* रजनीश भसीन

वेगवेगळया क्षेत्रातल्या लोकांना वेगवेगळे स्वाद आवडू शकतात, परंतु संपूर्ण भारतात स्नॅक्स सगळयांनाच आवडतात. स्नॅक्स तयार करताना चव आणि तब्येत याकडे विशेष लक्ष दिलं जातं. तरीही लोक असं मानतात की तळलेले आणि भाजलेले स्नॅक्स छान असतात किंवा ते निदान मसालेदार तरी असावेत.

आजकाल कित्येक पदार्थ असे असतात, जे आपण फटाफट स्वयंपाकघरात तयार करू शकतो आणि ते इतर कुठल्याही स्नॅक्सपेक्षा स्वादात कमी नसतील.

बस्स या स्नॅक्समध्ये पौष्टिक पदार्थ टाकायचे आहेत. बटर, मेयॉनीज आणि रिफाईंड तेलाच्या जागी ऑलिव्ह ऑइल, संपूर्ण गव्हापासून तयार केलेल्या न्युडल्स आणि पास्तासारखे निरनिराळे पदार्थ वापरू शकता. साखरेऐवजी ब्राऊन शुगर आणि वरून किसमिस टाकू शकता. सलाडवर हेवी ड्रेसिंग ऐवजी एक्सस्ट्रा वर्जिन ऑलिव्ह ऑइल, मेवा आणि विनाइग्रेट उपयुक्त असतं.

तुम्हाला हवं असल्यास पास्ता आणि निवडक मेव्याने काही पौष्टिक आणि स्वादिष्ट स्नॅक्सही तयार करू शकता. योग्य प्रकारे शिजवलंत तर छान चव आणि सुगंध याबरोबरच आरोग्याविषयक फायदे मिळतील. या तर जाणून घेऊ काही अशा हेल्दी पदार्थांविषयी :

पॉपकॉर्न

मक्याच्या दाण्यात फायबरबरोबरच योग्य प्रमाणात अँटीऑक्सिडंटसुद्धा असतात. हे भले ही सामान्य दिसतात, पण तब्येतीसाठी याचे काही विशेष असे फायदे असतात. आजकाल पॉपकॅर्न बटर आणि काळ्या मिरीपावडरसह तयार करण्याची पद्धत आहे. परंतु यात जे काही जास्तीचं बटर असतं, ते आरोग्याशी निगडित याचा लाभ नष्ट करतं. म्हणून तुम्ही बटरऐवजी ऑलिव्ह ऑइल वापरून पॉपकॉर्न तयार करा आणि वरून सी सॉल्ट भुरकावा. हं, विशेषत: मायक्रोवेव्हमध्ये तयार केलेल्या अधिकांश पॉपकॉर्नमध्ये फॅट अगोदरपासूनच टाकलेले असते, ज्यामुळे चरबी सोबतच कॅलरी वाढायचाही धोका असतो.

पॉपकॉर्नचे प्रमुख पोषक तत्व त्याच्या सालांमध्ये असतात. जर तुमची  मसालेदार पॉपकॉर्न खायची इच्छा होत असेल तर ब्राऊन शुगर वापरून याचे सॉस बनवा आणि चिली फ्लेक्स टाकून याचा फ्लेवर वाढवा. हे पॉपकॉर्न तुम्हाला एकाच वेळेस गोड आणि खारट या चवींची मजा देतील. आरोग्याच्या दृष्टीने साखरेपेक्षा ब्राऊन शुगर (गूळ) तुम्हाला लाभदायक असतो.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...