धार्मिक उपवास एक जीवघेणं कर्मकांड

* हरि विश्नोई

धर्माच्या नावावर आपल्या समाजात वर्षांनुवर्षं विविध प्रकारे कर्मकांड होत आली आहेत. उपवास हा त्याचाच एक भाग आहे. पुण्य कमवण्यासाठी, मोक्ष मिळवण्यासाठी, नवस करण्यासाठी किंवा अगदी दुसऱ्यांचं अनुकरण करून खाणंपिणं सोडून दिलं जातं. पण हे बरेच दिवस उपाशी राहणं जीवावर बेतू शकतं.

काही दिवसांपूर्वी हैदराबादमध्ये अशीच एक घटना घडली. आठवीत शिकणाऱ्या १३ वर्षीय आराधनाने सलग ६८ दिवस उपवास केला. यात ती संपूर्ण अन्नत्याग करून फक्त पाणी पित होती. यामुळे ती अशक्त बनली. पण तरीही तिला नववधूप्रमाणे सजवून-नटवून, रथात बसवून तिची मिरवणूक काढण्यात आली.

आराधनाचं व्रत पूर्ण झाल्यानंतर साजरा करण्यात आलेल्या सोहळ्याला बरीच गर्दी जमली होती. यात काही नेतेही उपस्थित होते. पण त्यानंतर दोन दिवसांनी त्या मुलीचा मृत्यू झाला. त्यानंतर तिच्या आईवडिलांविरूद्ध चुकीच्या उद्देशाने हत्या केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पण या प्रकरणाला धार्मिक रंग देऊन त्यावर पडदा टाकू पाहणाऱ्या भक्तांनी मृत मुलीला बालतपस्वी म्हणून जाहीर केले.

धर्म एक व्यसन आहे आणि आपल्या देशात अशा धर्मांध आईवडिलांची कमतरता नाही, जे साधूसंतांच्या आहारी जाऊन आपल्या निष्पाप मुलांना त्यांच्या हातात सोपवतात किंवा मांत्रिकांच्या बोलण्याला भुलून आपल्या नको त्या स्वार्थासाठी मुलांचा बळी देतात. वर्तमानपत्रांमध्ये रोज अशा बातम्या छापून येत असतात.

धर्मांधांची कमतरता नाही

डोळे झाकून उपासतापास केल्याने मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना नाही. याआधी बिजनौरमध्ये एक महिला देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी नवरात्रीचे नऊ दिवस उपाशी राहिली. या दिवसांमध्ये ती फक्त दोन लवंग पाण्यासोबत अख्ख्या गिळून खात असे,

एक दिवस तिच्या अन्ननलिकेत लवंग अडकली आणि तिथे जखम झाली. त्यानंतर ४ दिवसांनी तिचा मृत्यू झाला. ती महिला वयाने मोठी होती पण आराधना तर अल्पवयीन होती.

कमी वयाच्या मुलीला ६८ दिवस उपाशी राहण्याचा परिणाम माहीत नव्हता. तिच्या आयुष्यासाठी हा निबंध धोकादायक ठरेल याची तिला कल्पना नव्हती. अशावेळी उपाशी राहण्याचे परिणाम काय होतील हे तिच्या आईवडिलांनी तिला समजावणे हे त्यांचे कर्तव्य होते. त्यांनी तिला असं करण्यापासून रोखणं आवश्यक होतं. पण त्यांना आपल्या समाजात प्रतिष्ठा प्राप्त करून घ्यायची होती.

पुस्तकांतून मिळतंय प्रोत्साहन

धर्माच्या पुस्तकांत व्रतवैकल्यांचा महिमा सांगण्यात आला आहे. याला त्यागतपस्या म्हटलं गेलं आहे. योग दर्शन, जैनेंद्र सिद्धांत कोश, वसुनंदी श्रावकाचार, जैन दर्शन व्रत विधान, सर्वोदय जैन तंत्र, नैसर्गिक चिकित्सेने रोगमुक्ती आणि दैवी उपचार, इत्यादी अनेक पुस्तकांमध्ये उपवासामुळे पोट बरे होणे, तब्येत चांगली होणे, चेहऱ्यावर चमक येणे आणि विविध रोगांपासून मुक्ती असे फायदे सांगण्यात आले आहेत.

याशिवाय लोकांना धार्मिक उपवासांच्या पद्धती सांगून या चुकीच्या परंपरेला प्रोत्साहन देणारी कितीतरी पुस्तके तीर्थस्थळे, मंदिर, फूटपाथवर बेधडक विकली जातात. सत्यनारायण, संतोषी माता आणि वैभव लक्ष्मी इ. देवांच्या नावावर भक्तांच्या संख्येत वाढ होतच राहते.

निरर्थक गोष्टी

कधीतरी पोटाला आराम म्हणून किंवा आजारी पडल्यावर हलकं जेवण किंवा एकवेळ उपाशी राहाणं समजून घेण्यासारखं आहे. पण मोक्ष मिळवण्यासाठी महिनाभर सातत्याने उपाशी राहाणं म्हणजे आत्महत्या करण्यासारखं आहे.

पायी चालत तिर्थक्षेत्री जाणे किंवा लोळत लोळत मंदिरात जाणे, आपल्या शरीरावर चाबूक, चाकू, वगैरे मारून घेणे आणि उपाशी राहून कष्ट सोसणाऱ्यांचे गोडवे गायले जातात. त्यामुळे बरेचसे धर्मांध लोक जेवण-खाणं सोडून उपासतापास करत राहतात. काहीवेळा तर महिनोंमहिने उपाशी राहतात.

गुरू घंटाळ

धर्मगुरूंच्या मते उपवास हे महाकल्याणकारी, शास्त्रीय, पापनाशल, स्वर्ग आणि मोक्ष मिळवून देणारे तसेत मनातल्या इच्छा पूर्ण करणारे असतात. आपलं म्हणणं खरं ठरवण्यासाठी निरर्थक उदाहरणे देतात. माणसे अति खाल्ल्याने मरतात. भुकेने नाही असं त्यांचं म्हणणं असतं. लोकांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी उपवास करूनही जिवंत राहिलेल्या लोकांच्या काल्पनिक गोष्टी ऐकवत राहतात.

धर्मगुरू व्रतवैकल्यांना प्रोत्साहन देतात कारण अशाच गोष्टींमुळे त्यांचा धंदा चालतो. व्रतांमध्ये दान करण्याचा सल्ला दिला जातो. दानामध्ये मिळालेला सर्व माल ते स्वत:च हडप करतात. असे उपवास करणाऱ्यांची संख्या वाढली की त्यांना हवी तशी वातवरणनिर्मिती आपोआपच मिळते.

गावांमध्ये आणि शहरांतही बऱ्याच मुली लग्न वेळेत आणि चांगल्या घरामध्ये व्हावं म्हणून १६ सोमवार, संतोषी माता आणि बृहस्पती यांसाठी दिवसभर उपाशी राहतात, गरीब महिला श्रीमंत होण्यासाठी वैभव लक्ष्मी व्रत करतात. पुरुष रोजगार आणि नोकरीतील बढती यासाठी मंगळवारचा उपवास करतात.

कर्मकांड

पुरूष असोत वा महिला उपवासाच्या नावावर आजकाल सगळे दिखावाच करत असतात. उपवास फक्त नावाला असतो. पण त्या दिवशी एरव्हीपेक्षा जास्त फळे, वडे, तिखट मीठ घालून राजगिऱ्याच्या पुऱ्या, पराठे, लाडू, मिठाई इ. गोष्टी मनसोक्त हादडल्या जातात.

एकादशी, अमावस्या, पौर्णिमा आणि इतर सर्व सण मिळून वर्षांतल्या ३६५ दिवसांपैकी साधारण २५० दिवस उपवासांचे असतात. आठवड्याला, पंधरवड्याला किंवा दर महिन्याला धान्य आणि मीठ असलेलं अन्न सोडून उपवास करणं शक्य आहे. पण भक्ती जीवावर बेतू शकते.

उपाशी पोटाचे परिणाम काय असतात?

वेळेवर न जेवल्याने तब्येतीवर वाईट परिणाम होतो. आहारतज्ज्ञ ममता यांच्या म्हणण्यानुसार बराच काळ शरीराला इंधन न मिळाल्याने ताकद देणारे ग्लायकोजन तुटू लागतात. त्यामुळे थकवा आणि अशक्तपणा जाणवू लागतो. खूप वेळ उपाशी राहिल्याने रक्तातील ग्लुकोज घटू लागते. पेशी कमकुवत होतात. रोगप्रतिकारक क्षमता कमी होते. तसेच वजन कमी होते. असे सतत होत राहिल्याने मृत्यू ओढवू शकतो.

उपदेश

खरा दोष धर्मगुरू आणि धर्म प्रचारकांचा आहे. ते सतत सांगत असतात की उपवास केल्याने शरीर शुद्ध होतं. आत्म्याची ताकद वाढते, दु:ख नाहीसं होतं आणि सर्व इच्छा पूर्ण होतात. त्यामुळे भित्रे भक्त त्यांच्या बोलण्याला भुलतात.

सुखी राहण्यासाठी उपासतापासांच्या जंजाळातून बाहेर पडून अंधश्रद्धांपासून मुक्ती मिळवणं आणि विचारपूर्वक निर्णय घेणं आवश्यक आहे. याशिवाय हे समजून घेण्याची गरज आहे की इच्छा उपवास करून वा मरून नव्हे, बुद्धिच्या आणि मेहनतीच्या बळावर पूर्ण केल्या जातात. आयुष्यातल्या समस्या कर्मकांडाने नाही तर समजूतदारपणे सोडवल्या जातात.

डोळे द्ब्राकून केल्या जाणाऱ्या उपवासांचा फायदा भक्तांना कमी तर धर्मगुरूंनाच जास्त होतो. आजच्या विज्ञानयुगात अशाप्रकारची ढोंगं करून आपल्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न म्हणजे स्वत:ला फसवण्यासारखं आहे. उपवासाने कोणाचं भलं व्हायचं असतं तर एव्हाना ते झालंही असतं. त्यामुळे उपाशी राहण्याचा काहीच फायदा नसतो.

भेटवस्तू दिली की पुन्हा आठवण करू नये

* प्रियदर्शिनी

महान जर्मन तत्ववेत्ते आणि कवी फ्रेडरिक नित्शे म्हणतात, ‘‘ज्याने देण्याची कला शिकली असेल त्याने जीवन जगण्याची कलादेखील समजून घेतली आहे. देणे ही एक साधना आहे, जी आपल्या अंगी रुजवण्यासाठी शेकडो वर्ष व्यतीत होतात.’’

आपल्या कुटुंबात, मित्रांमध्ये, नातेवाईकांमध्ये देण्याचा हा क्रम सतत चालू राहतो, विशेषत: सण-उत्सवांमध्ये आणि लग्नाच्या समारंभात देण्याचा हा वेग अजून वाढतो. पण देण्याघेण्याच्या या वेगात, बऱ्याच वेळा आपले विचार, आपले मन स्वत:च एक अडथळा बनते. जेव्हा आपण एखाद्याला काहीतरी देतो, तेव्हा आपलं प्रेम आणि आपुलकी त्यात दडलेली असते, पण जेव्हा अधूनमधून समोरच्या व्यक्तिला आपण अशी आठवण करून देतो की मी तुम्हाला अमुक गोष्ट दिली होती, आठवते ना? तेव्हा तेच प्रेम आणि आपलेपणा गायब होऊन जातो.

अशा परिस्थितीत समोरचा माणूस स्वत:ला गरीब समजू लागतो आणि जेव्हा हा टोमणा जाहीरपणे सुनावला जातो तेव्हा ही निराशा आणखीच तीव्र होते.

नुकत्याच झालेल्या विवाहसोहळयाच्या कार्यक्रमात माझी सर्वात चांगली मैत्रीणही काही जुन्या मैत्रीणींसह भेटली. कमलेश आणि ज्योती एकेकाळी जिवलग मैत्रीणी होत्या. ज्योती अचानक बोलली, ‘‘अरे व्वा कमलेश, तू तोच नेकपीस घातला आहेस ना, जो मी तुला तुझ्या मागच्या जन्म दिनानिमित्त दिला होता?’’

भरल्या मैफलीत कमलेश काही बोलू शकली नाही, बस्स स्मितहास्य करत राहीली. पण तिच्या मनावर झालेली जखम ती विसरू शकली नाही.

आपल्या सभोवताली, कुटुंबात किंवा समाजात असे अनेक लोक आहेत, ज्यांना आपण दिलेल्या गोष्टीची चर्चा करण्यात कंटाळा येत नाही. बऱ्याच वेळा भेटवस्तूपेक्षा चर्चाच अतिरंजक असते. जेव्हा घेणारा एखाद्या दुसऱ्याच्या तोंडून अशा गोष्टी ऐकतो, तेव्हा त्याचा स्वाभिमान दुखवाला जातो.

अशी शिका देण्याची कला

* तुम्ही कितीही महागडी भेट दिली असली तरीही मनात हे दु:ख ठेवू नका की मी एवढी महागडी वस्तू का दिली.

* भेटवस्तू किंवा कोणतीही वस्तू देताना किंमतीचा टॅग काढलाच पाहिजे किंवा जर छापिल किंमत असेल तर त्यावर शाई किंवा पांढऱ्या कागदाने झाका.

* दिल्यानंतर अगदी चुकूनही कधीही आठवण करू नका किंवा एखाद्या पार्टीत किंवा मेळाव्यात अनावश्यक स्मरण करून देऊ नका.

* एकाच वेळेस एकसमान भेटवस्तू आपल्या कोणत्याही जवळच्या व्यक्तिंना देण्याची चूक करू नका. योगायोगाने ते एखाद्या कार्यक्रमात सेम आइटमसह दिसू शकतात, तेव्हा लज्जास्पद पेचप्रसंग येऊ शकतो.

* आपण कुणालाही काहीही देताना मनापासून द्या.

* चांगली पॅक केलेली भेटवस्तू बंद डब्यात देण्याचा प्रयत्न करा. यावरून आपली छाप पडेल.

* देणे आपल्याला आतून विशाल बनवते, म्हणून या परंपरेचे वाहक व्हा.

हे फार मोठे काम नाही

देण्याच्या कलेत स्वत: प्रभुत्व मिळवणे हे खूप मोठे काम वा जड काम नाही. थोडयाशा प्रयत्नातून आपण हे कौशल्य अधिक चांगल्याप्रकारे विकसित करू शकतो.

अखेरीस आपण अल्बर्ट आइनस्टाइन, ग्रॅहम बेल, क्रॉल्बस, जॉर्ज वॉशिंग्टन, वॉल्टडिज्णी, बिलगेट्स, एपीजे कलाम यासारख्या महान लोकांकडून आपण काहीतरी का शिकत नाही, ज्यांनी या जगाला आयुष्यभर काहीतरी देण्याचे काम केले, परंतु त्याचे नाव घेतले नाही.

देणे जर गुप्त असेल तरच यशस्वी होते. याचे प्रदर्शन आपल्याला संकुचित बनवते. देणे आपल्याला मोठे बनवते. महानता यात आहे की कोणालाही दिले जाण्याची जाणीव करून देऊ नका. जड आणि दु:खी मनाने न देता खुल्या व हलक्या मनाने देण्याची सवय लावा. सहर्ष देण्याचा कॉम्बो पॅक आपल्या प्रतिमेला आयुष्याहून मोठे बनवू शकतो.

अशाप्रकारे घ्या दागिन्यांची काळजी

* प्रतिनिधी

दागने कोणत्याही धातूचे असले तरी ते नियमितपणे वापरल्यास त्याच्यावर धूळ जमा होते. मग हळूहळू त्याची चमक कमी होत जाते.

अशावेळी दागिन्यांची विशेष देखभाल करणे गरजेचे असते, जेणेकरून त्यांची चमक तशीच नव्यासारखी राहील. तुम्ही त्या दागिन्यांची सुंदरता टिकवून ठेवण्यासाठी सराफाकडे घेऊन जाऊ शकता. ते दागिन्यांना केमिकलने स्वच्छ करतात. पण सातत्याने असे केल्यास दागिन्यांच्या वजनात घट होते.

सोने आणि प्लॅटिनमच्या दागिन्यांची विशेष काळजी घ्यावी लागत नाही. पण रोजच्या वापरातल्या किंवा सातत्याने वापरात येणाऱ्या दागिन्यांची स्वच्छता ठेवणे गरजेचे असते.

सुभाषिनी ऑर्नामेंटचे ज्वेलरी डिझायनर आकाश अग्रवाल यांनी दागिन्यांची चमक सदाबहार ठेवण्यासाठी काही सोप्प्या पद्धती सांगितलेल्या आहेत :

अशाप्रकारे घरीच दागिन्यांची सफाई करा

सोन्याचे दागिने : सोन्याचे दागिने स्वच्छ करण्यासाठी प्रथम त्यांना स्वच्छ कपडयाने पुसून घ्या. मग चिमुटभर हळद लावून मलमलच्या कपडयाने हलकेच रगडले की दागिने स्वच्छ होतील.

डिश सोपने स्वच्छता : एका वाटीत गरम पाणी घेऊन त्यात लिक्विड साबणाचे काही थेंब मिसळा. अधिक चांगला परिणाम पाहण्यासाठी सोडियम फ्री सॅल्टजर किंवा क्लब सोडयाचा वापर करू शकता. नाजुक आणि रत्नजडित दागिन्यांवर उकळत्या पाण्याचा वापर करू नये. सोन्याच्या दागिन्यांना साबणाच्या पाण्यात १५ मिनिटांसाठी भिजवत ठेवा. गरम साबणाचे पाणी दागिन्यांच्या कोपऱ्यात जाऊन तेथे अडकलेल्या धुलीकणांना सैल करतील मग सॉफ्ट टूथब्रशने ते साफ करून घ्या. बाजारात दागिन्यांची सफाई करण्यासाठी विशेष ब्रश उपलब्ध आहे.

चांदीचे दागिने : चांदीचे दागिने नेहमी डब्यात बंद करून ठेवा. हवा आणि दमटपणाने ते काळे पडू शकतात. नियमितपणे उपयोगात येणाऱ्या चांदीच्या दागिन्यांना थोडयाशा टूथपेस्टने हातानेच हळूवारपणे स्क्रब करा आणि काही वेळासाठी तसेच ठेवून द्या. मग सॉफ्ट टूथब्रशने हळूहळू साफ करा.

* एक वाटी गरम पाण्यात १ चमचा बेकिंग सोडा घालून ५ मिनिटे तसेच ठेवा. त्यात चांदीचे दागिने काही वेळासाठी बुडवा. मग त्यांना पाण्यातून काढा आणि मलमलच्या कपडयाने नीट पुसून घ्या.

* ब्लीच विरहीत डिटर्जंट पावडरनेदेखील चांदीचे दागिने साफ करता येतात. एका वाटीत पाणी घेऊन त्यात डिटर्जंटचा घोळ बनवून घ्या.

* बटाटे उकडलेले पाणी वापरून चांदीचे दागिने स्वच्छ केल्यास चमक येईल.

मोत्यांचे दागिने : सफेद चमकदार मोती प्रत्येकाचेच मन मोहून घेतात. पण त्यांची काळजी घेतली नाही तर त्यांची चमक हरवून जाते. मोत्यांवर कोटींग केलेली असते. त्यामुळे दमट वातावरणात ते कोटींग निघण्याची शक्यता अधिक असते.

* मोत्याचे दागिने खरेदी केल्यानंतर त्यावर लगेच रंगविरहीत नेलपेंटचा एक कोट लावून घ्या, जेणेकरून ते काळे पडणार नाहीत.

* मोत्यांचे दागिने कापसावर स्पिरीट लावून स्वच्छ करा म्हणजे ते चमकदार दिसतील.

* जर मोती अस्वच्छ दिसत असतील तर मलमलचा कपडा पाण्याने ओला करूम हळूहळू स्वच्छ करा.

* मोत्याच्या दागिन्यांना शार्प दागिन्यांसह ठेवू नका. नाहीतर त्यावर स्क्रॅचेस येऊ शकतात.

* मोत्यांच्या हाराला वर्षातून एकदा सराफाकडून व्यवस्थित बांधून घ्या म्हणजे ते मजबूत राहतील.

प्लॅटीनमचे दागिने : प्लॅटीनमला सोने म्हणूनही संबोधले जाते. याप्रमाणे घ्या काळजी :

* प्लॅटीनमच्या दागिन्यांना अमोनियाने साफ करू नका.

* साबणाच्या पाण्यात जास्त वेळ ठेवू नका.

* प्लॅटीनमचे दागिने स्वच्छ करण्यासाठी साबणाचा फेस बनवून छोटया ब्रशने हलक्या हातांनी साफ करा, मग ते धुवून सुकवा.

सेक्सलाइफ रिचार्ज करणे आहे गरजेचं

* अंजू जैन

माहेरी आलेली नणंद अभिलाषाचा उतरलेला चेहरा पाहून वहिणीने विचारले, ‘‘पवनसोबत काही वाद झाला आहे का?’’ अभिलाषा काहीच बोलली नाही. पण अनुभवी वहिणीने अधिक आपुलकीने विचारताच तिचे डोळे पाणावले. अभिलाषा स्वत:ला रोखू शकली नाही. मग अभिलाषाने तेच सांगितले ज्याचा संशय वहिणीला आला होता. अभिलाषा म्हणाली, ‘‘लग्नाला केवळ २ वर्षेच झाली आहेत… पवनला माझ्यात काहीही इंटरेस्ट उरलेला नाही… इच्छा झालीच तर एखाद्या यंत्राप्रमाणे तो सर्व करुन झोपून जातो… रोमान्स नाही की मजामस्ती नाही.’’

पत्नींची एक सर्वसामान्य तक्रार अशी असते की, लग्नानंतर २-३ वर्षे पती त्यांच्या मागूनपुढून फिरत असतात, पण नंतर इंटरेस्ट घेणे बंद करतात. अशा परिस्थितीत पत्नींना आपण उपेक्षित असल्यासारखे वाटू लागते.

वेगवेगळया तक्रारी

शेकडो जोडप्यांच्या केलेल्या अभ्यासानुसार, पत्नीने केलेल्या या तक्रारीचीही पुष्टी झाली. या अभ्यासानुसार हनीमून फेज जो ३ वर्षे ६ महिन्यांचा असतो, तो संपल्यानंतर पती-पत्नी दोघेही एकमेकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सोडून देतात. दोघेही सुंदर दिसणे, एकमेकांची काळजी घेणे यासाठीचे अतिरिक्त प्रयत्न करणे सोडून देतात. प्रेम ही एक नॉर्मल गोष्ट आहे असे त्यांना वाटू लागते. एकीकडे बायका तक्रार करतात की पती पूर्वीसारखे त्यांच्यावर प्रेम करत नाहीत आणि त्यांच्याशी लैंगिक संबंधात जास्त रस घेत नाहीत, तर दुसरीकडे पतीही अशीच काहीशी तक्रार करतात.

अभिलाषासारख्या पत्नींना हे समजून घ्यावे लागेल की, पतीनेच नेहमीच पत्नीमध्ये इंटरेस्ट का दाखवायचा? पतीनेच लैंगिक संबंधासाठी आर्जव किंवा पुढाकार का घ्यावा? यासाठी पत्नीने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा पतीने का करू नये?

जर तुम्ही तुमच्या लैंगिक संबंधात पहिल्या इतकीच ऊर्जा टिकवून ठेवू इच्छित असाल तर या टीप्स नक्की जाणून घ्या :

स्वत:चेच लाड करा : तुम्ही यापूर्वी तुमच्या भुवया, नखे, ओठ, अंडरआर्म्स, पाठ, त्वचा, केस आणि चेहऱ्याची किती काळजी घेत होता, हे आठवते का? दररोज सकाळी ड्रेस घालण्यापूर्वी कोणता ड्रेस घालावा, याची निवड करायला तुम्ही कितीतरी वेळ घेत होता आणि आता लाल ब्लाऊजवर हिरव्या रंगाची साडी, ओठांची निघालेली सालपटे, अंडरआर्म्सचा घामाचा वास आणि बिकिनी एरियातील केस अशा अवस्थेत तुम्ही असता.

जरा विचार करा, कमरेवरची चरबी, सुटलेले पोट, या सर्वांमध्ये पतीचा दोष आहे का? नाही? मग उशीर कशाला करता? पेडिक्योर, मॅनिक्योर, स्पा, फेशियल, हे सर्व कधी उपयोगी पडणार? जिम, एक्सरसाईज करुन स्वत:ला पुन्हा फिट ठेवा. आनंदी रहा, हसत रहा, मग बघा काय कमाल होते ती.

अंतर्वस्त्रांचा मेकोव्हर गरजेचा : सेक्स लाईफमध्ये कंटाळा येण्याचे सर्वात मोठे कारण असते ते आकर्षणाचा अभाव. अनेक महिला लग्नाच्या २-४ वर्षांनंतर अंतर्वस्त्र घालणेही थांबवतात. काही ते घालत असले तरी रंग उडालेले, फाटलेले, घाणेरडे झालेले अंतर्वस्त्र पाहून मळमळायला होते.

अशा बायकांना वाटत असते की, अंतर्वस्त्रांकडे कोण बघणार? त्या हे का विसरतात की, ज्याला ते दाखवायचे आहे त्यालाच तर इम्प्रेस करायचे आहे. रोमांसमध्ये चिंब भिजलेला नवरा जेव्हा तुमच्याकडे पाहून पुढे सरसावतो आणि अंतर्वस्त्रांची अशी अवस्था पाहतो तेव्हा विश्वास ठेवा त्याच्यातील अर्धा रोमांस गायब होतो. त्यामुळे थोडे पैसे खर्च करुन सेक्सी अंतर्वस्त्र घ्यायला काहीच हरकत नाही.

रोमान्सची संधी द्या : रोज तोच बेडरूम, तेच वातावरण… यामुळेही सेक्स कंटाळवाणे होऊ लागते. पतीसोबत वर्षातून १-२ वेळा फिरायला जा. नोकरी किंवा मुलांचे शिक्षण यामुळे बाहेर जाणे शक्य नसेल तर वीकेंडला शहरातच फिरायला जा. पार्कमध्ये जा. मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट पहा किंवा शॉपिंग मॉलमध्ये विंडो शॉपिंगसाठी जा आणि त्यावेळी थोडेसे फ्लर्टी व्हा. प्रेमाने गप्पा मारणे, रोमँटिक बोलणे यातून पतीला उत्तेजित करण्यासोबत तुम्हीही सेक्ससाठी तयार आहात, याची त्याला जाणीव करुन द्या. मग पहा की, पतीचा स्वत:वरचा ताबा सुटून तो तुमच्या मिठीत येण्यासाठी आतूर होईल.

गॅझेट्सचा वापर करा : आजकाल मोबाईल फोन किंवा टॅब खूप उपयोगाचे ठरत आहेत. कधीकधी याचाही फायदा घ्या. लपून पतीची एखादी विशिष्ट पोझ किंवा अस्ताव्यस्तपणे पलंगावर झोपल्यानंतरचा त्याचा फोटो काढा. त्याला तो रात्री दाखवा. नवरा घराबाहेर असल्यास, रोमँटिक एसएमएस किंवा व्हॉट्सअॅप पोस्ट पाठवा. यामुळे पती तुमच्यासोबत रोमांस करण्यासाठी व्याकूळ होईल. रोमांस म्हणजेच प्रणयाच्या क्षणांना जादुई स्पर्श देण्यासाठी, बेडरूममध्ये एखादे सेक्सी किंवा रोमँटिक गाणे हळू आवाजात लावा घाला आणि त्यानंतर एकमेकांमध्ये हरवून जा.

उत्कंठा प्रेमींना आकर्षित करणारं ठिकाण

* प्रतिनिधी

आपल्या सर्वांनाच रोजच्या दगदगीतून शांतता मिळावी म्हणून सुट्ट्यांची गरज असते. जिथे आपण शरीराला थोडा आराम देऊ शकू आणि पुन्हा रोजच्या कामासाठी दुप्पट उर्जेने परतू शकू. अशात जर तुमच्या मनाबरोबरच आत्म्याची शांतता ही हवी असेल तर जॉर्डनला नक्की जा.

आपल्यामध्ये बऱ्याच व्यक्ती अशा असतात, ज्या दुसऱ्यांना पोहताना पाहून खूप खूश होतात. त्यांनाही पाण्यात उतरावेसे वाटते. पण कुठल्याशा भीतिमुळे ते पाण्यात जाण्यास घाबरतात. पण आज अशा समुद्राची तुम्हाला ओळख करून देणार आहोत जिथे पोहता न येणारे लोकसुद्धा सहजपणे पोहू शकतात आणि असे करण्यासाठी त्यांना लाइफ जॅकेटचीही गरज नसते.

या समुद्राचे नाव डेड सी. डेडसी जॉर्डन आणि इस्त्रायल यांच्या मधोमध आहे. या समुद्राला सॉल्ट सी असेसुद्धा म्हटले जाते.

यामुळे म्हणतात डेड सी

याचे नाव डेड (मृत) सी पडले आहे, कारण येथील सर्व वस्तू मृत आहेत. इथे ना झाडं झुडुपं आहेत ना गवत. इतकेच नाही तर इथे कोणत्याच प्रकारचे मासेही नाहीत. यामागील कारण असे की येथील समुद्राचे पाणी सरासरीपेक्षा ८ पट जास्त क्षारयुक्त म्हणजे खारट आहे. म्हणून याला खाऱ्या पाण्याचा समुद्र किंवा सरोवर असेही म्हटले जाते. हा समुद्र जॉर्डनच्या पूर्वेला आहे, तर पश्चिमेला इस्त्रायलच्या सीमेजवळ आहे.

यात अनेक विषारी खनिज मीठ जसे मॅग्नीशियम क्लोराइड, कॅल्शियम क्लोराइड, पोटॅशियम क्लोराइड इ. भरपूर प्रमाणात आढळते. या सर्व क्षारांच्या अधिक प्रमाणामुळे इथे समुद्री झुडपे आणि समुद्री जीव राहण्यासाठी अनुकूल वातावरण नाही. या समुद्राचे पाणी ना पिण्यासाठी वापरले जाऊ शकते ना इतर कुठल्या कामासाठी. डेड सी ६७ कि.मी. लांब आणि १८ कि.मी. रूंद आहे. याची खोली ३७७ मीटर (साधारण १२३७ फूट) आहे. हे या विश्वातील सर्वात खोल खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे.

यामुळे कोणी बुडत नाही

पाण्यामध्ये मिठाचे प्रमाण अधिक असल्याने इथे कोणी बुडत नाही. याचमुळे लोकांना या समुद्रात पोहायला आवडते. इतर समुद्रांपेक्षा हा समुद्र खूप वेगळा आहे. या वैशिष्ट्यामुळे जगभरात हा समुद्र प्रसिद्ध आहे. दूरदुरून लोक इथे येतात आणि आनंद लुटतात.

इर्षा नेहमीच वाईट नसते

* पूनम पांडे

इर्षा किंवा द्वेष या भावनेकडे हल्ली मानसोपचारतज्ज्ञ व समाजसुद्धा एका नव्या दृष्टीने पाहू लागले आहेत. त्यांचा शोध असे सिद्ध करत आहे की जर कोणाची प्रगति पाहून तुम्हाला इर्षा वाटत असेल तर घाबरण्यापेक्षा याकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पहायला हवे. जर या इर्षेतून प्रेरणा घेऊन आपली स्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला तर परिस्थिती बदलू लागेल. याचा फायदा असा होईल की या इर्षेमुळे तुमचे नुकसान होण्याऐवजी तुम्हाला आनंदाचा मार्ग मिळेल.

दुसऱ्यांची प्रगति किंवा यश पाहून इर्षेने जर तुम्हीही चांगले प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला तर ही इर्षा तुमच्यासाठी सुखद ठरू शकते. हे भविष्यासाठी शुभ संकेत आहेत.

नवे प्रयोग करा

असं म्हणतात की भावनांना कुणी थोपवू शकत नाही, पण आपला दृष्टीकोन तर बदलता येऊ शकतो ना? सांगण्याचे तात्पर्य हेच की दृष्टीकोन जर सकारात्मक बाळगून स्वत:ला चांगल्या वातावरणासाठी तयार करत राहावे नाहीतर फक्त इर्षाच केल्याने मानसिक शांती हरवून जाईल. बरोबरच हृदय, यकृत, रक्तदाब इ. आजारही तुमच्या शरीराचा ताबा घेतील.

वेळेचे महत्त्वं ओळखून आपल्या इर्षेचा लाभ करून घेतला जाऊ शकतो. म्हणजे जगही नवनवे प्रयोग करून प्रगती साधत आहे, तर तुम्हीही करून पाहा. जर काळाप्रमाणे नाविन्य आणि ताजेपणा अपेक्षित असेल तर तुम्हीही असेच करण्याकडे लक्ष केंद्रित करा.

लक्ष्य ठरवा

मनात जर इर्षेची भावना जोर धरत असेल तर आपले लक्ष्य एखादे ध्येय गाठण्याकडे वळवा. याचा खूप फायदा होऊ शकेल. याबाबतीत आळशी व कामचोर लोक फक्त विचारच करत बसतील व वेळेला दोष देत राहतील. पण ध्येय गाठणारे लोक स्वत:चा तोल ढळू देत नाहीत. पटकन् आपल्यातील कमतरता ओळखतात व आपले ध्येय निश्चित करतात व इर्षा नावाच्या या रोगाला आपले औषध बनवतात.

मुल्यांकन करा

आपली स्पर्धा स्वत:शीच करणे हे अतिउत्तम असतं म्हणजे दरदिवशी मागील दिवसापेक्षा चांगले व उत्तम बना. यासाठी एक दिनदर्शिका तयार करणे खूपच उपयुक्त ठरते. स्वत:चं खरंखुरं मुल्यांकनही करता आलं पाहिजे. यात दिनदर्शिकेची खूप मदत होते. काळचक्र आणि प्रकृती आपल्यासाठी नेहमी चांगली व्यवस्था करून ठेवत असते. यावर अवश्य विचार करत राहिलं पाहिजे.

स्वत:शीच विचारविनिमय केला तर आपल्याला आपल्यातील उणिवा कळून येतील. आपल्यातील कमतरतेलाच आव्हान बनवून हिम्मत ठेवणे खरोखर एक उत्तम पर्याय आहे. अजिबात घाबरू नका. बस्स, नाराजी व तक्रारींमध्ये थोडीशी कपात करून शक्यता जागृत करा व जीवनाला सावरून घ्या.

स्वयंपाकघरातील प्रदूषण टाळणेदेखील महत्त्वाचे आहे

* पारुल भटनागर

भारतीय मसाले केवळ चवच वाढवत नाहीत तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहेत. परंतु जिथे ते अन्नाची चव वाढवतात तिथे तेल-मसाल्याने समृद्ध अन्न शिजवताना स्वयंपाकघरात खूप धूरही होतो, जो आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे सिद्ध होते.

महिलांचा बराच वेळ स्वयंपाकघरात व्यतीत होतो. अशा परिस्थितीत त्यांच्या आरोग्यासाठी असे एखादे साधन, जे स्वयंपाकघरातील धूर क्षणार्धात बाहेर काढून टाकते आणि स्वयंपाकघर प्रदूषणमुक्त करते, तर ते म्हणजे चिमणी आहे.

पूर्वी भारतीय घरे मोठी होती आणि स्वयंपाकघर सामान्यत: उघडयावर बनविले जात असे जेणेकरून घरात स्वयंपाकघराच्या धुराचा प्रसार होऊ नये, परंतु लोकसंख्या वाढत असल्याने कुटुंबं फ्लॅटमध्ये संकोचित होत आहेत, ज्यामध्ये हवा आणि प्रकाशाची कमतरता असते आणि लोक आरोग्याशी संबंधित समस्यांचे बळी ठरतात. हे टाळण्यासाठी चांगल्या वायुवीजनासह, विद्युत उपकरणे योग्य प्रकारे साफ करणेदेखील आवश्यक आहे जेणेकरून घराच्या आत प्रदूषण होणार नाही.

स्वयंपाकघरात प्रदूषणाची कारणे

आता स्वयंपाकघर फक्त गॅसपुरते मर्यादित राहिलेले नाही. आता जुन्या स्वयंपाकघराचे रूपांतर मॉडयूलर किचनमध्ये केले जात आहे, ज्यामध्ये टोस्टर, मायक्रोवेव्ह ओव्हन आणि इतर बऱ्याच गोष्टी ठेवल्या जात आहेत. परंतु या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमुळे जसा वेळ वाचतो, तसंच ते प्रदूषणदेखील पसरवतात, जे बाह्य प्रदूषणापेक्षा बरेच अधिक धोकादायक आहे. चला, याविषयी जाणून घेऊया :

टोस्टर : सर्व इलेक्ट्रिक बर्नर वाफेने-निर्मित धूळीपासून सूक्ष्मकण तयार करतात, जे प्रदूषणास जबाबदार आहेत. जेव्हा आपण बराच काळ टोस्टर वापरत नाही आणि पुन्हा जेव्हा आपण वापर करतो तेव्हा त्यात साचलेली घाण वाफेच्या रूपात सूक्ष्मकणांमध्ये बदलते आणि प्रदूषणास कारणीभूत ठरते, ज्यामुळे आरोग्याशी निगडित समस्यांना सामोरे जावे लागते.

मायक्रोवेव्ह : इंग्लंडच्या मॅनचेस्टर विद्यापीठातील संशोधकांच्या म्हणण्यानुसार मायक्रोवेव्ह ओव्हन कार्बन डायऑक्साईडचे अत्यधिक प्रमाणात उत्सर्जन करतात, जे कारपेक्षा अधिक धोकादायक प्रदूषण पसरवण्याचे काम करते.

रोटी मेकर : जरी रोटी मेकर त्वरित गरमागरम रोटया तयार करत असेल परंतु तो ही आपल्या घरास प्रदूषित करत आहे हे आपणास ठाऊक आहे काय? जर आपल्या घरात यापासून निघणारा धूर बाहेर काढण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसेल तर याचा वापर काळजीपूर्वक करा.

ही समस्या कशी सोडवावी

* स्वयंपाकघरातून धूर आणि घाण काढून टाकण्यासाठी घरात योग्य वायुवीजन असण्याबरोबरच चिमणीचीही व्यवस्था करावी जेणेकरून घरात प्रदूषण होणार नाही.

* चिमणीवर साचलेली घाण काढून टाकण्यासाठी, थोडया-थोडया दिवसांनंतर फिल्टर आणि त्याचे फ्रेम स्वच्छ करा.

* जेव्हा-जेव्हा आपण टोस्टर, मायक्रोवेव्ह नंतर कॉफी किंवा चहा मेकर वापरता तेव्हा त्याच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्या, कारण जेव्हा या उपकरणांवर घाण जमा होते तेव्हा प्रदूषणाचा धोका जास्त असतो.

* एकावेळी फक्त एकच इलेक्ट्रिक डिव्हाइस वापरण्याचा प्रयत्न करा.

दानाच्या मोबदल्यात प्रेम मिळविण्याची धार्मिक पद्धत

* मोनिका गुप्ता

रामायण, गीता, कुराण, बायबल यासारख्या धार्मिक ग्रंथांना धंद्याचे माध्यम म्हणावे की मग नैतिक शिक्षण मिळविण्याचे माध्यम? पाहायला गेल्यास आज आपल्या देशात देवाच्या नावे सर्वात मोठा धंदा सुरू आहे. धंदा करायचाच असेल तर धर्माच्या नावाखाली कशाला? आजच्या युगात याचा काहीच अर्थ नसतानाही लोक हे ग्रंथ कशासाठी वाचतात आणि ऐकतात? देवाच्या नावाखाली एक माणूस दुसऱ्या माणसाला लुटून निघून जातो. धर्माच्या नावाखाली मारहाण केली जाते.

आपल्या ग्रंथात खरेच असे लिहिले आहे

प्रत्यक्षात एक धार्मिक कथा जिथे एका पत्नीने आपल्या पतिचे प्रेम मिळविण्यासाठी पतिलाच दान म्हणून दिले, ही पौराणिक कथा आहे, पण आजही ऐकविली जाते. फेसबूकवर, अध्यात्मिक कथांच्या पेजवर पोस्ट केलेल्या अशा कथांना बऱ्याच लाईक्सही मिळाल्या आहेत. आजचे युग, आजचा काळ, आजच्या लोकांशी त्या युगातील कथांचा खरंच काही संबंध आहे का?

ही कथा कृष्ण लीलांशी संबंधित आहे, त्याच कृष्णाशी ज्याने गोपिकांशी रासलीला खेळून स्नानाच्या वेळी गोपिकांचे कपडे पळवले होते. कथेच्या सुरुवातीचे वाक्य असे आहे की कृष्णाच्या १६००८ पत्नींमध्ये राणी होण्याचा मान फक्त ८ जणींनाच होता. हे कुठल्याही युगात स्वीकारले जाणार नाही, परंतु आजच्या काळात अशाप्रकारे त्याचे वर्णन करणे चुकीचे आहे.

लोभ आणि मत्सर

आजच्या युगात, पत्नी असूनही तुम्ही दुसरे लग्न केले तर आपला समाज आणि कायदासुद्धा तुम्हाला दोषी मानतो, कारण आजच्या काळात समाज आणि कायदा दोघेही याविरूद्ध आहेत. आजच्या युगात असे झाल्यास पहिली पत्नी पोलिसांपेक्षाही जास्त आक्रमकपणे विरोध करेल. अशावेळी सत्यभामाची कथा सातत्याने सांगून एकापेक्षा जास्त महिलांशी असलेल्या संबंधाच्या कथेचा गौरव का केला जातो?

कथेत असे सांगितले आहे की सत्यभामा आणि रुक्मिणी अशी कृष्णाच्या दोन राण्यांची नावे होती. सत्यभामाला गर्व होता की कृष्ण तिच्यावरच सर्वात जास्त प्रेम करतो. पण जिथे प्रेम असते, तिथे केवळ सकारात्मकताच असते. जिथे नकारात्मकता येते, ते प्रेम खरे असूच शकत नाही. शिवाय ही अभिमानाची गोष्ट आहे, गर्व असण्याची नाही. पण कथेत लेखक म्हणतात की कृष्णाचे तिच्यावर इतके प्रेम असूनही सत्यभामाला अधिक प्रेम हवे होते आणि तेच सत्यभामाच्या आयुष्यात लोभ आणि मत्सर घेऊन आले, जो इतका वाढला की सत्यभामाने कृष्णालाच दानात देऊन टाकले.

कथेत लेखक सांगतो की नारदला याबाबत समजले त्यावेळी त्याचे काम तर तसेही देवलोकात भ्रमण करणे हेच होते, मग ते भ्रमण करत राहाणे असो किंवा त्यावेळी कळ लावणे, काय फरक पडतो? आजच्या युगात नारदासारख्या व्यक्तिरेखेचे कौतुक करणे चुकीचे आहे, पण कथांमधून त्याला उच्च स्थान दिले जाते. नारदाने सत्यभामाला आपल्या जाळयात अडकवले आणि सांगितले की, तिने तुलाव्रत करावे, ज्यामुळे श्रीकृष्णाचे सत्यभामावरील प्रेम कितीतरी पटीने अधिक वाढेल.

बिनबुडाची कथा

आज जर तुम्ही तार्किकपणे या उपवासाचा संपूर्ण विधी ऐकाल तर आश्चर्यचकित व्हाल. या व्रताच्या संपूर्ण विधीबाबत नारदांनी सांगितले की आधी कृष्णाला दानात देऊन नंतर परत मिळविण्यासाठी कृष्णाच्या वजनाचे सोने द्यावे लागेल. सत्यभामा हे कार्य पूर्ण करण्यात अयशस्वी झाल्यास कृष्ण नारदाचे गुलाम होतील. असा प्रेमाचा सौदा करायला कोण शिकविते? हा एक प्रकारचा जुगार आहे, हेदेखील येथे पौराणिक कथेच्या रूपात मनावर बिंबवले जाते.

नारदाच्या या खेळाकडे दुसऱ्या दृष्टिकोनातून पाहिल्यास लक्षात येते की या युगात सर्व मोहमाया आहे. आजही नारद प्रत्येक घरात, प्रत्येक मंदिर, मशिदीत बसलेला दिसेल. कुठे फकीर म्हणून, कुठे पुजारी म्हणून, तर कुठे भगवी वस्त्र परिधान केलेला. कोणी चंदनाचा टिळा लावून सकाळी सकाळी टीव्हीवर ज्ञान पाजळत असतो.

अशा कथांचा असा प्रभाव पडतो की यामुळे कोणाचेही काम पूर्ण होत नाही. मेहनत घेण्याऐवजी आपण हातांच्या रेषा दाखवण्यातच धन्यता मानतो आणि हात पाहून भविष्य सांगणारा तुमचा भविष्यकाळ आणि सोबतच प्रत्येक समस्येचे समाधान सहजपणे सांगून झोळी घेऊन गल्लोगल्ली फिरतो. पण मग त्याच्या आयुष्यात स्थिरता का नसते?

सत्यभामाला प्रेम कृष्णच देऊ शकत होते, नारद नाही. ही वस्तुस्थिती सत्यभामा समजूच शकली नाही. तिच्यातील लोभ आणि अभिमानाने तिला विचारच करू दिला नाही. ती नारदाच्या बोलण्यात फसत गेली आणि विसरून गेली की आपण ज्याच्यावर प्रेम करतो तोच आपले दु:ख दूर करू शकतो, इतर कोणीही नाही.

खरे प्रेम आणि खरा विश्वास

कथेतील सत्यभामाच्या व्रतानुसार कृष्णाला दानात देण्यात आले. आता कृष्णाला तराजूवर बसवून त्याच्या वजनाइतके सोने दान करण्याची वेळ आली. सत्यभामाने पूर्ण प्रयत्न केला, पण ती अपयशी ठरली. तितके सोने गोळाच करू शकली नाही. शेवटी रुक्मिणीने खरे प्रेम आणि विश्वासाने सोने बाजूला करून तुळशीचे एक पान दुसऱ्या पारडयात टाकले आणि त्याचे वजन कृष्णाइतके झाले. सत्यभामाचा अभिमान तिथेच गळून पडला. यामुळे सोने तुच्छ झाले आणि तुळशीची पूजा श्रेष्ठ ठरली. सोने द्या प्रेम मिळवा हेदेखील सांगितले गेले आणि तुळशीची पूजा करा हेसुद्धा.

या कथेत उपदेश देण्यात आला की खरे प्रेम दिखावा करून मिळत नाही, प्रेम कोणतीही वस्तू नाही, जिचे वजन करता येऊ शकेल. जे पारखून पाहण्यासाठी योजना आखावी लागेल. वास्तव असे आहे की ही एक भावना आहे, जी अनुभवता येते.

या कथेमागचा छुपा उद्देश असा की साधुसंत पंडित पतिचे प्रेम परतवूही शकतात आणि परतही हिरावूनही घेऊ शकतात. म्हणूनच पतिला खूश करण्यासाठी त्याचे प्रेम मिळविण्यासाठी, मोठया प्रमाणात दान करा, अंधविश्वासाच्या मार्गावरून चाला. कोणाच्याही बोलण्यात येऊन आपले सर्वस्व गमावून बसा. जसे सत्यभामाने नारदाच्या शब्दात येऊन केले.

आजच्या काळात लोक जर देवाला खूप सारे सोने-चांदी दान करत असतील तर ते अशाच कथांनी प्रेरित होऊन. हे पुन्हा पुन्हा मनावर बिंबवले जाते की देव लोभी आहे. आपण त्याला काही देत नाही तोपर्यंत तो आपली इच्छा पूर्ण करत नाही. देव लाच घेतो आणि त्याचे एजंट येऊन घेऊन जातात. अशा प्रकारच्या कथांचा प्रसार-प्रचार आजच्या काळातत पुन्हा उच्च-नीचता आणि लुबाडणूक करण्यासाठी केला जात आहे.

आत्महत्या हा समस्येवर उपाय नाही

* गरिमा पंकज

मार्च २०२० मध्ये हैदराबाद येथील एका सॉफ्टवेअर अभियंत्याने कर्ज फेडण्यात अपयशी ठरल्याने पत्नी आणि दोन मुलांची हत्या केल्यानंतर आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी वडिलांना लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये अभियंत्याने वाढत्या कर्जाचा बोजा हे त्याच्या आत्महत्येचे कारण असल्याचे नमूद केले आहे. त्याने एका गृहनिर्माण वित्त कंपनीकडून 22 लाखांचे गृहकर्ज घेतले होते. याशिवाय घर बांधण्यासाठी आणि व्यवसाय सुरू करण्यासाठीही अनेक कर्जे घेतली गेली. त्याच्या शब्दांत, ‘मी कधी विचार केला नव्हता की मी अशा प्रकारे कर्जाच्या जाळ्यात अडकू. एका कर्जदाराने मला पुन्हा पुन्हा फोन करायला सुरुवात केली आहे. तर मी घर विकू शकत नाही कारण माझ्या आईच्या आठवणी घराशी जोडलेल्या आहेत. मी माझ्या पत्नी आणि मुलांना तुमच्यावर ओझे म्हणून सोडू शकत नाही. म्हणून मी त्यांना माझ्या बरोबर घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा माझा तुम्हाला शेवटचा संदेश आहे. ”

मृताच्या पत्नीच्या भावानं, जो स्वत: एक सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे, अनेक वेळा दरवाजा ठोठावला पण तो उघडला नाही, तेव्हा कुटुंबातील सदस्यांना या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर त्याने पोलिसांना माहिती दिली आणि चारही मृतदेह घराच्या आतून सापडले.

त्याच दिवशी, मुंबईत अशीच एक घटना उघडकीस आली जेव्हा तिच्या 3 वर्षांच्या मुलीला तिच्या पती आणि पत्नीसह मृत अवस्थेत तिच्याच घरातून बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्येनंतर ही आत्महत्या आहे. मृतदेहाजवळ एक सुसाईड नोट सापडली आहे, त्यात नमूद आहे की कुटुंबातील 13 लोकांमुळे त्यांना हे पाऊल उचलावे लागले आहे. सुसाईड नोटनुसार, कुटुंबातील काही सदस्य तिला मालमत्तेच्या मुद्द्यावरून त्रास देत असत. चिठ्ठीत मृत व्यक्तीने आपल्या पत्नीचे दागिने दान करण्यास सांगितले आहे. पोलिसांचा असा विश्वास आहे की या जोडप्याने आत्महत्या करण्यापूर्वी मुलीची हत्या केली आणि नंतर तिचा मृत्यू होण्यापूर्वी, महिलेने ही सुसाईड नोट तिच्या कुटुंबासह सोशल मीडियाद्वारे शेअर केली.

सर्व युद्धांपैकी सर्वात धोकादायक म्हणजे ‘कोविडचे युद्ध’

*प्रतिनिधी

युद्धे मानवी इतिहासाचा अविभाज्य भाग आहेत. प्रत्येक युगात सामान्य लोकांना विनाकारण युद्धात ओढले गेले आहे आणि युद्ध म्हणजे दैनंदिन जीवनाचे विघटन. युद्धादरम्यान शहरे नष्ट केली जातील. तरुण लढाईत जात असत, अन्नासाठी भुकेले असत, घरात कोणाला मारले पाहिजे हे माहित नसते. तरीही एक गोष्ट जी भेट आणि निसर्गाची गरज दोन्ही आहे, ती चालूच राहिली. ते प्रेम आहे. तरुण प्रेम सर्व प्रकारच्या काटेरी झुडपांमध्ये भरभराटीला आले, फुलांच्या बागांमध्ये भरभराट झाली, बुलेट्समध्ये भरभराट झाली, आज कोविडच्या रक्तरंजित पंजामध्येही प्रेम फुलत आहे.

आज कोविडचे युद्ध आधीच्या सर्व युद्धांपेक्षा अधिक धोकादायक आहे कारण ते प्रत्येक व्यक्तीला त्याच्या स्वतःच्या कारणासाठी तुरुंगात टाकत आहे. जे लोक परकीय आक्रमणामध्ये सहभागी झाले नाहीत, त्यांनी दंगलीत भाग घेतला नाही त्यांच्यावर हजारो निर्बंध लादण्यात आले आहेत. दुष्काळ आणि पूर नव्हता, शेतात युद्ध झाले नाही. कोविडने आधीपासून एकाच छताखाली राहत नसलेल्या प्रत्येकाला मिठी मारणे आणि एकमेकांशी बोलणेदेखील बंद केले. स्पर्श करणे, सहकार्य करणे, बोलणे जवळ बसणे यावर बंदी होती. अशा स्थितीत नवीन प्रेम कसे असावे, निसर्गाला स्पर्श करण्याची इच्छा कशी असावी, एकमेकांमध्ये लीन होण्याची गरज पूर्ण व्हावी.

लॉकडाऊन काढून टाकल्यानंतरही कोविडने कैद केलेले नगण्य आहे. मुखवटे असलेल्या चेहऱ्यांकडून प्रेम विनंत्या कशा असू शकतात? 2 यार्डचे अंतर एकमेकांना कसे स्पर्श करू शकते?

आता ज्यांना लसीकरण करण्यात आले आहे, ते लसीकरण झालेल्यांना शोधत आहेत. त्यांच्यापैकी कोण त्यांना पात्र आहे, परंतु ही लस अशी नाही की ती उद्यानांवर शिक्का मारली जाते. या लसीनंतरही मास्क आवश्यक आहे. आता ती नैसर्गिक गरज एखाद्याच्या आयुष्यात कशी पूर्ण होऊ शकते. कोविडची दुसरी लाट, ज्यामध्ये एका छताखाली राहणारे संपूर्ण कुटुंब आजारी पडले, त्याने सर्वांना वाईट रीतीने चावले.

कृतज्ञतापूर्वक, आधुनिक तंत्रज्ञानाने इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअॅपचे दरवाजे उघडे ठेवले, पण या कैद केलेल्या खाणींच्या छोट्या खिडक्या होत्या जिथून फक्त डोळाच पाहू शकतो. चेहरा एक इंच बाय एक इंच पाहून व्यक्तीमत्व ओळखता येत नाही.

होय, या काळात भारतात विवाह झाले, पण फेसबूकवर त्यांच्यात चेहरा दिसला, काही मिनिटांसाठी मुखवटा काढून टाकला गेला आणि तो केला गेला की नाही, 18 व्या शतकातील लग्नाप्रमाणे. बाकी गोष्टी सोशल मीडियावर घडल्या पण अर्ध्या अपूर्ण. जोपर्यंत कोणी चहाच्या कपमध्ये बोट बुडवून ते पिणार नाही तोपर्यंत प्रेम थोडे फुलणे आहे. आता जे विवाह निश्चित होत होते, ते शारीरिक युतीची तडजोड आहेत, प्रेमाच्या अंतिम ध्येयाची पूर्तता नाही.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें