* गरिमा पंकज

कोरोना महामारी अजूनही मुळासकट संपलेली नाही. एखाद्या व्यक्तीला कोरोना किंवा त्यासंबंधित गुंतागुंतीचा आजार झाल्यास आणि त्या व्यक्तीने खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यास, एकूण खर्च रूपये १० लाखांपासून ते रूपये १२ लाखांपर्यंत जाऊ शकतो. कोरोना व्यतिरिक्तही अनेक प्रकारचे आजार आहेत जे लोकांना त्रासदायक ठरतात आणि त्यांच्या उपचारात त्यांची सर्व बचत संपून जाते. त्यामुळेच आरोग्य विम्याचे महत्त्व नाकारता येत नाही.

कोरोना काळात आपल्या सर्वांना या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे की, अचानक उद्भवलेल्या आजाराशी सामना करण्यासाठी, योग्य उपचार तसेच कुटुंबाच्या संरक्षणासाठी रूपये २-३ लाखांचा साधा आरोग्य विमा काढायला काहीच हरकत नाही. घरातील एकापेक्षा जास्त व्यक्ती आजारी पडल्यावर याचे महत्त्व अधिकच समजते. कोरोना काळात असा आजारी पडण्याचा प्रकार तुमच्या आजूबाजूच्या अनेक घरांमध्ये पाहायला मिळाला असेल. म्हणूनच तुमच्याकडे कोणतीही आरोग्य विमा पॉलिसी नसेल तर तुम्ही लवकरात लवकर चांगली पॉलिसी घ्या.

जर तुम्ही एम्प्लॉयी ग्रुप इन्शुरन्स कव्हर अंतर्गत येत असाल तरीही, तुम्ही स्वत:साठी किमान रूपये २५ ते रूपये १० लाखांचा आरोग्य विमा घेणे आवश्यक आहे. जरी तुम्ही विमा घेतला असेल तरी सध्याच्या परिस्थितीनुसार त्यात  बदल करणे आवश्यक आहे. तुमची इच्छा असल्यास तुम्ही एका विमा कंपनीतून दुसऱ्या विमा कंपनीकडेही जाऊ शकता. अधिक सुविधा देणारी कंपनी निवडू शकता.

चला, याविषयी जाणून घेऊया :

फॅमिली फ्लोटर आरोग्य विमा योजना

जवळपास प्रत्येक विमा कंपनी मूलभूत आरोग्य विमा संरक्षण देते, ज्यामध्ये रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीचा खर्च, रुग्णालयात दाखल झाल्यानंतरचा खर्च, औषधांचा खर्च, डॉक्टरांचे शुल्क आणि चाचण्या इत्यादींचा सहभाग असतो. प्राथमिक आरोग्य विम्याचे २ प्रकार आहेत - पहिला वैयक्तिक आणि दुसरा फॅमिली फ्लोटर. वैयक्तिकमध्ये तुम्हाला फक्त कव्हरेज मिळते तर फॅमिली फ्लोटरमध्ये संपूर्ण कुटुंबाला कव्हरेज मिळते.

फॅमिली फ्लोटर आरोग्य विमा योजना सहसा एखादी व्यक्ती, तिचा जोडीदार आणि त्यांच्या मुलांना संरक्षण देते. परंतु, काही विमा कंपन्या विमा पॉलिसी खरेदी करणाऱ्याचे आई-वडील, भावंडे आणि सासू-सासऱ्यांनाही संरक्षण देतात. फॅमिली फ्लोटर आरोग्य विम्याचा एक फायदा म्हणजे संपूर्ण कुटुंबाला थोडया प्रमाणात संरक्षण मिळते.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...