- रोचिका शर्मा
श्वेता आणि प्रियांका सिनेमाला गेल्या होत्या. सिनेमा पाहून परतताना श्वेता म्हणाली, ‘‘हिरोइन किती सुंदर दिसत होती. तिचे ड्रेसेसही किती छान होते. खरंच मीसुद्धा असे ड्रेस घालू शकले असते तर...’’
श्वेताचे बोलणे ऐकून प्रियांका टिचकी वाजवत म्हणाली, ‘‘मग घाल ना, तुला कोणी रोखले आहे...’’
‘‘कोणी रोखले नाहीए, पण माझे वयही बघ ना. या वयात तसे कपडे घातले, तर लोक मला हसणार नाहीत का? कुठे २०-२२ वर्षांची हीरोइन आणि कुठे मी,’’ श्वेताने उत्तर दिले.
‘‘यात हसण्यासारखी कोणती गोष्ट आहे? प्रत्येक माणसाची स्वत:ची आवड असते. केवळ ड्रेसिंग सेन्स चांगला असला पाहिजे. मग मजेत आपल्या आवडीचे कपडे घाला आणि तरुण दिसा.’’
गोष्ट खरी आहे. ड्रेसिंग सेन्स चांगला असेल, तर तुम्ही सर्व प्रकारचे कपडे वापरू शकता.
एफ सलूनच्या मालकीण पारुल शर्माला जेव्हा मी विचारले की आपले वय कमी दिसण्यासाठी घातलेल्या कपड्यांची काही भूमिका असते का? तेव्हा ती म्हणाली, ‘‘ऑफकोर्स असते. सर्व महिलांना आपल्या वयापेक्षा कमी दिसायचे असते. त्यासाठी त्या वेगवेगळ्या प्रकारचे घरगुती उपाय करतात, परंतु या सर्वांबरोबरच वय कमी दाखवण्यात घालण्यात आलेल्या कपड्यांचीही महत्त्वाची भूमिका असते. आपले शरीर आणि आवडीनुसार कपड्यांची निवड आपल्याला तरुण दाखवण्यास खूप मदत करते.’’
मी विचारले की अनेक महिला आपल्या टीनएजर्स मुलींप्रमाणे फॅशनेबल कपडे वापरतात. त्याबाबत तुम्हाला काय म्हणायचे आहे? एका ४० वर्षीय महिलेने जर असे कपडे घातले, तर ती वाईट दिसणार नाही का? तेव्हा यावर ती म्हणाली, ‘‘नाही मुळीच नाही, केवळ त्या महिलेला तसे ड्रेस घालण्याची आवड असावी आणि तिला माहीत असावे की तो ड्रेस कसा कॅरी करायचा आहे.’’
तसे हे आवश्यकही नाही की जे कपडे टीनएजर यंग दिसण्यासाठी घालतात, ते ४० वर्षीय महिलेनेही घालावेत, पण हो, त्या ट्रेंडच्या हिशोबाने मिळते-जुळते आणि जास्त सॉफिस्टिकेटेड पॅटर्न घालू शकता.