* प्रतिनिधी

प्रत्येक ऋतूमध्ये फॅशनेबल दिसण्यासाठी त्या ऋतूप्रमाणे फक्त आऊटफिटचीच निवड नाही तर एक्सेसरीजचंही कलेक्शन जवळ असणं आवश्यक आहे. आऊटफिट आणि एक्सेसरीजच्या बेस्ट कॉम्बिनेशनमुळेच तर व्यक्तिमत्वाला एक परफेक्ट लुक मिळतो. हॉट समर सिझनमध्ये कोणत्या कुल एक्सेसरीजने आपला लुक कम्प्लिट कराल, हे माहीत करून घेण्यासाठी आम्ही फॅशन डिझायनर आणि स्टायलिस्ट सोनम जैन यांच्याशी चर्चा केली.

फ्लोरल स्कार्फ : हॉट समरमध्ये फ्रेश लुकसाठी आपल्या वार्डरोबमध्ये स्कार्फचं कलेक्शन अवश्य ठेवा. आजकाल फ्लोरल प्रिंटेड कलरफुल स्कार्फची फॅशन आहे. हा तुम्ही शॉर्ट ड्रेससोबत किंवा टी शर्टबरोबर कॅरी करू शकता. स्कार्फ रोज वेगळया स्टाईलचे घाला. यामुळे तुम्ही जास्त स्टायलिश दिसाल.

एव्हिएटर सनग्लास : कडक उन्हात डोळयाच्या सुरक्षेबरोबरच स्टायलिश दिसायचं असेल तर सनग्लासहून दुसरा कोणता पर्याय नाही. परंतु गोल किंवा चौकोनी वा बॉक्स शेपऐवजी मेटल फ्रेमचा एव्हिएटर सनग्लास निवडा. हे घातल्यावर तुम्हाला जास्त आय मेकअपची गरज भासणार नाही.

क्लासिक वॉच : या उन्हाळयात बोल्ड आणि बिनधास्त अंदाजासाठी आपल्या हाताचं सौंदर्य वाढवा क्लासिक वॉच घालून. हे कोणत्याही आऊटफिटबरोबर सहज मॅच होतं आणि लेदर बेल्ट असल्यामुळे कधीही आऊट ऑफ फॅशन होत नाही.

सुपरसाईज्ड बॅग : कम्प्लिट लुककरिता सुपरसाईज्ड बॅगला आपली पहिली पसंत बनवा. यात फक्त तुम्हाला आवश्यक असलेल्या वस्तू सहज मावू शकतात. याशिवाय ही बॅग तुम्हाला सुपरस्टायलिश लुक देते. आकर्षणाचा केंद्रबिंदू व्हायचं असेल तर नियॉन शेडची हॅन्ड बॅग खरेदी करा. पारदर्शक बॅगही ट्राय करू शकता. ही तुम्हाला बोल्ड लुक देईल.

पॉप कलर्स नेकपीस : गोल्ड, डायमंड आणि रेगुलर नेकपीसने जर तुम्ही कंटाळला असाल तर पॉप कलर्सच्या हॉट नेकपीसला आपली स्टाईल स्टेटमेंट बनवा. आपल्या ज्वेलरी बॉक्समध्ये लाईम, ग्रीन, पिंक, ऑरेंज यासारखे पॉप शेड्स स्टोन, पर्ल आणि क्रिस्टलने बनलेल्या नेकपीसला जागा द्या. सिंगल शेड किंवा प्लेन आऊटफिटबरोबर पॉप कलरचा नेकपीस तुम्हाला सुपर स्टायलिश लुक देईल.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...