व्यावसायिक आणि स्टायलिश ऑफिसवेअरच्या टीप्स

* पूनम अहमद

ऑफिसच्या कपडयांमध्ये चांगले दिसल्याने केवळ कौतुकच होत नाही तर आत्मविश्वासही वाढतो. एखाद्या स्मार्ट, कामासाठी योग्य आणि ट्रेंडी परिधान केल्याने व्यक्तिमत्व खुलते. पूर्वी महिलांना ऑफिसमध्ये साडी किंवा सूट घालणे आवडायचे पण आता नाही. आज त्या आपल्या ऑफिसच्या लुकमध्ये नव-नवीन गोष्टींचा प्रयोग करू इच्छित आहेत.

व्यावसायिक तसेच स्टायलिश दिसण्यासाठी खालील टीप्सचा विचार करा :

  • आपल्या ऑफिसमध्ये आपल्याला जीन्स घालण्याची परवानगी असल्यास पांढऱ्या शर्टसह ब्लू जीन्स आणि ब्लॅक ब्लेझर घाला. हाय हील किंवा पीप टोजने आपण खूप स्मार्ट दिसाल. हे प्रासंगिक आणि व्यावसायिक दोन्ही स्वरूप आणेल.
  • प्लेन ब्लाउजसह स्ट्रीप प्लाझा खूप छान दिसतो पण तुम्हाला सिंगल कलरचा प्लाझा घालायचा असेल तर त्यास प्रिंट केलेल्या ब्लाऊजसह परिधान करा. एखाद्या महत्त्वपूर्ण मीटिंगला किंवा प्रेजेंटेशन डेला ही प्लाझा पॅन्ट आणि ब्लाउज घालता येऊ शकतो.
  • आपल्याला परिपूर्ण कॉर्पोरेट लुक हवा असल्यास व्हाइट शर्टसह ब्लॅक सूट वापरुन पहा. अगदी व्यावसायिक महिला दिसाल आणि याची फॅशन कधीच आऊट होत नाही.
  • फॉर्मल लुकसाठी, चांगल्या फॉर्मल टॉपसह पँट घाला. पातळ लेदर बेल्ट आणि हाय हिलसह खूप छान दिसाल.
  • लांब कुर्ती आणि सिगरेट पँट वापरुन पहा. हा ड्रेस त्यांच्यासाठीच आहे, ज्यांना इंडो-वेस्टर्न फॉर्मल लुक हवा आहे. वेस्टर्न टच असलेले हे भारतीय रूप चांगले दिसते. काही वर्षांपासून सिगरेट पँट फॅशनमध्ये आहे आणि लांब कुर्ती तर सदाफुली आहे.
  • बिजनेस वूमन लुकसाठी, फॉर्मल शर्ट आणि ब्लेझरसह पेन्सिल स्कर्ट घाला, तसेच पेन्सिल हिल पंप आणि कमीतकमी अॅक्सेसरीज घाला.
  • कॅज्युअल ड्रेसाठी रंगीबेरंगी पोलो नेक टी-शर्टसह एकल रंगाचा फॉर्मल ट्राउजर घाला. ब्राइट कलरचा टी-शर्ट आउटफिटला आकर्षक बनवेल.
  • आजच्या युगात, तरुणांना जीन्ससह कॅज्युअल शॉर्ट किर्ती खूप आवडतात. आजकाल, बहुतेक कॉर्पोरेट घरांमध्ये कंफर्टेबल ड्रेसिंगवर जोर देण्यात येत आहे. हा इंडो-वेस्टर्न पोशाख खूप लोकप्रिय आहे. आपण त्यास सूती स्कार्फसह परिधान करू शकता.
  • सलवार सूटमध्ये जवळजवळ प्रत्येक स्त्री चांगली दिसते. आपल्या ऑफिसच्या खास प्रसंगासाठी, काही पेस्टल रंगाचे सलवार सूट सॉर्ट करून ठेवा. भले सूती सूट असो वा रेशमी फॅब्रिक, त्यात चांगले दिसाल. पारंपारिक भारतीय हातमाग प्रिंट्सदेखील घातले जाऊ शकतात. यात स्टायलिश आणि व्यावसायिक दिसाल.

ऑफिस लुकसाठी अतिरिक्त सूचना

  • आजकाल बहुतेक कॉर्पोरेट घरे कॅज्युअल ड्रेस कोडचे पालन करतात. तरीही मीटिंगसाठी किंवा महत्त्वपूर्ण कार्यक्रमासाठी फॉर्मल ड्रेस घातला पाहिजे.
  • प्रत्येक शनिवारी व रविवारी स्वत:ला तयार करण्यासाठी थोडा वेळ घालवा. नियमितपणे पेडीक्योर, मॅनीक्योर, वॅक्सिंग व आयब्रोजसाठी जावे.
  • जे आपल्या शरीराचा प्रकार आणि शैलीस अनुरूप असेल तेच खरेदी करा. एखाद्या फॅशन मासिकामध्ये एखाद्या मॉडेलला परिधान केलेले पाहुन खरेदी करू नका. तोच पोषाख परिधान करा, जो आपल्यावर परिपूर्ण दिसेल आणि ज्याने आपण गॉर्जियस दिसाल.
  • असे काही खरेदी करा, जे वेगवेगळया कपडयांसह परिधान करून वेगवेगळया प्रकारे छान दिसाल. उदाहरणार्थ एखादा असा टॉप खरेदी करा, जो जीन्स, ट्राउजर किंवा अगदी स्कर्टसहदेखील चांगला दिसेल.
  • ऑफिससाठी परिधान करण्यात येणारे कपडे अधिक सैल किंवा फार घट्ट नसावेत. चुकीच्या फिटिंगच्या कपडयात आपण अस्वस्थ राहाल आणि चांगलेही दिसणार नाहीत, म्हणून आपल्यास अनुकूल असे काहीतरी घाला.
  • कार्यालयात व्यवस्थित प्रेस केलेले कपडे घाला. एक महाग परंतु दुमडलेला पोशाख संपूर्ण लुक खराब करेल.
  • लाउड मेकअप करू नका आणि बिझनेस सूटसह चंकी दागिने घालू नका अन्यथा पोशाखाचा संपूर्ण लुक खराब होईल. ऑफिससाठी कमीतकमी मेकअप करा आणि अॅक्सेसरीजसुद्धा कमी घाला.
  • कामावर जात असताना जसे चांगले कपडे घालणे आवश्यक आहे, चांगले शूज घालणेदेखील तितकेच महत्वाचे आहे. जर शूज आउटफिट्समध्ये न जुळले तर सर्व व्यक्तिमत्व वाईट दिसेल. शूज स्वच्छ आणि पॉलिश केलेले असले पाहिजेत. काळे शूज, सँडल आणि न्यूड पंप चांगले दिसतात. जर तुम्हाला काही ब्राइट घालायचे असेल तर निश्चित करा की ते पोषाखाच्या रंगसंगतींसह संयोजित होत आहे.

यंग लुकसाठी असा निवडा ड्रेस

– रोचिका शर्मा

श्वेता आणि प्रियांका सिनेमाला गेल्या होत्या. सिनेमा पाहून परतताना श्वेता म्हणाली, ‘‘हिरोइन किती सुंदर दिसत होती. तिचे ड्रेसेसही किती छान होते. खरंच मीसुद्धा असे ड्रेस घालू शकले असते तर…’’

श्वेताचे बोलणे ऐकून प्रियांका टिचकी वाजवत म्हणाली, ‘‘मग घाल ना, तुला कोणी रोखले आहे…’’

‘‘कोणी रोखले नाहीए, पण माझे वयही बघ ना. या वयात तसे कपडे घातले, तर लोक मला हसणार नाहीत का? कुठे २०-२२ वर्षांची हीरोइन आणि कुठे मी,’’ श्वेताने उत्तर दिले.

‘‘यात हसण्यासारखी कोणती गोष्ट आहे? प्रत्येक माणसाची स्वत:ची आवड असते. केवळ ड्रेसिंग सेन्स चांगला असला पाहिजे. मग मजेत आपल्या आवडीचे कपडे घाला आणि तरुण दिसा.’’

गोष्ट खरी आहे. ड्रेसिंग सेन्स चांगला असेल, तर तुम्ही सर्व प्रकारचे कपडे वापरू शकता.

एफ सलूनच्या मालकीण पारुल शर्माला जेव्हा मी विचारले की आपले वय कमी दिसण्यासाठी घातलेल्या कपड्यांची काही भूमिका असते का? तेव्हा ती म्हणाली, ‘‘ऑफकोर्स असते. सर्व महिलांना आपल्या वयापेक्षा कमी दिसायचे असते. त्यासाठी त्या वेगवेगळ्या प्रकारचे घरगुती उपाय करतात, परंतु या सर्वांबरोबरच वय कमी दाखवण्यात घालण्यात आलेल्या कपड्यांचीही महत्त्वाची भूमिका असते. आपले शरीर आणि आवडीनुसार कपड्यांची निवड आपल्याला तरुण दाखवण्यास खूप मदत करते.’’

मी विचारले की अनेक महिला आपल्या टीनएजर्स मुलींप्रमाणे फॅशनेबल कपडे वापरतात. त्याबाबत तुम्हाला काय म्हणायचे आहे? एका ४० वर्षीय महिलेने जर असे कपडे घातले, तर ती वाईट दिसणार नाही का? तेव्हा यावर ती म्हणाली, ‘‘नाही मुळीच नाही, केवळ त्या महिलेला तसे ड्रेस घालण्याची आवड असावी आणि तिला माहीत असावे की तो ड्रेस कसा कॅरी करायचा आहे.’’

तसे हे आवश्यकही नाही की जे कपडे टीनएजर यंग दिसण्यासाठी घालतात, ते ४० वर्षीय महिलेनेही घालावेत, पण हो, त्या ट्रेंडच्या हिशोबाने मिळते-जुळते आणि जास्त सॉफिस्टिकेटेड पॅटर्न घालू शकता.

तरुण दिसण्यासाठी छोटे आणि बॉडी हगिंग टाइट कपडे वापरणे आवश्यक आहे का? विचारल्यावर तिचे उत्तर होते, ‘‘जर कोणाला आवडत असतील, तर जरूर वापरा. केवळ स्वत:चा स्वत:वर विश्वास असला पाहिजे की, मी छान दिसतेय. मी असे म्हणेन की आपण छोटे, पारदर्शी किंवा टाइट कपडे घातल्यावरच तरुण दिसाल, हे आवश्यक नाही. ट्रेंडी राहाल, तर नक्कीच आपण आपल्या वयापेक्षा लहान दिसाल. कपडे व्यवस्थित घाला. जर ड्रेस घालण्याचा नीटनेटकेपणा नसेल, तर तुम्ही तरुण दिसण्याऐवजी अजागळ दिसू शकता.’’

ट्रेंडची माहिती कुठून घ्यावी? याच्या उत्तरादाखल त्यांचे मत आहे, ‘‘लेटेस्ट ट्रेंड्सच्या वेबसाइट्स आणि चांगले फॅशन कॅटलॉग्स पाहा. मी स्वत: ते पाहते आणि सर्च करते की कोणता ट्रेंड चालू आहे, कोणते फॅब्रिक आणि पॅटर्न फॅशनमध्ये आहे वगैरे.’’

फिटनेसमुळे चेहराही उजळतो

माझी मैत्रिण जिया सांगते, ‘‘मला फॅशनेबल कपडे वापरणे खूप आवडते. त्यामुळे जिममध्ये वर्कआउट करून स्वत:ला फिट ठेवते. जिमचा एक फायदा हाही आहे की अॅक्टिव्ह राहिल्याने शरीरात एंडोर्फिन हार्मोन रीलिज होते. त्याला हॅप्पीनेस हार्मोनही म्हणतात. जर आपण आनंदित राहाल, तर त्यामुळे चेहऱ्यावरही उजळपणा दिसेल, जेव्हा चेहरा उजळ दिसेल, तेव्हा नक्कीच आपण तरुण दिसाल. म्हणून आवडते कपडे घाला, खूश राहा आणि तरूण दिसा.’’

माझी आणखी एक मैत्रीण जी सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे, काही महिन्यांपूर्वीच ऑस्ट्रेलियातून परतली आहे, ती सांगते, ‘‘मला वेस्टर्न कपडे घालायला खूप आवडतात आणि त्यात मला कंफर्टेबलही वाटते. वेस्टर्नसोबत डोक्यावर हॅटही खूप छान दिसते. मी रोज बाहेर जाता-येताना हॅट घालते. सूर्याची तीव्र किरणे जेव्हा चेहरा आणि डोक्यावर पडतात, तेव्हा त्वचेचा रंग काळा आणि निस्तेज होतो. केसही निस्तेज होऊ लागतात. अर्थात, हॅट घातल्याने शौक तर पूर्ण होतोच, त्याचबरोबर सुर्याच्या हानिकारक किरणांपासून माझ्या त्वचेचं व केसांचेही संरक्षण होते. त्यामुळे स्किन एजिंग होत नाही. ही गोष्ट मला माझ्या वयापेक्षा कमी दाखवण्यास मदत करते.’’

ट्रेंडी दिसण्यासाठी काही टीप्स

  • मला माझ्या कॉलेजच्या काळापासूनच ट्रेंडी कपडे वापरण्याची खूप आवड होती. तरुण दिसण्यासाठी काही महिला केवळ ब्युटी प्रॉडक्ट्सचा आधार घेतात. परंतु ब्युटी प्रॉक्ट्स सोबतच जर त्यांनी आपल्या पेहरावावर लक्ष दिले, तर नक्कीच आपण तरुण दिसाल.
  • आपली जीवनशैली नियमितपणे तपासा. पूर्ण झोप घ्या, आहारात बॅलन्स डाएट घ्या. रोज व्यायाम करून स्वत:ला फिट ठेवा. जर तुम्ही फिट असाल, तर सर्व प्रकारचे पेहराव आपल्यावर इतरांपेक्षा जास्त चांगले दिसतील.
  • जर मनाजोगे कपडे घालायचे असतील, तर कपडे खरेदी करताना त्यांच्या स्टिचिंगवरही लक्ष द्या. जर ते चांगल्याप्रकारे डिझाइन्ड असतील, तर आपण जास्त आकर्षक दिसाल. व्हर्टिकल स्ट्रीम लाइन्ड ड्रेस तुम्हाला तरुण दर्शवतील. अनेक वेळा ३-४ प्रकारचे ट्रेंड्स एकाच ड्रेसमध्ये एकत्र मिसळले जातात. उदा. ट्रेडिशनल कुर्त्यामध्ये अॅम्ब्रॉयडरी, फुल स्लीवजसह कप व बटण, म्हणजे स्लीवज फोल्डही करता येतील. पण खरे सांगायचे तर हे मुळीच चांगले दिसत नाही.
  • आपण जेव्हा कपडे खरेदी करता, तेव्हा त्यांच्यासोबतच मॅचिंग बॅग्ज, चप्पल, ज्वेलरी इ.ही खरेदी करा. अनेक वेळा ड्रेस आणि फूटवेअरची स्टाईल मॅचिंग झाली नाही, तर ट्रेंडी आणि नवीन फॅशनच्या कपड्यांचा आनंद लुटता येत नाही. त्याच ड्रेससह जर आपली एक्सेसरीज व फेस मेकअपवरही विशेष लक्ष दिलेत, तर झटपट आपले वय १० वर्षांनी कमी दिसेल. उदा. आपण जीन्स घालत असाल, तर पेन्सील हिल्सचे सँडल ऐवजी प्लॅटफॉर्म हिल्स वापरा, साडीसह पेन्सील हिल्स वापरल्याने आपण जास्त डेलीकेट आणि तरुण दिसाल.
  • अनेक महिला शॉर्ट स्कर्ट घालतात आणि सोबतच टिकलीही लावतात, तेव्हा समजून जा की पाहणाऱ्याला कळून येते की त्यांना मॅचिंगचे नॉलेज नाहीए. त्यामुळे असे करणे टाळा.
  • जर आपल्याला शॉर्ट स्कर्ट घालण्याची आवड असेल, तर जरूर वापरा. जर आपले वय जास्त असेल, तर खूप फ्लेयर असलेले स्कर्ट न वापरता, स्ट्रेटकट वापरा. त्याबरोबर फ्लॅट किंवा हिल्स, ज्यात आपल्याला कंफर्टेबल वाटेल ते वापरा. त्यामुळे तुम्ही स्लिम व अॅक्टिव्ह दिसाल.

फेस मेकअप आहे पेहरावाचा भाग

या सर्वानंतर जर आपल्याला फेस मेकअप आवडत असेल, तर जरूर करा. तोही आपल्या पेहरावाचा महत्त्वाचा भाग आहे.

आयशॅडो जर ड्रेसच्या मॅचिंगच्या नादात गडद लावलीत, तर खूप कृत्रिम वाटेल. त्याऐवजी हलक्या रंगाचा नॅचरल दिसणारा आयशॅडो लावा आणि लिपस्टिकही सॉफ्ट रंगाची लावा किंवा मग केवळ लिपग्लॉसही लावू शकता. तो आपल्या ओठांना मॉइश्चराइज करण्याबरोबरच चमकदारही ठेवेल. या सर्वामुळे आपण भडक नव्हे, तर तरुण आणि फ्रेश दिसाल.

हॉट समरच्या सुपर कुल एक्सेसरीज

* प्रतिनिधी

प्रत्येक ऋतूमध्ये फॅशनेबल दिसण्यासाठी त्या ऋतूप्रमाणे फक्त आऊटफिटचीच निवड नाही तर एक्सेसरीजचंही कलेक्शन जवळ असणं आवश्यक आहे. आऊटफिट आणि एक्सेसरीजच्या बेस्ट कॉम्बिनेशनमुळेच तर व्यक्तिमत्वाला एक परफेक्ट लुक मिळतो. हॉट समर सिझनमध्ये कोणत्या कुल एक्सेसरीजने आपला लुक कम्प्लिट कराल, हे माहीत करून घेण्यासाठी आम्ही फॅशन डिझायनर आणि स्टायलिस्ट सोनम जैन यांच्याशी चर्चा केली.

फ्लोरल स्कार्फ : हॉट समरमध्ये फ्रेश लुकसाठी आपल्या वार्डरोबमध्ये स्कार्फचं कलेक्शन अवश्य ठेवा. आजकाल फ्लोरल प्रिंटेड कलरफुल स्कार्फची फॅशन आहे. हा तुम्ही शॉर्ट ड्रेससोबत किंवा टी शर्टबरोबर कॅरी करू शकता. स्कार्फ रोज वेगळया स्टाईलचे घाला. यामुळे तुम्ही जास्त स्टायलिश दिसाल.

एव्हिएटर सनग्लास : कडक उन्हात डोळयाच्या सुरक्षेबरोबरच स्टायलिश दिसायचं असेल तर सनग्लासहून दुसरा कोणता पर्याय नाही. परंतु गोल किंवा चौकोनी वा बॉक्स शेपऐवजी मेटल फ्रेमचा एव्हिएटर सनग्लास निवडा. हे घातल्यावर तुम्हाला जास्त आय मेकअपची गरज भासणार नाही.

क्लासिक वॉच : या उन्हाळयात बोल्ड आणि बिनधास्त अंदाजासाठी आपल्या हाताचं सौंदर्य वाढवा क्लासिक वॉच घालून. हे कोणत्याही आऊटफिटबरोबर सहज मॅच होतं आणि लेदर बेल्ट असल्यामुळे कधीही आऊट ऑफ फॅशन होत नाही.

सुपरसाईज्ड बॅग : कम्प्लिट लुककरिता सुपरसाईज्ड बॅगला आपली पहिली पसंत बनवा. यात फक्त तुम्हाला आवश्यक असलेल्या वस्तू सहज मावू शकतात. याशिवाय ही बॅग तुम्हाला सुपरस्टायलिश लुक देते. आकर्षणाचा केंद्रबिंदू व्हायचं असेल तर नियॉन शेडची हॅन्ड बॅग खरेदी करा. पारदर्शक बॅगही ट्राय करू शकता. ही तुम्हाला बोल्ड लुक देईल.

पॉप कलर्स नेकपीस : गोल्ड, डायमंड आणि रेगुलर नेकपीसने जर तुम्ही कंटाळला असाल तर पॉप कलर्सच्या हॉट नेकपीसला आपली स्टाईल स्टेटमेंट बनवा. आपल्या ज्वेलरी बॉक्समध्ये लाईम, ग्रीन, पिंक, ऑरेंज यासारखे पॉप शेड्स स्टोन, पर्ल आणि क्रिस्टलने बनलेल्या नेकपीसला जागा द्या. सिंगल शेड किंवा प्लेन आऊटफिटबरोबर पॉप कलरचा नेकपीस तुम्हाला सुपर स्टायलिश लुक देईल.

स्टेटमेंन्ट इयररिंग : समर सिझनमध्ये कुल लुकसाठी आपल्या ज्वेलरी बॉक्समध्ये रेग्युलर इअररिंगऐवजी लांब स्टेटमेंट इयररिंग्ज ठेवा. शॉर्ट्सबरोबर लांब इयररिंग्जचं कॉम्बिनेशन तुम्हाला सुंदर आणि हॉट लुक देईल. कोणत्याही शेप आणि साईजच्या स्टेटमेंन्ट इयररिंग्जची निवड तुम्ही करू शकता.

अँकल ब्रेसलेट फुटवेअर : आता हिवाळा संपला आहे. त्यामुळे फुल पॅक फुटवेअरच्या जागी आपल्या शु रॅकमध्ये अँकल ब्रेसलेट फुटवेअर ठेवा. हे फुटवेअर चारही बाजूंनी उघडे असतात. हे वापरल्याने घामही येत नाही. हे दिसायलाही खूप स्टायलिश असतात. शॉर्ट्सबरोबर हे खूप हॉट दिसतात.

ग्लिटर मोबाईल कव्हर : फुटवेअर आणि हॅन्ड बॅगप्रमाणेच मोबाईलही एक्सेसरीजमधेच गणला जातो. परंतु फुटवेअर आणि बॅगप्रमाणे रोज मोबाईल बदलणं सोपं नाही, मग मोबाईल कव्हर बदलून मोबाईलला एक नवीन लुक का देत नाही. म्हणून समरमध्ये कुल लुकसाठी ग्लिटर मोबाईल कव्हर खरेदी करा.

थम्ब रिंग्ज : फॅशनेबल दिसायला इंडेक्स फिंगरमध्ये कॉकटेल किंवा डबल फिंगर रिंग घालण्याऐवजी अंगठयात रिंग ट्राय करा. कुल लुकसाठी अॅनिमल प्रिंटेड किंवा मग चंकी थम्ब रिंग खरेदी करा, आजकाल याचा ट्रेंड सुरु आहे. तुम्हाला हवं तर दोन्ही हाताच्या अंगठयात किंवा फक्त एका हाताच्या अंगठ्यात आणि इतर बोटातही तुम्ही वेगवेगळ्या शेप स्टाइलच्या रिंग घालू शकता.

हॉटहॅट्स : जर तुम्ही हॉलिडे मूडमध्ये आहात आणि बीचवर सुट्ट्या घालवायला जात आहात, तर आपला लुक कम्प्लिट करायला आऊटफिटला मॅच अशा हॉट हॅट  घ्यायला विसरू नका. उन्हापासून सुरक्षित ठेवण्याबरोबरच या हॅट तुम्हाला फॅशनेबल लुकही देतील. जरा मोठी हॅट जास्त आकर्षक दिसेल. ही तुम्ही आपली पहिली पसंत बनवू शकता.

वेडिंग ज्वेलरीचे नवे अंदाज

* टी. राठौड

दागिन्यांशिवाय नववधूचा साजशृंगार अपूर्ण असतो. भावी नववधू आतापासूनच ज्वेलरी शॉपिंगचा प्लान बनवू लागल्या असतील. यावेळी ब्रायडल ज्वेलरीची खरेदी करण्याआधी या काही अनोख्या अलंकारांकडेही लक्ष द्या :

निजामी झुमर

नवाबांच्या खानदानात मोठया आवडीने वापरला जाणारा दागिना म्हणजे निजामी झुमर, तो डोक्यावरील झुमरप्रमाणे कोपऱ्यात लावला जातो. तसं तर झुमरच्या अनेक डिझाईन अलीकडे प्रचलित आहेत, पण सगळयात सुंदर असते निजामी डिजाइन. यावरील बारीक नक्षीकाम पाहून कोणती नववधू याकडे आर्कषित होईल. याचा नवाबी लुक तिच्या सौंदर्यात अधिकच भर घालतो.

बीड ज्वेलरी

जर तुम्ही ट्रेडिशनल लुकला कंटाळला आहात आणि विवाहप्रसंगी मार्डन लुकचा अवलंब करू इच्छित असाल, तर तुम्ही बीड ज्वेलरी नक्कीच वापरली पाहिजे. यात सोन्याच्या साखळया एकत्र जोडून मॉडर्न मॉर्डन लुक दिला जातो. ही ज्वेलरी घातल्यानंतर तुम्हाला इंडोवेस्टर्न लुक मिळतो.

गढवाली नथ

भारतात गढवाली स्त्रियांच्या सौंदर्याची चर्चा कायमच असते. त्यांच्या हेच सौंदर्य अधिक खुलवते. परंपरागत नथ, जिच्या सौंदर्यांसमोर सगळं फिकं वाटतं.

आजकाल गढवाली स्त्रियांव्यतिरिक्त ही नथ देशातील अन्य ठिकाणीदेखील महिला वापरू लागल्या आहेत. जर नववधू थोड्या वेगळया पध्दतीचा साज करू इच्छित असेल, तर गढवाली नथ तिच्यासाठी सर्वात सुंदर दागिना आहे.

खमेर ज्वेलरी

खमेर ज्वेलरी कंबोडीयाच्या परंपरागत डिजाइनच्या रूपात ओळखली जाते. खमेर प्रदेशातील स्त्रिया ही ज्वेलरी मोठया प्रेमाने वापरतात. अलीकडे खमेर ज्वेलरी भारतातही प्रचलित आहे. जर नववधूने आपल्या परंपरागत पोशाखासह खमेर ज्वेलरी वापरली तर तिच्या सौंदर्यात अधिकच भर पडेल. खासकरून या ज्वेलरीचे कडे खूप प्रसिध्द आहेत.

घुंगरू असलेलं पैंजण

घुंगरू असलेलं पैंजन एक असा दागिना आहे, जो नववधूच्या पायांचं सौंदर्य तिप्पटीनं वाढवतो. त्यात मोत्याच्या आकाराचे बारीक बारीक घुंगरू लावले जातात, ज्यांची जाडसर पट्टी पायांना भव्यतेबरोबर सुंदर दिसायला मदत करतात. रॉयल लुक मिळवण्यासाठी होणाऱ्या नववधूने हे नक्कीच वापरले पाहिजेत.

उबिका माथापट्टी

माथापट्टीचं नाव घेताच नववधूच्या मनात दक्षिण भारतीय डिझाईन येते. पण याप्रकारची माथापट्टी आजकाल उत्तर भारतीय लग्नातदेखील नववधू घालणं पसंत करतात. याला परंपरागत रूप न देता मीनाकारी आणि कुंदनकारी डिझाईनने सजवलं जातं, ज्याने तिला एक रॉयल लुक मिळतो. ती डोक्यावर एखाद्या मुकूटाप्रमाणे सजते. ज्याने नववधूच्या सौंदर्याला चंद्राचं रूप प्राप्त होतं.

हसली नेकलेस

परंपरागत आणि जुन्या काळातील ज्वेलरीची आठवण देणारे हसली नेकलेस हल्ली मॉडर्न टच देऊन पुन्हा बाजारात आले आहेत. हा राजस्थानी ज्वेलरीचा एक प्रकार आहे, ज्यात हसली किंवा चंद्राच्या आकाराबरोबर नेकलेस बनवले जातात, जे घातल्यावर गळयाचा गोलाकार आकार उठावदार दिसतो. वेस्टर्न ज्वेलरीमध्येही या डिझाईनची चलती आहे, पण भारतीय पोशाखाबरोबर याचं ट्रेडिशनल रूप खूप पसंत केलं जातं.

लग्नानंतर कार्यक्रमासाठी वापरा असे दागिने

 

शक्यतो असं दिसतं की लग्नानंतर नवरीला दागिन्यांनी मढवलं जातं, ज्याकारणाने तिचा लुक बिघडतो. त्यामुळे तिने नेहमी काळजी घेतली पाहिजे की जर ती हेवी वर्कची डिझाईनर साडी नेसत असेल, तर तिने उठावदार ज्वेलरी सेट वापरू नये. जर बनारसी साडी वापरत असेल, तर त्याबरोबर झुमकेदेखील शोभून दिसतील. त्याव्यतिरिक्त खूप बांगडयाऐवजी रत्नजडीत कडयाच्या जोडयाही किंवा नेहमीच्या डिझाईनपेक्षा चोकर किंवा टेंपल ज्वेलरीही वापरू शकते.

कमी बजेट मध्ये अशी खरेदी करा ज्वेलरी

 

हल्ली रत्नजडीत चोकर वापरायचा ट्रेंड आहे, सोबत नववधू लहान गोलाकार इअररिंग्ज घालू शकते. जर बजेट कमी असेल तर सोन्याबरोबर सेमीप्रिशियस स्टोन्सचा वापर करून दागिने खरेदी करा. या स्टोन्समध्ये रूबी आणि पन्ना वापरलेला असतो, जे बीड्सच्या रूपात सोन्याने बनलेल्या पेडंटमध्ये लावतात. या बीड्सचा वापर तुम्ही रंगानुसार करू शकता. तुम्हाला हवं तर मोत्याचा वापरदेखील करू शकता.

साडी ड्रेपिंगच्या हॉट स्टाइल

* विनीत छज्जर, डायरेक्टर, विनीत साडी

साडी ही एक अशी वेशभूषा आहे, जी पारंपरिक असूनही यात तुमचा लुक हॉटही दिसू शकतो. साडी सर्वांनाच शोभून दिसते. साडी नेसण्याची पद्धत प्रत्येक प्रदेशात वेगवेगळी असते. लहंगा, बटरफ्लॉय, जलपरी इ. प्रसिद्ध स्टाईल आहेत. साडी नेसण्याच्या या काही हॉट स्टाईल खालीलप्रमाणे :

तर मग सणासुदीच्या काळात पारंपरिक भारतीय लुक मिळवण्यासाठी यातील साडी ड्रेपिंगची तुम्हाला आवडेल ती पद्धत निवडा व उत्सवातील मौजमस्तीचा आनंद घ्या.

बटरफ्लाय साडी

बटरफ्लाय पद्धतीने साडी नेसणे थोडेफार निवी स्टाईलसारखेच असते. फक्त पदराचा फरक असतो. या स्टाइलमध्ये साडीचा पदर खूपच अरूंद केला जातो, ज्यामुळे शरीराचा मिडल र्पोर्ट दिसतो.

निवी साडी

निवी साडी नेसणं खूपच सोपे आहे आणि साडी नेसण्याची एक ठराविक पद्धत आहे. या पद्धतीने तुम्ही रोजच्या वापरात किंवा सणासुदीलाही साडी नेसू शकता. आंध्र प्रदेशात या निवी पद्धतीचा उगम झाला आणि आज पूर्ण भारतभरात ही प्रचलित स्टाइल आहे.

पॅन्ट स्टाइल

पॅन्ट आणि जेगिंगसोबत साडीला एक अनोखा लुक मिळू शकेल. ही लेटेस्ट फॅशन मुलींची आणि महिलांचीही आवडती फॅशन बनली आहे. सॉलिड पॅण्टसाठी तुम्ही प्रिंटेड साडी निवडू शकता. हे एक सुंदर कॉम्बिनेशन आहे. यात तुम्ही खूपच सुंदर दिसाल.

मुमताज स्टाइल

पार्टीला जाताना रेट्रो लुकसाठी मुमताज स्टाइलहून सदर पर्याय असूच शकत नाही आणि तुमचा बांधा जर सुडौल असेल तर ही स्टाइल तुमच्यासाठी अगदी   योग्य पर्याय ठरेल.

लहंगा स्टाइल

ही साडी नेसण्याची एक आधुनिक पद्धत आहे, जी साडी आणि लहंग्याच्या रूपात दोन सुंदर भारतीय वेशभूषेचे मिश्रण करते. यात साडी लहंग्याप्रमाणे नेसली जाते आणि यासाठी निऱ्यांची मदत घेतली जाते. या स्टाइलमध्ये बहुंताशी पदर उलटा घेतला जातो. कोणत्याही खास उत्सवाच्या वेळी अशा स्टाइलने साडी नेसणे हा अगदी योग्य पर्याय आहे.

कुर्गी स्टाइल

ही एक खूपच वेगळी स्टाइल आहे. यात साडीच्या निऱ्या मागच्या बाजूला घातल्या जातात म्हणजे तुम्हाला व्यवस्थित चालता येते. यामध्ये पदर फ्रंट चेस्टवरून घेऊन मागे वळवून समोर खांद्यावर टाकला जातो. काखेतील नेकलाईनचा योग्य विचार करून हा पदर सेट केला जातो.

बंगाली स्टाइल

पारंपरिक लुकसाठी साडीच्या बाबतीत बंगाली पद्धतीच्या साडीला काही तोड नाही. यामुळे फक्त ग्रेसफुल लुक मिळतो असे नाही तर ही सांभाळणेसुद्धा जास्त कठिण नसते.

मराठी स्टाइल

नेहमीच्या साड्यांच्या पॅटर्नच्या तुलनेत ही स्टाइल खूपच वेगळी आहे. यासाठी  सहावार साडीऐवजी नऊवार साडी वापरली जाते. हल्ली परकर वापरला जात नाही.

वेडिंग सिझनमध्ये ग्लैमरस लुक

वेडिंगमध्ये सजलेल्या मुली सर्वांचे लक्ष वेधून घेतात. परंतु हे तेव्हाच घडते जेव्हा ती केसाला एक सुंदर आणि मोहक लुक देईल. तर मुलींनो, हे लक्षात ठेवा की आपला मेकअप आणि ड्रेसिंग सेन्स असा असावा की आपल्या सौंदर्य आणि ड्रेसिंग स्टाईलचे कौतुक केल्याशिवाय दर्शक जगू शकत नाही.

तर, या 5 टिपा अनुसरण करण्यास विसरू नका-

  • अनोखा पोशाख

हे आपल्याला समजले पाहिजे की आपण एक कॉलेजची तरुण मुलगी आहात, काकू नाही. कधीकधी मुली ड्रेसिंगमुळे वयस्कर दिसू लागतात. मुलींनी काहीतरी भारी वाटण्याऐवजी साध्या, चमकदार, अनोख्या ड्रेसची निवड करावी. या वयात करण्यासारखे एकसारखेच आहेत, जेणेकरून आपण अगदी सुंदर दिसाल. जर आपल्याला वेस्टर्न घालायचे असेल तर मिडी, फ्रॉक किंवा गाऊन घाला. आपण क्लासिक पाहू इच्छित असल्यास, आपण शरारा, लेहंगा, अनारकली दावे प्रयत्न करू शकता.

जर तुम्हाला साडी घालायची असेल तर ती अनोख्या स्टाईलमध्ये घाला.

  • अ‍ॅक्सेसरीजची निवड

सामान आणि दागदागिने काळजीपूर्वक निवडा. एका हातात बांगडी व दुसर्‍या हातात घड्याळ घाला. जर कानात मोठ्या कानातले असतील तर गळ्यास काही घातले जात नाही. दागिने मिसळा आणि आपल्या ड्रेससह जुळवा.

  • केसांची शैली

केसांची शैली संपूर्ण लुक बदलते. फंकी आणि साध्या केशरचना आपल्याला परिपूर्ण बनवू शकतात. खुल्या केसांचा प्रत्येक ड्रेस सूट होतो. स्टाइलिश अर्धे केस किंवा अर्ध्या वेणी उत्कृष्ट दिसतात.

  • मेकअप संपला नाही

मेकअप जास्त कृत्रिम बनवू नका. फाउंडेशनचा वापर ओव्हर मेकअपचा लुक देतो. जर चेहयावर डाग आणि मुरुम असतील तर बीबी किंवा सीसी क्रीमचा वापर चांगला होईल. मेकअपच्या युक्त्या केवळ तेव्हाच चांगले दिसतात जसे की स्मोकी आकार आणि ठळक ओठ मुलींवर चांगले दिसत नाहीत आणि इंप्रेशन चांगले नसतात.

  • आपली उत्कृष्ट वैशिष्ट्ये आकर्षक बनवा

आपली उत्कृष्ट वैशिष्ट्ये कोणती आहेत हे आपल्याला चांगलेच ठाऊक आहे. उदाहरणार्थ, जर आपल्याला माहिती असेल की आपले डोळे अधिक सुंदर आहेत, तर मेकअप वापरताना डोळे तीक्ष्ण ठेवा. ओठ अधिक गोंडस आहेत, म्हणून काळजीपूर्वक लिपस्टिक शेड निवडा. डार्क लिपस्टिक अजिबात लावू नका. जर आपल्याला मेकअपपासून वाचवायचे असेल तर या टिप्सचे अनुसरण करा जेणेकरून आपण पार्टीमध्ये सर्वात मोहक आणि सुंदर दिसू शकाल

चष्म्याला पर्याय स्टायलिश सनग्लास

* प्रतिनिधी

रणरणत्या उन्हात तुम्हाला कधी ना कधी मौजमजा वा एखाद्या कामासाठी घर वा ऑफिसमधून बाहेर पडावं लागतं. तेव्हा तुम्हाला अशा सनग्लासेसची गरज लागते, जे तुम्हाला रणरणत्या उन्हापासून तुमच्या डोळ्यांना थंडावा देऊ शकतील.

सनग्लास उपयोगी आहेत

डोळ्यांनी छानपैकी दिसावं यासाठी चष्मा असलेले अनेक जण सनग्लासेसचे फायदे आणि आराम यापासून तसे वंचितच राहातात; कारण नजरेच्या चष्म्याच्या ऐवजी ते सनग्लासेसचा वापर करू शकत नाहीत. ज्या लोकांना डोळ्यांनी स्पष्टपणे दिसत नाही, त्यांना चष्म्याशिवाय गाडी चालवणं धोकादायक होऊ शकतं, अगदी नजरेच्या चष्म्याशिवाय रस्त्यावर चालणंदेखील धोकादायक असतं. मग नजरेचा चष्मा वापरणाऱ्यांनी रणरणत्या उन्हापासून वाचण्यासाठी आणि फॅशन स्टेटमेण्टसाठी सनग्लासचा वापरच करू नये का? नाही, अजिबात असं नाही. अलीकडे नजर कमी असणारेदेखील असे सनग्लास सहजपणे मिळवू शकतात, ज्यामध्ये नजर सुधारण्याची आणि उन्हापासून डोळे बचावण्याची दोन्हींची क्षमता असते.

नजेरचा चष्मा वापरणारी अनेक लोक अनेकदा या दुहेरी हेतूसाठी परंपरागत लेन्सचा वापर करतात आणि वेगवेगळ्या ऋतूनुसार चष्मा बदलण्याच्या असुविधेपासून वाचतात. परंतु परंपरागत लेन्स कधीकधी एडजस्ट होत नाहीत वा बदलत्या ऋतूमुळे त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्वरित परिवर्तित होत नाहीत. काही लोकांना असंदेखील वाटतं की परंपरागत लेन्स त्यांच्या स्टाइलशी मॅचिंग आणि उपयुक्त नाहीत.

नजरेच्या सुरक्षिततेसाठी

प्रेस्क्रिप्शन सनग्लास विशेष तंत्रज्ञानाने युक्त सनग्लास असतं, ज्यामध्ये व्यक्तिची नजर सुधारण्यासाठी पावर लेन्सदेखील असते. प्रेस्क्रिप्शन सनग्लास सर्व प्रकारच्या प्रेस्क्रिप्शनसाठी उपलब्ध आहे.

पूर्वी लोक जिथे सनग्लासेसला फॅशन एक्सेसरीज मानत असत, तिथे आता डोळ्यांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठीदेखील असे सनग्लासेस वापरण्याची फॅशन वेगाने वाढू लागलीए, ज्यामुळे सूर्याच्या अल्ट्राव्हायलेट किरणांनी आपल्या डोळ्यांचं रक्षण होतं.

आता तर कॉण्टेस्ट लेन्स लावणारेदेखील प्रेस्क्रिप्शन सनग्लासला आपल्या डोळ्यांची ज्योत व आरोग्य याचा सर्वोत्तम पर्याय मानू लागले आहेत.

मेंदी बनू नये हानिकारक

* मोनिका गुप्ता

मेंदी लावणे प्रत्येक स्त्रीला आवडते. लग्न असो वा इतर कोणता उत्सव मेंदीविना तो अपूर्ण आहे. प्रत्येक आनंदात सहभागी होणाऱ्या या मेंदीची सगळे प्रशंसा करत असतात, पण यामुळे होणाऱ्या त्रासाकडे आपण दुर्लक्ष करतो.

पूर्वी मेंदी घरातच वाटून तयार केली जायची. पण आजकाल ही बाजारात सहज उपलब्ध होते आणि बहुतांश महिला याचाच वापर करतात. पण बाजारात मिळणारी रेडिमेड मेंदी आपल्या त्वचेसाठी हानिकारक असते. तसे  पाहता, बाजारात मिळणाऱ्या मेंदीत अनेक प्रकारची रसायने मिसळलेली असतात, जी तुमच्या त्वचेला नुकसान पोहोचवू शकतात.

रसायने असलेली मेंदी

गडद रंगाची मेंदी जेव्हा हातावर काढली जाते, तेव्हा स्त्रिया खूपच खुश होतात. पण याच्या गडद रंगामागे धोकादायक रसायनं असतात. पीपीडी, डायमिन, अमोनिया, हायड्रोजन यासारखी धोकादायक रसायनं मेंदीत मिसळलेली असतात. यामुळे हात शुष्क होतात, शिवाय सूज, जळजळ, खाज यासारखे त्राससुद्धा सुरु होतात. जर भयानक रसायनांनी तयार केलेली मेंदी सूर्यकिरणांच्या संपर्कात आली तर यामुळे कर्करोग व्हायची भीती असते.

विचार करून लावा केसांना मेंदी

आज मेंदी लावणे म्हणजे भयानक रसायनांशी मैत्री करणे आहे. जसे आपण मेंदीचे सुंदर सुंदर डिझाइन्स हातांवर काढतो, तसेच केसांचे सौंदर्य वाढवायलासुद्धा याचा वापर करतो. पण केसांना मेंदी लावल्याने अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात, ज्याकडे आपण कधी लक्ष देत नाही.

या जाणून घेऊ, मेंदी केसांना का लावू नये :

हेअरस्टाईलिस्ट हेमंत सांगतात, ‘‘अलीकडे हर्बल मेंदीच्या नावावर केमिकल विकण्यात येत आहे, ज्यामुळे केस थोडया काळासाठी चमकदार तर दिसतात, पण शेवटी त्यातील आर्द्रता कमी होऊ लागतो, ते शुष्क आणि निर्जीव दिसू लागतात.’’

आजच्या काळात तुम्ही स्टायलिस्ट आणि सुंदर दिसणे आवश्यक झाले आहे, जेणेकरून तुमचे केसही सुंदर दिसावे, कॉलेजमधील युवती असो वा काम करणारी स्त्री असो, आजच्या काळात प्रत्येकजण हायलाईट, केराटिन, स्मूदनिंग, रिबॉण्डिंग करून घेण्याला प्राधान्य देतात. जर तुम्हाला आपल्या केसांवर वेगवेगळे प्रयोग करायचे असतील तर सर्वात आधी तुम्हाला तुमच्या केसांना मेंदीपासून दूर ठेवावे लागेल.

तसे पाहता, मेंदी आपल्या केसात दीर्घ काळ राहते. जर कोणी मेंदीचा वापर हायलाईट, कॅराटीन वगैरेसाठी करणार असेल, तर यामुळे केसांवर त्याचा कधीही चांगला परिणाम मिळणार नाही.

आपल्या केसांना समजून घ्या

हेमंत सांगतात, ‘‘केसांचे ३ थर असतात. क्युटिकल, कॉर्टेक्स आणि मेड्युला. मेंदी केसांच्या पहिल्या थरावर आवरण टाकण्याचे काम करते. ज्या स्त्रिया वर्षातून १० वेळा मेंदी लावतात, त्यांच्या केसात ६-७ आवरण राहून जातात. अशा वेळी केसांवर कोणतेही रसायन काम करत नाही आणि जर करत असेल तर त्याचा परिणाम चांगला नसतो, जे केसांना नुकसानच पोहोचवते.’’

बाह्य उपायांनी स्वत:ला सुंदर दाखवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा आपले व्यक्तिमत्व समृद्ध करा. मग मेंदीचा वापर कारायचाच असेल, तर एखाद्या तज्ञाच्या देखरेखीखाली करा.

या गोष्टींकडे लक्ष ठेवा

* जर तुम्हाला मेंदीचा वापर करायचा असेल तर बाजारात मिळणारी मेंदी घेण्याऐवजी पानांच्या मेंदीचा वापर करा.

* मेंदीची ताजी पानं बारीक करून केसांना लावल्यास थंडावा जाणवतो. यामुळे केसांचे कोणतेही नुकसान होत नाही.

* जर तुम्हाला भविष्यात केसांवर काही प्रयोग करायचे असतील तर तुम्ही मेंदी लावू नका.

* कधीच मेंदी केसात अर्ध्या तासाहून अधिक वेळ ठेवू नका.

* हातांवर मेंदी लावण्याआधी मोहरीचे तेल अवश्य लावा.

* जर मेंदी लावल्यावर तुमच्या शरीरावर पुटकुळ्या आल्या वा इतर कोणते नुकसान झाले, तर थंड पाण्याने धुवून टाका आणि नंतर खोबरेल तेलाचा लेप लावून चांगले मालिश करा. आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे मेंदी चांगल्या ब्रॅण्डची खरेदी करा.

जमाना आदिवासी फॅशनचा

* सुमन वाजपेयी

नवीन फॅशनचा अवलंब करणे आजकालचा ट्रेंड आहे. म्हणूनच फॅशन डिझायनर्सही हटके प्रयोग करत आहेत. कानातले असोत किंवा साडया, यात आदिवासी लुक बराच लोकप्रिय आहे. आजकाल आदिवासी प्रिंट सर्व प्रकारच्या पोशाखांवर पाहायला मिळत आहे.

आदिवासींमध्ये निसर्ग आणि प्राण्यांविषयी ओढ पाहायला मिळते. त्यामुळेच अशा ड्रेस मटेरियलमध्येही नैसर्गिक प्रिंट्स आणि रंगांचा वापर वाढत आहे. आदिवासी प्रिंटस असलेल्या पाश्चात्य कपडयांचीही बरीच चलती आहे. ते फ्यूजन लुक देतात. सोबतच प्रिंट्सही अगदी ट्रेंडी दिसतात. आदिवासी लुक असलेल्या साडयांचीही सध्या चलती आहे. खासकरून कॉटन आणि हँडलूमच्या आदिवासी प्रिंट्स असलेल्या या साडया क्लासी आणि आकर्षक लुक देतात. ऐश्वर्या राय बच्चनपासून जेनेलिया आणि बिपाशाही अशाप्रकारच्या साडया परिधान करताना दिसू शकतात.

आफ्रिकन प्रिंट्सनेही आदिवासी लुकमध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. आफ्रिकन प्रिंट्सच्या स्कार्फपासून ते बॅडशीट्स, उशाही पसंतीस उतरत आहेत. आफ्रिकन प्रिंट्सच्या सलवार सूटचा वापरही वाढला आहे. आदिवासी लुक हा पारंपरिक पेहराव, साडीसोबतच कॅपरी, पॅण्ट, ट्यूनिकपासून ते मिनीजपर्यंत सर्वांवर ट्राय करता येऊ शकतो. आदिवासी प्रिंट्स पॅण्टला कूल लुक मिळवून देतात. याला तुम्ही बॉयफ्रेंड शर्टसोबत मॅचिंग करून घालू शकता. आदिवासी प्रिंट्सच्या प्लाझो पँटदेखील घालू शकता, ज्याला टँग किंवा  क्रॉप टॉपसह तुम्ही सहज कॅरी करू शकता.

ज्वेलरीही असते खास

ड्रेसबरोबरच ज्वेलरीमध्येही आदिवासींचा लुक कॅरी केला जात आहे. आदिवासी कानातले तरुणींसह वयस्कर महिलाही घालू लागल्या आहेत. यांचे वैशिष्टय म्हणजे हे पारंपरिक किंवा ट्रेंडी अशा कुठल्याही लुकला मॅच करतात. आदिवासी भागात राहणाऱ्या बहुतेक स्त्रिया खूप जड दागिने घालतात. परंतु डिझाइनर त्याच्या हलक्या वजनाच्या डिझाईन्स तयार करत आहेत. अष्टधातू, तांब्याच्या तारांसोबत चांदी मिक्स करून बनविलेली आदिवासी ज्वेलरी इंडोवेस्टर्न आऊटफिटसह खूपच छान दिसते. यात अॅनिमल ज्वेलरी जसे की, कासवाची अंगठी, घुबडाची चेन, पोपटाचे कानातले, लीफ सेट इत्यादींचा सध्या खूपच ट्रेंड आहे.

चांदीच्या पांढऱ्या किंवा काळया धातूपासून बनवलेले कानातलेही सध्या बाजारात उपलब्ध आहेत.

आदिवासी बोहो बांगडयादेखील वेगळा लुक देतात. त्या पाश्चिमात्य तसेच पारंपरिक पेहरावासोबतही घालता येतात. बोहो बांगडयांना कडा किंवा ब्रेसलेटप्रमाणेही घालता येते. आदिवासी प्रिंट्स असलेले स्कार्फ खूपच स्मार्ट लुक देतात. ते जीन्स, ड्रेस किंवा कुर्ती जीन्स अशाप्रकारे कोणत्याही पेहरावासोबत परिधान केले जाऊ शकतात. तुम्ही तुमचा फॉर्मल किंवा कॅज्युअल आदिवासी स्कार्फ कुठल्याही आऊटफिटसह कॅरी करू शकता.

जर तुम्ही प्लेन ड्रेस घालणार असाल तर त्यासोबत आदिवासी प्रिंट स्कार्फ वापरा. यामुळे आपला ड्रेस आणखी आकर्षक दिसेल. जर तुम्ही ब्रोच लावत असाल तर साडीला आदिवासी ब्रोच लावता येऊ शकेल.

मेकअपवरही आहे जादू

आदिवासी लुकच्या मेकअपची वाढती क्रेझ तरुणींमध्ये दिसू शकते. आदिवासी लुक मिळविण्यासाठी डोळयांचा विशेष मेकअप केला जातो. यामुळे डोळे बोल्ड दिसू लागतात. यासाठी वरच्या आणि खालच्या दोन्हीकडील पापण्यांना चांगल्याप्रकारे हायलाईट केले जाते आणि डोळे उठून दिसण्यासाठी काजळ लावले जाते. त्यानंतर आयशॅडो वापरून डोळयांना बोल्ड लुक दिला जातो. नंतर मस्करा लावून आर्टिफिशियल लॅशेज लावल्या जातात.

आदिवासी लुक मिळविण्यासाठी लिक्विड फाउंडेशन आणि ब्रोन्जरचा उपयोग ओठांवर केला जातो, परंतु या उपयोग खूप कमी प्रमाणात केला जातो, फक्त त्याचा हलकासा टच दिला जातो. या लुकसाठी ब्लशरदेखील वापरला जात नाही. लिपस्टिकसाठी मॅट कलर निवडा जे नारंगी आणि कोरलच्यामधले असतील किंवा मग लाल रंगाशी मिळत्याजुळत्या शेडचीही लिपस्टिक लावता येईल.

हेअर स्टाईलबाबत बोलायचे म्हणजे, या लुकसाठी केस मोकळे सोडा किंवा सैलसर बांधा. बोटांनीच केस पसरवा. मोकळे, साधारपणे कर्ल केलेले केस या स्टाईलसाठी योग्य ठरतात. आदिवासी स्त्रिया केस सजवण्यासाठी विविध प्रकारचे जड दागिने वापरतात, परंतु ते दागिने प्रमाण मानून या दिवसात ज्या डिझाईन्स तयार केल्या जात आहेत, त्यांना फॅशन ज्वेलरी असे म्हणतात.

फॅशन छोट्या शहरांतील

* दीपा पांडे

नेहमीच दोन-अडीच वर्षांनी होणाऱ्या बदलीमुळे सीमा एवढया देश-प्रदेशात फिरली होती की नेहमीच ती काय घालावे आणि काय नाही, अशा विचारात पडत असे. तुमच्यासोबतही असेच घडते का? आपण जर मोठया शहरात राहात असाल, तर आपण निर्धास्तपणे कोणताही पेहराव घालू शकता, पण आपण जर छोटया शहरात राहात असाल, तर हे पाहणे आवश्यक आहे की, तेथील वातावरण कसे आहे. अजूनही तिथे चेहऱ्यावर घुंगट घेण्याचा रिवाज आहे का किंवा मग डोक्यावर पदर घेण्याचा रिवाज आहे का? तेथील वातावरणानुसार तुम्हालाही तुमचा वार्डरोब तयार करावा लागेल, अन्यथा सर्वांमध्ये तुम्हाला अवघडल्यासारखे होईल.

२००४ मध्ये सीमाची बदली हरदोई, उत्तर प्रदेशात झाली होती, तेव्हा तिथे तिने पाहिले की सर्व महिला साडी नेसत आणि घुंगट चेहऱ्यावर ओढून घेत असत, तर मुली पंजाबी ड्रेस वापरत असत. खूप कमी मुली जीन्स घालत होत्या, तीही कधीतरी. आज मात्र एवढया वर्षांत खूप बदल झाला आहे. आज त्याच महिला कुर्ती-लेगिंग्ज वापरू लागल्या आहेत, तर मुली जीन्स आणि टॉप. आज अशीच स्थिती अनूपपूर मध्य प्रदेशमध्येही आहे. आता कोणी हरदोईवरून फोन करून खुशाली विचारली की सीमा सांगते, इथे आजही १२ वर्षांपूर्वी हरदोई होतं, मग प्रश्न विचारणारीही हसू लागते.

काय वापराल?

‘जसा देश तसा वेश’ ही म्हण खरी असली, तरी याचा अर्थ असा नाही की सर्व महिला साडी नेसतात, त्यामुळे तुम्हीही साडीशिवाय दुसरे काही वापरायचेच नाहीत. उलट साडीबरोबरच सलवार-कमीज, चुडीदार, लेगिंग, पॅरलल इ. पेहराव कुठलाही संकोच न बाळगता वापरा. एकमेकांचे पाहून आजूबाजूच्या महिलांनाही अशा प्रकारचे कपडे वापरण्याची इच्छा होईल.

आपण जर एखाद्या लग्नाला जात असाल, तर मात्र साडीच सर्वात उत्तम पेहराव ठरेल. अशा वेळी पारंपरिक पद्धतीने तयार होऊन सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरू शकता. रोज साडी, चूडीदार परिधान करणाऱ्या महिला तुमचं पारंपरिक रूप पाहून दंग राहतील. त्याचप्रमाणे, अशाच भेटीगाठींच्या प्रसंगी पॅरलल, लेगिंग किंवा सलवार सूटसोबत छान ओढणी घेऊ शकता. जर तुम्हाला मोठा दीर किंवा सासऱ्यांसमोर चेहरा दाखवायचा नसेल, तर आपला दुपट्टा डोक्यावर चांगल्याप्रकारे घेऊन पिनअप करा. असे केल्याने आपल्या डोक्यावरील पदरही सरकणार नाही आणि कोणी तुमच्या फॅशनला नावही ठेवणार नाही.

जर साडी नेसून कंटाळा आला असेल, तर आपल्या आवडीनुसार गुजराती वर्क मिरर आणि गोंडयांनी सजलेली, राजस्थानी बांधणीच्या किंवा नक्षीकाम केलेल्या राजसी दिसणारी लहंगा-चोली घालून मिरवा. रेडीमेड लेहंगा-साडीही आपल्या सोईनुसार वापरू शकता.

तरुणी जीन्स किंवा पँटसोबत गुडघ्यांपर्यंत कुर्ती व स्टोल वापरून आपली हौस भागवू शकतात. हा पेहराव लांबून कुर्ती व लेगिंगचा लुक देईल. त्यामुळे तुम्ही इतरांपेक्षा वेगळयाही दिसणार नाही. जर कमी वयाच्या तरुणी असाल तर लाँग स्कर्ट आणि शॉर्ट कुर्तीवर स्टोल घेऊन सणासुदीला आपला हटके लुक मिळवू शकता.

जर तुम्हाला मिनी मिडी किंवा हॉट पँट घालायची इच्छा असेल आणि तुम्ही एकत्र कुटुंबात राहत असाल, तर आपण पतीसोबत एकांतात आपल्या बेडरूममध्ये अशा प्रकारचा पेहराव करून मिरवू शकता. त्याचप्रमाणे दुसऱ्या शहरात फिरायला जाताना तिथे आपला मनपसंद ड्रेस वापरू शकता. मात्र आपला फोटो सोशल मीडीया उदा. फेसबुक, व्हॉट्सअपवर पोस्ट करू नका. कारण तुम्हाला परत त्याच कुटुंबात परतायचे आहे.

काय वापरणे टाळाल?

आता काही अतिउत्साही महिला विचित्र कपडे वापरतात किंवा मग हास्याला पात्र ठरतात. उदा. नेटची साडी नेसून डोक्यावर पदर घेऊन फिरणे. अशा वेळी त्यांना काय झाकायचे आहे अन् काय दाखवायचे आहे तेच कळत नाही. काही महिला स्किन टाइट लेगिंगसोबत कुर्ता वापरतात. अशा वेळी वाटते की केवळ कुर्ताच घातला आहे. हे दिसायला खूप वाईट दिसते. म्हणूनच बाहेर जाताना आपल्या वेशभूषेची विशेष काळजी घ्या.

साडी खरोखरच संपूर्ण पोशाख आहे, पण तीही नेसण्याच्या अनेक पद्धती आहेत. साडी सरळ पदर, उलटा पदर अशा कुठल्याही पद्धतीने नेसलेली असेल, तरी त्याच्यासोबत मॅचिंग ब्लाउज व परकर नसेल, तर ती खुलून दिसत नाही. त्याचप्रमाणे ती व्यवस्थित नेसलेली नसेल, वरती उचलली गेली असेल, फॉल निघाला असेल, पदर पसरलेला असेल, तरीही खराब दिसते.

जर जीन्स किंवा पँट घालायची असेल, तर शॉर्ट टॉप किंवा स्किन टाइट जीन्स वापरणे टाळा. लाँग स्कर्टसोबत टाइट शर्ट किंवा टीशर्ट वापरू नका. छोटया शहरांमध्ये असे कपडे परिधान केलेल्या तरुणींकडे लोक असे काही वळून पाहतात की जणू काही प्राणिसंग्रहालयातून एखादा प्राणी बाहेर येऊन रस्त्यावर फिरतोय.

पेहराव कुठलाही असो, तो योग्य प्रकारे केलेला नसेल, तर तो आपले रूप खुलविण्याऐवजी घटवितो. काही महिलांना वाटते की महागडे ड्रेसेसच शोभून दिसतात, पण असे नाहीए. रोजच्या पोशाखांमध्येही त्यांच्या किंमतीपेक्षा रंगांचे संयोजन, डिझाइन जास्त महत्त्वाची असते. म्हणूनच जो पेहराव कराल, तो शोभण्यासारखा असावा. त्याच्या रंगांशी मिळत्याजुळत्या बांगडया, कडे, ब्रेसलेट, आर्टिफिशिअल ज्वेलरी वापरून तुम्ही तुमचे सौंदर्य खुलवू शकता.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें