कोरोना लॉकडाऊन वेडिंग (ना वऱ्हाडी, ना वाजंत्री असे आहे नवे लग्न)

* मिनी सिंह

देशात कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन करण्यात आले. ते अशावेळी जाहीर झाले जेव्हा देशात लग्नाचा हंगाम असतो. लॉकडाऊनमुळे अनेक जोडप्यांनी लग्नाची तारीख पुढे ढकलली. परंतु काही जोडपी अशीही आहेत ज्यांना लग्नाच्या बंधनात अडकायचे आहे. त्यामुळेच लॉकडाऊनमध्येही यावर पर्याय शोधून त्यांनी लग्नगाठ बांधली. ऑनलाइन लग्न केले. यात मेहंदी, संगीत आणि इतर सर्व विधीही ऑनलाइनच झाल्या. लोकांनाही ऑनलाइन आमंत्रण दिले. लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन होऊ नये म्हणून लग्न ऑनलाइन करण्यात आले.

नवरा एकीकडे आणि नवरी दुसरीकडे

उत्तर प्रदेशातील शहर बरेलीमध्ये असाच एक अनोखा, ऑनलाइन लग्न सोहळा पहायला मिळाला. नवरा सुषेनचे असे म्हणणे आहे की, भलेही येत्या काही दिवसांत लॉकडाऊन संपेल, पण आम्हाला तोपर्यंत लग्नासाठी वाट पाहत रहायचे नव्हते. म्हणूनच, एक जबाबदार नागरिक या नात्याने आम्हाला असे वाटले की सामाजिक अंतर राखण्यासाठी हा एक चांगला मार्ग आहे.

हे लग्न शादी डॉट कॉमद्वारे करण्यात आले. शादी डॉट कॉमने ‘वेडिंग फ्रॉम होम सर्व्हिस’ सुरू केली आहे. या सेवेअंतर्गत सर्व पाहुणे लग्नात ऑनलाइन सहभागी झाले आणि फेरेही ऑनलाइनच घेण्यात आले. इतकेच नाही तर या लग्नात सनई-चौघडयांचीही ऑनलाइन व्यवस्था करण्यात आली होती. हे लग्न इतर लग्नांप्रमाणेच सामाजिक अंतर राखून आयोजित करण्यात आले होते.

भारतात जिथे लग्नाची तयारी अनेक महिन्यांपूर्वीपासून सुरू होते, तिथे केवळ दोन तासांत लग्न होणे आश्चर्याची गोष्ट आहे.

परंतु कोरोनाच्या महामारीने आयुष्यच बदलून टाकले. याच बदलामुळे भारतीय लग्नाचे रुपही बदलले. तेच लग्न जिथे नवरा- नवरीसोबत वऱ्हाडी, वाजंत्री आणि न जाणो किती मित्रमैत्रीणी सहभागी होत असत. कितीतरी महिने आधीपासूनच तयारी सुरू केली जायची आणि नंतर हळद, मेहंदीसारख्या बऱ्याच विधी झाल्यावर तो खास दिवस उजाडायचा ज्या दिवशी नवरा-नवरी कायमचे एकमेकांचे होऊन जायचे. परंतु आता कोरोना युगाने लग्नाचा हॉल, मंडप, केटरिंगची संकल्पना अशी काही बदलली आहे की, लग्नात सामाजिक अंतर आणि ऑनलाइन वेडिंगसारख्या अनेक संकल्पना नव्याने जोडल्या गेल्या आहेत.

आज अनेक जोडपी व्हिडीओ कॉलिंग अॅप्सद्वारे लग्न करीत आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये दिल्ली, महाराष्ट्र, मध्य प्रदेश इत्यादी ठिकाणांहून अशी काही जोडपी चर्चेत आली ज्यांनी व्हर्च्युझअल वेडिंगचा मार्ग स्वीकारला. अशा प्रकारे लग्न करणाऱ्या काही जणांनी सांगितले की, वाजंत्री, वरातीसह लग्न करायची इच्छा होती, पण आता ते नाही तर निदान ऑनलाइन सनई-चौघडेही चांगले आहेत.

स्वत:हूनच नटत आहे नवरी

लग्नाच्या दोन-तीन महिने आधीपासूनच नवरा आपल्या चेहऱ्यावर खास लक्ष देत असे, नवरी महागातले महाग प्री ब्रायडल पॅकेज घेत असे. आता मात्र कोरोनाच्या या काळात वर आणि वधूचा तोच चेहरा मास्कखाली झाकलेला पहायला मिळत आहे. इतकेच नाही तर लग्नात सहभागी होणारे मोजके नातेवाईकही मास्क लावलेलेच पहायला मिळतात. आता लग्नासाठी नवरी एखाद्या पार्लरमध्ये नाही तर स्वत:कडे असलेल्या ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर करुन स्वत:च किंवा आपल्या नातेवाईकांच्या मदतीने तयार होत आहे.

कुटुंबातील माणसे बनली फोटोग्राफर

आतापर्यंत लग्नसोहळयाव्यतिरिक्त प्री-वेडिंग, मेहंदी आणि हळदीसाठीची फोटोग्राफी तसेच व्हिडीओग्राफी केली जात होती, पण आता जी लग्नं होत आहेत, तिथे फक्त नवरा-नवरीचे बहीण-भाऊ किंवा मग जवळचे नातेवाईकच फोटो काढताना किंवा व्हिडीओ शूटिंग करताना दिसत आहेत. या कोरोना काळाने दोन्ही बाजूंकडचा मोठा खर्च कमी केला आहे आणि फोटो काढल्यानंतर फोटोग्राफरसोबत बसून त्यातील खास फोटो निवडण्यासाठीचा वेळही वाचवला आहे.

घरच झाले लग्नाचा हॉल

लग्नाच्या दिवशी वरात हॉलमध्ये येताच सर्वत्र आनंदाच्या वातावरणाची निर्मिती होते. इकडे सनई-चौघडे वाजतात आणि तिकडे नवरीच्या हृदयाची धडधड वाढते. पण आता लग्नसोहळे अतिशय शांततापूर्ण वातावरणात होत आहेत. वाजंत्री नाही, वरात नाही. नवरा काही मोजक्याच जवळच्या नातेवाईकांना घेऊन नवरी मुलीच्या घरी येऊन तिच्याशी लग्न करतो आणि तिला घेऊन जातो. आता कुटुंबीयांना लग्नपत्रिका छापायाची किंवा पाहुण्यांचे आदरातिथ्य करायची गरज नाही. लग्नात दोन्ही बाजूंकडील लाखो रुपयांची बचत होत आहे. यामुळे हुंडयाची परंपराही मोडीत निघत असल्याचे पहायला मिळत आहे. मास्क लावलेले नवरा-नवरी पवित्र बंधनात बांधले जात आहेत.

तसे तर ऑनलाइनने आपल्या जीवनात खूप आधीपासूनच प्रभाव पाडायला सुरुवात केली आहे. इंटरनेटच्या या युगात खूप काही बदलले, पण आयुष्य जगण्याची पद्धत आहे तशीच आहे. सध्या ज्या प्रकारे ऑनलाइन होणाऱ्या लग्नाला विरोध होत आहे, तसाच तो फारपूर्वी गॅस आणि कुकरलाही झाला होता. जेव्हा गावात एखाद्याच्या घरी टीव्ही आला तेव्हाही विरोध करण्यात आला होता. मुले संस्कार विसरतील म्हणून पालक त्यांना बाहेरगावी अभ्यासासाठी पाठवायला तयार नव्हते. अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्यांना कालपर्यंत विरोध केला जात होता त्याच आज सामान्य होऊन गेल्या आहेत. अशाच प्रकारे, ऑनलाइन लग्नही सामान्य गोष्ट आहे.

घातक आहे धार्मिक उन्माद

* दीपान्विता रायबनर्जी

धार्मिक ढोंगीपणा माणसांची विचारसरणी संकुचित बनवितो यामुळे माणसं अतिक्रूर बनून आपलं तनमनधन सर्वकाही हरवून बसतात.

२ जून, २०१६ साली झालेला मथुरा कांड याचं ताजं उदाहरण आहे. रामवृक्ष यादवने आपल्या संकुचित विचारसरणीमुळे २४ निरपराध्यांचे जीव घेण्याबरोबरच      स्वत:देखील आपल्या अंधश्रद्धांसोबत स्फोटात जीव गमावून बसला.

वेडेपणाच्या नादात हा इसम देशाची घटना, कायदा आणि सरकार तिन्ही गोष्टींशी विद्रोह करून स्वत:ला देव समजू लागला होता. आपल्या उन्मादी भाषणांद्वारे अंधश्रद्धाळू भक्तांची फौज एकत्रित करत होता. मथुराच्या जवाहर बागेत स्फोटक सामुग्री जमा करत होता. दुर्घटनेच्या दिवशी उन्मादी भक्तांनी या व्यक्तिसोबत मिळून भयानक स्फोट घडविला. अंधश्रद्धा जर रोखली गेली नाही तर हे किती विध्वंसक होऊ शकतं हे कोणापासूनही लपलेलं नाहीए.

कोणीही यापासून बचावलं नाहीए

देश असो वा परदेश, अंधश्रद्धेच्या विषवृक्षाने नेहमीच अतिवादी विचार पसरवले आहेत.

आंतरराष्ट्रीय पटलावर कुकलक्स कलान यांचं भयानक नाव बनून समोर आलं. जेव्हा दक्षिण युरोपात गणराज्याची स्थापना झाली तेव्हा काळ्या लोकांची गुलामगिरीतून सुटका झाली. तेव्हा एलीट लोकांच्या समूहातून कूकलक्स कलान नावाची भयानक जातीयवादी संघटना प्रस्थापित झाली जी काळ्या लोकांच्या गुलाम प्रथेची समर्थक होती आणि गोऱ्या लोकांची सुपरमॅसी म्हणजेच बाजूची होती. या संघटनेच्या लोकांनी शाळा, चर्चेसवर हल्ले करायला सुरूवात केली. रात्रीच्या अंधारात हे भीतिदायक कपडे घालून काळ्या लोकांवर हल्ले करत असत. त्यांनी काळ्या लोकांना धमकावण्यापासून ते त्यांचा खून करण्यापर्यंत मजल मारली होती. त्यानंतर सरकारी दबावामुळे यांचा प्रभाव कमी झाला, परंतु आता यांनी पुन्हा डोकं वर काढलंय. हे आफ्रिकन अमेरिकन हेट ग्रपुच्या सिद्धांतावर चालतात.

या सर्व घटना चरमपंथाशी संबधित आहेत, जिथे मानव उलटसुलट तर्क, सहनशीलता, उदारता यांची कट्टर विरोधक बनते. त्यांच्यासाठी स्वत:चा स्वार्थ सर्वोपरी होतो.

आज आयएसआयएस कट्टरवादी आतंकवादाचा क्रूरतम चेहरा आहे, ज्याची प्रत्येकाला दहशत आहे. स्वत:ला वा विशेष धर्माला अथवा जातीला मोठं करून अंधश्रद्धेखाली लोकांना आणलं जाण्यासाठी दहशत पसरवली जाते.

अमेरिकन राष्ट्रपतींनी आयएसआयएसवरच्या कारवाईच्यावेळी सांगितलं होतं की यांचा सिद्धांत नॉनइस्लामिक आहे.

एक गोष्ट मात्र खरी आहे की धर्माच्या आड केलं जाणारं क्रूरतम काम कधीही वास्तविक धर्माचं उद्देश्य पूर्ण करू शकत नाही.

ढोंगी बाबाबुवांचं जाळं

आपल्या देशात आसाराम बापू प्रकरण तसं फारसं जुनं नाहीए. कथित परमपूज्य आसाराम बापूला १६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्याच्या आरोपाखाली गजाआड करण्यात आलं. या मुलीचे आईवडील आसारामच्या आश्रमात अनेक वर्षापासून सेवा करत होते.

आसारामवर खून, बलात्कार, तांत्रिक मंत्रसिद्धीद्वारे वशीकरण, कामोत्तेजना वाढविणाऱ्या औषधांचं सेवन करवून स्त्रिया आणि मुलींचं शारीरिक शोषण, जमीन हडपणं इत्यादी अनेक आरोप लागले आहेत.

आसाराम हरपलानी, जन्म १९४१, पूर्वी टांगेवाला, नंतर रस्त्यालगत चहा विकणारा आणि त्यानंतर जमिनी बळकावत स्वयंभू भगवान बनतो. त्याने जवळजवळ ३० लाख अंधश्रद्धाळू भक्तांची फौज तयार केली, त्यांच्यासाठी हा पूज्य संत श्री आसाराम बापू बनला.

आसारामचे अंधभक्त अतिरेकी संघटनेतील जिहादीसारखे आहेत, जे याच्या एका इशाऱ्यावर मरण्यास आणि मारण्यासदेखील तयार होतात. यांच्यासाठी गुरूच्या अंधशक्तीपेक्षा अधिक असं काहीही नाहीए. आता जरा विचार करा की देशातील एवढी मोठी लोकसंख्या जर अंधश्रद्धेच्या वेडेपणाच्या मानसिकतेत असेल, बुद्धी आणि तर्कवार त्याच्यापुढे गौण ठरत असेल तर देशाचा विकास कसा होईल?

स्त्रियादेखील सावज ठरतात

धर्माच्या नावाखाली लोकांना विश्वासात घेऊन एकामागोमाग एक अतिरेक्यांच्या क्रूरकर्मा संघटना मजबूत होत चालल्या आहेत. जातिधर्माच्या ढोंगाचं जाळं पसरवून अशा संघटनांचे कर्ताधर्ता आपल्या मानसिक संकीर्णतेला संतुष्ट करतात.

अगदी गृहिणीदेखील धर्म आणि ढोंगीपणाचं खातं उघडून बाबाबुवा, मौलवी, भटब्राह्मण, तांत्रिकांच्या मागे लागलेल्या दिसतात. मग मूल आजारी असो, पदोन्नती, शत्रूंचा बीमोड असो वा मनासारखी वास्तू मिळवण्याची गोष्ट असो, लोक आश्रम, देऊळ, मस्जिदची गुलामी करू लागतात. धर्माच्या आड लोकांना घाबरवून स्वत: विलासी जीवन जगणं ही तर भटब्राह्मण, मौलवी, पाद्री यांचा व्यवसाय आहे.

धर्माच्या ठेकेदारीने हे ढोंगी कुशल तंत्राने लोकांना वश करणं खूपच चांगलं जाणून आहेत. भीतीला हत्यार बनवून हे लोकांची मानसिकताच बोथट करून टाकतात.

आपल्या इच्छेनुसार सर्व काही मिळविण्याच्या लालसेपायी मनुष्य           भ्रष्ट होत जातो. लोकांच्या या लालसेला ढाल बनवून हे पंडित, मुल्ला आपलं काम साधून घेतात.

माणसाने जर आपल्या डोक्याचा योग्य वापर केला तर त्याला कोणाताही धर्म वा अंधश्रद्धेची गरज पडणार नाही. बाबाबुवांच्या फेऱ्यात सापडून लोकांची विचारसरणी बोथट होते, तेव्हा हे बाबाबुवा साधना, तंत्रमंत्र, दान, भक्तीच्या गोष्टी सांगून पैसा उकळत राहातात. नंतर वेगवेगळ्या व्यवसायात पैसा लावतात. आपल्यामागे स्वत:च्या साम्राज्याच्या रक्षणासाठी सेना उभी करतात, बलात्कारापासून ते अगदी खुनापर्यंतच्या प्रत्येक गोष्टीत यांचे हात माखलेले असतात.

सुशिक्षित अंधश्रद्धाळू

आश्चर्याची बाब म्हणजे आजच्या या युगातदेखील लोक अंधश्रद्धेच्या माध्यमातून आपलं आयुष्य समृद्ध करण्याचा प्रयत्न करतात.

मनुष्य होण्याची सार्थकताही आपण अंधश्रद्धेच्या अधीन जाऊ नये यातच आहे. आस्थेचं एक महत्त्व आहे, परंतु ही आस्था सत्याच्या आधारावर असावी, लबाडी, थोतांडावर नसावी.

आयुष्यात जादूने काहीही होत नाही, सर्वकाही मेहनत आणि वैज्ञानिक सत्यावर आधारित असतं. जर अंधश्रद्धा आणि नक्कल करणाऱ्यांच्या भरवशावर अवलंबून      राहिलात तर आयुष्यात अशी ठोकर बसेल की सांभाळण्याची संधीदेखील मिळणार नाही. म्हणून न्याय आणि सत्याच्या मार्गाने अंधश्रद्धेला न जुमानता चला, मार्गातील अडथळे आपोआप दूर होतील.

स्मार्ट वाइफ यशस्वी करेल लाइफ

– शैलेंद्र सिंह

पती-पत्नीचे नाते खूपच संवेदनशील आणि भावनिक असते. पूर्वी एकत्र कुटुंबपद्धत होती, त्यामुळे त्या काळात या नात्यात थोडे चढउतार चालून जायचे. परंतु आता एकत्र कुटुंबपद्धत संपुष्टात आल्याने संपूर्ण कुटुंबाचा भार फक्त पती-पत्नीवरच आला आहे. अशा परिस्थितीत पत्नीने लेचेपेचे राहाणे कुटुंबासाठी योग्य नाही. आजच्या काळात पत्नीची जबाबदारी पतिपेक्षा कितीतरी पटीने वाढली आहे.

खरेतर पैसे कमावून आणण्याचे काम पतिचे असते. पैशांचा योग्यप्रकारे वापर करून घर, मुले, नातेवाईक आणि शेजाऱ्यांशी चांगले संबंध ठेवणे पत्नीचे काम असते. या महागाईच्या काळात स्मार्ट पत्नी ही पतिने कमावलेले पैसे साठवून ठेवण्याचे आणि पतिला बचतीच्या वेगवेगळया योजनांची माहिती देण्याचेही काम करते. आजची स्मार्ट वाइफ केवळ हाऊसवाइफ म्हणवून घेण्यातच समाधान मानत नाही तर ती चांगली हाऊस मॅनेजरही बनली आहे.

भावना आणि भूपेश लग्नानंतर त्यांचे छोटे शहर गाझापूरहून राहण्यासाठी लखनौला आले. येथे भूपेशला एका खासगी कंपनीत नोकरी मिळाली होती. भूपेशला दरमहा १५ हजार रुपये पगार होता. त्याने दरमहा २ हजार भाडयाने फ्लॅट घेतला होता. १-२ महिन्यांनंतर भावनाला वाटू लागले की भाडयाच्या घरात राहणे योग्य नाही, पण भूपेशशी याबाबत बोलण्यास तिला संकोच वाटत होता. ती सुशिक्षित होती. त्यामुळे सरकारी योजनांतून मिळणाऱ्या घरांवर लक्ष ठेवण्यास तिने सुरुवात केली.

एका महिन्यातच भावनाला समजले की सरकारच्या गृहनिर्माण योजनेत बरीच घरे अशी आहेत, जी काही लोकांनी बुक केली होती, पण त्यांना ती खरेदी करणं शक्य झालं नाही. अशी घरे पुन्हा विकण्याची तयारी सरकार करीत होते. त्यासाठी घराच्या एकूण किंमतीच्या २५ टक्के रक्कम आधी द्यायची होती. उर्वरित रक्कम हप्त्यांमध्ये भरता येणार होती.

भावनाने याबाबत भूपेशला सांगितले, तेव्हा तो म्हणाला, ‘‘सर्वात लहान घराची किंमत ३ लाखांहून अधिक आहे. त्यानुसार आपल्याला सुरुवातीला लगेचच ७५ हजार द्यावे लागतील. त्यानंतर, दरमहा हप्ता स्वतंत्रपणे द्यावा लागेल. एवढे पैसे कुठून आणायचे?’’

यावर भावना म्हणाली, ‘‘अडचण फक्त सुरुवातीच्या ७५ हजारांची आहे. त्यानंतर मासिक हफ्ता केवळ २ हजार रुपयांच्या आसपास असेल. एवढे भाडे तर आपण आताही देतो. ७५ हजारांपैकी ५० हजारांची सोय मी करू शकते. २५ हजारांची सोय तुम्ही केली तर आपलेही या शहरात स्वत:चे घर असेल.’’

भूपेशने भावनाने सांगितलेले मान्य केले. काही दिवसांतच त्यांचे स्वत:चे घर झाले. घर थोडे व्यवस्थित केल्यानंतर ते तेथे राहू लागले.

एके दिवशी भूपेश आणि भावना एका लग्नाच्या पार्टीला गेले होते. भावनाला  दागिन्यांशिवाय तयार होताना पाहून भूपेशने विचारले की तुझे दागिने कुठे आहेत? तेव्हा भावनाने सांगितले की दागिने विकून तिने ५० हजारांची सोय केली होती. हे ऐकताच भूपेशने भावनाला जवळ घेतले. त्याला वाटले की खऱ्या अर्थाने भावनाच स्मार्ट वाइफ आहे.

बचतीमुळे सुधारते जीवन

महागाईच्या या युगात संसाराची गाडी चालवण्याची गुरुकिल्ली बचत हीच आहे. ज्या कुटुंबांमध्ये कुठून आणि कसाही पैसा येतो, त्यांनीही बचतीकडे पूर्ण लक्ष द्यायलाच हवे. एका स्मार्ट वाइफने अर्थमंत्र्यांप्रमाणे आपल्या घराचे बजेट तयार केले पाहिजे. संपूर्ण महिन्याचा खर्च एका ठिकाणी लिहिला पाहिजे, जेणेकरून महिन्याच्या शेवटी हे समजेल की महिन्यात किती खर्च झाला. यातून हेदेखील समजते की खर्च कमी करून पैसे कुठे वाचवता येतील. आपत्कालीन परिस्थितीत होणाऱ्या खर्चासाठी दरमहा काही ठराविक रक्कम वाचवणे आवश्यक आहे जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत होणाऱ्या खर्चावेळी पैशांची अडचण भासणार नाही.

दरमहा ठराविक रक्कम बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जमा करणे आवश्यक आहे. एका वर्षानंतर ते पैसे बँकेत फिक्स डिपॉझिट म्हणून जमा करता येतील. आजकाल म्युच्युअल फंडात पैसे जमा केल्यासही चांगला परतावा मिळवता येतो. स्मार्ट वाइफ दर महिन्याच्या खर्चातून थोडे तरी पैसे वाचवून ठेवतेच.

जर पती, कुटुंब आणि मुलांचे आरोग्य चांगले असेल तर औषधांवरील खर्चही कमी होतो. हीदेखील एक प्रकारची बचत आहे. घरातील स्वच्छतेतूनही बऱ्याच रोगांना दूर ठेवले जाऊ शकते. घरासाठीची खरेदी सुज्ञपणे केली तरी बचत करता येते. एकाच वेळी सर्व खरेदी करा. सामान अशा ठिकाणाहून खरेदी करा, जिथे ते कमी किंमतीत चांगले मिळेल. आजकाल मॉल संस्कृती आल्याने बऱ्याच प्रकारचे सामान स्वस्तात मिळते.

स्मार्ट वाइफ समाजात निर्माण करते स्वत:ची ओळख

सध्या बरेच लोक शहरांमध्ये आपल्या नातेवाईकांपासून वेगळे राहतात. अशावेळी मित्रांना भेटायला त्यांच्याकडे जास्त वेळ असतो. याच लोकांमध्ये आनंद-दु:ख शेअर केले जाते. एकमेकांना भेटण्यासाठी लोक काही ना काही निमित्त करून पार्टीचे आयोजन करू लागले आहेत. येथे पत्नींमध्ये एकप्रकारची अघोषित स्पर्धा सुरू झाली आहे, ज्यामुळे एकमेकांबद्दल अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. कोणाची पत्नी कशी दिसते? तिने कशाप्रकारचे कपडे परिधान केले आहेत? तिची मुले किती शिस्तबद्ध आहेत? स्मार्ट पत्नी तीच ठरते जी या सर्व प्रश्नांवर खरी उतरते.

पार्टीत कसे वागायचे हे शिकून त्याप्रमाणेच तेथे वावरावे लागते. अशा प्रकारच्या पार्टींमध्ये अनेकदा चांगले नातेसंबंध तयार होतात, जे पुढे जाण्यासाठीही मदत करतात. स्मार्ट पत्नीने खूपच सोशल राहायला हवे. बऱ्याचदा पती मनात असूनही सामाजिक नातेसंबंध चांगल्याप्रकारे निभावू शकत नाही.

स्मार्ट पत्नी ही उणीव दूर करून पतिला प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करण्यास मदत करते. स्मार्ट पत्नीने पतिचे मित्र आणि कार्यालयातील सहकाऱ्यांच्या घरगुती पाटर्यांमध्ये जाणे गरजेचे आहे. यामुळे आपापसांत चांगले संबंध निर्माण होतात. आजकाल मोबाइल, इंटरनेट व फोनद्वारे एकमेकांशी बोलणे अधिक सोपे झाले आहे. याचा फायदा करून घेतला पाहिजे. प्रत्येक वेळेस नातेसंबंधातील मर्यादेचेही भान ठेवले पाहिजे. कधीकधी नाती जुळताना कमी आणि बिघडताना अधिक दिसतात.

महिलांनी कसं घ्यावं पर्सनल लोन

* आदित्य कुमार, संस्थापक व सीईओ, क्यूबेरा
पर्सनल लोन हे कर्ज असते, ज्याच्यासाठी काहीही गहाण ठेवावे लागत नाही.
यामुळेच सुरक्षित कर्जाच्या तुलनेत याचे व्याज दर थोडे जास्त असतात. कर्ज
घेणाऱ्या व्यक्तिचा क्रेडिट स्कोअर, कर्ज फेडण्याचा इतिहास, उत्पन्न आणि त्याची
नोकरी या मापदंडांच्या आधारे निश्चित केले जाते की त्याला कर्ज द्यायचे की
नाही. पर्सनल लोनच्या पात्रतेशी निगडीत काही महत्वपूर्ण गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.

चांगला क्रेडिट स्कोअर
पर्सनल लोनसाठी चांगला क्रेडिट स्कोअर असणे ही पायाभूत गरज आहे. स्त्री
असो की पुरुष, कर्ज देण्याआधी कर्जदाता क्रेडिट स्कोअर पाहतो. दुसरीकडे
फायनान्शियल टेक्नोलॉजी (फिनटेक) युक्त स्टार्टअप कर्जदाता कंपन्या या
अटीवर थोडी सूट देत कमी क्रेडिट स्कोअर असलेल्यांनासुद्धा कर्ज देतात.
फिनटेक कर्जदाता केवळ क्रेडिट स्कोअर पाहत नाही, तर इतर मापदंडसुद्धा
वापरतात आणि अशाप्रकारे अर्जदारांना सबप्राईम क्रेडिट स्कोअरसोबत पर्सनल
लोन मिळण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा देतात.

कर्ज फेडण्याचा इतिहास

दुसरी महत्वाची लक्षात ठेवायची गोष्ट ही आहे की जेव्हा तुम्ही पर्सनल लोन
घेण्यासाठी जाल तेव्हा जुने कर्ज फेडल्याचा चांगला इतिहास असावा. एखाद्या
व्यक्तिचा रिपेमेंट इतिहास हा अतिशय महत्वाचा मापदंड आहे आणि

अर्जदाराच्या क्रेडिट स्कोअरमध्ये याचे सर्वात जास्त महत्व असते. अर्जदाराच्या
रिपेमेंट इतिहासामुळे कर्जदाराला त्याचे क्रेडिट बिहेवियर समजून घेण्यास मदत
होते, शिवाय त्याच्या कर्ज परताव्याची क्षमता लक्षात येते. ज्या महिला पर्सनल
लोनसाठी अर्ज करतात, त्यांच्या जुन्या कर्ज परताव्याच्या इतिहासाला सर्वात
जास्त महत्व मिळते.

कंपनीचे स्टेटस
कर्जाचा अर्ज मान्य वा अमान्य करणे खूप महत्त्वाचे असते. खाजगी बँक केवळ
त्याच व्यक्तींना पर्सनल लोन देतात, ज्या ‘ए’ अथवा ‘बी’ श्रेणीच्या कंपनीत
नोकरी करतात. ‘सी’ आणि ‘डी’ श्रेणी असलेल्या कंपनीत नोकरी करणाऱ्यांना
स्वीकारले जात नाही. असे यासाठी की खाजगी बँका क्रेडिट हेल्थची चौकशी व
कंपनीचे रिस्क प्रोफाईलिंग करतात आणि त्यांना त्यानुसार श्रेण्या ठरवतात.
खाजगी बँका या माहितीचा वापर हे जाणून घ्यायला करतात की अर्जदाराची
कर्ज परत करण्याची क्षमता कशी आहे. ‘सी’ आणि ‘डी’ श्रेणीतील कंपन्या नव्या
स्टार्टअप कंपन्या असतात, वा अशा असतात ज्यांच्याकडे पुरेसे नकदी खेळते
भांडवल नसते, म्हणून अशा कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांची कर्ज परत
करण्याची शक्यता कमी असते.
फिनटेक कर्जदाता आणि पी २ पी लँडिंग प्लॅटफॉर्मच्या बाबतीत कंपनीच्या
स्टेटसची फार पर्वा केली जात नाही आणि त्यानंतरच कर्ज देण्यात येते. म्हणून
जर तुम्ही महिला असाल आणि तुम्ही एखाद्या प्रतिष्ठित कंपनीत काम करत
नाही या कारणास्तव तुम्हाला कर्ज मिळत नसेल तर तुम्हाला फिनटेक कर्जदाता
अथवा पी २ पी लँडिंग प्लॅटफॉर्मकडे जायला हवे.

नोकरीचे स्थैर्य
वर्तमान संघटनेत तुम्ही किती वर्षांपासून नोकरी करत आहात, हा मुद्दासुद्धा
मापदंडामध्ये समाविष्ट आहे आणि कर्जाच्या स्वीकृतीला प्रभावित करतो.

कर्जदाता हे बघतात की एखाद्या अर्जदाराचा नोकरी करण्याचा रेकॉर्ड किती
स्थिर आहे आणि त्यानुसार मूल्यमापन केले जाते. म्हणून अनेक वर्षांच्या
नोकरीचा अनुभव हे स्पष्ट करतो की अर्जदार कमी जोखीम असणारा आहे
आणि म्हणून कर्ज स्वीकृत होण्याची शक्यता आपोआप वाढते.
कर्जाच्या रकमेचा वापर पर्सनल लोनमध्ये अनेक अॅप्लिकेशन्स समाविष्ट
असतात. एक महिला असल्याकारणाने तुम्ही कर्जाच्या रकमेचा वापर
कुटुंबासोबत आपल्या सुट्ट्या साजऱ्या करायला, मोठे लग्न, घराला नवे रूप
देण्याकरिता अथवा करियरमध्ये प्रगतीच्या हेतूने पुढील शिक्षण घेण्याकरिता करू
शकता.

एकसाथ अनेक कर्जदात्यांकडे जाऊ नका
लोकांना ही गोष्ट माहीत नसते, पण हा पैलू तुमच्या क्रेडिट स्कोअरवर वाईट
प्रभाव टाकू शकतो, कारण या कर्जादात्यांच्या मनात अशी प्रतिमा बनेल की
अर्जदार कर्जाचा लोभी आहे, ज्याचा परिणाम अर्ज नाकारण्यात होऊ शकतो. कर्ज
नाकारल्याचाही क्रेडिट स्कोअरवर वाईट परिणाम होतो आणि एकापेक्षा अधिक
नकार आल्यावर कर्ज मिळणे कठीण होते.

सहअर्जदाराचा पर्याय : हा खूपच चांगला निर्णय आहे. विशेषत: महिलांसाठी.
पर्सनल लोन घेताना सहअर्जदाराचा पर्याय निवडणे काही नवी गोष्ट नाही आणि
सगळया प्रकारचे कर्जदार मग खाजगी बँक असो वा फिनटेक, लॅण्डर असो, सगळे
या पर्यायाला अनुमती देत आहेत. सहअर्जदार असल्याने कर्ज फेडण्याचा भार
खूप कमी होतो. शिवाय पारदर्शकतेलाही उत्तेजन मिळते. सह अर्जदाराला गॅरंटर
निवडण्याबाबत आणखी एक चांगली गोष्ट ही आहे की प्रभावी क्रेडिट
स्कोअरशिवाय कर्ज मिळते. मात्र सहअर्जदाराचा क्रेडिट स्कोअर स्वीकारण्यायोग्य
असावा. विशेषत: नोकरदार, विवाहित महिलेसाठी सहअर्जदाराचा पर्याय निवडणे

खूपच फायदेशीर असू शकते. तरीही अर्जदार कर्ज फेडण्यात अयशस्वी झाला तर
सहअर्जदार कर्ज फेडण्याकरिता जबाबदार असेल.

जितके हवे त्यापेक्षा जास्त घेऊ नका
साधारणत: पर्सनल लोन घेणारे या चक्रात अडकतात. क्रेडिट स्कोअर, उत्पन्न
आणि कंपनीचे स्टेटस यांसारख्या मापदंडांच्या आधारावर कर्जदाता अर्जात
लिहिलेल्या रकमेपेक्षा खूप जास्त कर्ज देतात. महत्वाची गोष्ट ही आहे की
जितके तुम्हाला हवे तेवढेच कर्ज घ्या .

पगारदार असल्यामुळे
आजकाल कर्जदाता पगारदार आणि स्वयंरोजगारी दोन्ही प्रकारच्या लोकांना
पर्सनल लोन देण्याची ऑफर देत आहेत. पण फिनटेक कंपन्या आणि पी २ पी
लँडिंग प्लॅटफॉर्म अधिकांश पगारदार लोकांनाच कर्ज देण्याची ऑफर देतात.
म्हणून जर तुम्ही पगारदार महिला असाल आणि कमीतकमी कागदी व्यवहार
करत असाल आणि तुम्हाला लगेच आपल्या बँक खात्यात कर्जाची रक्कम
मिळवायची असेल तर हे तुमच्यासाठी जास्त सोपे आणि सुविधाजनक आहे.

हनिमून संस्मरणीयही बजेटमध्येही

* मोनिका अग्रवाल

लग्न एक सुंदर जाणीव आहे. पूर्वी लग्नानंतर एकमेकांना नीट समजून घेण्यासाठी हनिमून ट्रिपला जात असत. परंतु आता डेटिंगचे फॅड वाढल्याने कपल्स लग्नापूर्वीच एकमेकांचा स्वभाव, आवडीनिवडी असे एकमेकांबद्दल बरेच काही माहिती करून घेतात. आता हनिमूनची क्रेझ आहे ती फक्त एवढयाचसाठी की लग्नानंतरचे काही दिवस फक्त दोघांनीच एकमेकांसोबत एकांतात घालवावेत. मात्र हनिमूनसाठी एक चांगले ठिकाण शोधणे आणि फायनल करणे हे प्रत्येक कपलसाठी खूप मोठे काम असते.

त्या ठिकाणाबाबत जास्त माहिती नसल्यास ठिकाण निश्चित करायला बऱ्याच अडचणी येतात. पण आता काळजी करण्याची गरज नाही, कारण आम्ही तुम्हाला अशा काही ठिकाणांची माहिती देणार आहोत, ज्यांना हनिमूनसाठी जास्त पसंती मिळते. ही ठिकाणे तुमच्या खिशावर जास्त भार न टाकता तुमच्यासाठी गोड आठवणी ठरतील. या रोमँटिक आणि सुंदर ठिकाणी तुम्ही तुमची हनिमून ट्रीप अधिकच संस्मरणीय बनवू शकाल.

बर्फाचा कटोरा

बर्फाचा स्वर्ग म्हणून ओळखले जाणारे ऑली हे हनिमूनसाठी एक सुंदर ठिकाण आहे. ते बर्फाचा कटोरा म्हणूनही ओळखले जाते. मस्त वातावरण असलेले हे ठिकाण उत्तराखंडचा श्वास आहे. उन्हाळयात तुम्हाला येथे फुले पाहायला मिळतील. पण हिवाळयात तुम्ही येथे बर्फात खेळल्या जाणाऱ्या प्रत्येक खेळासोबतच स्नोफॉलची मजाही घेऊ शकता. याचे हेच वैशिष्टय तुमच्या हनीमूनची मजा द्विगुणित करेल. अशाच प्रकारचा रोमांचक अनुभव घेण्यासाठी तुम्ही उत्तर पूर्वेलाही जाऊ शकता.

वातावरणात असेल फक्त रोमांस

गोवा हनीमूनसाठी एक चांगला पर्याय आहे. येथील बीच तुम्हाला वेगळयाच वातावरणात घेऊन जातील. गोवा खूपच सुंदर ठिकाण आहे. पोतुर्गीजांच्या काळात बनवलेल्या जंगलात रात्री राहण्याचीही व्यवस्था आहे. शिवाय येथे रोमांस करण्याचा वेगळाच अनुभव घेता येईल.

रोमांसच नाही रोमांचही

रोमांसला रोमांचची फोडणी द्यायची असेल तर कपल्ससाठी कसौलीपेक्षा जास्त चांगले ठिकाण असूच शकत नाही. डोंगरांवर चालण्याची मजा आणि थंडीतील पहाडी जीवन तुम्हाला वेगळा अनुभव देईल. येथील अॅडव्हेंचर आणि रोमांसचे वातावरण तुमच्यासाठी परफेक्ट ठरू शकेल.

कसौली देशातील रोमँटिक डेस्टिनेशनपैकी एक आहे. येथील हिरवळ तुम्हाला आकर्षित करेल. येथे चहूबाजूला पाईन आणि देवनारची उंच झाडे आहेत. कसौली चंदिगड आणि शिमलाच्यामध्ये आहे. येथील अनोखे कॉटेज आणि इंग्रजांच्या काळातील चर्च कुणाचेही लक्ष वेधून घेतील अशीच आहेत.

अॅडव्हेंचर आवडत असेल तर ट्रेकिंग करता येईल. निसर्गप्रेमी असाल तर निसर्गाच्या कुशीत भटकंती करू शकाल. खरेदीची आवड असेल तर शॉपिंग करू शकाल आणि फूडी असाल तर खाण्याच्याही खूप व्हरायटी मिळतील.

जोडीदारासोबत रोमँटिक व्हायचे असेल तर कसौली उत्तम पर्याय आहे, कारण या सुंदर हिल स्टेशनवर आल्यावर तुमचे तन आणि मन दोन्ही प्रसन्न होईल.

वास्तूकलेचे अनोखे उदाहरण

जर तुम्ही पाँडेचरीला गेलात तर समजा की तुम्ही पॅरिसपेक्षाही उत्तम ठिकाणी गेला आहात. फ्रेंच स्टाइलमध्ये सांगायचे झाल्यास, पाँडेचरी तुमची वाट पाहात आहे. फ्रेंच बोलीभाषा, शानदार बीच, मार्केट आदी या ठिकाणाला एका वेगळया सौंदर्यासह सादर करतात.

निसर्गाच्या कुशीत हनिमून

निसर्गाच्या कुशीत हनिमूनचा आनंद घेणे तुमच्यासाठी एक वेगळा अनुभव ठरू शकेल. हो, आम्ही रणथंबोर नॅशनल पार्कबद्दलच बोलत आहोत. येथे तुम्ही वाघांसह असंख्य प्रजातींच्या पक्ष्यांनाही पाहू शकता.

परदेशी बेटापेक्षा कमी नाही

शानदार हनिमूनसाठी यापेक्षा उत्तम ठिकाण क्वचितच दुसरे असू शकेल. तुमचे प्रेम आणि रोमांस समुद्राच्या लाटांप्रमाणे येथे उफाळू द्या. तुम्ही साहसी असाल आणि सुंदर बीचेस तसेच लव बर्ड्ससोबत रोमांच अनुभवायचा असेल तर दमण आणि दीवचे बीच तुम्हाला खुणावत आहेत. हे ठिकाण तुमच्या जोडीदारासोबतच्या तुमच्या क्षणांना जास्तच रोमँटिक बनवेल. हे ठिकाण तुम्हाला एखाद्या परदेशी बेटासारखाच अनुभव देईल.

अल्लेप्पी

केरळमधील योजनाबद्ध पद्धतीने बांधलेल्या शहरांपैकी एक असलेल्या या शहरात जलमार्गाचे अनेक कॉरिडॉर आहेत. शांत रोमांससाठी अल्लेपीहून जास्त चांगले ठिकाण असूच शकत नाही. येथे मनाला शांतता लाभेल आणि जोडीदारात हरवून जाण्यासाठी वेळही मिळेल. खूपच सुंदर असलेल्या अल्लेप्पीत  पाण्याच्या मोहक छटा आणि मनमोहक हिरवळही अनुभवता येईल. येथे मार्केट आणि बीचही आहेत.

या गोष्टींकडेही लक्ष द्या

* तुम्ही हवाई प्रवास करत असाल तर काही एअरलाईन्स नवविवाहित दाम्पत्यांसाठी विशेष सवलती देतात. या सवलती किंवा ऑफर्सची माहिती करून घ्या आणि तिकिटे काही महिने आधीच बुक करा.

* हॉटेलसाठी कितीतरी वेबसाईट्स आहेत. यामुळे हॉटेल आधीच बूक करता येईल. हे स्वस्त ठरेल. एकाच परिसरात अनेक दिवसांची ट्रीप असेल तर एका हॉटेलमध्ये एका रात्रीपेक्षा जास्त वेळ राहायचा प्रयत्न करा. कारण अनेकदा असे पाहायला मिळते की बरीच हॉटेल्स एका रात्रीपेक्षा जास्त काळ वास्तव्य केल्यास चांगले डिस्काउंट देतात.

* हॉटेलची बुकिंग करतेवेळीच ब्रेकफास्ट, लंच, डिनरसारख्या सुविधा आहेत की नाहीत, याची संपूर्ण माहिती करून घ्या. बरीच हॉटेल्स ब्रेकफास्ट आणि डिनरचीच सुविधा देतात, कारण लंच टाईमला तुम्ही बाहेर असल्याने बाहेरच लंच करता. तरीही एकदा ऑफर नक्की माहीत करून घ्या.

* खायची ऑर्डर देताना एकदाच सर्व ऑर्डर देण्यापेक्षा थोडे थोडे मागवा. अनेकदा एवढे जास्त ऑर्डर केले जाते की पदार्थ आणि पैसे दोन्ही वाया जातात.

* लक्षात ठेवा की लंच पत्नीच्या आवडीचा असेल तर डिनर पतीच्या आवडीचा असावा. यामुळे खाणे आणि पैसे या दोघांचीही बचत होईल.

* प्रवासात कार्डद्वारे पेमेंट करा. यामुळे डिस्काउंट आणि मनी बॅकचाही फायदा मिळू शकेल.

बऱ्याचदा फिरायला जाताना पूर्ण वेळेसाठी टॅक्सी बूक केली जाते. मात्र, पूर्ण वेळेऐवजी दर दिवशी गरजेनुसारच टॅक्सी बूक करा.

कमी खर्चात विवाह

* सोमा घोष

विवाह आणि कमी खर्च हे ऐकताना कदाचित सर्वांना विचित्र वाटेल, परंतु आता विवाह समारंभात कमी खर्चाची पद्धत सुरू झाली आहे, कारण यामुळे वेळ आणि पैसा दोहोंचीही बचत होते. काही लोकांना हा विचार म्हणजे कंजुषी वाटू शकेल. कारण ते विचार करतात की लाकडी टेबलांवर सफेद कापड अंथरून कँडल लाइट करून आणि कमी लोकांना आमंत्रित करून लग्नाचा खर्च कमी केला जाऊ शकतो. परंतु असे मुळीच नाही.

कमी खर्चाच्या विवाहासाठी हे जरूरी नाही की आपण सर्व इच्छांना मुरड घालावी किंवा काही करूच नये. अर्थात, ज्या गोष्टी विवाहांमध्ये आवश्यक नसतात किंवा केवळ दिखाव्यासाठी असतात, त्या सोडून मुख्य गोष्टींवर लक्ष द्या. अशा प्रकारे केवळ थोडीशी समजदारी आणि योग्य प्लॅनिंगनेच आपण विवाहाला आपल्या मनाप्रमाणे व स्मरणीय बनवू शकता.

याबाबत वेडिंग प्लॅनर आशू गर्ग सांगतात की विवाह सर्वांसाठी स्मरणीय बनेल याचा मी नेहमी प्रयत्न करतो. कारण विवाहाचा खर्च व्यक्तिच्या बजेटनुसार झाला पाहिजे, जेणेकरून कोणालाही ओझे वाटणार नाही. हेच माझ्यासाठी आव्हान आहे. अशा वेळी या गोष्टींवर लक्ष देण्याची गरज असते :

डिटेलिंगवर लक्ष द्या

पीच कलरसोबत रेड आणि गोल्डनचा मेळ विवाहांमध्ये अनेक काळापासून आहे. वेडिंगमध्ये यांना खास महत्त्व असते. परंतु आता यामध्ये हलक्या आणि नैसर्गिक रंगांच्या मिश्रणालाही अधिक महत्त्व दिले जात आहे. यामध्ये तशाच कलाकृतींचे फर्निचर आणि रोपे त्यांची शोभा वाढवतात.

मोठमोठया वस्तू वापरून सजावट करण्याचा काळ आता लोटला. आता लोक आपल्या आवडीने घर किंवा विवाह मंडप सजवतात, ज्यात सजवणाऱ्याचे व्यक्तिमत्त्व आणि अभिरुची स्पष्टपणे दिसते. हे त्यांच्यासाठी एक आव्हान असते. यामध्ये दाम्पत्य बहुतेककरून बॉलीवूडच्या सजावटीचा आधार घेतात. त्यामध्ये डिटेलिंगवर जास्त भर असतो, जी बहुंताशी वेगवेगळया रंगांच्या कॉम्बिनेशनवर आधारित असते. जेणेकरून फोटो चांगले यावेत.

कमी खर्चातील विवाहांमध्ये सजावटीबरोबरच बहुतेक कपल्सची इच्छा असते की त्यांच्या सजावटीला एक छानसा लुक असावा. म्हणूनच डिटेलिंगबरोबरच छोटया-छोटया गोष्टींवरही स्वत: लक्ष देण्याची गरज असते. यामध्ये पाहुण्यांचे मनोरंजन प्राधान्याने असले पाहिजे. याबरोबरच स्टेज प्रेझेंटेशन, पाहुण्यांच्या टेबलांचा आकार गोल किंवा चौकोनी असावा आणि सिल्कचे रंगीत कापड त्यावर अंथरलेले असेल, जेणेकरून त्याला एक कोनीय व्ह्यू मिळेल.

डिझाइन मोठी दर्शवा

कमी खर्चातील विवाहांत बहुतेक लोक भिंतींवर कमी सजावट करतात. मात्र, प्रत्यक्षात एक चांगली थीम किंवा डिझाइनचा विचार करून, त्यालाच मोठया आणि कलरफूल पद्धतीने दाखविणे उचित असते. त्याचा केंद्रबिंदू विवाह असला पाहिजे. यामध्ये रंग आणि लाइटसपासून प्रत्येक बेसिक गोष्टीचा समावेश केला पाहिजे.

फ्लॉवर पॉवर

फुलांची सजावट आपल्या प्रत्येक लुकला सुंदर बनवते. आशु म्हणतात की फुलांच्या वेगवेगळया एक्सपेरिमेंट करून तुम्ही वैवाहिक परिदृश्य अधिक सुंदर बनवू शकता. फुलांचा वापर सजवण्यासाठी, नवरा-नवरीसाठी, सेंटर टेबल आणि भिंतीवरील डेकोरेशन इ. सर्व ठिकाणी काही ना काही रूपात करता येऊ शकेल. गेस्ट टेबल आणि भिंतींना सजवण्यासाठी जर कृत्रिम फुलांचा वापर केला गेला, तर खर्च अजून कमी होतो. याबरोबरच कलरफूल बेरी आणि स्ट्रबेरीजचाही सजावटीसाठी वापर करू शकता. त्यामुळे फ्रेश लुक दीर्घकाळ टिकून राहील.

नॅचरल लाइटिंग

प्रकाश योजनेला वेडिंगमध्ये खास स्थान आहे. जर ही योग्य पद्धतीने केली गेली, तर सिंपल आणि एलिगंट वेडिंगची जी कल्पना आपण केलेली आहे, ती गेस्ट आणि वेडिंग दोघांनी आकर्षक वाटते. नॅचरल लाइटिंग विवाहाचा खर्च नेहमी कमी करते. खरे तर ओपन हॉल, कोलोनियल, स्टाइल हॉल्स या मध्यम प्रकाशाच्या कॅफे स्टाईल इ. सर्व पारंपरिक आणि शिल्पकारीच्या पराकाष्ठेला व्यक्त करतात.

डिनर फिएस्टा

विवाहांमध्ये भोजन सर्वात महत्त्वाचे असते. त्यामध्ये संतुलित आहार असण्याबरोबरच त्याच्या गुणवत्तेवरही अधिक लक्ष देणे आवश्यक असते. मेनूची मोठी लिस्ट ठेवून पाहुण्यांना खूश करण्याची गरज नाही, कारण ते सर्व पदार्थांची चव घेण्यास असमर्थ असतात. पदार्थ साधे आणि गुणवत्तापूर्ण ठेवा. कारण आज लोकांचा क्वांटिटीऐवजी क्वालिटीवर अधिक भर असतो. यात सर्व्ह करण्यात थोडी कलात्मकता आणि स्नेह दाखवा, जेणेकरून त्यांना छान वातावरण लाभेल.

ट्रीट ओ ट्रीट

विवाहामध्ये आजकाल केक कापण्याची पद्धत आहे. अशा वेळी वेगवेगळया स्टाईलचे केक याची शोभा वाढवतील. यामध्ये आपण आपली कलात्मकता वापरून त्याला आणखी सुंदर बनवू शकता. आवश्यकता असेल तेव्हा तर काही फुलांनी याची शोभा आणखी वाढवता येईल.

पेहराव असावेत अविस्मरणीय

हेवी एम्ब्रॉयडरीचे गाउन्स आणि लहंग्याचा काळ आता मागे पडला आहे. अशावेळी स्टाइलिश आणि सुंदर दिसणाऱ्या गाउन्सला आज मागणी आहे. आजकाल कपल्स आरामदायक आणि क्लासिक ड्रेस परिधान करणे पसंत करतात, ज्यामध्ये कट्स आणि प्लीट्सवर लक्ष देणे आवश्यक असते. लहंगाचोली किंवा साडी, सिल्क किंवा शिफॉनच्या कपडयावर मनपसंत रंगानुसार चांगले नक्षीकामच वेडिंगला सुंदर बनवतात. त्याचबरोबर सफेद लिलीचा बुके किंवा केसांमध्ये फुले माळल्याने वधू एखाद्या सुंदर मूर्तीप्रमाणे दिसते. दागिने गरजेनुसार घेतले पाहिजेत आणि त्यामध्ये नथ, बाजूबंद आणि कंबरपट्टयाचा समावेश करायला विसरू नका.

कार्ड हॅकिंगबद्दल सावधगिरी बाळगा

* ममता सिंह

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये हजार आणि पाचशेच्या नोटा बंद झाल्यावर लोकांना एटीएम आणि बँकांच्या बाहेर रांगा लावाव्या लागल्या. रोख रकमेच्या कमतरतेमुळे दैनंदिन आयुष्यातील गरजा भागवणं कठीण झालं. अशावेळी ऑनलाइन बँकिंग आणि कार्डद्वारे होणारे व्यवहार वरदान ठरले. पेट्रोल पंपपासून किराणा मालाच्या खरेदीपर्यंत दुकानदारांनी कार्डद्वारे खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. बिल भरण्यासाठी ऑनलाइन बँकिंगची मदत झाली. या कॅशलेस व्यवहारांमध्ये जितका फायदा असतो, तितकीच जोखीमही असते. कारण यावर कार्ड आणि बँक अकाउंट हॅकिंगची टांगती तलवार कायम असेल. त्यामुळे कॅशलेस व्यवहारांमध्ये थोडा जरी हलगर्जीपणा झाला तर त्याची मोठी किंमत मोजावी लागू शकते.

हॅकिंग म्हणजे काय?

ऑनलाइन किंवा कार्डने करण्यात येणाऱ्या व्यवहारांमध्ये बऱ्याचदा हॅकर्स फेक वेब पेज आणि कम्प्युटर व्हायरसद्वारे क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड डिटेल किंवा ऑनलाइन पासवर्ड चोरतात. याला हॅकिंग म्हणतात. अकाउंट आणि कार्ड डिटेलचं हॅकिंग करून हॅकर्स लोकांच्या बँक खात्यांमधून ऑनलाइन चोरी करतात.

नजर ठेवून असतात हॅकर्स

२०१६ मध्ये देशात बऱ्याच प्रमुख बँकांचे ३२ लाख कार्ड डिटेल्स हॅक झाले होते. यावर तात्काळ पावलं उचलत बँकेने सर्व ग्राहकांचे एटीएम कार्ड्स ब्लॉक केले. दोन आठवड्यांच्या आत सर्व ग्राहकांना नवीन एटीएम कार्ड्स देण्यात आले. पिन बदलेपर्यंत बँकांनी या खात्यांमधून पैसे काढण्याची मर्यादा प्रतिदिन ५००० रुपये केली होती. देशविदेशातील हॅकर्स कायम यावरच लक्ष ठेवून असतात की, कधी ग्राहकांच्या हातून चूक होतेय आणि त्यांना याचा फायदा करून घेता येतोय. यामुळेच नेटबँकिंग आणि कार्डद्वारे करण्यात येणाऱ्या व्यवहारांमध्ये सतर्कता बाळगणे आवश्यक आहे.

कार्ड किंवा अकाउंट हॅक झालं तर काय कराल?

सायबर लॉ एक्सपर्ट पवन दुग्गल यांच्या सांगण्यानुसार कॅशलेस व्यवहाराच्या वाढत्या प्रमाणासोबतच हॅकिंगच्या घटनाही खूप सामान्य झाल्या आहेत. त्यामुळे अकाउंट किंवा कार्ड हॅक झाल्यास तात्काळ काळजी घ्या आणि पुढील गोष्टी करा.

* हॅकिंगची माहिती तात्काळ बँकेला द्या आणि कार्ड ब्लॉक करण्यास सांगा.

* तुम्ही बाहेर असाल तर संबंधित बँकेच्या कस्टमर केअर नंबरवर कॉल करून आपले कार्ड ब्लॉक करण्यास सांगा.

* बँकेला सूचना देऊन आपले कार्ड आणि नेटबँकिंग बंद करा.

* पोलिसांना याची लेखी तक्रार द्या.

* यादरम्यान स्वत: व्यवहार करण्यासाठी चेकचा वापर करा.

* ज्या बँक खात्याचा वापर तुम्ही नेटबँकिंग किंवा कार्डद्वारे व्यवहार करण्यासाठी करता त्यामध्ये जास्त पैसे ठेवू नका.

* क्रेडिट कार्ड होल्डर असाल तर क्रेडिट लिमिट कमी ठेवा, जेणेकरून हॅकिंगच्यावेळी कमीत कमी नुकसान होईल.

बँक करेल भरपाई

हॅकिंगमुळे झालेलं ग्राहकाचं नुकसान भरून काढण्याची जबाबदारी बँकेची असते. जर हॅकिंगमुळे ग्राहकाचं दहा हजार रुपयांचं नुकसान झालं असेल तर ग्राहक बँकेकडे तेवढ्याच रकमेची मागणी करू शकतो. पण त्यासाठी तुमच्याकडे बँकेच्या निष्काळजीपणामुळेच नुकसान झालं हे सिद्ध करणारे पुरेसे साक्षीदार असावे लागतील. बऱ्याचदा ग्राहकांना याची माहिती नसते. त्यामुळे ते हॅकिंगमुळे झालेलं नुकसान भरून देण्याची मागणी बँकेकडे करत नाहीत.

सावधगिरी बाळगा

कार्ड किंवा नेटबँकिंगचा वापर करताना सावधगिरी बाळगा. तुम्ही चुकूनही कधी आपले नेट बँकिंग डिटेल, १६ अंकी कार्ड नंबर, कार्ड व्हॅलिडिटी अवधी आणि कार्डच्या मागे असलेला ३ अंकी सीव्हीव्ही नंबर कोणाला सांगितला तर ती व्यक्ती तुमची सगळी कमाई लुटू शकते.

* आपला एटीएम पिन वेळोवेळी बदलत राहा. हे काम तुम्ही कोणत्याही एटीएममध्ये जाऊन करू शकता.

* कोणत्याही कस्टमर केअरमधून फोन करून कोणीही कार्ड डिटेल विचारत असेल तर त्या व्यक्तिला डेबिट किंवा क्रेडिट कार्डचे डिटेल्स सांगू नका.

* लक्षात ठेवा बँक कधीही कोणत्याही ग्राहकाकडून कार्ड डिटेल किंवा पासवर्ड मागत नाही.

* आपला मोबाइल नंबर आपल्या खात्याशी जोडा. त्यामुळे तुमच्या खात्यातून पैसे काढल्यास तुम्हाला तात्काळ मेसेज येईल.

* दर ३ दिवसांनी आपले बँक स्टेटमेंट तपासा. आजकाल या सर्व सेवा ऑनलाइन असल्यामुळे तुम्ही कधीही माहिती मिळवू शकता.

* केवळ आपल्या कार्यालयातील किंवा खासगी संगणकाद्वारेच आर्थिक व्यवहार करा. या दोन्ही ठिकाणी अॅन्टीव्हायरस असेल. दोन्ही सर्व्हर सुरक्षित असतील.

* सायबरमध्ये जाऊन नेट बँकिंग किंवा कार्डद्वारे व्यवहार करणं टाळा. अशा ठिकाणी हॅकिंगचा धोका अधिक असतो.

* आपला नेटबँकिंग पासवर्डही २-३ महिन्यांनी बदलत राहा.

* तुम्ही न केलेल्या व्यवहाराचा मेसेज जर तुमच्या मोबाइलवर आला तर तात्काळ बँकेला कळवा.

* अशावेळी आपल्या कार्डाद्वारे किंवा नेटबँकिंगद्वारे होणारी देवाणघेवाण थांबवा.

* बऱ्याचदा तुम्हाला लॉटरी लागल्याचे इमेल्स येतात. ते पैसे तुमच्या खात्यात जमा करण्यासाठी तुमच्या खात्याची माहिती मागितली जाते. असा इमेल्सना उत्तर न देता ते डिलीट करा.

लिव्हिंग रूममधील आरामदायी आसन व्यवस्था

* श्री.महेश एम., सीईओ, क्रिएटिसिटी

आपण एखाद्या घरात प्रवेश करतो, तेव्हा कोणती गोष्ट सर्वप्रथम आपले लक्ष वेधून घेते? ते समोरच्या भिंतीवरील जतन करून ठेवलेले दुर्मिळ पेंटिंगही नसते किंवा टाइल्स आणि त्यावरील कार्पेट. ती लक्ष वेधून घेणारी गोष्ट असते सोफा. तो सोफाच हे ठरवतो की ती त्या जागेमध्ये एखाद्याला किती आरामशीर वाटू शकते. फर्निचर आणि होम डेकोरच्या संभाव्य खरेदीदारांशी झालेल्या संवादामधून आणि दशकाहून अधिक काळची त्याची पसंती आणि सवयींच्या निरीक्षणावरून आमच्या असे लक्षात आले आहे की योग्य सोफ्याची खरेदी ही आजवर अत्यंत दुय्यम आणि त्यामुळेच सर्वात कठीण आव्हान आहे.

सोफ्याची डिझाइन

सोफ्याची अंतिम निवड करताना एखाद्याला नेमक्या कोणत्या प्रक्रियेतून जावे लागते, हेही जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रथमत: आपल्या लिव्हिंग रूमला कसा लुक मिळायला हवा, हे ठरवणे महत्त्वाचे ठरते. क्लासी ते कंटेम्पररीपासून सोफ्याच्या डिझाईन्समध्ये ही क्षमता असते की ते एखाद्या व्यक्तीला पूर्णपणे गोंधळात टाकू शकतात. हे वास्तव आपण समजून घेण्याची गरज असते की सोफ्यामध्ये अशी क्षमता असते की तो खोलीचा लुक आणि फील निश्चित करू शकतो. साहजिकच सोफ्याच्या डिझाइनची निवड ही त्या खोलीच्या एकंदर वातारवरणाशी सुसंगत आणि सोबतच त्या सोफ्यावर बसल्यानंतर माणसांची मान, पाठ आणि पायांनाही आरामदायी ठरेल. अशा प्रकारची असायला हवी. याव्यतिरिक्त आणखीही काही गोष्टींबाबत माहिती घेतली पाहिजे. ती म्हणजे मटेरिअल कोणते आहे. आर्म रेस्ट कशी आहे. डायमेन्शन्स हे त्या खोलीला आणि तुमच्या व्यक्तिमत्त्वाशी अनुरूप ठरतात की नाही.

बजेटनुसार पर्याय

पुढील टप्पा आहे तो म्हणजे, आपले बजेट. बाजारपेठेमध्ये बजेटनुसार अनेकानेक पर्याय उपलब्ध असतात. त्यामुळे सोफ्यासाठी आपण किती खर्च करणार आहोत, याबाबत आपल्या मनामध्ये अत्यंत स्पष्टता असायला हवी. हे अशासाठी की ‘पॉकेट फ्रेंडली’ या शब्दाचा अर्थ प्रत्येक खरेदीदारानुसार बदलत असतो. कुटुंबाचा आकार हादेखील सोफ्याची निवड करतानाचा तितकाच महत्त्वाचा निकष असतो. जर तो ३+२ असेल तर मग त्याची लांबी किती असणार? तो खोलीमध्ये खूपच मोठा वाटेल का? एखाद्या कुटुंबाच्या दृष्टीकोनातून विचार केला तर हे असे अनेक प्रश्न सुयोग्य उत्तर मिळवण्यासाठी उपयुक्त ठरतात.

याशिवाय सोफ्याच्या कार्यक्षमतेविषयी किंवा उपयुक्ततेविषयी स्पष्टता असणे आवश्यक असते. जो आराम त्या सोफ्यामुळे मिळतो, जेवढा वेळ आपण सोफ्यावर घालवतो यासारखे इतरही काही मुद्दे हे आपल्याला त्या सोफ्याची उपयुक्तता ठरविण्यासाठी सहाय्यभूत ठरतात. पर्यायवरणीय परिस्थिती लक्षात घेता सोफ्यासाठी वापरले जाणारे साहित्य ठरवता येते, जसे की धूळ नसलेले वातावरण असेल तर कुणीही सहजपणे फॅब्रिक सोफ्याची निवड करू शकतो. त्या कुटुंबाची पसंती, वापर आणि पर्यावरण या अनुषंगानेही लेदर, हाफ लेदर उदा. पर्यायही उपलब्ध असतात.

सोफा खरेदी करण्यापूर्वी

सर्व प्रकारच्या निकषांचा विचार हा सोफा खरेदीचा निर्णय घेण्यापूर्वीच करायला हवा. शिवाय खरेदीचे ठिकणही सर्वसमावेशी अशाच प्रकारचे असावे. सोफा अर्थ म्हणजे, कोणी सोफ्याचे अनेक प्रकार असलेले ठिकाण निश्चित करेल. ज्यामधून सर्जनशीलतेला बळ मिळेल. तर कोणी घराचा विचार करेल. वैविध्यापेक्षाही त्या उत्पादनाचा ‘टच अॅन्ड फिल’ हादेखील महत्त्वाचा घटत असू शकतो. म्हणून ऑर्डर देण्यापूर्वी गरजेची असलेली सर्व महिती नीट तपासून घेतली पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, योग्य त्या सोफा खरेदी करण्यापूर्वी सर्व टीप्सचा विचार केला तर तो व्यवहार पूर्ण होण्यास मदत होऊ शकेल. म्हणूनच कोणी युरोपियन, अमेरिकन, एशियन, किंवा भारतीय शैलीच्या सोफ्यांना पसंती देत असेल तर त्यांनी सर्व घटकांचे मिश्रण असलेल्या ठिकाणाची काळजीपूर्वक निवड केली पाहिजे.

सोफ्याची देखभाल

योग्य सोफ्याची निवड केल्यानंतर त्याची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे असते. व्यावसायिकदृष्ट्या सोफ्याची काळजी घेणाऱ्या व्यक्तीने, कंपनीची सेवा घ्यायला हवी. जेणेकरून सोफ्याची स्वच्छता आणि चकाकी उपयुक्तता टिकून राहू शकेल. हे नेहमी लक्षात ठेवायला हवे की सोफा हा एखाद्याच्या घरातील लिव्हिंग रूममधील कम्फर्ट तर दर्शवतोच, शिवाय एखाद्या कुटुंबाच्या व्यक्तिमत्त्वाचेही प्रतिबिंब दाखवतो. घराची देखभाल ठेऊ शकणारे आणि घरापर्यंत येऊन सेवा देऊ शकणाऱ्या ‘शॉपिंग डेस्टिनेशन’ची निवड आपण करणेही महत्त्वाचे असते. जर या सगळ्या गोष्टी ध्यानात घेतल्या तर आपल्या सोफ्याची देखभाल करण्याची काही काळजी करावी लागत नाही.

पुण्याची बाजारपेठ ही एकल कुटुंब पद्धतीच्या रचनेसह वेगाने वाढत आहे. शिवाय रिअल इस्टेट आणि स्थलांतरीत लोकसंख्येमुळे होम फर्निचर खरेदीमध्ये मोठीच वाढ दिसून येत आहे. आज फर्निचर खरेदी ही अनुकूल जागेच्या दृष्टीकोनापेक्षाही त्या उत्पादनाचा दर्जा आणि त्या उत्पादनाचे प्रेरणादायी मूल्याहून अधिक म्हणजे डिझाईन आणि सौंदर्य यासह काहीसे पण क्वर्की नाविन्यपूर्णतेवर भर देणारी अशीच आहे.

म्हणूनच आजच्या काळात कोणाही सहजपणे त्यांच्या सोफ्यावर आराम करत नितांत राहू शकतो.

नववर्षात आनंदी जीवन जगण्याची २० सुत्रं

* सोमा घोष

यशस्वी आणि आनंदी जीवन सर्वजण जगू इच्छितात, पण कोणीही जीवनातील चढउतारांना सामोरं न जाता हे जगू शकत नाही, कारण जीवन आहे म्हटल्यावर नकारात्मकता तर येणारच. जरूरी नाही की हरक्षणी तुम्हाला सफलता मिळेल वा आयुष्यात कायम तुम्ही सुखी राहाल. जीवनातील कोरोनाच्या महामारीच्या अशा कठिण परिस्थितीमध्ये ताळमेळ कायम राखणं खूप जरूरी असतं. हा समतोल मेंदू आणि शरीराच्या माध्यमातूनच राखला जातो, पण कसा? नवीन वर्ष २०२१ येत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो अशी २० सुत्रं, ज्यांचा अवलंब करून तुम्हीही आनंदी अन् सुखी जीवन जगू शकता.

  1. जीवन आपल्याला जगायच्या अनेक संधी उपलब्ध करून देते, ज्यांना जीवनात योग्य प्रकारे उतरवून व्यक्ती पुढे जाऊ शकते. जर काही कारणामुळे ही संधी हातून निसटली, तर निराश व्हायची गरज नाही. कारण यामुळे पुढे येणारी संधी तुम्ही गमावू शकता, नेहमी आपले लक्ष वर्तमानावर ठेवा.
  2. स्वत:साठी जगा, इतरांसाठी नाही. स्वत:वर प्रेम करा, तुम्हाला तुमचा आनंद कशात आहे हे ठरवावे लागेल. स्वत: वर प्रेम करणाराच दुसऱ्यावर प्रेम करू शकतो.
  3. आपल्या कुटुंबीयांना आणि मित्रांना समजून घ्यायचा प्रयत्न करा. त्यांच्यासोबत चांगला वेळ घालावा. एखाद्या सण किंवा आनंदी प्रसंगी त्यांच्यासोबत राहण्याचा प्रयत्न करा.
  4. एखाद्याबाबत गैरसमज झाला असेल तर तो एकत्र बसून दूर करा, कारण जोशात येऊन आपण बोललेले एखादे वाक्य इतर कोणाच्या मनाला लागू शकते.
  5. आयुष्यात नेहमी काही नवे शिकण्याचा प्रयत्न करा, शिकणे थांबवले तर तुम्ही इतरांपेक्षा खूप मागे पडू शकता.
  6. आपल्या ज्ञानाचा अहंकार बाळगू नका. एखाद्याला जर काही जाणून घ्यायची इच्छा असेल तर त्याला मदत करा आणि त्या मोबदल्यात काही मिळावे असा प्रयत्न करू नका.
  7. जर एखादी व्यक्ती तुम्हाला नावे ठेवत असेल, तर त्याच्यापासून दूर राहिलेलेच बरे. शक्य असेल तितकं त्याच्या चुका माफ करा.
  8. जर काही समजवायचे असेल तर योग्य प्रकारे संवाद साधून समजावण्याचा प्रयत्न करा.
  9. जीवन सोपे नसते. नकारात्मकता तुमच्या सभोवताली कायम असली तरी त्यातही सकारात्मकता शोधा.
  10. आयुष्यात लोकांना महत्व द्यायला शिका. मजबूत नातीच तुमच्या मनाला स्वस्थ आणि मजबूत बनवतात, ज्यात आईवडील, सख्खे नातेवाईक आणि मित्रपरिवाराने सहभागी होणे खूप जरूरी आहे. पण योग्य मित्रांची निवड करणे खूप मह्त्वाचे असते. जर मित्र योग्य असतील तर ते तुमचे आयुष्य आनंदाने भरून टाकतील. पण विश्वासघातकी आणि अप्रामाणिक मित्र तुमचे जीवन खराब करु शकतात.
  11. आपल्या भूतकाळातून बाहेर पडून वर्तमानकाळात जगायचा प्रयत्न करा टीकेचा सामना करण्याची क्षमता बाळगा.
  12. चूका स्वीकारायचे धैर्यसुद्धा दाखवा आणि त्यातून शिका. कोणाला त्यासाठी जबाबदार ठरवू नका.
  13. ऐकण्याची क्षमता वाढवा, यामुळे तुम्हाला कोणत्याही समस्येचे समाधान लवकर शोधता येईल.
  14. धन तुम्हाला आनंद देते, पण त्याने आपल्या आनंदाचे आकलन करू नका. मेहनत आणि कमिटमेंटने केलेले प्रत्येक काम धन घेऊन येते.
  15. गरजूंना मदत करण्याचा प्रयत्न करा.
  16. आपल्या शारीरिक स्वास्थ्याकडे नवीन वर्षात लक्ष ठेवा. जर एखादा आजार तुमच्या आसपास असेल तर त्यासाठी नियमित शारीरिक चर्चा आणि औषधांचे सेवन करा, कारण स्वस्थ शरीरातच स्वस्थ मानसिक अवस्थेचा वास असतो.
  17. जीवनाच्या वेगासोबतच आपल्या शरीराला आराम द्यायची गरज असते, यासाठी व्यस्त दिनचर्येतून थोडा वेळ काढून आपल्यासाठी ठेवा आणि त्यात जे तुम्हाला आवडेल, ते करायचा प्रयत्न करा.
  18. अनेक जण रोजच्या व्यस्त आयुष्यात आपले छंद विसरून जगत असतात, त्यांनी आपले छंद पूर्ण करायला वेळ नक्कीच काढावा, जेणेकरून तुम्हाला आनंद मिळेल आणि जीवनातील नीरसता नाहीशी होईल.
  19. जीवन खूप किचकट असल्यामुळे नकारात्मकता तुमच्या आसपास नेहमी असते. अशावेळी योग्य मार्ग निवडणे कित्येकदा कठीण असते. लोक तुम्हाला सकारात्मक विचार करण्याचा सल्ला तर देतात, पण त्यातून सहीसलामत बाहेर पडणे कठीण असते. अशावेळी एखाद्या तज्ज्ञाचे मत घेणे काही वाईट नाही.
  20. अधिकाधिक हसायचा प्रयत्न करा, यामुळे तुमचे जीवन खूप प्रमाणात सोपे होईल. काही लोक सकाळी उठून ५ मिनिटं हसत राहतात, असे केल्याने दिवस छान जातो.

डेस्टिनेशन वेडिंग – विवाहसोहळा बनवा अविस्मरणीय

* गरिमा पंकज

डेस्टिनेशन वेडिंग म्हणजेच वेडिंगच्या वेळी संपूर्ण धमाल-मस्ती आणि रोमांचक क्षण. आजकाल सेलिब्रिटी असोत किंवा सामान्य माणसे सर्वजण आपल्या विवाहाच्या क्षणांना स्मरणीय आणि आनंदी बनविण्यासाठी डेस्टिनेशन वेडिंगची निवड करतात.

अलीकडेच चित्रपट अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहलीचे डेस्टिनेशन वेडिंग खूप चर्चेत होते. विवाहसोहळा इटलीमध्ये संपन्न झाला होता. आपला खास मित्रपरिवार आणि कुटुंबीयांना सहभागी करून, फेअरी टेल थीमनुसार त्यांनी आपले सात फेरे स्मरणीय बनविले.

वेडिंग कन्सल्टंट आणि मेकओव्हरच्या क्षेत्रात नाव कमावलेल्या आशमीन मुंजालने नुकतेच आपली मुलगी ऐनी मुंजालसह मिळून वेडिंग आपल्या व्हेंचर स्टार्सट्रक वेडिंगची सुरुवात केली आहे.

वेडिंग डिझायनर म्हणून आशमीन मुंजाल सांगते की डेस्टिनेशन वेडिंगचा अर्थ, आपले घर आणि शहरापासून दूर (कमीतकमी १०० मैल) एखाद्या सुंदर ठिकाणी जाऊन विवाहसोहळयाचा कार्यक्रम संपन्न करणे. इथे वर-वधू आपले कुटुंब, निवडक नातेवाईक आणि मित्रांसोबत ३-४ दिवस क्वालिटी टाइम घालवतात. कधी काळी पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याचा हा प्रयत्न असतो.

थीमवर आधारित डेस्टिनेशन वेडिंग

डेस्टिनेशन वेडिंग कोणत्या ना कोणत्या विशिष्ट थीमवर आधारित असते. विवाहाच्या वेगवेगळया कार्यक्रमांसाठीही वेगवेगळ्या थीम निवडल्या जाऊ शकतात. काही मुख्य थीम आहेत- हवाईन थीम, बॉलीवूड थीम, रजवाडा आणि मोगल थीम, फेयरी टेल थीम, जंगल बुक थीम, वॉटर, कोरल आणि रेड कारपेट थीम.

लोकेशनची निवड

आपली इच्छा असेल तर आपण शहराच्या आजूबाजूच्या लोकप्रिय लोकेशनची निवड करू शकता. उदा. गोवा, केरळ, जयपूर, आग्रा, उदयपूर वगैरे किंवा मग परदेशी लोकेशन्स उदा. मॅक्सिको, हवाई, युरोप, दुबईसारख्या ड्रीम प्लेसेसपैकी एखादे स्थान, जे आपल्या बजेटमध्ये असेल, त्याची निवड करू शकता.

आशमीन सांगते की डेस्टिनेशन वेडिंगचा अर्थ असा नव्हे की, तुम्हाला तुमचा खिसा जास्त सैल करावा लागेल. आपण प्रत्येक बजेटमध्ये आपल्या मनपसंत विवाहाचा आनंद घेऊ शकता.

२ लाखांपेक्षा कमी बजेट असेल तेव्हा : फालतू खर्च न करता आपण कमी बजेटमध्येच जास्तीतजास्त रोमांचक विवाहसोहळयाचा आनंद लुटू शकता.

वेन्यू : आजूबाजूचे बँक्वेट हॉल, फार्म हाऊस, कमी बजेटमधील व्हिला इ. खूप पर्याय असतात. जिथे जास्त सजावटीचीही आवश्यकता नसते. रात्रीऐवजी दिवसा विवाहसोहळा पार पाडला, तर विजेचा खर्च वाचविता येऊ शकतो. गरमीच्या दिवसांत संध्याकाळच्या वेळी ओपन एरियामध्ये विवाहाचा कार्यक्रम ठेवून वायफळ तामझम टाळता येऊ शकते.

सजावट : सजावटीचे काम खऱ्या फुलांऐवजी कृत्रिम फुलांनीही करता येऊ शकेल. यात पैसे कमी लागतील आणि शोभाही वाढेल. अशा प्रकारच्या सजावटीसाठी रिबन, गोटा, पेपरवॉल, ग्लास फ्लॉवर, आर्टिफिशयल प्लांट इ. चा वापर करून कमी खर्चात सुंदर दृश्य साकार केले जाऊ शकते.

कॅटरिंग : मांसाहाराऐवजी शाकाहारी जेवण कमी किंमतीत तयार होते. शाकाहारी जेवणात अनेक व्हरायटी मिळतात.

ढोलासोबत डीजे : डीजे महागडा असावा, हे आवश्यक नाही. राजस्थानी थीम घेतली, तर ढोल-टाळांच्या साथीने उत्तम संगीताचा आनंद घेता येऊ शकेल.

थीम : राजस्थानी थीम घेतला, तर प्रत्येक प्रकारचा खर्च कमी करता येईल. उदा. पाहुण्यांना बसण्यासाठी सोफे, खुच्यांएवजी चौरंग आणि झोपाळयांचा वापर होतो. पाहुण्यांसाठी पगडया भाडयाने घेता येऊ शकतील. साडया आणि लहंगाचोळीही भाड्याने मिळते. जयपुरी थीमनुसार वधुचा लहरिया लेहंगासुद्धा जास्त महाग नसतो. दागिनेही आर्टिफिशल वापरता येतील.

व्हिडीओग्राफी : आठवणी जपून ठेवायच्या असतील तर व्हिडीओग्राफर आणि कॅमेरामॅन विवाहसोहळयातील आवश्यक व्यक्ती आहेत. हे कामही कमी खर्चात होऊ शकते. विवाहाच्या दिवशीच सिंपल व्हिडीओग्राफी करता येऊ शकेल. यामुळे प्रीशूटचा खर्च वाचू शकतो.

३० लाखांपर्यंतचा विवाहसोहळा

३० लाखांच्या विवाहसोहळयात आपल्याकडे खूप पर्याय असतात. आपण आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करू शकता.

वेन्यू : आपली इच्छा असेल तर आपण जवळपास २०० लोकांसाठी मानेसर, अलवर, जयपूर, दिल्ली, एनसीआरमध्ये फार्महाउस, फाइव्ह स्टार हॉटेल वगैरे बुक करू शकता.

थीम : आपण मोगल थीम, व्हिक्टोरियन थीम, इटालीयन थीम इ.ची निवड करून लॅविश अरेंजमेंटचा आनंद घेऊ शकता. थीमनुसारच आपल्याला जेवणही सर्व्ह केले जाईल.

वेगवेगळया फंक्शनमध्ये वेगवेगळे थीम प्ले होऊ शकतात. मॅजिकल अलादीन नाइट, बॉलीवूड नाइट, ओम शांति ओम, इटालियन हवाईन, एंजिल्स अँड डेव्हिल्स, फ्रेंचवीरा यांसारख्या अनेक थीम आहेत. त्यांचा आनंद घेता येऊ शकेल.

वाटल्यास वर-वधुचा ड्रेस जोधा-अकबर स्टाईलमध्ये ठेवता येऊ शकेल.

कॅटरिंग : आपण एवढया बजेटमध्ये व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकारचे भोजन अनेक व्हरायटींसह ठेवू शकता.

पैसा खर्च करून वेडिंगची इच्छा असेल, तर आपण थायलँड, मॉरिशस, दुबई, मॅक्सिको, इटली, स्वित्वझर्लंड यांसारख्या ठिकाणी लॅविश अरेजमेंट करून, आपल्या मनातील इच्छा पूर्ण करू शकता.

या विवाहांमध्ये आपण सिंगर्स, टेलिव्हिजन स्टार्स, मॉडेल्स, बॉलीवूड स्टार्सपासून ते इतर सेलिब्रिटीजनाही गेस्ट म्हणून किंवा परफॉर्मर म्हणून बोलावू शकता.

सिक्युरिटीपासून ते गेस्ट हँडलिंग, व्हिडीओग्राफी, प्रीवेडिंग शूट आणि मिडियामध्ये प्रचार इ. सर्व जबाबदाऱ्या वेडिंग प्लॅनरच्या असतात.

युनिक वेडिंग टिप्स

आपण नेहमी अशा विवाहसोहळयाचे स्वप्न पाहतो, जो कायम आपल्या आठवणीत राहील. मॅरेज एक्सपर्ट शिजिनी चावला सांगते की काही सोप्या पद्धती आपल्या विवाहसोहळयाला स्पेशल बनवतील.

निमंत्रणपत्रिका : लग्नामध्ये रचनात्मक निमंत्रणपत्र आजच्या काळाची मागणी आहे. मखमली कागदाचे गोल्डन कार्ड्स आता बोरिंग झाले आहेत, ज्यामध्ये केवळ आपल्या उपनावांची स्पेलिंग लिहिलेली असते. अशा प्रकारच्या कार्ड्समध्ये कपलच्या नावाशिवाय त्यांच्याबद्दल काहीही लिहिलेले नसते. व्यवहारिकदृष्टया हे काम एक एसएमएस पाठवूनही होऊ शकते.

थोडे रचनात्मक बना : आपल्या निमंत्रणपत्रात याबाबतही माहिती द्या की आपण कोण आहात. आपल्या होणाऱ्या जीवनसाथीमध्ये काय स्पेशल आहे, कार्डमध्ये एक छानशी कविता टाकून त्याची किंमत वाढवा.

आपली कहाणी सांगा : आपण विवाहस्थळाचे प्रवेशद्वार किंवा मग सर्व ठिकाणी स्क्रिन, फोटो फ्रेम्स टांगू शकता. त्यामध्ये एकापाठोपाठ एक येणारे फोटो असू शकतात. हे मोठया स्क्रिनवर बॉलीवूड गाण्यावर चालणाऱ्या शो रीळपेक्षा उत्तम असेल.

पाहुण्यांचे स्वागत अविस्मरणीय बनवा : आपले पाहुणे जेव्हा विवाहस्थळाच्या ठिकाणी प्रवेश करत असतील, तेव्हा त्यांचे वय, लुक, ड्रेस इ. वर आधारित काही मस्त व खास गाणी वाजवा. त्यांना खास अनुभव द्या.

मंडपाचे डिझाइन : मंडपही स्पेशल असला पाहिजे. याला फ्लोरल लुक देऊ शकता किंवा मंडपाच्या भिंतींवर कपल्सचे फोटो लावू शकता.

मेंदी : आपल्या मेंदीमध्ये काहीतरी वेगळे करा. आपल्या पारंपरिक मेंदीबरोबरच पाहुण्यांसाठी नेल आर्ट आणि हँड आर्टबरोबरच मेंदी लावा.

पेहराव : विवाहांमध्ये लाल ब्रायडल लेहंगा आणि क्रीम शेरवानी सामान्य पेहराव आहे. आपण काहीतरी वेगळे आजमावून पाहा. जमदानी वर्कपासून इक्कत सिल्कपर्यंत पारंपरिक एम्ब्रॉयडरीची मागणी आहे. काहीतरी अनोखे ट्राय करा.

कलर थीम : आपल्या विवाहामध्ये एक थीम आणि कलर स्कीम निवडा. पाहुण्यांनाही खास कलर किंवा स्टाइलचे कपडे घालून येण्यास सांगू शकता.

सजावट : सजावटीत रचनात्मकता आणा. उदा. विवाहस्थळांमध्ये कंदिलांच्या रूपात टांगलेल्या फुलांच्या गुच्छांमध्ये लावलेले बल्ब सुंदरही दिसतील आणि रचनात्मकही.

वेडिंग टीप्स

लग्नाचे प्लान करताना या गोष्टीची काळजी जरूर घ्या :

* वेडिंगसाठी इनडोर अरेजमेंट किंवा आउटडोर अरेजमेंटपैकी कोणताही पर्याय निवडू शकता. आपण काही विधी इनडोर ठेवणे व काही विधी आउटडोर ठेवणे उत्तम होईल. अर्थात, साखरपुडयासाठी संपूर्ण विधीसाठी इनडोर अरेजमेंट असणे चांगले ठरेल. परंतु मेंदीसारख्या विधी आउटडोरच चांगल्या वाटतात. पूल साइट किंवा लॉनच्या मोकळया वातावरणात मेंदी, संगीत इ.चा आनंद लुटणे काही निराळेच असते.

* फ्लोरल रेंजमध्येही अशा फुलांची निवड करा, जी लवकर खराब होत नाहीत. उदा. आर्किड, लिली वगैरे.

* कार्यक्रमाची वेळही योग्य निवडली पाहिजे. दुपारी १२ ते ३ पर्यंतची वेळ शक्यतो टाळा. लेट इव्हिनिंग फंक्शन छान एन्जॉय करता येतील.

* आपल्या पाहुण्यांना अशा अविस्मरणीय भेटवस्तू द्या, ज्या ते उपयोगात आणतील. सनग्लासेस, मुलांच्या कलरफुल कॅप यासारख्या भेटवस्तू उपयोगी सिद्ध होतील.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें