- प्रतिनिधी
परंपरेनुसार होळी ही गुलालाने खेळली जात असे जो ताज्या फुलांनी बनवला जात होता. पण आजकाल रंग केमिकलचा वापर करून फॅक्टरीमध्ये बनवले जाऊ लागले आहेत. यांमध्ये सामान्यपणे वापरले जाणारे केमिकल्स आहेत, लेड ऑक्साइड, कॉपर सल्फेट, अॅल्युमिनिअम ब्रोमाइड, प्रुशियन ब्लू, मर्क्युरी सल्फाइट. यापासून काळा, हिरवा, सिल्वर, निळा आणि लाल रंग बनतो. हे रंग दिसायला जेवढे आकर्षक दिसतात, तेवढेच हानिकारक तत्त्व यात वापरलेले असतात.
लेड ऑक्साइड रीनल फेलियरचे कारण बनू शकते. कॉपर सल्फेटमुळे डोळ्यांना अॅलर्जी, पफ्फिनेस आणि काही काळासाठी आंधळेपणाचे कारणही बनू शकते. अॅल्युमिनिअम ब्रोमाइड आणि मर्क्युरी सल्फाइट धोकादायक तत्त्व असतात आणि प्रुशियन ब्लू कॉन्टॅक्ट डर्मेंटाइटिसचे कारण बनू शकते. असे काही उपाय आहेत, ज्यांचा वापर करून आपण या हानिकारक तत्त्वांच्या परिणामांपासून स्वत:चे संरक्षण करू शकता.
त्वचेतील ओलावा टिकवा
पारस हॉस्पिटल, गुरुग्रामच्या त्वचा विभागाचे प्रमुख डॉ. एच. के. कार सांगतात, ‘‘होळी खेळताना पूर्ण बाह्यांचे कपडे घाला म्हणजे आपली त्वचा धोकादायक तत्त्वांच्या दुष्परिणामांपासून सुरक्षित राहील. स्वत:ला पूर्णपणे हायड्रेटेड ठेवा. कारण डिहायड्रेशनमुळे त्वचा रूक्ष होते आणि अशा वेळी आर्टिफिशियल रंगांमध्ये वापरात येणारे केमिकल्स केवळ आपल्या त्वचेलाच नुकसान पोहोचवत नाहीत, तर याचा प्रभाव बराच काळ टिकून राहील. आपले कान आणि ओठांचा ओलावा टिकून राहण्यासाठी व्हॅसलिन लावा. आपल्या नखांवरही व्हॅसलिन लावा.’’
डॉ. एच. के. कार पुढे सांगतात, ‘‘आपल्या केसांना तेल लावायला विसरू नका. असे न केल्यास केसांना होळीच्या रंगांत मिसळलेल्या केमिकल्समुळे हानि पोहोचू शकते. कोणी आपल्या चेहऱ्याला रंग लावत असेल किंवा चोळत असेल, तेव्हा आपण आपले ओठ आणि डोळे चांगल्याप्रकारे बंद करा. श्वासाव्दारे या रंगांचा गंध शरीरात गेल्याने इंफ्लेमेशन होऊ शकते. त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो.
‘‘होळी खेळताना आपल्या कॉन्टॅक्ट लेन्स काढून टाका आणि डोळ्यांच्या आजूबाजूची त्वचा सुरक्षित करण्यासाठी सनग्लासेस लावा.
‘‘जास्त प्रमाणात भांग घेतल्याने आपलं ब्लडप्रेशर वाढण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्याचे सेवन चुकूनही करू नका.