* रितू वर्मा
रिमाचं नवीन लग्न झालं होतं. सेक्स जे तिच्यासाठी नवीन होतं. आता लग्नानंतर अचानक ती रोमांचित झाली होती. रीमाला तिच्या आयुष्यात झालेल्या या बदलांबद्दल कोणासोबत तरी बोलायचं होतं. तिला जाणून घ्यायचं होतं की तिला जसं वाटतं ते तसंच सर्वांबाबत होतं का?
रीमाने आनंद आणि रोमांचित झाल्यामुळे स्वत:ची बेडरूम सिक्रेट्स म्हणजेच गुपितं आपल्या मैत्रिणींना सांगितली. जेव्हा रिमा आणि तिचा पती जय हे तिची मैत्रीण श्वेताकडे जेवायला गेले होते तेव्हा श्वेताने जयसमोरच अशा गोष्टी बोलायला सुरुवात केली होती ज्या अश्लीलतेच्या परिघात येत होत्या. जय समजून गेला की रिमाने त्यांच्या दोघांमधील वैयक्तिक गोष्टी सार्वजनिक केल्या आहेत. या गोष्टीसाठी तो रीमाला अद्यापही माफ करू शकला नव्हता. इकडे श्वेतादेखील जेव्हा संधी मिळेल तेव्हा रीमाला तिच्या बेडरूमची गुपितं विचारायची आणि तिखटमीठ लावून पूर्ण ग्रुपला सांगत असे.
भूमिकाचं जेव्हा लग्न झालं तेव्हा तिची विवाहित मैत्रीण एकता तिची जणू काही सेक्स गुरुच बनली. भूमिका निरागसपणे तिच्या प्रत्येक छोटया मोठया गोष्टी एकताला सांगत होती. एकता जी तिच्या पतीपासून समाधानी नव्हती. भूमिकाची बेडरूम सिक्रेट्स ऐकून तिच्या पतीकडे आकृष्ट झाली. संधी मिळतात एकताने भूमिकाच्या पतीला स्वत:कडे खेचलं होतं. आता भूमिका त्या दिवसाला दोष देत होती जेव्हा तिने एकतासोबत तिच्या बेडरूममधली सिक्रेट्स सांगायला सुरुवात केली होती.
आजदेखील अनेक नवविवाहित जोडपी लग्नापूर्वी सेक्सपासून दूर राहतात. म्हणून जेव्हा लग्नानंतर या नव्या जगतात पाऊल ठेवतात तेव्हा त्यांना समजत नाही की त्यांच्या गोष्टी कोणासोबत शेअर कराव्या. मनात हुरहूर, भीती असते, काही गोष्टी माहित नसतात, काही रहस्य असतात तेव्हा समजत नाही की कोणासोबत बोलावं. अशावेळी आपल्या मित्र मैत्रिणींशिवाय कोणीच दुसरं सुचत नाही. आपल्या मित्रांसोबत बेडरूम सिक्रेट शेअर करणं अनेकदा फायदेशीरदेखील होऊ शकतं.
जसं की मोहिनीने तिच्या परफॉर्मन्सबाबत खूपच स्ट्रेसमध्ये होती. मात्र जेव्हा एके दिवशी बोलता बोलता तिने तिची मैत्रीण वर्षाला याबद्दल सांगितलं तेव्हा मोहिनीला समजलं की ती विनाकारण याबद्दल स्ट्रेस घेत होती.





