* मोनिका ओसवाल
सण उत्सवांच्या दिवसांत पारंपारिक परिधानांना नेहमीच मागणी असते. भारतीय महिलांच्या फॅशनचे म्हणाल तर त्यांच्या स्टाईल स्टेंटमेंटमध्ये पारंपारिक वेशभूषेची छाप नेहमी असतेच. आता तरूणी सणांसाठी सूट किंवा सांड्यापेक्षा नवीन पारंपारिक पेहरावांना प्राधान्य देत आहेत.
हळूहळू महिलांमध्ये पारंपारिक रंगाहून थोड्या वेगळ्या फिकट रंगाची क्रेझ वाढत आहे. आता त्या पेस्टल मिंट ग्रीन, शँपेन गोल्ड आणि जेस्टी ऑरेंजसारख्या फिकट रंगांच्या पोशाखांना आपल्या वार्डरोबमध्ये सहभागी करून घेत आहेत. या रंगांमुळे त्यांचे सर्व व्यक्तिमत्त्व प्रफुल्लित आणि उठून दिसते. इतकेच नाही तर त्यांचे लक्ष आता खूप भरीव नक्षी असलेल्या पोशाखांपेक्षा हलक्या फुलक्या कपड्यांकडे अधिक आहे. त्या यादीत आम्ही निवडले आहेत पारंपारिक पोशाखांचे असे ट्रेण्ड, जे प्रत्येक सणाला खुलुन दिसतील.
हायनेक आणि कॉलर : बंद गळा किंवा कॉलरच्या कुर्ती पारंपरिक परिधानांना औपचारिक लुक मिळवून देतात. मित्र-मैत्रीणींना भेटायला जायचे असो किंवा एखाद्या कॉर्पोरेट मिटिंग किंवा कॉन्फरन्समध्ये सहभागी व्हायचे असो, या कुर्ती प्रत्येक प्रसंगाला साजेशा दिसतात. रेट्रो प्रिंट्सच्या बंद गळ्याच्या कुर्ती यावर्षी अपारंपरिक फॅशनच्या यादीत समाविष्ट असतील. खास जॉमेट्रिकल पॅटर्न आणि रफ काठांच्या डिझाइनच्या कुर्ती परिधान केल्यावर इतरांनी वळून पाहिलं तरच नवल. ब्रोकेड किंवा चंदेरी सिक्कलपासून बनलेली बंद गळ्याची कॉलर असणारी कुर्ती तुम्हाला एकदम शाही लुक देईल. चंदेरी सिल्कच्या ट्राउजर किंवा एक्सेसरीजचा वापर करून या परिधान करता येतील.
बोहो स्कर्ट : प्रत्येक तरूणीच्या वॉर्डरोबमध्ये स्कर्टला महत्त्वाचे स्थान असते. यावर्षी फूले-कळ्या आणि पानांची नक्षी असणारे पारंपारिक प्रिंटेड स्कर्ट्स स्टायलिश आणि चिक शर्टस, टॉप्स आणि ट्यूनिक्ससोबत वापरता येतील. ऑफिस पार्टी, सण आणि लग्नांच्या या सिजनमध्ये हा बोहो इंडोवेस्टर्न ट्रेंड आपलासा करून तरूणी त्यांची छाप पाडू शकतात. सणांच्या दिवसात विशेष आणि वेगळेपण दाखवण्यासाठी तुम्ही हा बोहो स्कर्ट क्रॉप टॉप किंवा हेवी दुपट्ट्यासोबत परिधान करू शकता.