* पूनम पांडे
इर्षा किंवा द्वेष या भावनेकडे हल्ली मानसोपचारतज्ज्ञ व समाजसुद्धा एका नव्या दृष्टीने पाहू लागले आहेत. त्यांचा शोध असे सिद्ध करत आहे की जर कोणाची प्रगति पाहून तुम्हाला इर्षा वाटत असेल तर घाबरण्यापेक्षा याकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पहायला हवे. जर या इर्षेतून प्रेरणा घेऊन आपली स्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला तर परिस्थिती बदलू लागेल. याचा फायदा असा होईल की या इर्षेमुळे तुमचे नुकसान होण्याऐवजी तुम्हाला आनंदाचा मार्ग मिळेल.
दुसऱ्यांची प्रगति किंवा यश पाहून इर्षेने जर तुम्हीही चांगले प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला तर ही इर्षा तुमच्यासाठी सुखद ठरू शकते. हे भविष्यासाठी शुभ संकेत आहेत.
नवे प्रयोग करा
असं म्हणतात की भावनांना कुणी थोपवू शकत नाही, पण आपला दृष्टीकोन तर बदलता येऊ शकतो ना? सांगण्याचे तात्पर्य हेच की दृष्टीकोन जर सकारात्मक बाळगून स्वत:ला चांगल्या वातावरणासाठी तयार करत राहावे नाहीतर फक्त इर्षाच केल्याने मानसिक शांती हरवून जाईल. बरोबरच हृदय, यकृत, रक्तदाब इ. आजारही तुमच्या शरीराचा ताबा घेतील.
वेळेचे महत्त्वं ओळखून आपल्या इर्षेचा लाभ करून घेतला जाऊ शकतो. म्हणजे जगही नवनवे प्रयोग करून प्रगती साधत आहे, तर तुम्हीही करून पाहा. जर काळाप्रमाणे नाविन्य आणि ताजेपणा अपेक्षित असेल तर तुम्हीही असेच करण्याकडे लक्ष केंद्रित करा.
लक्ष्य ठरवा
मनात जर इर्षेची भावना जोर धरत असेल तर आपले लक्ष्य एखादे ध्येय गाठण्याकडे वळवा. याचा खूप फायदा होऊ शकेल. याबाबतीत आळशी व कामचोर लोक फक्त विचारच करत बसतील व वेळेला दोष देत राहतील. पण ध्येय गाठणारे लोक स्वत:चा तोल ढळू देत नाहीत. पटकन् आपल्यातील कमतरता ओळखतात व आपले ध्येय निश्चित करतात व इर्षा नावाच्या या रोगाला आपले औषध बनवतात.
मुल्यांकन करा
आपली स्पर्धा स्वत:शीच करणे हे अतिउत्तम असतं म्हणजे दरदिवशी मागील दिवसापेक्षा चांगले व उत्तम बना. यासाठी एक दिनदर्शिका तयार करणे खूपच उपयुक्त ठरते. स्वत:चं खरंखुरं मुल्यांकनही करता आलं पाहिजे. यात दिनदर्शिकेची खूप मदत होते. काळचक्र आणि प्रकृती आपल्यासाठी नेहमी चांगली व्यवस्था करून ठेवत असते. यावर अवश्य विचार करत राहिलं पाहिजे.