सनस्क्रीन लावणे का आहे महत्त्वाचे

* मोनिका गुप्ता

सनस्क्रीन हे एक असे त्वचेची काळजी घेणारे उत्पादने आहे, जे आपल्या त्वचेसाठी दररोज वापरणे फार महत्त्वाचे आहे. बहुतेक स्त्रियांना असे वाटते की सनस्क्रीन फक्त उन्हाळयामध्येच लावले जाते, परंतु सनस्क्रीन सर्व हंगामात वापरले पाहिजे. सनस्क्रीन आपल्या त्वचेला खराब होण्यापासून प्रतिबंधित करते.

उन्हाळयात सनस्क्रीन महत्त्वाचे का आहे?

त्वचा विशेषतज्ज्ञ डॉ. इंदू यांच्या या म्हणण्यानुसार जर एखाद्याला फ्रीकल्स, सनबर्नसारखी समस्या झाली असेल तर त्याने दिवसातून ३ वेळा सनस्क्रीन अवश्य लावावी. फ्रीकल्स ही एक सामान्य समस्या आहे. जेव्हा चेहऱ्यावर तपकिरी डाग दिसतात तेव्हा त्यांना फ्रीकल्स असे म्हणतात.

फ्रीकल्स टाळण्यासाठी सनस्क्रीन लावणे खूप महत्वाचे आहे. तथापि याचा सीवो २ लेसर उपचारदेखील आहे. बरेच लोक घरात राहतात तेव्हा आपल्या त्वचेची काळजी घेण्यात आळस करतात. जर आपण घरी स्वयंपाकघरात जास्त वेळ घालवत असाल तरीदेखील सनस्क्रीन अवश्य वापरा. सनस्क्रीन खरेदी करताना एसपीएफकडे नक्की लक्ष द्या.

सनस्क्रीन आणि एसपीएफ

वाढत्या वयाबरोबर त्वचेवर पडणाऱ्या सुरकुत्या, बारीक रेघा, त्वचा फाटणे, रंगावर परिणाम, प्रतिबिंब या सर्वांचे सर्वात मोठे कारण म्हणजे अल्ट्राव्हायलेट किरण. जेव्हा आपण उन्हात जास्त वेळ घालवतो तेव्हा त्वचा काळी होण्यास सुरवात होते आणि त्वचेशी संबंधित काही गंभीर समस्यादेखील उद्भवू शकतात.

सनस्क्रीन खरेदी करताना त्यामध्ये असलेल्या सन प्रोटेक्शन फॅक्टर म्हणजेच एसपीएफ या प्रमाणाचे योग्य ज्ञान असणे खूप महत्वाचे आहे. तसे तर एसपीएफ १५ चे प्रमाण असलेले सनस्क्रीन वापरणे चांगले असते. परंतु वाढती उष्णता आणि प्रदूषण दरम्यान, एसपीएफ १५ पासून एसपीएफ ३० पर्यंतचे सनस्क्रीन लोशन अधिक प्रभावी मानले जातात. आपण सनस्क्रीनशिवाय घराबाहेर पडल्यास आपली त्वचा उन्हात होरपळू शकते.

सनस्क्रीनमध्ये एसपीएफ खूप महत्वाचे आहे. एसपीएफचे प्रमाण जितके जास्त असेल तितकेच आपल्या त्वचेला संरक्षण जास्त मिळते. जर आपल्या सनस्क्रीनमध्ये ३० एसपीएफ असेल तर आपल्या त्वचेवरील संरक्षण ३० पटीने अधिक वाढेल.

त्वचेनुसार सनस्क्रीन निवडा

* बहुतेक स्त्रिया अशी तक्रार करतात की सनस्क्रीन लावल्यानंतर त्वचा चिकट आणि काळी दिसू लागते. जर आपली त्वचा अधिक चिकट दिसत असेल तर आपण चुकीचे सनस्क्रीन निवडले आहे. सनस्क्रीन नेहमीच आपल्या त्वचेनुसार निवडा.

* जर तुमची त्वचा सामान्य असेल तर क्रीम आधारित सनस्क्रीन वापरा.

* आपल्या त्वचेवर पुरळ आणि मुरुमांची समस्या अधिक असल्यास तेल मुक्त सनस्क्रीन लावा आणि जर आपली त्वचा तेलकट असेल तर जेल सनस्क्रीन निवडा.

* कोरडी त्वचा असलेल्यांनी मॉइश्चरायझर आधारित सनस्क्रीन वापरली पाहिजे.

केव्हा, किती एसपीएफ आवश्यक आहे

त्वचेचे नुकसान होण्यापासून रोखण्यासाठी ३० एसपीएफ पुरेसे आहे. परंतु जर आपण फार काळ बाहेर असाल, उन्हात जास्त वेळ घालवत असाल आणि वारंवार सनस्क्रीन लावू शकत नाहीत तर आपण एसपीएफ ५० चे सनस्क्रीन वापरावे.

आपण रोजच्या दिवसांसाठी एसपीएफ ३० चे वापरू शकता. घरात असल्यावरदेखील सनस्क्रीन लावणे खूप महत्वाचे आहे. वास्तविक, घरात असलेल्या कृत्रिम प्रकाशाचाही त्वचेवर परिणाम होतो. म्हणूनच, घरी आपण एसपीएफ १५ चे सनस्क्रीन वापरावे.

ऑफिस गर्ल मेकअप आणि हेल्दी डाएट

* सुनील शर्मा

महिलांना २ गोष्टी सर्वात जास्त आवडतात- निरोगी शरीर आणि मेकअप. यामुळे केवळ त्यांची त्वचाच उजळत नाही तर त्या स्मार्ट आणि अॅक्टिव्हही दिसतात आणि ऑफिसमध्ये काम करत असतील तर त्या आपल्या सौंदर्याची जास्तच काळजी घेतात.

या सतर्कतेमध्ये चांगले अन्न आणि योग्य मेकअप खूप महत्त्वाचे असते अन्यथा स्वातीसारखी परिस्थितीसुद्धा येऊ शकते.

स्वाती एका मल्टिनॅशनल कंपनीत काम करते, पण ऑफिसमध्ये कोणता मेकअप करायचा आहे किंवा काय खायचे-प्यायचे आहे याबद्दल ती बेफिकीर होते. एकतर ती तिच्या आकाराने काहीशी जास्तच हेल्दी आहे आणि त्यावर मेकअपही भडक करते, त्यामुळे तिच्या पाठीमागे तिची खूप टिंगळ केली जाते.

पण यावर उपाय काय? ऑफिससाठी काही खास प्रकारचा मेकअप असतो का? योग्य आहार कुणा ऑफिस गर्लला सर्वांची चाहती बनवू शकतो का? असे काय करावे की एखादी महिला आपल्या कार्यालयात हसण्याचे कारण बनू नये?

या सर्व प्रश्नांची उत्तरे देताना आहारतज्ज्ञ आणि मेकअप आर्टिस्ट नेहा सागर म्हणतात, ‘‘मुलीसाठी, विशेषत: ऑफिस गर्लसाठी चांगले खाणे-पिणे आणि मेकअप यामध्ये संतुलन राखणे हे काही रॉकेट सायन्स म्हणजे कठीण काम नाही. ऑफिसमध्ये कामाचा ताण असल्यामुळे आपल्या आहाराकडे पूर्ण लक्ष दिले पाहिजे, काही छोटयाछोटया गोष्टींची काळजी घेतल्यास कोणतीही ऑफिस गर्ल स्वत:ला निरोगी ठेवू शकते.

‘‘जिथपर्यंत मेकअपचा प्रश्न आहे तर ऑफिसमध्ये जास्त हेवी मेकअप आवश्यक नाही. तुमच्या रंगरुपानुसार आणि बॉडीच्या आकारानुसार मेकअप केल्यानेदेखील प्रभाव पडू शकतो.’’

ऑफिस गर्लने तिच्या डाएट आणि मेकअपची काळजी कशी घ्यावी. यासाठी नेहा सागर काही टीप्स देत आहे, ज्या तुम्ही विचारात घेतल्या पाहिजेत :

आहार टीप्स

* ऑफिसला जाण्यापूर्वी नाश्ता जरूर करा.

* नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण यांशिवाय दिवसभरात फळांचे सेवन अवश्य करा. हंगामातील प्रत्येक फळ खा. याने शरीरात मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचे प्रमाण पूर्ण होते. फळे हे नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणाव्यतिरिक्त इतर वेळी खाण्याचा प्रयत्न करा.

* ऑफिससाठी रेडी टू इट मिलसोबत ठेवण्याचा प्रयत्न करा. जसे फळांमध्ये केळी, सफरचंद, पेरू, नाशपाती इत्यादी. खूप वेळेपूर्वी कापलेली फळे खाऊ नका.

* फळांव्यतिरिक्त, भाजलेले मखाने, चणे आणि सुका मेवादेखील तयार जेवणात समाविष्ट केले जाऊ शकतात.

* दररोज भरपूर पाणी प्या, बाहेरचे उघडे पाणी पिऊ नका, कारण त्यामुळे आजारी पडण्याचा धोका असतो.

* भोजनासाठी किमान १५ मिनिटे वेळ द्यावा. चावूनचावून खावे, नेहमी निरोगी अन्न खावे. यामुळे शरीरात ऊर्जा टिकून राहते.

सौंदर्य टीप्स

* ऑफिससाठी नेहमी हलका आणि न्यूड मेकअप केला गेला पाहिजे, ज्यामध्ये हलक्या रंगाच्या आयशॅडो आणि हलक्या रंगाची लिपस्टिक वापरावी.

* ऑफिसमध्ये फाउंडेशनही वापरता येते, पण चेहऱ्यावर हायलाइटर वापरू नका,

* ऑफिसमध्ये लिपस्टिक किंवा लिपग्लॉसची विशेष काळजी घ्या की ती अजिबात वेगळया रंगाची नसावी. ऑफिससाठी गुलाबी, पीच, माउव्ह आणि न्यूड ब्राऊन रंग वापरा.

* ऑफिससाठी त्वचेच्या रंगानुसार चेहऱ्यावर फाउंडेशन वापरण्याचा प्रयत्न करा. दिवसा लिक्विड फाउंडेशन वापरा.

* त्वचा तेलकट असेल तर ३-४ तासांनी चेहरा कोरडया टिश्यू पेपरने हलक्या हाताने स्वच्छ करा.

जशी त्वचा टोन तशी नेल पॉलिश

* पारुल भटनागर

आमच्या मैत्रिणीने अतिशय गडद रंगाची नेलपॉलिश लावली, हे पाहून तुम्ही तिच्या हाताचे वेडे झाले आहात आणि काहीही विचार न करता तुम्हीही ती विकत घेण्याचे ठरवले. पण जेव्हा तुम्ही तुमच्या नखांवर ट्राय केला तेव्हा ना तुम्हाला कोणतीही प्रशंसा मिळाली आणि ना तुमच्या हातांची शोभा वाढली, जे पाहून तुमची निराशा झाली.

पण तुमच्यासोबत असं का झालं याचा तुम्ही विचार केला आहे का? याचे कारण म्हणजे ज्याप्रमाणे त्वचेचा टोन आणि त्वचेचा प्रकार लक्षात घेऊन क्रीम्सची निवड केली जाते, अगदी तशीच नेल पॉलिशचीही निवड केली जाते. जेणेकरून ती तुमचे हात कुरूप न बनवता त्यांचे सौंदर्य वाढवण्याचे काम करेल. चला तर मग जाणून घेऊया की कोणत्या प्रकारची नेलपॉलिश कोणत्या स्किन टोनवर चांगली दिसेल :

त्वचेचा टोन लक्षात ठेवा

* जर तुमची त्वचा पांढरी असेल आणि तुम्हाला खूप गडद शेड्स लावायचे असतील, तर गडद निळा, लाल, मार्जेन्टा, केशरी, रुबी शेड्स तुमच्या हातांवर खूप चांगले उठून दिसतील, कारण ते तुमचे हात अधिक उजळ बनवण्याचे काम करतात. तुम्ही पारदर्शक शेड्स वापरून पाहू नका, कारण ते तुमच्या त्वचेशी मिसळल्यामुळे तुमचे हात निस्तेज दाखवायचेच काम करतील.

* जर तुमचा त्वचेचा टोन डस्की म्हणजे सावळा असेल तर तुम्ही बहुतेक नेल पेंट्स वापरून पाहू शकता, कारण डस्की ब्युटीशी कुठली स्पर्धाच नाही. बहुतेक गोष्टी त्याच्यावर शोभून दिसतात. त्यावर गुलाबी, पिवळा, केशरी यांसारख्या तेजस्वी आणि चमकदार रंगांसह धातूचे रंग जसे गोल्ड आणि सिल्वर रंगदेखील छान दिसतात.

* जर तुमच्या त्वचेचा टोन गडद असेल आणि तुम्ही असा विचार करत असाल की कोणतीही नेलपॉलिश माझ्या नखांना शोभणार नाही, तर तुमचा हा विचार पूर्णपणे चुकीचा आहे, कारण जर तुम्ही तुमच्या नखांवर डीप रेड, गुलाबी आणि निऑन रंग लावले तर हे रंग चांगले मिसळून तुमच्या त्वचेला व्हायब्रेन्ट लुक देण्याचे काम करतात.

नेल पॉलिश कसे लावायचे

तुम्ही तुमच्या स्किन टोननुसार नेलपॉलिश निवडली असली तरी ती योग्य प्रकारे लावली नाही तर तुमची सगळी मेहनत वाया जाऊ शकते.

त्यामुळे जेव्हाही तुम्ही नेलपॉलिश लावाल तेव्हा सर्वप्रथम नखांना व्यवस्थित फाईल करा जेणेकरून नेलपॉलिश उठून दिसू शकेल. तसेच नेलपॉलिश नेहमी कोरडया नखांवरच लावा, कारण यामुळे ती निघण्याची भीती नसते, नेलपॉलिशचे फिनिशिंग नखांवर नेहमीच दिसून यावे, यासाठी तुम्ही प्रथम एकच कोट लावा. मग ते सुकल्यानंतरच दुसरा कोट लावा, नेल पेंट लावल्यानंतर क्यूटिकल ऑइल अवश्य वापरा, कारण ते नखे हायड्रेट ठेवते.

नेहमी बँडेड नेल पॉलिश खरेदी करा

त्वचेच्या टोननुसार नेलपॉलिश खरेदी करणे जितके आवश्यक आहे तितकेच बँडेड नेलपॉलिश खरेदी करणे देखील महत्त्वाचे आहे, कारण जरी तुम्हाला लोकल नेलपॉलिश स्वस्त दरात आणि वेगवेगळया रंगात उपलब्ध होत असल्या तरी त्या नखे कमकुवत बनवण्यासोबतच त्यांचा ओलावाही चोरतात. तसेच जास्त केमिकल्स असलेल्या नेलपॉलिश वापरल्याने नखे पिवळी होऊ लागतात. त्यामुळे जेव्हाही तुम्ही नेलपॉलिश खरेदी कराल तेव्हा नेहमी फक्त बँडेड खरेदी करा.

आपल्या केशरचनेत सुधार करा

* भारती तनेजा, आल्प्स ब्युटी क्लिनिक आणि

अकादमीच्या संचालक

संपूर्ण लुकसाठी तुमची केशरचना आकर्षक असावी आणि त्याचबरोबर ती दीर्घकाळ टिकलीही पाहिजे. परंतु केशरचना जास्त काळ टिकत नाही आणि मॅसी होते. ही परिस्थिती टाळण्यासाठी हेअर स्प्रे, हेअर जेल आणि हेअर मूस वापरता येऊ शकेल. हे हेअर प्रॉडक्ट्स बराच काळ लुक एकसारखाच टिकवून ठेवतात.

स्प्रे : हेअर स्प्रे हे एक प्रकारचे स्टाइलिंग उत्पादन आहे, जे एकाच ठिकाणी केस चिकटून ठेवते, म्हणजेच, जर तुम्ही विशिष्ट प्रकारची केशरचना अवलंबत असाल, तर हेअर स्प्रेच्या मदतीने तुम्ही ती बराच वेळ तशीची तशी ठेवू शकता. लहान-लहान केस जे उभे राहत असल्याने लुक खराब करण्याचे काम करतात हेअर स्प्रे त्यांना आपल्या जागी टिकवून ठेवून केशरचना परफेक्ट करते. लो होल्ड स्प्रे सरळ केशरचनेवर चांगले कार्य करते, तर मिडीयम होल्ड स्प्रे त्या हेअरस्टाइलवर चांगले कार्य करते, ज्यात अर्धे वरती आणि अर्धे खाली केशरचना बनलेली असते आणि स्ट्राँग स्प्रे वेडिंग इत्यादीमध्ये बनवल्या जाणाऱ्या केशरचनांसाठी चांगले परिणाम देते.

जेव्हापण एखादी स्टाईल नागमोडी, कोरडी आणि लहान लांबीच्या केसांमध्ये बाळगली जाते, तेव्हा लगेचच हेअर स्प्रेचा वापर केला जातो. यामुळे केशरचना सेट राहते. केसांना नैसर्गिक स्वरूप आणि चमक देण्यासाठी ब्लो ड्राय केल्यानंतर हेअरब्रशवर हेअर स्प्रे लावले जाते आणि केसांना मुळांपासून टोकापर्यंत ब्रश केले जाते.

बऱ्याचदा केसांचा जुडा बनवण्यासाठी बॉबी पिनऐवजी कसून स्पिन पिन बांधल्या जातात किंवा केस एकाच जागी एकत्र ठेवण्यासाठी केसांच्या लहरी कडा खाली ठेवून बॉबी पिन वापरल्या जातात. पिनवर स्प्रे वापरून आपण त्यांना बऱ्याच काळासाठी केसांवर ठेवू शकता.

जर तुम्ही सरळ केसांवर कर्ल स्टाईल केलेली असेल तर ती जास्त काळ टिकत नाही. अशा परिस्थितीत केश कर्लिंग, रोलिंगनंतर त्यांच्यावर हेअर स्प्रे केले जाते. यामुळे कर्ल सुरक्षित होतात. जर कुरळे केस कोरडे आणि निर्जीव दिसत असतील तर त्यांना चमकदार बनवण्यासाठी त्यांच्यावर ग्लिसरीनयुक्त हेअर स्प्रेदेखील लावले जाते. हा स्प्रे घरीही बनवता येतो. यासाठी पाणी आणि ग्लिसरीन समान प्रमाणात मिसळा. नंतर ते चांगले हलवा आणि त्यात केसांच्या तेलाचे काही थेंब घाला. हा ग्लिसरीन स्प्रे ओल्या केसांवर फवारला जातो. स्प्रेचा वापर केशरचना बनवण्यापूर्वी किंवा नंतर दोन्ही प्रकारे केला जाऊ शकतो.

तुम्ही तुमच्या पातळ आणि हलक्या केसांना बाउन्सी लुक देण्यासाठीदेखील हेअर स्प्रे वापरू शकता. यामुळे केसांची मात्रा वाढते. केसांच्या मुळांवर आणि आत हेअर स्प्रे केल्याने ते आणखी सुंदर आणि दाट दिसतात.

जेल : आजकाल कोणत्याही स्त्रीला नेहमी एकसारखा लुक ठेवणे आवडत नाही. या कारणामुळे केसांच्या जेलची क्रेझ वाढली आहे. हे आपल्याला हवी असलेली स्टाईल बऱ्याच काळपर्यंत टिकवून ठेवण्यासाठी वापरले जाते आणि हे जेलच्या गुणवत्तेवर अवलंबून असते की त्याची मध्यम धारण क्षमता आहे किंवा मजबूत पकड आहे. जर तुम्हाला हेअर जेलचा चांगला रिझल्ट हवा असेल तर सर्वप्रथम टॉवेलने केस नीट सुकवल्यानंतर जेल दोन्ही हातात घेऊन केसांमध्ये लावा. टाळूवर जेल लावू नका, कारण यामुळे मुळे कमकुवत होतात आणि कोरडेपणाची समस्याही उद्भवते. लहान केसांसाठी जेल सर्वोत्तम आहे.

मूस : हेअर मूस हेअरस्टाईलला नाजूकपणे होल्ड करते, ज्यामुळे केसांना अतिशय नैसर्गिक लुक मिळतो. मूस हा एक प्रकारे दिसायला शेव्हिंग क्रीमच्या फेसासारखा आणि केसांच्या सेटिंगमध्ये वापरला जाणारा पदार्थ असतो. केसांमध्ये हा चांगला लावण्यासाठी याची थोडीशी मात्रा कंगव्यात ठेवा आणि संपूर्ण केसांवर लावा. केसांवर लावल्यानंतर तो पाण्यासारखा दिसू लागतो.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें