* पारुल

सणवार जवळ येताच मन कसे उत्साहाने भरून जाते. बाजार नवनवीन आणि युनिक गोष्टींनी फुलून येतो. अनेक दिवस आधीच शॉपिंग सुरू होते. घराची जोरदार सफाईही सुरू होते. फ्रेंड्स आणि नातेवाईक यांना खूप दिवस आधीच आमंत्रणे केली जाऊ लागतात. पण फक्त इतकेच करून भागत नाही तर घरातूनही तशा फेस्टिव्ह वाइब्स आल्या पाहिजेत. त्यामुळे घरातील वातावरण सुगंधित करणे आणि त्याला सजवणेसुद्धा आवश्यक असते, जेणेकरून तुम्ही स्वत:ला फेस्टिव्हलसाठी पूर्णपणे तयार करू शकाल. या, जाणून घेऊया की फेस्टिव्हलसाठी घर कसे सजवावे :

पडद्यांनी वाढवा घराचे आकर्षण

जर तुम्ही अनेक वर्षांपासून एकाच प्रकारचे पडदे घरात टांगून ठेवले असतील आणि ते पाहून तुम्हाला उबग आला असेल तर यावेळेस पडदे बदला. तुम्ही भिंतींना मॅच करणारे पडद्याचे डिझाइन फॉलो करा, जे घराला नवा लुक देण्याचे काम करतील. तुम्ही मॉडर्न कर्टन डिझाइन्सनीही आपले घर सजवू शकता, कारण हे फारच बोल्ड पॅटर्नमध्ये बाजारात उपलब्ध आहेत. फक्त आपल्या रूमची रचना आणि शेड लक्षात घेऊन यांची निवड करा.

पेंटिंग वाढवते भिंतींची शान

जर तुम्ही क्रिएटिव्ह थिंकिंग करत असाल तर आपल्या क्रिएटिव्हिटीने भिंतींची शान वाढवा. यासाठी एम्ब्रॉस पेंटिंग करू शकता, जे न केवळ तुमची क्रिएटिव्हिटी वाढवेल, तर बनवलेली ३डी डिझाईन तुमच्या घराच्या भिंतीचे सौंदर्य द्विगुणीत करेल.

कुशन्सना कव्हरने द्या नव्यासारखा लुक

जर तुमचे कुशन्स जुने झाले असतील आणि तुम्हाला बजेट कोलमडण्याच्या भीतिने ते बदलायचेही नसतील तर तुम्ही आपल्या जुन्या कुशन्सना स्टायलिश कव्हर्स घालून अगदी नव्यासारखा लुक देऊ शकता. यासाठी तुम्ही हल्ली ट्रेंडमध्ये असलेले ब्लॉक प्रिंट, हॅन्ड एम्ब्रॉयडेड कलर, जयपुरी पॅच वर्क, बनारसी ब्रोकेड, फ्लोरल, कांशा वर्क वगैरेने कुशन्स सजवू शकता. या प्रिंट्सना फेस्टिव्हलदरम्यान खूप मागणी असते आणि हे दिसायलाही सुंदर दिसतात.

इनडोअर प्लांट्सने सजवा घर

प्लांट्स फक्त बाहेरचेच नाही तर घरातील वातावरणही हिरवेगार ठेवतात. म्हणूनच या फेस्टिव्हलला तुम्ही मनी प्लांट, एअर प्युरिफाय प्लांट, एलोवेरा, बांबू इ. इनडोअर प्लांट्स लावून न केवळ स्वच्छ वातावरणात श्वास घेऊ शकाल तर घराचा प्रत्येक कोपरा सुंदर बनवू शकाल. विश्वास ठेवा तुमच्या या घराची ही नैसर्गिक सजावट लोक पाहतच राहतील.

वॉल पेपरने बदला भिंतींचा लुक

सणासुदीच्या काळात प्रत्येक जण घर स्वच्छ आणि टापटीप दिसावे यासाठी आपल्या घराची रंगरंगोटी करून घेण्याच्या विचारात असतो, जर तुमचे बजेट असेल तर तुम्ही कोणत्याही प्रकारात डिफरंट कलरचे पेंट करून घेऊ शकता. त्याचबरोबर वॉल पेपर्सनेही भिंतीचे सौंदर्य वाढवा. जर तुम्हाला घराच्या लुक्समध्ये थोडाफार बदलच करायचा असेल तर स्टिकर्सहून दुसरा बेस्ट ऑप्शन नाही.

लाइटिंगने उजळवा घर

फेस्टिव्हल्सची गोष्ट असेल आणि जर घरात खास लाइटिंग नसेल तर जो फील आला पाहिजे तो येत नाही. त्यामुळे तुम्ही घराला आतून आणि बाहेरून लाइटिंग करून उजळवा. आपल्या गार्डन एरियालाही खास प्रकारच्या लाइटिंगने सजवू शकता.

फ्लॉवर्सची खास सजावट

सेंटर टेबलला छोटे फ्लॉवर्स आणि फ्लॉवर पॉट्सने सजवा. जे न केवळ तुम्हाला पण पाहणाऱ्यांनाही फ्रेशनेसची जाणीव करून देतील. फेस्टिव्हलच्या दिवशी काचेच्या बाउलमध्ये फ्लोटिंग कँडल्सही ठेवू शकता. या कँडल्स फक्त मोहकच दिसत नाहीत तर घराला फेस्टिव्हल लुक देण्याचेसुद्धा काम करतात.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...