* सोमा घोष

यंदाची दिवाळी मराठी अभिनेत्री ईशा संजयने दिवाळीपूर्वीच काही अशा प्रकारे साजरी केली...

दिवाळी हा प्रत्येकासाठीच आनंदाचा आणि प्रकाशाचा सण आहे. दिवाळीत दिवे लावणे, चांगले कपडे घालणे, आवडीचे पदार्थ बनवणे आणि सणाचा आनंद घेणे, हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वानाच आवडते. यात काही कलाकार असेही आहेत ज्यांना केवळ त्यांच्या कुटुंबासोबतच नव्हे तर त्यांच्या आजूबाजूच्या माणसांसोबतही दिवाळी साजरी करायला आवडते, कारण इतरांच्या चेहऱ्यावरील आनंद त्यांना आनंदित करतो. चला तर जाणून घेऊया, झी मराठीवरील 'लाखात एक आमचा दादा' या मालिकेत राजश्रीची भूमिका साकारणारी अभिनेत्री ईशा संजय यावेळी दिवाळी कशा प्रकारे साजरी करणार आहे, जी तिने चित्रिकरणावेळी सर्व टीमसोबत साजरी केली. सोबत काम करणाऱ्यांसोबत दिवाळी साजरी करण्याचा अनुभव तिच्यासाठी खूप वेगळा होता.

सुंदर अनुभव

 आपला अनुभव सांगताना ईशा म्हणते की, मी यावेळी सेटवर दिवाळी चांगल्या प्रकारे साजरी केली. चित्रिकरणावेळी दिवाळी साजरी करण्याचा एक फायदा म्हणजे दिवाळीपूर्वीच दिवाळी साजरी करता येते. ती ' प्री दिवाळी' म्हणजेच दिवाळीपूर्वीची दिवाळी असते. खरं तर, सेटवर रोज एकत्र काम करत असल्यामुळे, संपूर्ण टीम एक कुटुंब बनून जाते, कारण इथे त्यांच्यासोबत खूप वेळ घालवावा लागतो, त्यांच्यासोबत दिवाळीचा आनंद साजरा करणे, हा एक वेगळाच अनुभव होता. यावेळी मी माझ्या टीमच्या भावेश दादाला भेट म्हणून चॉकलेट दिले, कारण तो सेटवरील प्रॉपर्टीची खूप काळजी घेतो, तसेच, कधीही कोणतेही काम करण्यास नकार देत नाही, तो अतिशय नम्र आहे. मी फटाके फोडत नसले तरी यावेळी मी सेटवर फुलबाजी पेटवली होती.

 भेटीगाठींचा उत्सव

 आनंदाचा हा सण ईशा तिच्या कुटुंबासह आणि आजूबाजूच्या सर्वांसोबत साजरा करते. माझ्या घरी दिवाळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो, असे ती सांगते. मी वर्षभर या सणाची वाट पाहात असते. मला त्या दिवशी सर्वांना भेटायला आवडते.

 सजावटीत कमतरता नसते

 दिवाळीतील घराच्या सजावटीबद्दल ईशा सांगते की, माझी आई खूप चांगली रांगोळी काढते, कधी फुलांनी तर कधी विविध रंगांनी ती वेगवेगळ्या प्रकारची रांगोळी काढते, जी तिच्या मनावर अवलंबून असते. दरवर्षीची तिची संकल्पना वेगळी असते. मी देखील तिच्यासोबत रांगोळी काढण्याचा प्रयत्न करते, पण मला ती तितकीशी चांगली जमत नाही. म्हणूनच मी लाइटिंगकडे जास्त लक्ष देते, ज्यामध्ये लांबलचक स्ट्रिंग लाइट्स असतात, ज्या सतत चमकत राहातात. त्या मी बाल्कनीत लावते, याशिवाय मी मेणबत्त्या, दिवे, अशा सर्व प्रकारच्या दिव्यांनी घर सजवते, ते दिसायला खूप छान दिसते.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...