सिंगापूरमध्ये ‘लाईक आणि सबस्क्राईब’चे टाळ्यांच्या कडकडाटात कौतुक

* नम्रता पवार

‘लाईक आणि सबस्क्राईब’चा वर्ल्ड प्रिमीयर नुकताच सिंगापूरमध्ये पार पडला. चित्रपटामधील कलाकार अमेय वाघ, जुई भागवत, राजसी भावे आणि दिग्दर्शक अभिषेक मेरूकर यांनी प्रीमियरला उपस्थिती दर्शवली होती. या खास शोला सिंगापूरमधील मराठमोळ्या प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला असून चित्रपट संपल्यावर प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात चित्रपटाचे कौतुक केले. प्रेक्षकांना चित्रपटाची कथा, दिग्दर्शन, अभिनय, लेखन हे सगळेच भावले आहे.

‘लाईक आणि सबस्क्राईब’ हा आताच्या काळाचा चित्रपट आहे. उत्कंठावर्धक कथानकामुळे हा चित्रपट खिळवून ठेवतो, काहीतरी वेगळे पाहाण्याचा अनुभव आला, मराठीत असा प्रयत्न कौतुकास्पद आहे, अशा अनेक प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून सध्या येत आहेत.

सिंगापूरमधील प्रेक्षकांकडून आलेल्या या प्रतिक्रिया चित्रपटाच्या टीमला भारावणाऱ्या होत्या याबद्दल दिग्दर्शक अभिषेक मेरूकर म्हणाले, “चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर सिंगापूरमध्ये पार पडल्यानंतर मनाला थोडी धाकधूक होती की, प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया काय असतील? परंतु प्रत्यक्षात आपण दिग्दर्शन केलेल्या चित्रपटावर रसिकांकडून कौतुकाचा वर्षाव होतोय, हे आनंददायी आहे. आता संपूर्ण जगात ‘लाईक आणि सबस्क्राईब’ हा चित्रपट चर्चेत येईल आणि शोज हाऊसफुल्ल जातील, याची मला नक्कीच खात्री वाटते.”

नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत, एस. एन. प्रॉडक्शन्स एलएलपी आणि अभिषेक मेरूकर प्रॉडक्शन्स यांच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य, अभिषेक मेरूकर निर्माते असून ‘लाईक आणि सबस्क्राईब’चे लेखन आणि दिग्दर्शन अभिषेक मेरूकर यांनी केले आहे. यात अमेय वाघ, अमृता खानविलकर, जुई भागवत, शुभंकर तावडे, विठ्ठल काळे या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.

‘बंजारा’च्या २० फूट भव्य पोस्टरचे अनावरण

* नम्रता पवार

स्नेह पोंक्षेचे दिग्दर्शनात पदार्पण मोरया प्रॉडक्शन्स आणि वि. एस. प्रॉडक्शन्स सादर करत असलेल्या ‘बंजारा’ या चित्रपटाचा शानदार पोस्टर लाँच सोहळा नुकताच पार पडला. यावेळी चित्रपटाच्या २० फूट उंचीच्या भव्य पोस्टरचे अनावरण करण्यात आले. सोहळ्यात विशेष लक्षवेधी ठरली ती शरद पोंक्षे, भरत जाधव, सुनील बर्वे आणि स्नेह पोंक्षे यांची बाईकवरील ग्रँड एन्ट्री. स्नेह पोंक्षे लिखित, दिग्दर्शित ‘बंजारा’ या चित्रपटात प्रेक्षकांना मैत्रीचा प्रवास अनुभवयाला मिळणार आहे. ‘बंजारा’ चित्रपट येत्या नाताळमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

नुकत्याच झळकलेल्या पोस्टरमध्ये तीन वयस्क मित्र सिक्कीमच्या पर्वतरांगांमध्ये बाईकराईडचा आनंद लुटताना दिसत आहेत. त्यांचा हा प्रवास त्यांच्यासाठी किती आनंददायी आहे, हे त्यांच्या चेहऱ्यावरून व्यक्त होत आहे. अनेकदा कुठे जायचंय, यापेक्षा तिथपर्यंत पोहोचण्याचा अनुभव सुखकारी असावा, ही गोष्ट प्रवासात नेहमीच महत्वाची असते आणि आपण याच आनंदाला बऱ्याचदा मुकतो. याचे महत्व अधोरेखित करणारा ‘बंजारा’ आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने शरद पोंक्षे निर्मितीत आणि स्नेह पोंक्षे दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत.

निर्माते शरद पोंक्षे म्हणतात, “हा प्रवास प्रत्येकाच्या जीवनाची कथा सांगणारा आहे. स्नेहने हा विषय खूपच सुंदर हाताळला आहे. तीन मित्रांच्या प्रवासाची ही कथा प्रेक्षकांचे मतपरिवर्तन करणारी आहे. पोस्टरवरून प्रेक्षकांना साधारण कथेचा अंदाज आला असेलच. मला खात्री आहे, चित्रपटही प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.”

दिग्दर्शक स्नेह पोंक्षे म्हणतात, “माझ्या पहिल्या चित्रपटात वडिलांसोबत, भरत जाधव, सुनिल बर्वे अश्या दिग्गच कलाकारनसोबत काम करण्याची संधी मिळणे, हे माझ्यासाठी एक अविस्मरणीय अनुभव आहे. त्यांच्या अनुभवाचा मला या चित्रपटासाठी निश्चितच फायदा झाला आहे. ‘बंजारा’ चित्रपटाच्या संकल्पनेतून मला एक गोष्ट सांगायची होती – असं म्हणतात की कुठे जायचंय त्यापेक्षा तिथे जाण्याचा प्रवास आनंददाई असायला हवा पण आपण तो आनंद कधी लुटतच नाही बंजऱ्यासारखं जमलं पाहिजे आनंदाने प्रवास करता आला पाहिजे, फिल्म मधला प्रवास ही प्रेक्षकांना नक्की अवडेल याची खात्री आहे मला.’’

१८ ॲाक्टोबरला उलगडणार ‘लाईक आणि सबस्क्राईब’चे रहस्य

* नम्रता पवार

काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘आपण शोधायचं का रोहित चौहानला?’ अशी पोस्ट व्हायरल होत होती. अनेकांना हा रोहित चौहान कोण असा प्रश्न पडला होता. तर आता हा रोहित चौहान कोण आहे, याचा १८ ॲाक्टोबरला लाईक आणि सबस्क्राईब’मधून उलगडा होणार असून या चित्रपटाचे एक नवीन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. पोस्टरमध्ये अमृता खानविलकर, जुई भागवत आणि अमेय वाघ सेल्फी काढताना दिसत आहेत. सेल्फीत दिसणारे चेहरे आणि मागे दिसणाऱ्या चेहऱ्यांवरील हावभाव खूप वेगळे आहेत. या चेहऱ्यांमध्ये काही रहस्ये दडलेली दिसत आहेत. हे चेहरे काही वेगळंच सांगत आहेत. त्यामुळे ‘लाईक आणि सबस्क्राईब’मागे हे काय गुपित आहे. हे चित्रपट पाहिल्यावरच कळणार आहे.

नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत, एस. एन. प्रॉडक्शन्स एलएलपी आणि अभिषेक मेरूकर प्रॉडक्शन्स यांच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य, अभिषेक मेरूकर निर्माते असून ‘लाईक आणि सबस्क्राईब’चे लेखन आणि दिग्दर्शन अभिषेक मेरूकर यांनी केले आहे. यात अमेय वाघ, अमृता खानविलकर, शुभंकर तावडे, विठ्ठल काळे, जुई भागवत अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे.

दिग्दर्शक अभिषेक मेरूकर म्हणतात, ‘’ लाईक आणि सबस्क्राईब हा दैनंदिन शब्द झाला आहे. रोजच्या जीवनात हा शब्द सर्रास ऐकला जातो आणि याच शब्दांभोवती फिरणारी कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. हा एक रहस्यमय चित्रपट असून प्रेक्षकांना निश्चितच खुर्चीला खिळवून ठेवेल. येत्या १८ ॲाक्टोबरला रोहित चौहान कोण आहे, याचा उलगडा होईल.’’

परीक्षकाच्या भूमिकेत अमित राज आणि प्रियंका बर्वे यांच्या नव्या इनिंगचा सुपरस्टार सिंगर दिसणार आहे

* सोमा घोष

‘छोटी पदावरिल सुपरस्टार सिंगर हा सोनी मराठी’ हा नवीन कार्यक्रम लवकरच सुरू होणार आहे. कार्यक्रमाची घोषणा झाल्यापासून त्याचे परीक्षक कोण असतील याची उत्सुकता होती. आपल्या सुरेल आवाजाने मंत्रमुग्ध करणारी प्रियांका बर्वे आणि आपल्या संगीताच्या जादूने प्रेक्षकांची मने जिंकणारे अमित राज हे कार्यक्रम परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपट गीतांच्या माध्यमातून किंवा संगीताच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून किंवा दोन्ही माध्यमांतून संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्याचा आनंद तिने अनुभवला आहे. कार्यक्रमासाठी ऑनलाइन ऑडिशन्स सुरू झाल्या आहेत आणि इच्छुक स्पर्धकांना त्यांचे ऑडिशन व्हिडिओ Sony Liv किंवा Upwar वर पाठवण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. 24 ऑगस्ट ही ऑडिशन पाठवण्याची शेवटची तारीख असेल. ऑडिशन प्रक्रिया सुरू झाली आहे, लवकरच प्रेक्षकांना निवडक स्पर्धक पाहायला मिळणार आहेत.

जगातील सर्वोत्तम संगीताचा आवाज सोनी मराठी वाहिनीच्या माध्यमातून चाहत्यांना उपलब्ध होणार आहे. अमित राज आणि प्रियांका बर्वे महाराष्ट्रात येणार हा केवळ आवाज अभ्यासकांसाठी उत्सुकतेचा विषय आहे. ‘नव्या’ या शोबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. ‘सुपरस्टार सिंगर’ने संपूर्ण महाराष्ट्रातील प्रतिभावान आणि महत्त्वाकांक्षी गायक आणि संगीतकारांना एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. आणि म्हणूनच परीक्षक म्हणून माझी निवड खूप आनंददायी आहे. या वर्षांमध्ये, संगीत क्षेत्रातील आमचे अनुभव आणि आम्ही जे काही शिकलो ते तुमच्यासोबत किंवा नवीन स्पर्धकांसोबत शेअर करण्यास आम्ही उत्सुक आहोत.

विशेष म्हणजे, तुमच्या गायन कौशल्यासाठी आणि तुमच्या मधुर आवाजासाठी मी तुम्हाला ऑडिशनसाठी नक्कीच पाठवले आहे. ‘सुपरस्टार सिंगर’ हा हिंदी रिॲलिटी कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय झाला असून त्याच्या मराठी अनुवादानेही उत्सुकता निर्माण केली आहे. तुमच्या घरात इतका चांगला आवाज असेल तर त्याला लगेच ऑडिशन द्यायला सांगा. 24 ऑगस्टपर्यंत तुम्ही तुमच्या ऑडिशन्स पाठवू शकता.

अधिक माहितीसाठी https://www.sonyliv.com/dplnk?schema=sony://ems/4/141/0 ला भेट द्या किंवा संकेतस्थळाला भेट द्या.

पॉवरहाऊस ऑफ टॅलेंट राजकुमार राव

* सोमा घोष

पॉवरहाऊस ऑफ टॅलेंट राजकुमार राव त्याच्या आगामी रिलीज ‘स्त्री 2’ बद्दल उत्सुक असताना अनेक नवनवीन गोष्टी दाखवत आहे. चाहत्यांना उत्साहित करण्यात कोणतीही कसर तो सोडत नाही. ‘आयी नई’ मधील त्याच्या दमदार डान्स मूव्ह्सने इंटरनेटवर कब्जा केल्यानंतर राजकुमार रावने ‘तुम्हारे ही रहेंगे हम’ या चित्रपटातील एक रोमँटिक गाणं लाँच केलं आहे.

गाण्यात राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर आहेत आणि त्यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री नक्कीच पाहण्यासारखी आहे. राजकुमार राव यांची प्रेमाची निरागसता या गाण्यातून दिसून येते.

https://www.instagram.com/shilparao/reel/C-Z4GW8NQW0/

वरुण जैन, शिल्पा राव, सचिन-जिगर यांचे सनी आणि अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिलेले हे गाणे त्याच्या जुन्या शालेय आकर्षणामुळे लोकांचे आवडते बनणार आहे. ‘आयी नई’ ला रावच्या सहज नृत्य कौशल्याबद्दल प्रेम मिळत असताना, ‘आज की रात’ प्रत्येक संगीत चार्ट जिंकत आहे. मॅडॉक फिल्म्सच्या हॉरर-कॉमेडी विश्वात रावच्या पुनरागमनाची खूण करणारा ‘स्त्री 2’ 15 ऑगस्ट रोजी पडद्यावर येणार आहे.

‘श्रीकांत’ आणि ‘मिस्टर अँड मिसेस माही’ या दोन बॉक्स ऑफिसवर यश मिळवणारा अभिनेता आहे. स्ट्री 2 च्या रिलीझसह बॉक्स ऑफिसवर हॅट्रिक करणार आहे. हा चित्रपट रावचा आतापर्यंतचा सर्वात मोठा हिट चित्रपट ठरणार आहे. ‘स्त्री 2’ व्यतिरिक्त राव ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’मध्ये दिसणार आहे.

 

स्वातंत्र्यदिनी भरत जाधव यांचा ट्रिपल धमाका!

* नम्रता पवार

चित्रपट, मालिका आणि नाटक अशा मनोरंजनाच्या विविध माध्यमांमध्ये चतुरस्त्र अभिनेते भरत जाधव यांनी स्वतःची एक वेगळी छाप पाडली आहे. स्वतःचा एक प्रचंड मोठा चाहता वर्गही त्यांनी  निर्माण केला. अभिनयासोबतच निर्मिती क्षेत्रातही त्यांनी पाऊल ठेवले. मराठी रंगभूमीवर ‘सही रे सही’, ‘श्रीमंत दामोदर पंत’, ‘ऑल दि बेस्ट’, ‘आमच्या सारखे आम्हीच’ अशी अनेक नाटके त्यांनी गाजवली असून काहीतरी नावीन्यपूर्ण देण्याकडे भरत जाधव यांचा कायमच कल राहिला आहे. त्यामुळे यंदाही असेच काहीतरी नवीन घेऊन येण्यास भरत जाधव सज्ज झाले आहेत. काही वर्षांपूर्वी १५ ऑगस्ट रोजी ‘पुन्हा सही रे सही’ या नाटकाचा शुभारंभ करण्यात आला होता. याच खास क्षणाचे औचित्य साधत भरत जाधव येत्या १५ ऑगस्ट रोजी नाट्यरसिकांसाठी ट्रिपल धमाका घेऊन येत आहेत. यात एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या नाटकांचे प्रयोग एकाच नाट्यगृहात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात हे प्रयोग होणार असून या दिवशी रसिकांना भरत जाधव यांच्या वेगवेगळ्या पात्रांची झलक अनुभवायला मिळणार आहे. यावेळी सकाळी ‘अस्तित्व’,  दुपारी ‘मोरूची मावशी’ तर सायंकाळी ‘पुन्हा सही रे सही’ या तीन नाटकांचे प्रयोग होणार आहेत. वैशिष्टय म्हणजे ‘पुन्हा सही रे सही’ या नाटकाचा ४४४४ वा प्रयोग यावेळी होणार असून या प्रयोगाला राज ठाकरे यांची उपस्थिती लाभणार आहे.

भरत जाधव आणि चिन्मयी सुमीत यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘अस्तित्व’ या नाटकाची निर्मिती भरत जाधव यांनी केली असून या नाटकाला महाराष्ट्र शासनचा व्यावसायिक नाटकासाठी सर्वोत्कृष्ट निर्मितीचा पुरस्कारही मिळाला आहे. तर भरत जाधव यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कार प्राप्त झाला आहे. या नाटकाचे आतापर्यंत ५८ प्रयोग झाले आहेत. तर मोरूची मावशी या नाटकाने आतापर्यंत ८६२ प्रयोगांचा पल्ला गाठला आहे. त्यामुळे हा ट्रिपल धमाका प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे.

याबद्दल भरत जाधव म्हणतात, ” प्रेक्षकांना काहीतरी नवीन देण्याचा माझा प्रयत्न असतो. यावेळी १५ ऑगस्ट रोजी मी तीन वेगवेगळ्या धाटणीची नाटके नाट्यप्रेमींसाठी घेऊन आलो आहे. या नाटकांवर आणि माझ्या भूमिकांवर रसिकांनी भरभरून प्रेम केले आहे. त्यामुळेच ही ऊर्जा मला मिळू शकते. ही तीनही  नाटके प्रेक्षकांसमोर घेऊन येताना मला प्रचंड आनंद होतोय. मला खात्री आहे, प्रेक्षक या तिन्ही नाटकांना प्रतिसाद देतील.”

हार्दिक जोशी झळकतोय ‘या’ चित्रपटात !

* नम्रता पवार

सध्या जोरदार चर्चेत असलेला, आगरी-कोळी भाषेचा जलवा दाखवणारा, ॲक्शनपट ‘बाबू’ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. अंकित मोहनच्या अभिनयाचे कौतुक होत असतानाच आता या चित्रपटातील एक सरप्राईस एलिमेंट समोर आला आहे. या चित्रपटात रांगड्या व्यक्तिमत्वाचा हार्दिक जोशी एका महत्वपूर्ण भूमिकेत दिसत असून दाक्षिणात्य व्यक्तिरेखा साकारणारा हार्दिक या चित्रपटात प्रथमच नकारात्मक भूमिकेत आहे.

आपल्या या व्यक्तिरेखेबद्दल हार्दिक जोशी म्हणतो, ” वेगळ्या धाटणीची ही व्यक्तिरेखा असून प्रथमच मी नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. नेहमीच वेगवगळ्या भूमिका साकारण्याकडे माझा कल असतो. या भूमिकेबद्दल प्रेक्षकांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत. खूप छान वाटतेय, प्रेक्षक अशा भूमिकांमध्येही मला स्वीकारत आहेत, याचा विशेष आनंद आहे. सध्या माझ्या ‘बाबू’मधील व्यक्तिरेखेबाबत चित्रपटातही गोपनीयता आहे. मात्र हे रहस्य दुसऱ्या भागात उलगडणार असून ते जाणून घेण्यासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे. तर दिग्दर्शक मयूर शिंदे म्हणतात, ” हार्दिकचे व्यक्तिमत्व भारदस्त आहे. त्यामुळे या भूमिकेत तो चपखल बसतो. अतिशय उत्तमरित्या त्याने ही व्यक्तिरेखा साकारली आहे. ‘बाबू’मध्ये आणखीही बरीच रहस्ये आहेत. जी दुसऱ्या भागात समोर येतील.”

समर्थ कृपा प्रोडक्शन प्रस्तुत ‘बाबू’ या चित्रपटाची निर्मिती सुनीता बाबू भोईर यांनी केली आहे. तर या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा मयूर मधुकर शिंदे यांनी सांभाळली आहे. अंकित मोहन, नेहा महाजन, रुचिरा जाधव, स्मिता तांबे, संजय खापरे, श्रीकांत यादव यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.

‘तू भेटशी नव्याने’ मालिकेला प्रेक्षक पसंती

* सोमा घोष

वैविध्यपूर्ण आशय-विषय यामुळे काही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस अल्पावधीतच उतरतात. सध्या अशाच एका मालिकेची जोरदार चर्चा आहे, ही मालिका म्हणजे सोनी मराठी वाहिनीवरील ‘तू भेटशी नव्याने’. सोनी मराठी वाहिनीने आजवर अनेक चांगल्या मालिका प्रेक्षकांसाठी आणल्या आहेत. या मालिकांवर प्रेक्षकांनीही भरभरून प्रेम केलं आहे. मालिका विश्वात एक वेगळं पाऊल टाकत ‘तू भेटशी नव्याने’ मालिकेच्या माध्यमातून पहिली एआय मालिका प्रेक्षकांसाठी आणली आणि अल्पावधीतच या मालिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली. अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री शिवानी सोनार यांची फ्रेश जोडी आणि प्रेमाचा विषय आगळ्यावेगळ्या पद्धतीनं मांडल्यामुळे ही मालिका प्रेक्षक पसंतीस उतरली आहे.

‘उत्तम कथा’, ‘माही आणि अभिमन्यू यांचा संवाद लाजवाब’, ‘आम्हांला खूप आवडते ही मालिका’, ‘उत्तम अभिनयाने नटलेली ही मालिका पाहण्याची उत्कंठा दिवसेंदिवस वाढतेय’. ‘एआयचा उत्तम वापर असलेली सर्वोत्कृष्ट मालिका’ अशा अनेक चांगल्या प्रतिकिया प्रेक्षकांकडून येतायेत.

अगदी सुरुवातीपासूनच या मालिकेला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळालाय, याबद्दल सोनी मराठी वाहिनीचे बिझनेस हेड अजय भाळवणकर यांनी सांगितलं, ‘मालिकेला मिळणारं प्रेक्षकांचं प्रेम पाहून चांगलं काम करायला अजून उत्साह  मिळतो. पडद्यावरचे आणि पडद्यामागचे कलाकार, तंत्रज्ञ या सगळ्यांचीच खूप छान भट्टी जमून आली आहे.

‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेला उत्तम प्रतिसाद मिळत असून मालिकेतील सर्वच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. प्रिया मराठे आणि किशोरी आंबिये यांच्यामुळे मालिकेत सध्या रंजक वळण आलं आहे. त्यामुळे येत्या भागांमध्ये भरपूर नाट्य घडणार असून प्रेक्षकांचं मनोरंजन होणार आहे यात शंका नाही.

आयुष्यात पहिलं प्रेम कधीही विसरता येत नाही. त्या प्रेमाच्या आठवणी मनाच्या एका कोपऱ्यात कायम असतात. याच आठवणींचा हळवा बंध घेऊन माही आणि गौरी या दोघांची प्रेमकथा या मालिकेत दाखवण्यात आली आहे. प्रत्येकाला पुन्हा प्रेमात पाडणारी ही नवीकोरी गोष्ट दोन काळांतल्या वेगळ्या शैलीत दिसत आहे. मालिकेचे दिग्दर्शक आणि निर्माते अजय मयेकर आहेत. सहनिर्माते  संदीप जाधव आहेत.

सोनी मराठी वाहिनीवर सोमवार ते शुक्रवार रात्री ९.००वा. ही मालिका प्रसारित होते.

‘स्त्री 2′ मधील ‘आज की रात’ मधील तमन्ना भाटियाच्या जबरदस्त डान्स मूव्हचं प्रेक्षकांनी केलं कौतुक !

* सोमा घोष

पॅन-इंडिया स्टार तमन्ना भाटियाने आगामी हॉरर-कॉमेडी ‘स्त्री 2’ मधील ‘आज की रात’ गाण्यात तिच्या अभिनयाने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. रजनीकांत स्टारर ‘जेलर’ मधील ‘कावला’ आणि ‘अरनमानाई 4’ मधील ‘अचाचो’ यासारख्या हिट गाण्यांमध्ये तिच्या दमदार डान्स मूव्हसाठी ओळखली जाणारी तमन्ना आता ‘स्त्री 2′ मधून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. मधुबंती बागची आणि सचिन-जिगर या डायनॅमिक जोडीने संगीतबद्ध केले आहे. विजय गांगुली यांनी कोरिओग्राफ केलेले, तमन्नाच्या डान्सने प्रेक्षकांना मोहित केलं आहे. या गाण्याने सोशल मीडियावर आधीच धुमाकूळ घातला आहे. हे अनेक स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर देखील ट्रेंड करत आहे. हे गाणे यूट्यूबवर आल्यापासून चाहत्यांनी तमन्ना आणि तिच्या अभिनयाचे कौतुक केले आहे.

 

https://x.com/tgangeshwaran/status/1816110209074446404?s=46&t=oh8v5SeUB06-89–L_mXog

 

https://x.com/missb_fan/status/1816141848609710512?s=46&t=oh8v5SeUB06-89–L_mXog

 

“प्रत्येक वेळी तमन्ना बॉटल ग्रीन ड्रेसमध्ये येते तेव्हा तुम्हाला माहीत आहे की ती झगमगाट करणार आहे,” एक टिप्पणी वाचली, तर दुसरी टिप्पणी वाचली, “ती एका गाण्यासाठी चित्रपटात येते.. पण संपूर्ण चित्रपट चोरतो… Tammannah alwayz rockz.” एका युजरने लिहिले की, “ती फक्त तिच्या नितळ नृत्याने लाखो हृदयांचा नाश करणार आहे”.

तमन्ना फक्त तिच्या स्क्रीन प्रेझेन्सने कशी लक्ष वेधून घेते यावरही अनेकांनी कमेंट केली. वर्षानुवर्षे, अभिनेत्रीच्या पाऊलखुणा आकर्षित करण्याच्या क्षमतेमुळे ती चित्रपट निर्मात्यांसाठी एक आवडती निवड बनली आहे, ज्यांना वाटते की अभिनेत्री ही भाग्यवान आकर्षण आहे जी चित्रपटांना ब्लॉकबस्टरमध्ये बदलू शकते. ‘आज की रात’ च्या रिलीजने 15 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणाऱ्या स्त्री 2 च्या आसपासचा उत्साह वाढवला आहे. ‘स्त्री 2’ व्यतिरिक्त, तमन्नाच्या चाहत्यांना खूप उत्सुकता आहे. ती ‘ओडेला २’, ‘वेद’ आणि ओटीटी मालिका ‘डेअरिंग पार्टनर्स’मध्ये दिसणार आहे.

‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ या मालिकेत राजवीर आणि मयूरी यांचा लग्नसोहळा

* सोमा घोष

राजवीर आणि मयूरी यांचा लग्नसोहळा! ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ महाएपिसोड, रविवारी रात्री ८ वाजता सोनी मराठीवर.

सोनी मराठी वाहिनीवरील ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. यातील राजवीर तर अनेक तरुणींचा ‘ड्रीम बॉय’ बनलाय. पण या ‘ड्रीम बॉय’ची ‘ड्रीम गर्ल’ अर्थात मयूरी हे दोघं आपलं प्रेम एकमेकांकडे कधी व्यक्त करणार याबद्दल प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता होती. राजवीर आणि मयूरी यांच्यामध्ये आता प्रेमाची कबुली झाली आहे. प्रेमाच्या प्रवासाला आता सुरुवात झाली आहे. मालिकेत राजवीर आणि मयूरी यांच्या प्रेमाचा बहर प्रेक्षकांना पाहायला मिळतो आहे. मयूरी हीच बॉडीगार्ड असल्याचं राजवीरला समजलं आहे पण याबद्दल बाकी कोणालाही काही समजलेलं नाही. यामिनी या लग्नाच्या विरोधात आहे. राजवीर आणि मयूरी यांचं लग्न होऊ नये यासाठी तिने भरपूर प्रयत्न केले, पण आता राजवीर आणि मयूरी यांचे लग्न आता ठरलं आहे आणि आता यामिनीच्या हातातून परिस्थिती बाहेर गेली आहे. आजवर तिने राजवीरला मयूरीपासून लांब ठेवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले. पण आता मयूरी आणि राजवीर एकत्र येणार आहेत आणि त्यांचं लग्न थाटामाटात होणार आहे. सराफ कुटुंबातलं हे लग्न नक्कीच पाहण्यासारखं असणार आहे.

या लग्नात मेहंदी, हळद, संगीत आणि लग्नसोहळा असे सगळे कार्यक्रम पार पडणार आहेत. या सोहळ्यात काही विशेष व्यक्तिरेखा सहभागी होणार आहेत. ‘तू भेटशी नव्याने’ मालिकेतील शिवानी सोनार ही अभिनेत्री धमाल असे नृत्य करणार आहे. याव्यतिरिक्त मयूरी आणि राजवीर, मयूरी आणि संपूर्ण सराफ कुटुंब एकत्र नृत्य करणार आहेत. रविवार रात्री ८ वाजता महाएपिसोड मध्ये लग्नं प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून त्या आधीच्या सगळ्या भागात संगीत, हळद असे कार्यक्रम पाहायला मिळणार आहेत. आता हे लग्न व्यवस्थित पार पडेल का काही अडथळा येईल  हा मोठा प्रश्न असणार आहे. यामिनी काही शांत बसणार नाही. हे लग्न होऊ नये यासाठी ती काही-ना-काही हालचाल नक्की करणार. यामिनीने चक्क मयूरीचे अपहरण करण्याचा बेत आखला आहे. मयूरी यातून  स्वतःला कशी वाचवणार? शिवाय मयूरीला या लग्नात बॉडीगार्ड म्हणूनही वावरायचे आहे. ती हे सगळं कसं निभावून नेणार, हे पाहणं‌ उत्सुकतेचं ठरणार आहे. राजवीरला या सगळ्याची काही माहिती नाही. जर त्याला समजलं तर गोष्टी आणखी कठीण होऊन बसतील. लग्नानंतर राजवीर आणि मयूरी कशा प्रकारे आपला संसार करतील, हे  पाहणंही प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचं असेल.

‘अबोल प्रीतीची अजब काहाणी’ या मालिकेत हे सर्व प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार आहे, पण आता आत्याच्या येण्याने राजवीर-मयूरीच्या या प्रेमकहाणीत अजून काय ट्विस्ट येणार, हे पाहणं उत्सुकतेचं असेल. कारण आता लग्नसोहळा पार पडणार असून प्रेक्षक या लग्नासाठी फार उत्सुक आहेत.

पाहायला विसरू नका, ‘अबोल प्रीतीची अजब काहाणी’, लग्नसोहळा महाएपिसोड, रविवारी रात्री ८ वाजता सोनी मराठीवर.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें