* प्रियदर्शिनी
महान जर्मन तत्ववेत्ते आणि कवी फ्रेडरिक नित्शे म्हणतात, ‘‘ज्याने देण्याची कला शिकली असेल त्याने जीवन जगण्याची कलादेखील समजून घेतली आहे. देणे ही एक साधना आहे, जी आपल्या अंगी रुजवण्यासाठी शेकडो वर्ष व्यतीत होतात.’’
आपल्या कुटुंबात, मित्रांमध्ये, नातेवाईकांमध्ये देण्याचा हा क्रम सतत चालू राहतो, विशेषत: सण-उत्सवांमध्ये आणि लग्नाच्या समारंभात देण्याचा हा वेग अजून वाढतो. पण देण्याघेण्याच्या या वेगात, बऱ्याच वेळा आपले विचार, आपले मन स्वत:च एक अडथळा बनते. जेव्हा आपण एखाद्याला काहीतरी देतो, तेव्हा आपलं प्रेम आणि आपुलकी त्यात दडलेली असते, पण जेव्हा अधूनमधून समोरच्या व्यक्तिला आपण अशी आठवण करून देतो की मी तुम्हाला अमुक गोष्ट दिली होती, आठवते ना? तेव्हा तेच प्रेम आणि आपलेपणा गायब होऊन जातो.
अशा परिस्थितीत समोरचा माणूस स्वत:ला गरीब समजू लागतो आणि जेव्हा हा टोमणा जाहीरपणे सुनावला जातो तेव्हा ही निराशा आणखीच तीव्र होते.
नुकत्याच झालेल्या विवाहसोहळयाच्या कार्यक्रमात माझी सर्वात चांगली मैत्रीणही काही जुन्या मैत्रीणींसह भेटली. कमलेश आणि ज्योती एकेकाळी जिवलग मैत्रीणी होत्या. ज्योती अचानक बोलली, ‘‘अरे व्वा कमलेश, तू तोच नेकपीस घातला आहेस ना, जो मी तुला तुझ्या मागच्या जन्म दिनानिमित्त दिला होता?’’
भरल्या मैफलीत कमलेश काही बोलू शकली नाही, बस्स स्मितहास्य करत राहीली. पण तिच्या मनावर झालेली जखम ती विसरू शकली नाही.
आपल्या सभोवताली, कुटुंबात किंवा समाजात असे अनेक लोक आहेत, ज्यांना आपण दिलेल्या गोष्टीची चर्चा करण्यात कंटाळा येत नाही. बऱ्याच वेळा भेटवस्तूपेक्षा चर्चाच अतिरंजक असते. जेव्हा घेणारा एखाद्या दुसऱ्याच्या तोंडून अशा गोष्टी ऐकतो, तेव्हा त्याचा स्वाभिमान दुखवाला जातो.
अशी शिका देण्याची कला
* तुम्ही कितीही महागडी भेट दिली असली तरीही मनात हे दु:ख ठेवू नका की मी एवढी महागडी वस्तू का दिली.
* भेटवस्तू किंवा कोणतीही वस्तू देताना किंमतीचा टॅग काढलाच पाहिजे किंवा जर छापिल किंमत असेल तर त्यावर शाई किंवा पांढऱ्या कागदाने झाका.