, ‘‘होळी खेळताना तुम्ही आपली त्वचा व्यवस्थित कव्हर करा. यासाठी तुम्ही डोक्यावरून स्कार्फ घेऊन केसांचे रक्षण करू शकता. सोबतच फुल स्लीव्हजचे कपडे, लाँग पँट किंवा सलवार वगैरे घालू शकता, ज्यामुळे तुम्ही त्वचेला बऱ्याच अंशी रंग लागण्यापासून वाचवू शकाल.

यासाठी नायकाचा सल्ला आहे की तुम्ही प्रोयोग वूमन ऑर्गेनिक योगा फोल्डओवर वेस्ट पँट्स आणि जॉकी ब्लॅक पोलो शर्ट घालू शकता.

* होळी खेळायला जाताना सनग्लासेस घालूनच बाहेर पडा किंवा जेव्हा कोणी तुमच्या चेहऱ्याला रंग लावायला येईल तेव्हा डोळे बंद करून घ्या, जेणेकरुन तुमच्या डोळयात रंग जाणार नाही. मात्र त्यानंतरही तुमच्या डोळयात रंग गेल्यास डोळे चोळू नका तर ते त्वरित पाण्याने धुवा आणि रोझ वॉटरचे काही थेंब डोळयात घालून त्यांना थंडावा द्या. यामुळे डोळयांची जळजळ दूर होईल.

यासाठी नायकाचा असा सल्ला आहे, नीविआ स्किन ब्रीध मिसैलर रोज वॉटरचा तुम्ही वापर करू शकता.

* होळीची मौजमस्ती पूर्ण होईल तेव्हा चेहरा एखाद्या चांगल्या मॉइश्चरायझरने स्वच्छ करा. कारण रंगांत खूपच कोरडेपणा असतो आणि त्यामुळे साबण किंवा हार्श फेसवॉशने चेहरा स्वच्छ केल्यामुळे तुमच्या त्वचेचे नुकसान होऊ शकते. एवढेच नाही तर तुम्ही अंघोळीनंतर मॉइश्चरायझिंग क्रीम वापरा. यामुळे त्वचेतील आर्द्रता कायम राहील.

यासाठी नायकाचा सल्ला आहे की तुम्ही ओले रीजेनरिस्ट क्रीम क्लिंजर, न्यूट्रोजिना लिक्विड फेस क्लिंजर्स आणि नीविया कोको नरिश बॉडी लोशनचा वापर करा.

* चेहऱ्यावरून रंग हटवण्याचा घरगुती उपाय म्हणजे रोझ वॉटरमध्ये बेसन, स्वीट आलमंड ऑइल आणि दुधाची साय एकत्र करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि जेव्हा ती सुकेल तेव्हा हळूवार हातांनी रब करा.

यासाठी नायकाचा असा सल्ला आहे की तुम्ही खादी नॅचरल स्वीट आलमंड हेअर अँड बॉडी हार्बर ऑइल आणि रुट्स अँड अबव आयुर्वेदिक रोज वॉटर वापरा.

* चेहरा आणि हातांसोबतच नखांचे रक्षण करणेही तितकेच गरजेचे आहे. ट्रासी यांनी सांगितले, ‘‘नखांना रंगांपासून वाचविण्यासाठी तुम्ही नेलपेंट लावा, म्हणजे होळीनंतरही तुमची नखे पहिल्यासारखीच सुंदर राहू शकतील.

यासाठी नायकाचा असा सल्ला आहे की तुम्ही नायका नेल केअर डबल ड्युटी टू इन वन टॉप अँड बेस कोट वापरा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें