* अमरजीत साहिवाल

‘हमें तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते, मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना,’ तू माझ्या रोमारोमांत वसतोस आणि म्हणूनच मी जगत आहे, ‘तू एक शब्द असेल ज्याचा अर्थ आहे आनंद,’ ‘तुला काय सांगू, तू माझा आधार आहेस, तुझ्या प्रेमातच माझं अस्तित्त्व आहे...’

जसजसा फेब्रुवारी महिना जवळ येऊ लागतो, प्रेमी जोडपी आपल्या जोडीदाराला व्हॅलेंटाइनच्या भेटवस्तूवर काहीशा अशाच ओळी लिहून देत असतात. कारण त्यांच्यासाठी तर हे दिवस आनंद, आशा आणि उमेद घेऊन येत असतात.

मग या तुम्हीदेखील थोडे रोमॅण्टिक होऊन हे जाणून घ्या की व्हॅलेंटाइन डे नक्की काय आहे, ज्याने भारताच्या धरतीवर हळुवारपणे पाऊल टाकून मग हळूहळू सर्व तरुणांना आपल्या मोहपाशात घेतलं.

हा उत्सव साजरा करण्याची पद्धत आणि रीतिभाती फारच रोमांचक आणि विलक्षण होत्या. इतिहासाची पानं उलटली तर म्हटलं जातं की व्हॅलेंटाइन डे, हा एका अशा माणसाच्या बलिदानाचा दिवस आहे ज्याने प्रेम केलं आणि प्रेम करणाऱ्यांना एका पवित्र बंधनामध्ये बांधण्याचा प्रयत्न केला. त्याच्या काळात क्लोडियम हा रोमचा शासक होता जो खूपच क्रूर आणि कडक स्वभावाचा होता. त्याने आपल्या शासनकाळात सर्व शिपायांवर असं बंधन टाकलं होतं की कोणी आपल्या प्रेयसीला भेटणारही नाही आणि लग्नही करणार नाही. पण व्हॅलेंटाइनने राजाच्या मर्जीच्या विरुद्ध प्रेमी जोडप्यांचं लपूनछपून लग्न लावलं आणि प्रेम करणाऱ्यांचं मीलन करून दिलं किंवा असं म्हटलं तरी चालेल की तो प्रेमाचा देवता झाला. मात्र क्लोडियमला हे सगळं सहन झालं नाही आणि त्याने व्हॅलेंटाइनला मृत्युदंड दिला. ही गोष्ट १४ फेब्रुवारी, ईसवी सन् २६९ची आहे.

व्हॅलेंटाइनची एक मैत्रीण होती जी जेलरची मुलगी होती, तिला मृत्युपूर्वी व्हॅलेंटाइनने एक पत्र लिहिलं होतं. त्यानंतरपासून दरवर्षी १४ फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाइनच्या स्मृत्यार्थ साजरा केला जात आहे आणि त्याला नाव दिलंय व्हॅलेंटाइन डे.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...