* निधी निगम
यशस्वी करिअर वुमन हल्ली सिंगल राहणेच पसंत करतात. त्यांच्या फ्युचर प्लॅन्समध्ये जणू काही लग्न या शब्दाचे स्थानच उरलेले नाही. मुली आपले यश, पॉवर, पैसा आणि स्वातंत्र्य अगदी मनमोकळेपणाने एन्जॉय करत आहेत. युवतींमध्ये लेट मॅरेज किंवा नो मॅरेज सिंड्रोममुळे समाज किंवा कुटुंबावर पडणाऱ्या नकारात्मक परिणामांमुळे भलेही आईवडील, समाजशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ आणि डॉक्टर चिंतीत झाले असले तरी युवती मात्र खुश आहेत. खरंच खूप फायदे आहेत सिंगल राहण्याचे, विश्वास बसत नसेल तर हे वाचा :
- करिअरची उंची गाठता येते
आपली रिलेशनशिपला कायम राखण्यासाठी खूप प्रयत्न, ऊर्जा आणि वेळ खर्ची घालणे जरुरी असते. तुम्ही सिंगल असाल तर हे सरळ आहे की तुम्हाला यापैकी काहीच करण्याची गरज नाही आणि तुम्ही तुमची संपूर्ण एनर्जी, अटेन्शन, क्षमता यांना आपल्या प्रोफेशन, करिअरसाठी वापरू शकता, ज्यामुळे तुमची प्रॉडक्टिव्हिटी वाढते. त्याचबरोबर तुम्ही लेट नाइट मिटिंग्स, बिझनेस डिनर आणि ऑफिशिअल टूरसाठीही सदैव तत्पर असता. आपली कंपनी, ऑफिस यांच्यासाठी पूर्ण समर्पित असता. त्यामुळे हे जाहीरच आहे की तुमच्यासाठी प्रमोशनचा मार्ग सोपा होतो.
- जे हवे ते करा
तुम्हाला प्रत्येक क्षणी या गोष्टीचा विचार करावाच लागत नाही की तुमच्या पार्टनरला काय आवडते आणि काय नाही, तुम्ही तुम्हाला हवे ते सहज करू शकता. जीवनातला प्रत्येक क्षण तुम्ही भरभरून जगू शकता आणि तेही कोणत्याही अपराधभावनेशिवाय. जसे तुम्ही कॉलेजगर्ल्सप्रमाणे तुमच्या गर्ल गँगला घरी बोलावून पैजामा पार्टी करू शकता, आपल्या मर्जीने ड्रेसअप होऊ शकता, तुमचे पॅरेंट्स, रिलेटिव्हज यांच्यासोबत राहू शकता. या माझ्या मर्जीवाल्या टॉनिकमुळे तुम्ही अधिक आनंदी, रिलॅक्स राहता आणि संतुष्ट व्यक्तिला इतरांच्या आयुष्यात आनंद आणू शकते.
- फट, तरुण आणि सुंदर
तुम्ही स्वत:कडे लक्ष देऊ शकता. तुमची काळजी घेणारे दुसरे कोणी नसल्याने तुमचा डाएट, हेल्थ, बॉडी आणि ब्युटी केअर ही तुमचीच जबाबदारी बनते, आणि आज करिअर गर्लसाठी फिट, ग्लॅमरस आणि प्रेजेंटेबल असणे अतिशय आवश्यक आणि फायदेशीरही बनले आहे. त्यामुळे सिंगल गर्ल ही इतरांच्या तुलनेत ना केवळ तरुण दिसते तर तिची बॉडीही शेपमध्ये ठेवते.