* गरिमा पंकज

बदाम आरोग्य आणि सौंदर्य दोन्हीसाठी फायदेशीर असतं. बदामाचं तेलदेखील विविध प्रकारे फायदे देत असतं. बदामाच्या तेलात ४४ टक्के तेल असतं, जे कोल्ड प्रेस करून काढलं जातं. बदामाच्या तेलामध्ये अँटीइनप्लॅमेटरी, इम्युनिटी बुस्टिंगसहित अनेक गुण असतात. यामध्ये विटामिन आणि मिनरल्स भरपूर प्रमाण असतं. पोषक तत्त्वांनी पुरेपूर बदामाचे तेल अनेक आजारांपासून दूर ठेवतं. बदामाच्या तेलाने मुलांना मालिश केल्यास त्यांचा शारीरिक विकास वेगाने होतो.

बदाम तेलाच्या काही अशा खास गुणांबद्दल जाणूया जे सौंदर्य कायम ठेवण्यासोबतच तुम्हाला निरोगी ठेवण्यात देखील मदत करतं :

त्वचेसाठी फायदेशीर : बदामाच्या तेलाने सौंदर्य उजळतं. हे चेहऱ्याचा रंग उजळण्याबरोबरच त्याला ग्लो देण्यातदेखील खूप परिणामकारक असतं. यामुळे त्वचेला योग्य प्रमाणात पोषण मिळतं. ज्यामुळे ती पूर्वीपेक्षा अधिक चमकदार आणि मुलायम बनते. बदाम तेलामध्ये ग्लायकोसाईड एमीगडेलीन असतं, जे कोरडी त्वचा, सुरकुत्या, अल्ट्राव्हाईट किरणांपासून त्वचेचं नुकसान इत्यादीमध्ये फायदेशीर असतं. ज्या मुलींना सतत बाहेर राहावं लागतं आणि त्वचा सावळी वा काळी झली असेल तर त्यांच्यासाठी बदाम तेलाचे निर्माता अधिक फायदेशीर सांगतात.

डार्क सर्कलसाठी फायदेशीर : डार्क सर्कल्ससारख्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही बदाम तेलाचा वापर करू शकता. रात्री झोपण्यापूर्वी डोळयांखाली या तेलाने मालिश करा. या तेलाच्या हलक्या मालिशने खूप फायदा मिळतो.

जेव्हा होईल टॅनिंग : विविध गुणांनी पुरेपूर हे तेल नैसर्गिक सनस्क्रीमप्रमाणे देखील काम करतं. टॅनिंगपासून व टॅनिंग रिमुव्ह करण्यासाठी बदाम तेलाचा वापर करू शकता. हे सूर्याचे अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून त्वचेचे रक्षण करण्यास मदत करतं. सेल्स गर्ल्स, फिजिकल क्लासेस घेणाऱ्या क्रीडा टीचर्स, खेळांमध्ये काम करणाऱ्या मुलींनी या तेलाचा वापर करणे फायदेशीर होऊ शकतं.

कोंडापासून सुटका : बदाम तेल डेड सेल्सला हटवून कोंडयापासून सुटका देतो. केसांना डँड्रफ फ्री आणि हेल्दी ठेवण्यासाठी या तेलाच्या मालिश नंतर हेअर स्टीम आवर्जून घ्या. यामुळे केसांचा मुलायमपणा आणि व्हॉल्युममध्ये फरक दिसून येईल.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...