* डॉ. करुणा मल्होत्रा, कॉस्मॅटिक स्किन अँड होम्योक्लीनिक
बोटोक्स किंवा फिलरच नव्हे, तर अनेक प्रकारची सर्जरीही परफेक्ट लुक देण्यात प्रभावी आहेत. चेहऱ्यावरील डाग दूर करून चेहऱ्याला चमक आणण्यासाठी केमिकल पील करवून घेणेही खास पॉप्युलर आहे. परमनंट हेअर रिमूव्हल आणि टमी टक काही असे उपाय आहेत, ज्यामुळे पर्सनॅलिटी खूप आकर्षक होते. मात्र, लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की या सर्वासाठी लग्नाच्या काही महिने आधीच प्लान करणे आवश्यक आहे.
वाटल्यास आपण लग्नाच्या एक महिना आधी बोटोक्स व लिप फिलर इंजेक्शन जरूर लावून घेऊ शकता. बोटोक्समुळे आपले वय कमी दिसते, तर लिप फिलरमुळे ओठांना आकर्षक उभार येतो.
डर्माब्रेशन, लेजर स्किन रीसफेंसिंग व केमिकल पीलसारख्या ट्रीटमेंटच्या उत्तम परिणामांसाठी काही वेळा त्या पुन्हा कराव्या लागतात. ज्या महिलांना स्वत:मध्ये खास बदल पाहायची इच्छा असेल, त्या फेस लिफ्ट, लाइपोसक्शन व बॉडी कंटुरिंगही करू शकतात. ज्यांना आपल्या ब्रेस्टला योग्य आकार द्यायचा असेल, त्या ब्रेस्ट सर्जरीचा आधार घेऊ शकतात.
अर्थात, या सर्व सर्जरी एका दिवसात होणाऱ्या आहेत आणि आपण त्याच दिवशी घरीही जाऊ शकता. परंतु सर्जरीच्या खुणा जाण्यास थोडा वेळ लागू शकतो. म्हणून लग्नापूर्वी सर्जरी करायची असेल, तर ३ ते ६ महिने आधी करणे योग्य होईल.
बोटोक्स व फिलर प्रक्रिया
जर तुम्ही ही ट्रीटमेंट घ्यायचा विचार करत असाल, तर आधी चेहऱ्याला चांगल्याप्रकारे स्वच्छ करा. इंसुलिन इंजेक्शनसारखी छोटी बोटोक्सची इंजेक्शन्स चेहऱ्यावर लावली जातात. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये १५ ते २० मिनिटांचा वेळ लागतो. याचा लगेच प्रभाव पडत नाही. ३ ते ७ दिवसांत याचा चेहऱ्यावर प्रभाव दिसू लागतो, जो ३ ते ६ महिन्यापर्यंत तसाच टिकून राहतो.
रिंकल्स, पिंपल्स, डार्क सर्कल्स, ल्यूकोडर्मासारख्या कॉमन ब्युटी प्रॉब्लेम्सचा उपाय आज कॉस्मॅटिकच्या अॅडव्हान्स ब्युटी ट्रीटमेंटने शक्य झाला आहे. या ट्रीटमेंटसचा आधार घेऊन आपल्या त्वचेचा रंग उजळण्यासोबतच, ओठ, गाल, नाक, कान, आयब्रो इ.च्या आकारातही कायम स्वरूपाचे मनाजोगे परिवर्तन करू शकता. हे परिवर्तन सौंदर्य दिगुणित करेल.