* अंजू जैन

माहेरी आलेली नणंद अभिलाषाचा उतरलेला चेहरा पाहून वहिणीने विचारले, ‘‘पवनसोबत काही वाद झाला आहे का?’’ अभिलाषा काहीच बोलली नाही. पण अनुभवी वहिणीने अधिक आपुलकीने विचारताच तिचे डोळे पाणावले. अभिलाषा स्वत:ला रोखू शकली नाही. मग अभिलाषाने तेच सांगितले ज्याचा संशय वहिणीला आला होता. अभिलाषा म्हणाली, ‘‘लग्नाला केवळ २ वर्षेच झाली आहेत... पवनला माझ्यात काहीही इंटरेस्ट उरलेला नाही... इच्छा झालीच तर एखाद्या यंत्राप्रमाणे तो सर्व करुन झोपून जातो... रोमान्स नाही की मजामस्ती नाही.’’

पत्नींची एक सर्वसामान्य तक्रार अशी असते की, लग्नानंतर २-३ वर्षे पती त्यांच्या मागूनपुढून फिरत असतात, पण नंतर इंटरेस्ट घेणे बंद करतात. अशा परिस्थितीत पत्नींना आपण उपेक्षित असल्यासारखे वाटू लागते.

वेगवेगळया तक्रारी

शेकडो जोडप्यांच्या केलेल्या अभ्यासानुसार, पत्नीने केलेल्या या तक्रारीचीही पुष्टी झाली. या अभ्यासानुसार हनीमून फेज जो ३ वर्षे ६ महिन्यांचा असतो, तो संपल्यानंतर पती-पत्नी दोघेही एकमेकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सोडून देतात. दोघेही सुंदर दिसणे, एकमेकांची काळजी घेणे यासाठीचे अतिरिक्त प्रयत्न करणे सोडून देतात. प्रेम ही एक नॉर्मल गोष्ट आहे असे त्यांना वाटू लागते. एकीकडे बायका तक्रार करतात की पती पूर्वीसारखे त्यांच्यावर प्रेम करत नाहीत आणि त्यांच्याशी लैंगिक संबंधात जास्त रस घेत नाहीत, तर दुसरीकडे पतीही अशीच काहीशी तक्रार करतात.

अभिलाषासारख्या पत्नींना हे समजून घ्यावे लागेल की, पतीनेच नेहमीच पत्नीमध्ये इंटरेस्ट का दाखवायचा? पतीनेच लैंगिक संबंधासाठी आर्जव किंवा पुढाकार का घ्यावा? यासाठी पत्नीने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा पतीने का करू नये?

जर तुम्ही तुमच्या लैंगिक संबंधात पहिल्या इतकीच ऊर्जा टिकवून ठेवू इच्छित असाल तर या टीप्स नक्की जाणून घ्या :

स्वत:चेच लाड करा : तुम्ही यापूर्वी तुमच्या भुवया, नखे, ओठ, अंडरआर्म्स, पाठ, त्वचा, केस आणि चेहऱ्याची किती काळजी घेत होता, हे आठवते का? दररोज सकाळी ड्रेस घालण्यापूर्वी कोणता ड्रेस घालावा, याची निवड करायला तुम्ही कितीतरी वेळ घेत होता आणि आता लाल ब्लाऊजवर हिरव्या रंगाची साडी, ओठांची निघालेली सालपटे, अंडरआर्म्सचा घामाचा वास आणि बिकिनी एरियातील केस अशा अवस्थेत तुम्ही असता.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...