हिवाळा : फनी दिसण्याचा मोसम

* मोनिका गुप्ता

हिवाळा सुरू होताच महिलांच्या पोशाखात विशेष असा बदल येऊ लागतो. थंडीपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी महिला अनेक प्रकारचे उपाय करून पाहतात. काही तर या सीजनला फॅशन सीजनच समजतात. काही महिला असे काही कपडे परिधान करतात की त्यांना पाहून कडाक्याच्या थंडीतही आपल्याला घाम येऊ लागतो आणि हसू आवरता आवरत नाही.

तर मग या, काही महिलांनी परिधान केलेल्या काही अशाच खास पोशाख पद्धतींविषयी जाणून घेऊया, ज्या पाहून तुम्हालाही हसू आल्याशिवाय राहणार नाही.

प्रत्येक महिलेला सुंदर दिसावे असे वाटत असते आणि याची सर्वाधिक उदाहरणे थंडीच्या मोसमात पाहायला मिळतात. बदलत्या मोसमातसुद्धा यांना स्वत:ला इतरांहून वेगळे दाखवायचे असते. कधी कधी त्यांचा हा वेगळा लुक फनी लुक बनतो.

आता हेच पहा ना, आजच्या युवा मुलींच्या डोक्यावर कानटोपी, गळयात मफलर, लाँग जॅकेट, पण नजर जेव्हा त्यांच्या पायावरील पातळ चुडीदार किंवा सलवारवर जाते तेव्हा तुम्हाला घाम येणे निश्चित असते. तुम्ही हाच विचार करत राहता की अरे ही कोणती फॅशन आहे? डोक्याला थंडी वाजते, शरीर, हात सर्वाना थंडी वाजते, पण पायांना थंडी वाजत नाही.

अशा अनेक अंदाजात तुम्हाला महिलांचा अजब फनी लुक पाहायला मिळत असतो.

बारीक स्त्रीसुद्धा दिसू लागते जाडी

आता ज्या महिला अतिशय बारीक असतात, त्यांच्यासाठी तर फुग्यात हवा भरल्यासारखी परिस्थिती निर्माण होते. स्वेटरच्या ओझ्याखाली या बिचाऱ्या दबून जातात. स्वेटरवर स्वेटर, जे त्यांना जाड दाखवण्यासाठी पुरेसे असतात, पण कधी यांच्या गोलमटोल शरीरावरून नजर हटवून त्यांच्या चेहऱ्यावरही लक्ष द्या. अरे, शरीरावर तर स्वेटरचा थर चढवलात, पण चेहऱ्याचे काय. जरा विचार करा जेव्हा शरीर जाडजूड दिसतं आणि चेहरा मात्र बारीक तेव्हा ते किती फनी दिसत असेल.

ओळखणे कठीण आहे

काही महिला यादरम्यान स्वत:ला अशा काही झाकून घेतात की त्यांना ओळखणं मुश्किल होऊन बसते. इतकेच कशाला कुणी पती आपल्या पत्नीला, कुणी बॉयफ्रेंड आपल्या गर्लफ्रेंडला ओळखण्याआधी १० वेळा विचार करेल. जरा कुठे थंडी पडू लागली की या स्वत:ला अशा काही झाकून ठेवतात की जणू काही थंडीचा सर्वाधिक परिणाम यांच्यावरच होत आहे.

मफलर वुमन

थंडीचा मोसम येताच सोशल मिडियावर दिल्लीचे सीएम अरविंद केजरीवाल हे सर्वप्रथम निशाण्यावर असतात. कोणी त्यांना आले मफलर मॅन किंवा एक मफलर पुरुष अशा फनी टोपणनावांनी संबोधतात.

इतकेच नाही तर केजरीवाल यांची मफलर घालण्याची स्टाइल हल्ली फॅशन आयकॉन बनली आहे. काही महिला मोठया प्रमाणावर केजरीवाल मफलर परिधान करताना दिसून येतात. जर तुम्हाला वाटत असेल की केजरीवाल मफलर स्टाइल आहे तरी काय तर तुम्हाला आम्ही येथे सांगतो. खरंतर थंडीच्या मोसमात केजरीवालजी मफलर जरूर परिधान करतात. त्यांची मफलर घालण्याची स्टाइल फार वेगळी आहे. ते डोक्यापासून मानेपर्यंत मफलर गुंडाळून घेतात. हा केजरीवाल मफलर लुक इतका फेमस झाला आहे की सोशल मिडियावर याचे मिम्सही बनू लागले आहेत.

अनेक महिला आणि पुरुष या केजरीवाल मफलर अंदाजात दिसू लागले आहेत. ते स्वत:ला मफलरमध्ये असे काही गुरफटून टाकतात की जणू काही मफलर हटवला तर थंडी यांच्या मानगुटीवरच येऊन बसेल.

मोजे आणि चपलांची लढाई

थंडीपासून रक्षण करण्याचे आपण सर्व उपाय अजमावून पाहतो आणि हेच उपाय करताना आपण कधी कधी स्वत:लाच एक फनी लुक देत असतो.

आता तुम्ही कामावर जाणाऱ्या स्त्रियांकडेच पाहा ना. थंडीपासून बचाव करण्यासाठी स्वत:ला पूर्ण पॅक करून घेतात, पण कधी तुम्ही त्यांच्या पायांकडे पाहिले आहे का. विश्वास ठेवा तुम्ही आपले हसू रोखू शकणार नाही.

मोजे आणि चपलांची लढाई पाहायला फार मजा येते. आता या असे मोजे घालतात, ज्यामुळे यांची बोटे चपलांमध्ये सरकतच नाहीत. पूर्ण रस्ताभर ही लढाई सुरू असते आणि कधी कधी या लढाईत महिला पडता पडता स्वत:ला सांभाळताना दिसतात.

थंडीत नो मॅचिंग

थंडीसुद्धा कमालच करते. कधी तुम्हाला आळसाच्या रजईत स्वत:ला झाकून ठेवते तर कधी रंगबेरंगी कपडयात लपेटून टाकते.

थंडीपासून बचाव करण्याचे अनेक बहाणे शोधले जातात. ज्या महिला स्वत:ला नेहमी फॅशनेबल ठेवत होत्या, ज्या नेहमी प्रत्येक गोष्ट मॅचिंग करून घालत होत्या, तुम्ही पाहू शकता थंडी येताच हातमोजे वेगळया रंगाचे, जरा नीट लक्ष द्याल तर कळेल की मोजेही रंगीबेरंगी दिसतात. मग दिवसा थोडे गरम होऊ लागल्यावर जेव्हा या महिला आपला स्वेटर काढतात, तेव्हा तुमच्या लक्षात येते की यांची साडी वेगळी आणि ब्लाउज वेगळया कलरचा आहे. म्हणजे थंडी हा असा मोसम आहे जो काहीही करवून घेऊ शकतो.

मंकी कॅपची जादू

तुम्ही थंडीत पुरुषांना मंकी कॅप घालताना पहिले असेलच. पण जरा विचार करा, हीच मंकी कॅप जर महिलांनी परिधान केली तर ते कसे दिसेल. हा विचार करूनच हसू येऊ लागते की महिला आणि मंकी कॅप किती फनी लुक दिसेल जेव्हा महिला मंकी कॅपमध्ये दिसू लागतील.

बाहेर तर महिला मंकी कॅप घालत नाहीत, पण जेव्हा त्या घरी असतात तेव्हा थंडीपासून बचाव करण्यासाठी मंकी कॅपची जादूच कामी येते.

खरंतर मंकी कॅप डोक्यापासून मानेपर्यंत थंडीपासून संरक्षण देते आणि महिला जेव्हा घरात असतात, तेव्हा मंकी कॅप घालून थंडीपासून तर स्वत:चा बचाव करतातच, त्याचबरोबर क्युट आणि फनी लुकमध्येही दिसून येतात.

प्री वेडिंग शूट बनवा संस्मरणीय

* इंजी आशा शर्मा

आजकाल प्रत्येक कपलला आपले प्री वेडिंग शूट इतरांपेक्षा चांगले करायचे असते. त्यांची इच्छा असते की हा थाटमाट सोहळयाला आलेल्यांच्या आठवणीत कायमचा राहावा. लग्नानंतरही त्याचीच चर्चा व्हावी आणि फोटोग्राफरनेही त्यांचेच शूट उदाहरणादाखल इतरांना दाखवावे. चला, जाणून घेऊया की याला शानदार आणि संस्मरणीय कसे बनवायचे ते.

लग्नानंतर जवळीक वाढविण्यासाठी जसा हनीमून गरजेचा आहे, तसेच एकमेकांना चांगल्याप्रकारे समजून घेण्याच्या प्रक्रियेत प्री वेडिंग शूट उपयोगी ठरू शकते. कारण सोबत राहिल्यामुळे तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या बऱ्याच गोष्टी समजतात. त्याच्या सवयी लक्षात येतात.

यासोबतच सामान्यत: प्री वेडिंग शूट करणारा फोटोग्राफरच लग्नाचे शूटिंग करतो. साहजिकच त्या जोडप्याशी त्याचे चांगले टयूनिंग जुळते. त्यामुळे शूट करणे त्याच्यासाठी सहज सोपे होते. आणि याच सहजतेमुळे लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ शानदार आणि संस्मरणीय ठरतात.

कोठे कराल

प्री वेडिंग शूटसाठी सर्वप्रथम योग्य ठिकाणाची निवड करणे खूपच गरजेचे आहे. प्रत्येकाची स्वत:ची अशी आवड असते. कुणाला नदी, पर्वत आवडतात, तर कुणाला समुद्र किंवा किल्ले, महाल. काहींना थीम शूटिंग आवडते.

वरवधूने एकमेकांची आवड आणि सोय लक्षात घेऊन ठिकाण निवडले पाहिजे. देशात आणि देशाबाहेर अशी बरीच ठिकाणे आहेत, जी आजकाल प्री वेडिंग शूटसाठी तरुणांची पहिली पसंती आहेत. जसे महाल, किल्ल्यांसाठी राजस्थानातील जयपूर आणि उदयपूर, समुद्र किनाऱ्यांसाठी गोवा, केरळ आणि पाँडेचेरी व उद्याने, वनांसाठी नॅशनल पार्क इत्यादी.

आपल्या बजेटचा विचार करून तुम्ही आसपासच्या एखाद्या रमणीय ठिकाणाचीही निवड करू शकता.

अजून बरेच पर्याय आहेत

वेडिंग फोटोग्राफर नरेश गांधी सांगतात की छोटया शहरांतील तरुण-तरुणी जे डेस्टिनेशन शूट करू शकत नाहीत, त्यांच्यासाठी सेट्सचा एक नवा ट्रेंड आला आहे. होय, चित्रपट आणि मालिकांप्रमाणेच आजकाल प्री वेडिंग शूटसाठीही खास सेट बनवले जात आहेत. याचा फायदा असा होतो की तुम्हाला एकाच ठिकाणी सर्व लोकेशनचे बॅकग्राउंड मिळते. एकटयाने बाहेर जावे लागेल, हा संकोच दूर होतो आणि खिशावर बजेटचा भारही पडत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आउट डोअर शूटिंगवेळी कपडे बदलताना येणाऱ्या अडचणीतूनही सुटका होते.

शूट कसे असावे

स्टिल फोटोग्राफी आणि व्हिडिओ शूट बहुतांश कपल्सची इच्छा असते की एखाद्या चित्रपटाच्या जोडप्याप्रमाणे त्यांची गोष्टही सर्वांसमोर यावी. जसे की एखाद्या विशिष्ट ठिकाणी त्यांचे भेटणे किंवा फिल्मी स्टाईल एकमेकांना धडकणे. मग थोडे लटके, भांडण. त्यानंतर प्रपोज आणि होकार इत्यादी आणि हे सर्व केवळ व्हिडिओ शूटद्वारे शक्य आहे, पण हे प्रत्यक्ष त्याच लोकेशनवर शूट करणे कठीणच नाही तर बजेटच्या बाहेरचेही होऊ शकते.

व्हिडिओ शूटसाठी तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कम्फर्टेबल असणे खूपच गरजेचे आहे, कारण एका व्हिडिओ शूटमध्ये १०-१५ सेकंदांपर्यंत कम्फर्टेबल राहावे लागते.

काय खास असावे

प्री वेडिंग शूटमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोघांमधील केमिस्ट्री. तुम्ही दोघे मेड फॉर इच अदर वाटायला हवात. यासाठी गरजेचे आहे की तुम्ही दोघांनी एकमेकांसोबत काही वेळ एकांतात घालवायला हवा. तुम्ही फोनवर गप्पा मारल्या असाल किंवा व्हिडिओ चॅटद्वारे एकमेकांची आवडनिवड समजून घेतली असेल, ते भाव तुमच्या देहबोलीतून जाणवायला हवेत.

अशा प्रकारच्या शूटमध्ये मित्रमैत्रिणींनाही सोबत घेता येईल. तुम्ही सर्व डान्स करत किंवा सहलीत मौजमजा करत असताना दिसलात तर ते क्षण निश्चितच अतिरिक्त ऊर्जेने भरलेले दिसतील.

पावसात भिजतानाच्या तुमच्या शूटमध्ये नॅचरल रोमान्स दिसेल. विविध प्रकारचे प्रॉप्स वापरुनही तुम्ही तुमच्या शूटला युनिक बनवू शकता.

थोडेसे रोमँटिक व्हा

नेहमीच्या आणि पारंपरिक शूटपेक्षा वेगळे असे काही व्हिडिओ जे थोडे रोमँटिक आणि सेक्सी असतील तर सोन्याहून पिवळे होईल. गरजेचे नाही की हे फोटो किंवा व्हिडिओ सर्वांसमोर पाहिले जावेत. यांना भविष्यातील त्या क्षणांसाठी सांभाळून ठेवता येईल, जेव्हा लग्नाच्या काही वर्षांनंतर आपसात मतभेद किंवा पती-पत्नीत वाद होतील. आपल्या फोटोग्राफरशी बोलून असे खासगी सेक्सी व्हिडिओ शूट करून घेता येईल.

कसे असावे गृहिणीच्या कामाचे नियोजन

* लीना खत्री

शीला एक गृहिणी आहे. तिची तक्रार ही आहे की ती कधीही फ्री नसते. तिची कामवाली बाई सकाळी ९ वाजता येते, पण ९ वाजेपर्यंत ना तिला डस्टिंग करून ठेवणे जमतं ना ओटा क्लीन करून भांडी घासण्यासाठी ठेवायला जमतं. यामुळे कामवालीसुद्धा वैतागून जाते. पण कामवाली फारच वेगात तिचे काम करून निघून जातेही. संपूर्ण दिवस घराच्या कामात व्यस्त असलेल्या शीलाला कळतच नाही की तिचा वेळ नक्की जातो तरी कुठे?

शीलासारख्या अशा अनेक गृहिणी असतील ज्यांना हीच समस्या सतावत असते. पण घरी राहून घरातली कामे उरकणे फार कठीण काम नाही. फक्त गरज आहे ती थोडयाशा वर्क मॅनेजमेंटची.

सोशल साइट्सवर बिझी राहू नका

जेव्हा शीलाने आपल्या पतिला ही गोष्ट सांगितली, तेव्हा तो तिला म्हणाला की सकाळीसकाळी तुझा बराच वेळ मोबाइलवर वाया जातो. शीलाला आपल्या पतिचे म्हणणे पटले. खरं तर, शीलाला सवय होती की सकाळी सकाळी सोशल साइट्सवर लाइक्स, कमेंट्स पाहत बसायचे आणि त्यांना रिप्लाय करण्यात ती इतकी रमून जायची की तिला वेळ काळाचे भानच उरायचे नाही. जेव्हा शीलाला आपली चूक कळली, तेव्हा तिने स्वत:मध्ये सुधारणा केली आणि सकाळऐवजी सर्व कामं पूर्ण झाल्यावरच ती सोशल मिडियावर अॅक्टिव्ह राहू लागली. आता तिची सर्व कामे वेळेत होऊ लागली आणि तिला पूर्ण दिवस फ्री मिळू लागला आहे.

टाइमटेबलने होईल काम

मीनलच्या घरी कामवाली नाहीए, पण तरीही तिची सर्व कामे दुपारी १२ च्या आत पूर्ण होतात. कारण तिने प्रत्येक कामासाठी वेळ राखून ठेवला आहे. किती वेळात कोणते काम करायचे हे ती आधीच ठरवून ठेवते. टाइमटेबलनुसार केलेले काम हे नेहमी वेळेत पूर्ण होते आणि संपूर्ण दिवस आपल्याला फ्री मिळून स्वत:साठी भरपूर वेळ देता येतो.

सकाळी लवकर उठा

बऱ्याच हाऊसवाइफना उशिरा उठण्याची सवय असते, नाहीतर मुले शाळेत गेल्यावर त्या आळसात पडून राहतात. यामुळे कधी कधी गाढ झोप लागते आणि मग खूप उशीर होतो. सकाळी कामे जर उशिरा सुरू झाली तर मग पुढचा संपूर्ण दिवस गोंधळ आणि तणावाचा जातो आणि मग स्वत:साठी वेळ असा मिळतच नाही. त्यामुळे लवकर उठायची सवय करून घ्या आणि एकदा उठल्यावर पुन्हा झोपला नाहीत तर मग तुमच्यापाशी वेळच वेळ असेल.

एक्स्ट्रा कामांसाठी वेगळा वेळ

दररोजच्या कामांव्यतिरिक्त काही अशीही कामे असतात, जी गृहिणींसाठी आव्हानात्मक असतात. बीनाला ही सवय आहे की ती लवकर उठून सर्व कामे आटपून घेते. मुले शाळेतून घरी येण्याआधी जो वेळ मिळतो त्यात ती एक्स्ट्रा कामे जसे वॉर्डरोबची साफसफाई, कपडयांना इस्त्री करणे, हिशोब तपासणे अशी कामे उरकून घेते. यामुळे अतिरिक्त प्रेशर न येता तिची कामे पूर्ण होतात. आणि तिचे घरही अस्ताव्यस्त दिसत नाही. मग कोणत्याही वेळी पाहुणे आले तरी तिचे घर एकदम अपटुडेट असते.

काम सोपवायला शिका

घर काही तुमच्या एकटीचेच नाही. सर्व कामे स्वत:वर ओढवून घेऊ नका. आपला पती आणि मुले यांच्यावर थोडी थोडी कामे सोपवा. जसे डस्टिंग किंवा बाहेरून काही सामान आणणे. सुट्टीच्या दिवशी हाउसवाइफवर अतिरिक्त कामाचे प्रेशर असते. अशावेळी जर सर्वांची मदत घेतली तर न थकता सर्व कामे वेळेत पूर्ण होतात आणि कुटुंबासोबत मनमुराद सुट्टीचा आनंदही घेता येतो.

खरेदीनंतर प्रश्चात्ताप करावा लागू नये

* पारुल भटनागर

आजचे युग डिजिटलचे आहे. कोरोनामुळे तर सध्या डिजिटल व्यवहारांनाच सुगीचे दिवस आले आहेत. आपल्याला काहीही करायचे असेल तर क्षणार्धात आपल्या कॉम्प्यूटर किंवा मोबाईलने काम होते. मार्केटला जायची गरज पडत नाही. जसे ऑनलाईन पेमेंट, शॉपिंग वगैरे. आपण घरी बसूनच आपल्या आवडीचे ड्रेस, अॅक्सेसरी व गॅजेटची चुटकीसरशी ऑर्डर करतो. जे सुविधाजनक आहेच पण वेळेचीही बचत होते. हे योग्यही आहे की जर या सर्व सुविधा आहेत तर त्यांचा पुरेपूर फायदाही का घेऊ नये? पण त्याचबरोबर हे जाणूण घेणेही आवश्यक आहे की जे प्रॉडक्ट आपण खरेदी करत आहात ते योग्य आहेत की नाहीत, ज्यामुळे नंतर पश्चाताप करावा लागू नये.

प्रॉडक्टविषयी माहिती आपण रेटिंग व कमेंट्सने घेऊ शकता.

काय आहे रेटिंग

रेटिंग भले ही खूप सिंपलशी स्टेप आहे, परंतु याचा प्रभाव खूप गहन होतो. हे वर्ड ऑफ माऊथ मार्केटिंगला प्रोत्साहित करते व पेमेंट पेड झालेल्या जाहिरातींच्या परिणामांत सुधारणा आणते. सगळयात महत्वाचे हे की ते खरेदीला प्रभावित करते.

कशी दिली जाते रेटिंग

आपण जेव्हाही काही ऑनलाईन खरेदी करता, तेव्हा खरेदीनंतर आपल्याला त्याला रेटिंग द्यायचा विकल्प दिला जातो. ज्यात त्या प्रॉडक्टविषयी आपला अनुभव सांगू शकता. रेटिंग १ ते ५ मध्ये दिली जाते. ज्याचा अर्थ हा आहे की जर आपण त्या प्रॉडक्टने असमाधानी असाल तर आपण एक स्टार द्या, चांगला वाटला तर दोन स्टार द्या, जर प्रॉडक्ट ठीक ठाक वाटला तर तीन स्टार द्या, उत्तम वाटला तर चार आणि सर्वोत्तम वाटला तर पाच स्टार देऊ शकता.

रेटिंग व कमेंट्सचा प्रभाव

जर आपण एखादा प्रॉडक्ट ऑनलाईन खरेदी करू इच्छिता, तेव्हा आपण सर्वप्रथम त्या प्रॉडक्टची रेटिंग व कमेंट्स वाचतो. त्यावरून आपल्याला कळतं की प्रॉडक्ट खरेदी करण्यास योग्य आहे की नाही. रेटिंग व कमेंट्स देण्यासाठी युजर्स स्तंभ असतात. ते आपल्या अनुभवाच्या आधारे त्यास निगेटिव्ह किंवा पॉजिटिव्ह कोणतेही रॅकिंग देऊ शकतात. ते कमेंट्स लिहूनही सांगू शकतात की त्यांना अमुक वस्तू पसंत आली नाही, यात ही उणीव आहे, यात हे फीचर्स अजून असायला हवे होते, किंमतीनुसार क्वॉलीटी काही योग्य नाही वगैरे. त्यांचे कमेंट्स इतर लोकांसाठी खूप सहाय्यक सिद्ध होतात.

पॉजिटिव्ह रेटिंग खरेदी करण्यास विवश करतात

आपण मोबाईल फोनच्या खरेदीविषयी विचार करत आहात आणि हाच विचार करून आपण शॉपिंग साईट्स खोलून बसला आहात. तेवढयात आपली दृष्टी अशा मोबाईल फोनवर जाते, जो लुकवाईज चांगला आहेच त्याचबरोबर युजर्सचे कमेंट्स व रेटिंग पाहूनही आपण त्याला खरेदी करण्यावाचून राहू शकत नाही.

‘या फोनची किंमत कमी असण्याबरोबरच याचे सर्व फीचर्सही महाग फोनसारखे आहेत आणि वेटमध्येही एवढा लाईट आहे की आपण कधी विचार पण केला नसेल. एवढया कमी किमतीत एवढे फीचर्स आपल्याला दुसऱ्या कोणत्याही फोनमध्ये मिळणार नाहीत,’ ‘एवढे फीचर्स आणि एवढया कमी किमतीत असा फोन मिळणे अवघड आहे,’ फोनचा लुक खूप चांगला आहे, ज्याला कॅरी करताना आपल्याला खूप चांगले फील होईल,’ या सर्व कमेंट्स आपल्याला लगेच फोन खरेदी करण्यास विवश करतील.

चुकीचे सामान येण्याचे चांसेज कमी

जेव्हा आपण मार्केटमधून एखादे सामान खरेदी करता, तेव्हा आपल्याला गॅरंटी नसते की ते प्रॉडक्ट योग्य आहे किंवा नाही. कारण तेथे फक्त आपण दुकानदाराचे म्हणणे ऐकून सामान खरेदी करता, ज्यात ओपिनियन कमी असते. परंतु जेव्हा आपण ऑनलाईन शॉपिंग करतो तेव्हा एका प्रॉडक्टवर कित्येक लोकांचे कमेंट्स आपल्याला खूप मदत करतात, ज्यामुळे चुकीच्या वस्तू येण्याचे चांसेज कमी असतात. कारण कमेंट्स करणाऱ्यांनी आधीच त्याला युज केलेले असते.

रेटिंग स्वत:मध्येच प्रॉडक्टचे प्रमोशन

जेथे कंपन्या आपल्या प्रॉडक्टला विकण्यासाठी वर्तमानपत्रे, टीव्ही, रेडिओ इत्यादींवर लाखो रुपये खर्चून जाहिराती देतात. जेणेकरून जास्तीत जास्त लोकांनी त्यांचे प्रॉडक्ट खरेदी करावेत, याउलट रेटिंग मात्र प्रॉडक्टविषयी एक इमेज बनवते, ज्यामुळे आपण एकतर प्रॉडक्ट खरेदी करता किंवा मग नाही.

मुलांच्या पुढे येताहेत मुली

* मोनिका गुप्ता

एक काळ होता जेव्हा मुली घरकामात आपल्या आईला मदत करण्यापुरत्या मर्यादित होत्या. घरातील स्वयंपाक-पाणी, पाहुण्यांचे आदरातिथ्य बस्स एवढेच त्यांचे जग होते. शिक्षण पूर्ण होण्याच्या आधीच त्यांना विवाहाच्या बेडीत बांधले जाई. परंतु बदलत्या काळाबरोबर मुलींविषयी ना केवळ आई-वडील तर समाजाचीही विचारसरणी बदलली आहे. आज बदलत्या काळाच्या स्पर्धेत मुली प्रत्येक क्षेत्रात मुलांपेक्षा पुढे जात आहेत.

सीबीएसई बोर्ड, यूपी बोर्ड, आयसीएसई बोर्ड या सगळयांमध्ये मुलींचा रिजल्ट मुलांपेक्षा चांगला लागतो.

समाजाच्या रूढीवादी विचारसरणीवर मात करत आज मुली आपल्या प्रगतीच्या आकाशात उड्डाण भरत आहेत आणि त्याचबरोबर आपले कर्तव्यही पूर्ण निष्टेने बजावत आहेत.

असे नाही की मुले आपले कर्तव्य पार पाडण्यात चुकत आहेत पण ज्याप्रकारे घरातील महिला वा मुली कुटुंब सांभाळण्याबरोबरच बाहेर समाजातही आपली एक ओळख बनवत आहेत, त्या तुलनेत मुले असे करत नाहीत. ते फक्त बाहेरच्या कामांपुरतेच मर्यादित राहतात.

विचारसरणी बदलण्याची गरज

जेव्हा एक मुलगी घरातील कामांबरोबरच बाहेरची कामे ही करते, तर मग घरातील मुले का करू शकत नाहीत? घरकामांमध्ये मुलांची आवड कमी दिसून येते. जर घरातील महिला स्वयंपाकाची कामे करते तर पुरुष घरातले पंखे स्वच्छ का करू शकत नाही. हे आवश्यक नाही की घरातील कामे म्हणजे स्वयंपाक घर सांभाळणे आहे. घरात स्वयंपाकाशिवायही बरीच कामे असतात, जी पुरुषांद्वारे सहजपणे केली जाऊ शकतात. जसे प्लंबरला किंवा इलेक्ट्रिशियनला बोलावणे वगैरे.

महिला आठवडयाचे सातही दिवस घर व बाहेर सांभाळते. अशावेळी घरातील पुरुषमंडळी या कामांसाठी आपला वेळ का नाही काढू शकत?

खरेतर आपल्या समाजात आधीपासूनच विभाजन करून ठेवले आहे. हे आधीपासूनच निश्चित असते की कोणते काम मुलगा करेल आणि कोणते काम मुलगी.

याच कारणाने मुलांची विचारसरणी हे मानते की हे काम फक्त महिलांचे आहे. पण आता ही मानसिकता प्रत्येक घराची नाहीए, कारण आपल्या समाजात बदल होत आहेत आणि बदलत्या समाजात काही कुटुंबे अशीही आहेत, जेथे प्रत्येक काम बरोबरीचे असते.

याविषयी दिल्ली युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसर संगीता कुमारीचे म्हणणे आहे, ‘‘व्यक्तिला लिंग-भेद करण्याआधी एक मनुष्य असण्याचे कर्तव्य निभवायला हवे. जर आपण अजून ही या स्वतंत्र देशात अशा रूढीवादी विचारसरणीला प्रोत्साहन देत राहिलो तर आपली मानसिकता, आपले विचार नेहमीच संकुचित राहणार.’’

ज्यामुळे भेदभाव होणार नाही

देश स्वतंत्र झाला. काळ बदलला. पण काही गोष्टींचे स्वतंत्र होणे अजून बाकी आहे. दिल्ली रहिवासी बिझनेस वुमन प्रीती सांगतात, ‘‘मला २ मुले आहेत आणि ते मला कधी मुलगी नसल्याची उणीव भासू देत नाहीत. घरातील कामांत माझी मदत करतात. माझी पूर्ण काळजी घेतात. आपल्या व्यस्त शेड्युलमुळे मीच त्यांना जास्त वेळ देऊ शकत नाही.’’

कोणाही मनुष्याला बाह्य दृष्टीने बदलणं खूप सोपं असतं, परंतु मानसिक रूपाने बदलणे खूप अवघड.

आजही अशी घरे आहेत, जेथे मुली नाही नाहीत आणि लोक तरसतात की किती बरे झाले असते जर त्यांना एक मुलगी असती तर. तसेच अशीही घरे आहेत की जेथे मुली नाहीत आणि ते या गोष्टीचा जणू उत्सव साजरा करतात. हे ते लोक आहेत, जे आपल्या समाजाला रूढीवादी विचारसरणीचा गुलाम बनवू पाहत आहेत.

सामाजिक कार्यकर्त्यांचे मानणे आहे की आपण लहानपणापासून आपल्या मुलांना रुल एंड रेग्यूलेशनचे धडे शिकवू लागतो. काही असे रुल्स, जे आमच्या मुलांना मर्द बनवतात. जर मुलगा रडला तर त्याला शिकवले जाते की रडणे मुलांचे नव्हे तर मुलींचे काम आहे. अशी शिकवण दिल्यामुळेच मुले असे आचरण करू लागतात आणि घरकामांमध्ये इंटरेस्ट घेत नाहीत. कारण त्यांना माहीत असते, जे काम आपल्यासाठी नाहीच आहे, ते का करायचे. जर आपण अशाप्रकारचे धडे शिकवणे बंद केले तर आपल्या समाजातील हा भेदभाव संपूर्ण जाण्यास वेळ लागणार नाही.

सौंदर्य समस्या

ब्यूटि एक्सपर्ट इशिका तनेजा द्वारा

मी माझ्या केसांच्या कलरसाठी पावसाळ्यात काय काळजी घेऊ?

जर केस पावसात भिजले असतील तर धुवून ताबडतोब केस कोरडे करा, कारण पावसाचे पाणी प्रदूषणयुक्त असते. ज्यामुळे कलर आणि केस दोन्ही खराब होऊ शकतात. केस धुण्यासाठी कलरसेव्ह शॅम्पू आणि कंडिशनरचा वापर करा. म्हणजे केसांचा कलर जास्त काळपर्यंत टिकू शकेल. केस धुतल्यानंतर त्यांना सीरम जरूर लावावे. असं केल्याने क्युटिकल्स बंद होतील, तसेच केस सॉफ्ट व सिल्कीसुद्धा होतील. तसेच सीरमच्या वापरामुळे कलरलासुद्धा चमक येईल. पावसाळ्यात हवेत आर्द्रता असल्याने केसांचे क्युटिकल्स उघडत असतात. त्यामुळे डॅमेज होण्याची शक्यता वाढते. केसांना डॅमेजपासून वाचवण्यासाठी एखाद्या कॉस्मेटिक क्लिनिकमधून कलर्ड हेअरस्पा करवून घेत जा. याबरोबरच स्टाइलिंग करत असताना केसांना अॅन्टीह्यूमिडिटी प्रॉडक्टचा वापर करावा. यामुळे केसांचे बाहेरच्या ओलाव्यापासून रक्षण होईल. ज्यामुळे कलर सुरक्षित राहिल. तसेच हेअरस्टाइलही जास्त वेळ टिकून राहिल.

माझे वय ३६ वर्षं आहे. माझ्या मानेवर सुरकुत्या दिसू लागल्या आहेत. गळ्याच्या व चेहऱ्याच्या रंगातही खूपच फरक दिसतो. कृपया काही उपाय सुचवा.

जर त्वचेला पोषण मिळाले नाही तर सुरकुत्या येऊ शकतात. यासाठी चेहऱ्याच्याबरोबरीनेच मानेलाही नरिशमेट द्या. रात्री झोपण्याआधी एएचए क्रिमने चेहऱ्याचा व मानेचा मसाज करावा. रोज सकाळी अंघोळीआधी व्हिटामिन ई तेलाचे काही थेंब आणि दोन चमचे ऑलिव्ह ऑईल मिसळून मानेवर लावावे. १५ ते २० मिनिटांनी थंड पाण्याने धुऊन घ्या. क्लिनिकल ट्रिटमेंटच्या रूपात लेजरच्या सिटिंग्ज व कोलोजन मास्कही लावू शकता. जेव्हा फेशिअल करून घ्याल तेव्हा मानेचा मसाजही करून घ्या. मानेचा रंग उजळावा म्हणून कच्च्या पपईची फोड मानेला चोळावी.

मी प्रायव्हेट जॉब करते. त्वचेची चमक वाढवण्यासाठी रोज बॉडी पॉलिशिंग करून घेऊ शकत नाही. असे काही उपाय सांगा, ज्यामुळे माझी त्वचा चमकदार दिसू शकेल.

पार्लरमध्ये जाऊन रोज कोणीच बॉडी पॉलिशिंग करून घेऊ शकत नाही. पण त्वचेचा चमकदारपणा टिकावा म्हणून तुम्ही घरीसुद्धा त्वचेची काळजी घेऊ शकता. यासाठी दिवसाआड बॉडी स्क्रब करू शकता. यासाठी चोकरमध्ये साय व चिमूटभर हळद घालून पूर्ण शरीरावर लावून नंतर हलक्या हाताने चोळून पाण्याने धुवून घ्या. याबरोबरच रोज अंघोळीपूर्वी पूर्ण शरीराला ऑलिव्ह ऑइलने मसाज करावा. याशिवाय दिवसातून १० ते १२ ग्लास पाणी जरूर प्यावे. तसेच प्रथिनयुक्त आहार घ्यावा.

मी २० वर्षांची आहे. मला खूप घाम येतो. ज्यामुळे दुर्गंधीही येते. त्यामुळे खूपच लाजिरवाणे वाटते. दिवसातून २-३ वेळा कपडे बदलावे लागतात. एखादे हर्बल लोशन किंवा काही उपाय सुचवा.

घामाच्या समस्येपासून वाचण्यासाठी होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेऊ शकता.    याशिवाय शरीरावर मुलतानी मातीचा पॅकही लावू शकता. असे केल्याने त्वचेची रंध्र होतील व घाम येणार नाही. रोज रात्री अंघोळीच्या पाण्यात लिंबाचे साल घालून ठेवावे. सकाळी त्या पाण्याने अंघोळ करावी. असे केल्याने पूर्ण दिवसभर ताजेतवाने वाटत राहिल.

मेकअप अॅप्लीकेशनसाठी योग्य पर्याय काय आह  बोट की ब्रश. यामुळे फिनिशिंगमध्ये काही फरक पडतो का?

बोट आणि ब्रश दोघांचीही आपापली अशी वेगळी कार्य आहेत. जेव्हा चेहऱ्यावर तुम्ही बोटाच्या सहाय्याने मेकअप करता, तेव्हा त्यातील हीटमुळे ते चेहऱ्यावर व्यवस्थित मर्ज होते आणि चेहऱ्याला फ्लालैस लुक मिळतो. तर ब्रशने चेहऱ्याच्या वेगवेगळ्या भागांना परफेक्शन दिले जाते. लिप ब्रशने ओठ, लाइनर ब्रशने डोळे, एअरब्रश इफेक्टने बेसला परफेक्ट ब्लेंड करून फ्लालैस लुक दिला जातो. बाहेर पडताना फक्त कॉटन किंवा शिफॉन फॅब्रिकचे फुलस्लिव्हज कपडे घालण्याचा प्रयत्न करा.

माझ्या हाताच्या नखांची मागील त्वचा निघत राहते ही माझी समस्या आहे. ज्यामुळे रक्त निघते व वेदनाही खूप होतात. बरे झाल्यानंतर तेथील त्वचा काळी पडते जे दिसायला खूपच वाईट दिसते. असे होऊ नये म्हणून उपाय सुचवा.

तुम्ही एखादी चांगल्या दर्जाची क्यूटिकल क्रिम किंवा ऑलिव्ह ऑईल कोमट करून आपली नखे व त्याच्या आसपास मसाज करावा. न्यूटिकल्स स्वत: काढू नयेत. एखाद्या पार्लरमध्ये जाऊन मेनीक्योर करून घ्यावे. तिथे तंज्ज्ञांकडून सोप्या पद्धतीने काढले जातील.

जीवन कौशल्य शिकणेही आहे आवश्यक

* शिखरचंद जैन

अन्विता चिडलेली होती. एक तर बाहेर मुसळधार पाऊस, वरून ३ तासांपासून लाइट गायब. आजूबाजूच्या सर्व घरांमध्ये लाइट होती, फक्त तिच्याच घरात नव्हती. एवढया पावसात कोणी इलेक्स्ट्रिशियन यायला तयार नव्हता. वरून ओले कपडे सुकवायची समस्या होती. ८ वर्षाच्या मुलाने घरात दोरी बांधून कपडे सुकविण्याचा सल्ला दिला. परंतु भिंतीमध्ये खिळा ठोकणे अन्विताच्या शक्तिबाहेरचे होते.

या दरम्यान चौथ्या मजल्यावर राहणारी तिची शेजारीण मनीषा तिच्या घरी आली. तिने अन्विताच्या घरी काळोख पाहिला, तेव्हा तिला संशय आला म्हणून फ्युज चेक केला. तिचा संशय खरा ठरला. फ्युज उडाला होता. मनीषाने लगेच तार लावून फ्यूज दुरूस्त केला. नंतर तिने फोन करून आपल्या मुलाकडून घरी ठेवलेला टूल बॉक्स मागवला आणि ड्रिल मशिनने होल करून पटकन दोन खिळे त्यात गाडून दोरी बांधून दिली, जेणेकरून अन्विता कपडे सुकवू शकेल. अशाप्रकारे तिने काही मिनिटांतच अन्विताची सारी समस्या दूर केली.

अन्विता मनीषाचे कौशल्य पाहून दंग होती. मनीषाने अन्विताला समजावले, ‘‘तुम्ही वर्किंग असा किंवा गृहिणी अशाप्रकारची कामं अवश्य शिकून घेतली पाहिजे. जीवनाला सोपे आणि उपयोगी बनवण्यात यांची मोठी भूमिका असते. यातील काही कौशल्य भलेही आपल्या रोजच्या जीवनात उपयोगी ना पडोत, परंतु जेव्हा यांची आवश्यकता भासते आणि ते तुम्ही शिकून घेतलेली नसतात, तेव्हा आपल्याला मोठया मुश्किलीचा सामना करावा लागतो.’’

अन्विताने मनीषाने सांगितलेल्या गोष्टींनी प्रभावित होऊन ठरवले की आता तीही छोटी-मोठी कामे अवश्य शिकेल.

प्रत्येक महिलेने ही कामे अवश्य शिकली पाहिजेत

छोटी-मोठी रिपेअरिंग

जर आपण असा विचार करत असाल की याचा संबंध अर्थशास्त्राशी आहे तर आपण चुकीचा विचार करत आहात. विदेशात एका स्वतंत्र विषयाप्रमाणे याला कॉलेजांत शिकवले जाते. याअंतर्गत, घरगुती गरजांशी संबंधित अनेक कौशल्यांचे व्यवहारिक प्रशिक्षण दिले जाते. परंतु आपल्या देशात आपण हे इतरांना करतांना किंवा वेगवेगळया क्षेत्रातील लोकांकडून शिकू शकता.

यात घरातील पेंटिंग, प्लंबिंग (नळाची फिटिंग), सुतारकाम, विद्युत काम, घराची देखभाल आणि दुरुस्ती यासंबंधित बऱ्याच लहानसहान गोष्टी आहेत, परंतु तुम्ही काही महत्त्वाच्या गोष्टी शिका. जसे की अचानक फ्युज उडाल्यावर पुन्हा वायर जोडणे, टॅप खराब झाल्यास प्लंबरच्या प्रतीक्षेत बसू नका, टॅप स्वत:च फिट करा, भिंतीला खुंटी लावण्यासाठी ड्रिल मशीनचा उपयोग करणे, सुतारकामाशी निगडित छोटी-मोठी कामे करणे इत्यादी. सांगण्याचा अर्थ असा की आपल्याला याविषयी ‘मास्टर ऑफ नन, जैक ऑफ ऑल’ (कोणत्याही विषयाचा तज्ज्ञ नाही, परंतु प्रत्येक गोष्टीबद्दल थोडी-फार माहिती आहे) बनावे लागेल. अशाने आपण आपले जीवन सुखद प्रकारे जगू शकता.

चालणारी गाडी थांबू नये

आजकाल घरोघरी आपल्याला कार किंवा दुचाकी वाहन बघावयास मिळेल. खासगी वाहने आता सुविधा नसून कार्यरत व्यक्तिची जबाबदारी आहे. किरकोळ समस्येमुळे वाहन अचानक थांबते तेव्हा समस्या उद्भवते आणि दूर-दूरपर्यंत कोणी दुरुस्ती करणाराही सापडत नाही.

बरेच लोक बाईक किंवा कार अवश्य चालवतात, परंतु आपली वाहने खूप गलिच्छ ठेवतात, कारण दररोज पेट्रोलपंप किंवा सर्व्हिस सेंटरवरून धुवून घेणे त्यांना शक्यही नाही आणि व्यावहारिकही नाही. अशा स्थितीत आपण वाहनाची नियमित स्वच्छतेची पद्धत, वाहनाच्या देखभाल संबंधित छोटया-मोठया गोष्टी शिकल्या पाहिजेत. जर आपण कार चालवत असाल तर तुम्ही कारचे टायर बदलणेही शिकणे महत्वाचे आहे. अन्यथा कारमध्ये पडलेली स्टेपनी तुम्हाला काही उपयोगाची राहणार नाही.

दुखापतीनंतर प्रथमोपचार

आजार आणि अपघात कधीही घडू शकतात. अशा परिस्थितीत रडारड आणि आरडाओरड करण्याऐवजी संयमाने काम करणे महत्वाचे आहे. अशा कठीण परिस्थितीत सर्वात महत्वाचे म्हणजे रुग्णाला किंवा अपघात झालेल्या व्यक्तिला प्रथमोपचार देणे आणि शक्य तितक्या लवकर त्याला रुग्णालयात दाखल करणे. यासाठी आपण नेहमी काही आवश्यक औषधे जसे की अँटिसेप्टिक, मलम, ब्रॅडेज, पेनकिलर, कापूस इत्यादी घरी ठेवावेत आणि प्रथमोपचाराचे प्रशिक्षणदेखील घेतले पाहिजे. याशिवाय स्ट्रोक, हार्ट अटॅक आणि उष्माघाताच्या वेळी कोणती खबरदारी घ्यावी आणि त्याचबरोबर रुग्णाला कोणते प्रथमोपचार द्यावेत हे देखील जाणून घ्या.

संकोच बनू नये अडथळा

हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, परंतु ही वस्तुस्थिती आहे की मोठया संख्येने महिला अजूनही अज्ञात व्यक्तिशी बोलण्यास अगदीच संकोच करतात. त्यांना भीती वाटते की जर त्या योग्यरित्या बोलल्या नाहीत तर त्यांचे काम खराब होईल.

मुलांच्या शाळेत प्रवेश घेताना, एखाद्या सरकारी कार्यालयात, नोटरी लोकांकडून पडताळणीसाठी, डॉक्टरकडे जाण्यासाठी किंवा तत्सम कामासाठी त्या एकतर पती, मुलगा किंवा दिराला सोबत घेतात किंवा त्यांनाच पाठवतात.

उघडे पुस्तक बनू नका

सायबर क्राइममधील वाढ लक्षात घेता हे आवश्यक आहे. टोटल मॉम टेक डॉट कॉमच्या लिझा गंबीनर सांगतात की जेव्हा आपण ऑनलाइन शॉपिंग करता, तेव्हा वेब पत्त्याच्या सुरूवातीला पहा. त्याचप्रमाणे, आपण आपले फेसबुक खाते सुरक्षित करणे देखील शिकले पाहिजे. येथे प्रोफाइल प्रतिमेचे संरक्षण करणे योग्य ठरेल. आपले वैयक्तिक फोटो फेसबुकवर धडाधडपणे अपलोड करणे थांबवा.

फेसबुक खाते नेहमी खाजगी सेटिंग्जवर ठेवा. असे असूनही, शिवाय या पोस्ट केवळ आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंतच पोहोचतील अशी सेंटिंग ठेवा, कारण आपण इंटरनेटवर जे काही टाकतो ते कोठेतरी शेयर केले जाऊ शकते.

एकटयाने प्रवास करणे

बऱ्याच स्त्रिया अजूनही एकटया दुसऱ्या शहरात जाण्याचे धाडस करू शकत नाहीत. हा एक प्रकारचा कमकुवतपणा आहे. गस्टी ट्रॅव्हलर डॉट कॉमच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बोंड सांगतात की तुम्ही एकदा एकटयाने प्रवास करण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. यासाठी कुणाचीही मदत किंवा सल्ले न घेता आपण संपूर्ण योजना स्वत: तयार करावी.

एकटयाने प्रवास केल्याने तुमचा आत्मविश्वास वाढतो, नियोजनाची सवय निर्माण होते, लोकांशी संवाद साधण्याची कला विकसित होते, विविध प्रकारचे अॅप्स वापरण्याची सवय लागते, नवीन लोकं आणि नवीन ठिकाणे प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मनाला शांती आणि आनंद मिळतो. होय, आपण अगदी थोडया अंतरावरच्या एखाद्या यात्रेने प्रारंभ करू शकता.

आपला फायनान्स नियंत्रित करा

आजच्या आर्थिक जगात सगळयात अर्थपूर्ण जर काही असेल तर ते आहे अर्थ अर्थात पैसे. आपले जर आपल्या फायनान्सवर नियंत्रण असेल तर आपणास प्रत्येकजण विचारेल.

तुमचा आत्मविश्वासही कायम राहील. आपणास नेहमी हे माहीत असले पाहिजे की आपले किती उत्पन्न आहे, आपण किती बचत करीत आहात, महिन्याचा सरासरी खर्च किती आहे, आपला आरोग्य विमा किंवा जीवन विमा किती आहे आणि त्यापासून आपल्याला कोणता फायदा मिळू शकेल? कोणता म्युच्युअल फंड चांगला आहे, मालमत्तेचे कोणते क्षेत्र चांगले आहे इ. आपण एका डायरी वा वहीमध्ये उत्पन्नाचा आणि खर्चाचा संपूर्ण हिशोब ठेवला पाहिजे.

बँकिंगमध्ये स्त्रियांची वाढती आवड

* किरण बाला

काही दशकांपूर्वी केवळ पुरुषवर्गच बँकेशी जोडलेला असायचा. मग ती व्यक्ती व्यावसायिक असो वा नोकरदार ती आपलं किंवा आपल्या फर्मचं खातं बँकेत उघडायची आणि स्वत:च बँकेचं व्यवहार करायची. स्त्रिया आणि विशेष करून ग्रामीण भागातील स्त्रियांची पोहोच बँकेपर्यंत नव्हतीच आणि त्यांना बँकेशी निगडित कुठल्या गोष्टींची माहितीही नव्हती. मात्र आज परिस्थिती पूर्ण बदलली आहे. मुली आणि स्त्रिया बँकेत केवळ आपलं खातंच उघडत नाहीएत तर त्यांनी बँकिंग पद्धतीला चांगल्याप्रकारे समजूनही घेतलं आहे. इतकंच नव्हे तर, मोठ्या प्रमाणात स्त्रिया बँकांमध्ये नोकऱ्याही करू लागल्या आहेत. स्पष्टच आहे की या सगळ्यामुळे स्त्रियांच्या आत्मविश्वासात आणि स्वावलंबनात वाढच झाली आहे.

पूर्वी पुरुष आपल्या नावाने बँकेत खातं उघडायचे. शिवाय आपल्या पत्नी वा मुलीच्या नावाने त्यांनी खातं उघडलं जरी तरी त्याचा व्यवहार मात्र तेच करायचे. स्त्रियांना बँकेत जायला संकोच आणि लाज वाटायची. मात्र गेल्या १० वर्षांत बँकांमध्ये बचत खाती उघडणाऱ्या स्त्रियांच्या संख्येत तीनपटीने वाढ झाली आहे.

देशातील १३ राज्यांमध्ये स्त्रियांशी निगडित ८ मुद्दयांच्या ११४ मानदंडांवर एक सर्वेक्षण झालं. ज्यामधील एक मुद्दा बँकेत बचत खात्याशी निगडितही आहे.

सर्वेक्षणानुसार २००५-०६च्या तुलनेत २०१५-१६मध्ये बँकेत बचत खातं उघडणाऱ्या १५ ते ४९ वर्षांच्या स्त्रियांच्या संख्येत प्रशंसनीय वाढ झाली आहे. या प्रकरणात ८२.८ टक्क्यांनी गोव्यातील स्त्रिया सर्वात पुढे आहेत. जर टक्केवारीबद्दल म्हणावं तर या हिशोबाने सर्वात जास्त ४०० टक्के वाढ ही मध्य प्रदेशात नोंदवली गेली आहे.

आज स्त्रियांची केवळ बँकांमध्येच खाती नव्हेत, तर त्या नेटबँकिंग किंवा ई बँकिंगही वापरत आहेत. अनेक खातेधारक स्त्रियांजवळ स्वत:चे एटीएम कार्डदेखील आहेत, ज्याद्वारे त्या हवं तेव्हा आपल्या गरजेनुसार पैसे काढून घेतात.

मुलींमध्ये बँकिंगच्या बाबतीत आवड त्या शाळाकॉलेजात शिकत असतानापासूनच निर्माण होते. वेगवेगळ्या सरकारी शिष्यवृत्या योजना किंवा इतर त्यांच्या हिताच्या योजनांची रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा होते किंवा त्यांना चेकद्वारे ते पोच केलं जातं. या दोन्ही अवस्थेत बँकेत खातं असणं फार गरजेचं   असतं. मोठ्या होऊन जेव्हा त्या एखादी नोकरी किंवा व्यवसाय सुरू करतात तेव्हादेखील त्यांना रोखऐवजी बँकांच्या माध्यमाने खात्यातच पैसे पोच केले जातात. यामुळेदेखील त्या आपलं खातं बँकांमध्ये उघडू लागल्या आहेत.

काही दशकांपूर्वी तर स्त्रियांना बँकांची स्लीपदेखील भरता येत नव्हती. मग पैसे वा चेक भरायचा असो किंवा पैसे काढायचे असो, त्यांना स्लीप भरण्यासाठी इतरांवर अवलंबून राहावं लागायचं. त्या आपला अंगठा लावायच्या किंवा जास्तीत जास्त सही करायच्या पण आता शिक्षणाच्या प्रसारामुळे आणि स्त्रियांमध्ये वाढत्या जागरूकपणामुळे त्या बँकिंग प्रक्रियेतही तरबेज झाल्या आहे. आता त्यांना कोणीच मूर्ख बनवू शकत नाहीत.

पूर्वी स्त्रिया आपले पैसे किंवा दागिने एकतर घराच्या तिजोरीत तरी ठेवायच्या किंवा आपल्या शेतात किंवा घरांमध्ये पुरून लपवून ठेवायच्या. पण आज त्या आपले पैसे बँकांमध्ये जमा करू लागल्या आहेत आणि दागिने बँकेच्या लॉकरमध्ये ठेवू लागल्या आहेत. त्यांना बँकेचं लॉकर वापरणंही चांगल्याप्रकारे येऊ लागलं आहे आणि आता त्या स्वतंत्रपणे एकट्याच बँक लॉकर हाताळू लागल्या आहेत.

बँकेतून कर्ज वा लोन काढण्याच्या प्रक्रियेपासूनही आजच्या स्त्रिया अजाण नाहीत. कारण त्यांना स्वयंरोजगार इत्यादीसाठीही पैसे हवे असतात. स्त्रिया आपल्या बचतीचे पैसे मुदत ठेव, आवर्ती ठेव इत्यादीमध्ये जमा करू लागल्या आहेत, ज्यामुळे त्यांना वेगवेगळ्या खात्यांना हाताळण्यासाठी सामोरे जावं लागत आहे.

आज कोणत्याही स्त्रीला बँकेची पायरी चढायला भीती वाटत नाही. त्या सहजपणे बँकेत प्रवेश करून आपला आर्थिक व्यवहार करू शकतात. बँकांमध्ये कार्य करणाऱ्या स्त्रीकर्मचारीदेखील पुरुषांपेक्षा उत्तम काम करतात. या सर्व गोष्टींवरून हेच स्पष्ट होतं की आजच्या स्त्रिया केवळ हुशारच नव्हे तर प्रबळही आहेत.

डाएट मॉम बनू नका

– शिखर चंद्र जैन

९ वर्षीय मितालीचा जोरजोराने रडण्याचा आवाज ऐकून वैशालीताईंना रहावलं नाही. त्या पटकन् आतल्या खोलीत गेल्या. पाहिलं तर त्यांची सून सुलेखा मितालीला मारत होती. वैशालीताईंनी विचारलं असता त्यांना समजलं की खूप दिवसांपासून मितालीला पास्ता खायचा होता. पण सुलेखा तिला रोज नाश्त्यामध्ये उपमा किंवा लापशीच देत होती. ज्यामुळे मिताली खूप कंटाळून गेली होती. जेवणातही सुलेखा तिला रोज एकच भाजी तिही दुधीभोपळा, कधी पालक बटाटा किंवा पडवळ व एक चपाती एवढंच देत असे.

सुलेखा हल्लीच तिच्या माहेरी जाऊन आली होती. तेव्हापासून तिने मितालीच्या डाएटमध्ये हे बदल केले होते. तिथे एका शेजारणीकडून तिला समजले होतं की मुलांना मोजूनमापून, ‘कॅलरीज’चा हिशोब ठेऊनच जेवण दिलं पाहिजे. तेव्हापासून सुलेखाच्या डोक्यात हे खूळ बसलं होतं.

वैशालीताईंना हे सगळे खूपच विचित्र वाटले, पण भांडणं नकोत म्हणून त्या गप्प बसल्या. महिनाभर हे असेच सुरू राहिले व अचानक एक दिवस मिताली बेशुद्ध झाली. तिला रूग्णालयात दाखल करावे लागले. मिताली खूपच अशक्त झाली होती. विचारले असता असे समजले की रोज एकसारखे जेवण जेवल्यामुळे मितालीला उलट्या होऊ लागल्या होत्या व अनेकदा आईच्या भीतिने ती लपून जेवण टाकून देत असे, म्हणून ती कुपोषणाचा बळी ठरली होती व तिच्यावर ही परिस्थिती ओढवली होती.

अनावश्यक डाएट कंट्रोल

सुलेखाप्रमाणेच हल्ली अनेक आयांची मानसिकता दिसून येते. आपल्या मुलांच्या तब्येतीसंदर्भात गरजेपेक्षा जास्त काळजीचा नव्या पिढीतील आयांचा हा पवित्रा पाहून डॉक्टर व डाएटीशियनदेखील हैराण आहेत. कोलकात्यामधील बेलव्हू रूग्णालयातील डाएटीशिअन संगीता मिस्रा सांगतात की आजकाल बॉडी कॉन्शस नवीन पिढीच्या आया आपल्या ६-७ वर्षांच्या मुलांनाही घेऊन येतात व त्यांना मुलांसाठी आहारातील कॅलरी फिक्स डाएट चार्ट हवा असतो.

आयांची ही नवीन पिढी मुलांच्या ओबॅसिटीच्या बातम्यांमुळे काळजीत आहे. या भानगडीमुळे त्या त्यांच्या छान सुदृढ व व्यवस्थित वजन असणाऱ्या मुलांचेही डाएट कंट्रोल करण्यात व्यस्त आहेत.

डॉक्टर संगीता मिश्रांकडे अशाही काही आया येतात ज्या त्यांच्या मुलांना न्याहारीसाठी फक्त एक उकडलेले अंडे किंवा २ इडल्या खाण्यास देतात व जेवणात कोरडी पोळी व उकडलेल्या भाज्या देण्याचा प्रयत्न करतात.

मानसिक दबाव

व्यावसायिक वर्गसुद्धा आयांच्या या भीतिचा फायदा पुरेपूर घेताना दिसत आहेत. फॅट फ्री फूड प्रॉडक्टस्ची बाजारात रेलचेल आहे. मुलांना सतत हे खाऊ नको ते पिऊ नको, असे बजावले जाते. हे जास्त कॅलरी असणारं खाणं आहे. यात खूप फॅट आहे, इथे जिवाणू आहेत, तिथे व्हायरस आहेत इ. हेल्थ एक्सपर्ट्स पण या स्थितीमुळे खूपच चिंतेत आहेत. त्यांचे असे म्हणणे आहे की मुलांची हल्लीची पिढी जेवणासारखी गोष्ट जी चवीने खायला हवी तीसुद्धा भीतभीत खात आहे. या जेवणाचे जे फायदे आरोग्याला व्हायला हवेत ते मिळतच नाहीत व मुले मानसिक दबावाखाली राहू लागली आहेत.

काही दिवसांपूर्वी अमेरिकन प्रसार माध्यमांमध्ये अशाच एका डाएट मॉमचे किस्से चर्चिले गेले. मॅनहॅटनच्या या सोशलाईट महिलेद्वारे लिन वीएने फॅशन मॅगझिनसाठी लिहिलेल्या लेखावरून कळते की ती तिच्या मुलीच्या जेवणावरही पहारा ठेवत असे.

अत्याचारापेक्षा कमी नाही

एक डाएटीशियन सांगतात की त्यांना हे पाहून खूप आश्चर्य वाटते की ज्या माता आपल्या मुलांना माझ्याकडे घेऊन येतात. त्या स्वत: जाड असतात. जोपर्यंत घरातील मोठे खाण्यापिण्यात काळजी घेणार नाहीत आणि मुलांचे आदर्श बनणार नाहीत, तोपर्यंत मुलांकडून तशी आशा करणे हे त्यांच्यावर अत्याचार केल्यासारखेच आहे.

योग्य हेच आहे की मुलांना त्यांच्या आवडीचे पदार्थ खाण्यासाठी पूर्ण मनाई करण्याऐवजी व जबरदस्ती त्यांच्या मनाविरूद्ध जेवण जेवू घालण्याऐवजी काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष दिले, तर मुल निरोगी व सुदृढ राहतील. यासंबंधी खालील उपयोगी बाबी जाणून घेणं गरजेचं आहे.

मायक्रोबायोटिक थेरपी

मायक्रोबायोटिक असे मानते की शरीर दर ७ वर्षांत स्वत:ला भरून काढते. म्हणून वाढत्या वयातील मुलांमध्ये सुरूवातीची २१ वर्षं खूप महत्त्वाची असतात. या दरम्यान मुलांनी पौष्टिक खाणं खावं यासाठी मुलांना प्रेरित करणं यात आईवडिलांची महत्त्वाची भूमिका असते. जी मुलं भाज्या, कडधान्य, सुकामेवा, सर्वप्रकारची धान्य, फळे नियमित खातात त्यांची रोगप्रतिकारक क्षमता खूपच उत्तम असते. यामुळे क्रोनिक डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम, सर्दीखोकला, अॅलर्जी, हृदय विकार, ऑस्टियोपोरोसिस सुरक्षित राहतात. यासाठी आईने मुलांसाठी रोज वेगवेगळ्या चवींचे व नाविन्यपूर्ण जेवण बनवले पाहिजे म्हणजे जेवणात त्यांना रस निर्माण होऊन गोडी लागते.

पूर्णत: बंद नको
मुले जर पिझ्झा, बर्गर किंवा इतर फास्टफूडसाठी हट्ट करत असतील तर पूर्णपणे त्या गोष्टी बंद करण्याऐवजी त्यांचा आवडता खाद्यपदार्थ त्यांना विकत घेऊन देऊन त्यातील चुकीच्या बाबी सांगाव्यात, बरोबरीनंच असे पदार्थ घरी बनवण्याचाप्रयत्न करावा. म्हणजे त्यात भाज्या, सुकेमेवे इ. घालून त्यांना पौष्टिक बनवता येईल.

मुलांना खाण्यासाठी बाजारातून काही पॅकबंद जेवणही आणावे. ज्यांचे वेष्टण अत्यंत आकर्षक असते व खाण्यासाठी उपयुक्त असते. जसे रेडी टू इट उपमा, इस्टंट ढोकळा, इडली मिक्स इ. मुलांना साखरेऐवजी इतर काही गोड पर्याय द्यावेत जसे की आंबा, खजूराचा गूळ, कलिंगड, द्राक्ष, डाळिंब इ.

शारीरिक हालचालींची सवय

स्थूलपणाचे मूळ कारण आहे मुलांची कमी प्रमाणात असलेली शारीरिक हालचाल. एक जबाबदार आई म्हणून तुम्ही मुलांना मैदानी खेळ खेळण्यासाठी प्रवृत्त व प्रोत्साहित केले पाहिजे. जसे क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन, कबड्डी, खो खो इ. त्याबरोबरच काही ना काही कारणाने दिवसातून एक-दोनवेळा लहान सहान वस्तू आणण्यासाठी बाजारात पाठवले पाहिजे. शाळा जवळ असेल तर चालत किंवा सायकलने येण्याजाण्याची सवय लावावी. अशाप्रकारे मुलांना जास्त ताणतणाव न देताही तुम्ही त्यांना सुदृढ व निरोगी ठेऊ शकता.

स्टायलिश दिसण्यासाठी स्मार्ट ट्रिक्स

– रितू वर्मा

मिना काहीशी त्रासून कपाट उघडून उभी होती. उत्सव पार्टीसाठी उद्या तिला मैत्रिणीच्या घरी जायचे होते पण काय घालावे हेच तिला समजत नव्हते. खूप भारी साडी तिला नेसायची नव्हती. थंडीचा मोसम होता. काय करावे तिला काहीच सुचत नव्हते. त्यातच रोहनने आगीत तेल ओतले की पूर्ण कपाट कपडयांनी भरले आहे, पण हा तर तुझा नेहमीचाच प्रॉब्लेम आहे.

रोहिणीचेही काहीसे असेच आहे. तिच्या कुटुंबात तर असे विनोदाने म्हटले जाते की तिचे सर्व कुटुंब रोहिणीच्या कपडयांवरच झोपते, कारण घरातील सर्व पलंगांच्या कप्प्यात तिचेच कपडे भरलेले आहेत.

सीमाला उत्सव पार्टीमध्ये हटके कपडे घालायचे होते. त्यासाठी तिने वनपीस निवडले, पण ते घातल्यानंतर ती सर्वांच्या थट्टेचा विषय ठरली. दुसरीकडे ऋतुने मात्र उत्सव पार्टीमध्ये आपल्या जुन्या बनारसी साडीचा स्वत:साठी एक सुंदर प्लाझा कुर्ता शिवला, यामुळे पूर्ण साडीचा नव्याने वापर झाला. शिवाय केवळ ड्रेसच्या शिलाईत नवीन पोशाख तयार झाला.

महिलांना कपडे खरेदीचे वेड असते. यामुळे त्यांच्याकडे भरपूर कपडे होतात. यातील ६० टक्के कपडे त्या कधीतरीच वापरतात. त्यामुळे कपडे खरेदी करताना दोनदा विचार का नाही केला याचे नंतर त्यांच्या मनाला वाईटही वाटते.

विचारपूर्वक करा खरेदी

अशा वेळी जर महिलांनी काही गोष्टींकडे लक्ष दिले तर त्यांची ही समस्या बऱ्याच अंशी कमी होऊ शकते :
* तुम्ही गृहिणी असाल किंवा नोकरदार महिला आणि जर तुम्हाला वेस्टर्न ड्रेस आवडत असतील तर एक निळी जीन्स, सफेद शर्ट आणि काळया टीशर्टला आपल्या वॉर्डरोबमध्ये जागा अवश्य द्या. जीन्स खरेदी करताना तुम्ही फॅशनऐवजी तुमचे वय आणि शरीराची ठेवण नक्की लक्षात ठेवा.
* तुम्हाला शर्ट किंवा टीशर्ट आवडत नसेल तर एक सफेद आणि एक काळया रंगाचा कुर्ता तुमच्याकडे असायलाच हवा. हे तुम्ही कुठल्याही छोटेखानी कार्यक्रमात बिनदिक्कत घालू शकता. हे दोन्ही रंग वापरताना तुम्हाला खूप विचार करावा लागत नाही आणि ९८ टक्के महिलांवर हे दोन्ही रंग खुलून दिसतात.
* जीन्सला पारंपरिक लुक द्यायचा असेल तर एक सुंदर स्टोल अवश्य घ्या. हे तुम्ही कुर्ता आणि स्कर्टसोबतही वापरू शकता.
* आपल्या कपाटात डझनभर स्वस्त स्टोल आणि दुपट्टे ठेवण्याऐवजी काही महागडे आणि कुठल्याही कार्यक्रमासाठी योग्य ठरतील असेच स्टोल आणि दुपट्टे खरेदी करा आणि मनसोक्त वापरा.
* वनपीस सर्वच महिलांना शोभून दिसेलच असे नाही. तुमचे पोट सपाट असेल तर कुठल्याही एका रंगाचे लांब वनपीस तुमच्या वॉर्डरोबमध्ये नक्की ठेवा. यासोबतच एक लाँग ड्रॅगलर्स तुम्हाला सेक्सी तसेच क्लासिक लुकही देईल. यात पोटाचा भाग जास्त दिसतोय असे वाटत असेल तर ते कधीच खरेदी करू नका कारण ते घातल्यानंतर तुमच्यासह सर्वांचे लक्ष तुमच्या पोटाकडेच जाईल.
* कधीतरी घालायला काय हरकत आहे असा विचार करून सेलच्या नादात कुठलाही ड्रेस खरेदी करू नका, कारण तुम्ही तो कधीच घालणार नाही आणि उगाचच तो तुमच्या कपाटातली जागा अडवून ठेवेल.
* आजकाल शॉर्ट्स आणि मिनी स्कर्टचीही चलती आहे. पण तुमच्या मांडया जास्त जाड असतील तर हे घालून इतरांसमोर स्वत:चे हसे करून घेऊ नका.
* कॉटनचा ड्रेस खरेदी करण्यापूर्वी आपले वय आणि शरीराची ठेवण लक्षात घ्या.

भारतीय ड्रेससंबंधी काही महत्त्वाच्या गोष्टी

* तुम्ही कुठल्याही वयोगटातील असलात तरी कुठल्याही रंगाची शिफॉनची प्लेन कोणत्याही रंगाची साडी अवश्य ठेवा जी तुम्ही उन्हाळयात कधीही नेसू शकता.

* आर्टिफिशिअल सिल्कऐवजी प्युअर सिल्कच्या साडीसाठी पैसे खर्च करण्यातच खरी हुशारी आहे, कारण ही सदाबहार असण्यासोबतच प्रत्येक महिलेला क्लासिक लुकही मिळवून देते.

* कांथा वर्क, मणिपुरी सिल्क, पोचमपल्ली, चंदेरी सिल्क, बनारसी सिल्क, मैसूर सिल्क, कांचीपूरम सिल्क, पैठणी सिल्क, जयपुरी चुनर, कलमकारी या साडया तुमच्याकडे नक्कीच असायला हव्यात. या सर्व नेहमीच गोड आठवणींसह तुमच्यासोबत राहतील.

* एक गोल्डन, एक सिल्वर, काळया आणि लाल रंगाचे ब्रोकेडचं कलमकारी प्रिंट आणि गुजराती काचांचे वर्क केलेला पंचरंगी ब्लाऊज अवश्य कपाटात ठेवा. तो तुम्ही कुठल्याही साडीवर घालू शकता.

* चला आता जाणून घेऊया सूटबाबत. आजकाल सलवार कमीजसह प्लाझा सूट, पाजामीकुर्ता, अनारकली, पेंट केलेल्या सूटचीही खूप क्रेझ आहे.

* प्लाझा घालायची इच्छा असेल तर त्यावर खूप खर्च करण्याऐवजी एक सफेद, एक काळा आणि एक तपकिरी रंगाचा प्लाझा खरेदी करा. जर तुमचा पार्श्वभाग वजनदार नसेल तर प्लाझा उन्हाळयासाठी चांगला पर्याय आहे. तो तुम्हाला फ्युजन लुक मिळवून देईल.

* १ किंवा २ प्लेन सिल्कचे पेंट सूट किंवा पाजामीकुर्ता आपल्या कलेक्शनमध्ये अवश्य ठेवा.

* अनारकली सूट सर्व प्रकारच्या शारीरिक ठेवणीवर चांगला दिसतो. काळा अनारकली सूट सर्वांनाच स्लिम लुक मिळवून देतो.

* दंड मांसल असतील तर स्लीव्हलेस ब्लाऊज किंवा कुर्ता घालणे टाळा, कारण यामुळे गरज नसतानाही दुसऱ्यांचे लक्ष तुमच्यावर केंद्रित होईल.

* कुर्ती आणि स्कर्ट जयपुरी दुपट्टयासह प्रत्येक छोटेखानी कार्यक्रमासाठी चांगला पर्याय आहे.

वापर करण्यासंबंधी माहिती

* जर तुम्ही एखादा डे्स वर्षभरापासून वापरत नसाल तर तो गरजवंताला द्या किंवा रिसायकल करून नव्याने त्याचा वापर करा.

* शक्यता आहे की एखादा डे्रसशी तुमच्या काही आठवणी जोडल्या गेल्या असतील, त्यामुळे तुम्ही तो कोणाला देऊ इच्छित नसाल तर त्याचे उशी किंवा ब्लँकेटसाठी कव्हर शिवा.

* एखादी साडी नेसून तुमचे मन तृप्त झाले असेल तर तुम्ही त्यापासून सुंदर पडदे बनवू शकता.

* जुन्या मजबूत कपडयांपासून पिशव्या बनवता येतील.

* जुने स्वेटर किंवा ऊबदार शालीला आपल्या कपाटात नाहक जागा अडवू देऊ नका तर ते एखाद्या गरजवंताला द्या. त्यामुळे तुमच्या कपाटाला अपार शांती मिळेल.

* जुन्या आकर्षक रंगांच्या मजबूत कपडयांचे रात्री अंगावर ओढण्याचे पांघरून बनवू शकता.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें