* पारुल भटनागर
दिवाळीच्या दिवशी प्रत्येक स्त्रीला वाटत असतं की तिचं घर उजळून निघावं, नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणींनी तिने दिलेल्या भेटवस्तूची स्तुती करावी आणि हे सर्व करण्यात स्त्रिया अनेकदा भरपूर मेहनत करतात. परंतु या सगळयांमध्ये त्या एक गोष्ट करत नाहीत ते म्हणजे स्वत:कडे लक्ष देणं.
गरजेचं नाही की तुम्ही पार्लरमध्ये जाऊनच तुमचा चेहरा उजळवू शकता. तुम्ही घरच्या घरीदेखील सहजपणे सर्व कामं करता करता मिनिटात तुमच्या चेहऱ्यावर चमक आणू शकता आणि तेदेखील तुमच्या पाकिटावर अधिक भार न टाकता. होय, तुम्ही घरच्या घरी फेस मास्कने मिनिटात रिफ्रेश लुक व ग्लो मिळवू शकता.
चला तर, जाणून घेऊया कोणकोणते फेस मास्क आहेत जे तुमच्यासाठी बेस्ट आहेत :
हनी पोशन रीनेविंग फेस मास्क
या फेस मास्कला कोरडया त्वचेच्या लोकांसाठी मॅजिक म्हणणं चुकीचं नाही ठरणार, कारण यामध्ये हायड्रेशन प्रॉपर्टीज असतात. हे हनी बेस मास्क अँटिऑक्सिडंटमध्ये रिच असल्यामुळे तुमच्या त्वचेला काही मिनिटातच मुलायमपणा देण्याचं काम करतात.
सोबतच या मास्कमध्ये विटामिन बी असल्यामुळे हे त्वचेवर सणासाठी इन्स्टंट ग्लो आणण्याचं काम करतं. तर मग या हायड्रेट अँटिऑक्सिडंट फेस मास्कने मिळवा ग्लोइंग कॉम्प्लेक्शन. हे मास्क क्रुएल्टी फ्रीदेखील आहे.
कसं अप्लाय कराल : तुम्ही हे दहा मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावा आणि नंतर हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करून चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर एकदम ग्लो दिसून येईल. जे पार्टी वा फंक्शनसाठी योग्य आहे. हे तुम्ही तुमच्या सुविधेनुसार ऑनलाइन, ऑफलाइन सहजपणे खरेदी करू शकता.
ग्रेपफ्रूट हायड्रोजेल मास्क
जर तुमच्या त्वचेवर मुरुमांची समस्या असेल आणि तुमच्या त्वचेवर तुम्ही काही लावायलादेखील घाबरत असाल तर तुम्ही ग्रेपफ्रूट हायड्रोजेल मास्कचा वापर कोणताही विचार न करता करू शकतात. हे खास करून अॅक्ने प्रोन त्वचेसाठी डिझाइन केलं गेलंय. यामध्ये ग्रेपफ्रूट सीड एक्सट्रॅक्ट, जे त्वचेला रिफ्रेश करण्याचं काम करतं आणि यामध्ये विटामिन सीच्या अनेक गुणधर्म त्वचेला उजळवण्याबरोबरच अॅक्ने रोखण्याचंदेखील काम करतं. सोबतच अॅक्नेमुळे पडणारे डागदेखील कमी करण्यास मदतनीस ठरतं. जर तुम्ही या मास्कला सणासाठी लावाल तेव्हा तुमची त्वचा पार्लरसारखी उजळून निघेल.