* प्रतिनिधी
1) अक्रोड चाप्स
साहित्य
* १ कप वॉलनट तुकडे
* २ कप उकडलेले बटाटे मॅश करून
* २ मोठे चमचे बारीक चिरलेला कांदा
* १ छोटा चमचा बारीक कापलेले आले
* १ छोटा चमचा बारीक कापलेली हिरवी मिरची
* १ छोटा चमचा धने पावडर
* १ छोटा चमचा लाल मिरची पावडर
* पाव छोटा चमचा आमचूर
* अर्धा छोटा चमचा गरम मसाला
* अर्धा छोटा चमचा चाट मसाला
* १ छोटा चमचा जाडसर डाळिंबाचे दाणे
* १ कप तेल
* चवीनुसार मीठ.
कृती
तेल सोडून बाकी सर्व साहित्य मिसळा. मग या तयार साहित्याचे चाप्स बनवून हार्ट शेपच्या कटरने कापा. सर्व चाप्सला तव्यावर थोडे-थोडे तेल घालून शॅलो फ्राय करून हिरव्या चटणीसोबत वाढा.
2) वॉलनट पराठा
साहित्य
* २ कप मल्टिपर्पज पीठ
* १ कप जाडसर बारीक केलेले अक्रोड
* १ छोटा चमचा जिरे
* १ मोठा चमचा धने पावडर
* चवीनुसार मीठ
* १ छोटा चमचा डाळिंबाच्या दाण्याची पावडर
* १ छोटा चमचा चाट मसाला
*अर्धा छोटा चमचा गरम मसाला
* अर्धा छोटा चमचा जाडसर काळीमिरी
* आवश्यकतेनुसार तेल किंवा तूप.
कृती
पिठात चवीनुसार मीठ मिसळा. आवश्यकतेनुसार पाणी मिसळून मऊ मळून घ्या. अक्रोडसोबत सर्व मसाले मिसळा. पिठाचे गोळे बनवा. ते लाटून तूप लावा. अक्रोडचे सारण पसरवून काठाकडून बंद करत पुन्हा गोळा बनवा. आता हलक्या हातांनी पराठा लाटा. दोन्ही बाजूला तूप लावून सोनेरी रंगावर भाजून घ्या.
3) रवा केशरी
साहित्य
* पाव कप बादामचा चुरा
* १ कप रवा
*२ मोठे चमचे तूप
* २ मोठे चमचे तूप
* ४ मोठे चमचे पिठीसाखर
* अर्धा छोटा चमचा वेलची पावडर
* २ छोटे चमचे बदामाचे काप.
कृती
पॅन गरम करून तूप टाकून रवा घालून सोनेरी रंगावर भाजा. आता यात १ कप पाणी व साखर मिसळा. सतत ढवळत राहा, जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत. मग वेलची पावडर आणि बदामाचा चुरा टाकून २-३ मिनिटे अजून परता. आता हे आवडत्या आकाराच्या बाउलमध्ये ओता. थंड झाल्यावर काढून घ्या आणि बदामाचे काप पेरून सर्व्ह करा.